रोम आणि व्हेनिस

सांगलीचा भडंग's picture
सांगलीचा भडंग in भटकंती
8 Feb 2015 - 9:34 pm

शेवटी एकदाचे ठरले भटकंती करायला जायचे. एकदाचे म्हणण्याचे कारण म्हणजे प्लान साधारण ५-६ दिवसाचा ठरला होता आणि छोट्या अडिज वर्षाच्या मुलासोबत फिरायला जाणे म्हणजे १० वेळा विचार करायला लागतो . या आधी बर्याच वेळा फिरण्याचा प्लान ' आता नको मुलगा थोडा मोठा झाल्यावर बघू ' या सबबीवर बायकोचे आणि माझे एकमत झाल्यामुळे बारगळलेला असतो
पण आता युरोप ला आलोच आहे कामानिमित्त तर निदान आसपास ची २-४ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे तरी किमान बघू ,क्या पता कल हो न हो ... आणि या मुद्यावर (परत) एकमत झाले.( क्या पता कल हो न हो फिलिंग : हे फिलिंग फक्त ट्रिप च्या खर्चाशी रीलेटेड होते. म्हणजे सांगलीला आलोच आहे तर किमान पन्हाळा,रंकाळा , नरसोबा वाडी तर जाऊन यावे. प्रवास खर्चामध्ये बचत होईल टैप )

आता ठिकाण शोधायचा मागे लागलो पण ते तर लगेच ठरले -- रोम आणि व्हेनिस.,,

आता दुसरा टप्पा माहिती काढणे हा प्रकार मला सर्वात जास्त आवडतो . स्वत: माहिती काढून आपला आपण प्रवास करणे यासारखी मजा दुसरी नाही. पण यावेळी एकाचे दोन आणि दोनाचे तीन झाल्यावर सगळ्या गोष्टी कश्या पटकन चेंज होतात त्याचा अनुभव आला … एकटा असताना शुक्रवारी रात्री ठरून शनिवारी सकाळी ५ वाजता बाहेर पडता येत होते एकाचे दोन झाल्यावर शनिवारी सकाळचे १२ वाजायचे आणि आता तीन झाल्यावर 'एवढी गडबड आणि जीवाला त्रास करून जायलाच हवे का या मुद्यावर शनिवारी रात्रीच्या जेवणा पर्यंत फक्त चर्चा होते … पण यावेळी 'क्या पता कल हो न हो फिलिंग' असल्याने काही प्रोब्लेम नव्हता.

मग रेग्युलर वेबसाइट मदतीला आल्या क़हि नवीन ची भर पडली
www.tripadvisor.com : जगातली सर्वात एक नंबर साइट . इथे तर कुठल्याही शहरातल्या बारीक सारीक गोष्टी चे पण रीव्हु असतात .फ़क्त बराच वेळ द्यावा लागतो वाचायला/ शोधायला
https://www.ricksteves.com/ : हि दुसरी एक . युरोप ची आयडिया येण्यासाठी चांगली आहे .
http://www.skyscanner.nl/?usrplace=NL&langid=en : यावर लोएस्ट भाडे मन्थवईज बघता येते
http://www.trenitalia.com/trenitalia.html : इटली मधल्या २-३ ट्रेन कंपनी पैकी १

http://www.booking.com/ http://www.expedia.co.uk/ http://www.makemytrip.com/ : रेग्युलर वेबसाइट आहेत कधी कधी भारतीय वेबसाइट वर रुपयामध्ये डील एकदम मस्त मिळते
पण ट्रेव्हल वेबसाइट वर माहिती काढून डायरेक्ट एअर लाईन आणि हॉटेल च्या वेबसाइट वर बुकिंग करणे फायदेशीर असते असा अनुभव आला . रेट /कॅन्सलेशन साठी बरे पडते

यावेळी राहण्यासाठी हॉलिडे अपार्ट्मेण्ट घेण्याचे ठरले होते . याआधी किचन असलेली हॉटेल ट्राय केली होती पण अपार्ट्मेण्ट अशी कधी घेतली नव्हती . त्यामुळे थोडी भीती /रिस्क दोन्ही वाटत होती कारण सगळाच प्रकार नवीन होता माझ्या साठी. पण म्हणले बघू तरी करून अशीच माहिती घेत घेत दोन वेबसाइट सापडल्या

http://www.housetrip.com/ : हि वेबसाइट मस्त वाटली . आता पर्यन्त ३-४ वेळा वापरली आहे .
https://www.airbnb.com/ : हि तर जगप्रसिद्ध आहे आणि व्हेनिस चे बुकिंग यावरूनच केले होते .

तर सगळी माहिती काढून साधारण प्लान पक्का केला होता . बरोबर मुलगा असल्याने जास्त धावपळ हेक्टिक न करता निवांत मजा घेत फिरायचे असे ठरले .
( अेम्सटरडेम रोम - फ़्लाइट) रोम -3 दिवस (रोम- व्हेनिस - झुकझुक गाडी ) व्हेनिस : २.५ दिवस
(व्हेनिस-->अेम्सटरडेम - फ़्लाइट)

-------------------------------
रोम :
-------------------------------
तर पोचलो एकदाचे रोम आणि झाली आमची ट्रीप स्टार्ट . एअरपोर्ट ते रोमा टर्मिनी ( मेन स्टेशन ) एक बस बुकिंग केले होते ( http://www.terravision.eu/ ) त्यामुळे साधारण तासाभरात रोमा टर्मिनी ला पोचलो . मग रोमा पास घेतला ( http://www.romapass.it/ ) आणि सरळ हॉटेल मध्ये गेलो. रोमा पास चे फायदे तोट्य पेक्शा जास्त असल्याने तो घेणे सोयीचे आहे .

आम्ही रोम साठी लक्स अपार्ट्मेण्ट बुक केली होती . फेमिली साठी मस्त आहे. आणि लोकेशन पण ओके आहे http://www.luxappartamenti.it/en/Index.html

पब्लिक ट्रान्सपोर्ट ओके आहे . एकदाच गेलो मेट्रो ने पण भयानक गर्दी होती . छोट्या मुलाला विथ स्ट्रोलर घेऊन बराच त्रास झाला . पण बस सर्विस उत्तम आहे

रोम मध्ये सहज रस्त्यावरून फिरणे पण मस्त अनुभव आहे . साधारण प्रत्तेक ४ बिल्डिंग नंतर एक चर्च आहे . पिझ्झा पास्ता आणि आईस्क्रीम मस्त मिळतात . आणि रेस्तोरेंट मधली हाउस वाईन ( रेड) पण बरी असते त्यामुळे खाण्यापिण्याचे फार काय हाल होत नाहीत

रोम फिरायाच्या आधी थोडाफार इतिहास वाचून गेलेले जरा बरा पडते . साधारण सगळ्यांना दुसर्या महायुद्ध आणि नंतर असा इतिहास बर्यापैकी माहित असतो . पण रोम शहर इतके जुने आहे इतके जुने आहे कि त्याच्या सगळ्याच जागा हजारो वर्षापासूनचा इतिहास सांगत असतात . आईफेल टोवर चा इतिहास माहित नसताना बघून आले तरी फार काय फरक पडत नाहि पण कलोझीय म आणि सेंट पिटर्स चर्च सारखी ठिकाणे बघताना थोडा इतिहास माहित असला कि जास्त मजा येते .

१. कलोझीयम : रोमा पास मध्ये हि एन्ट्री असते आणि लाईन पण सेपरेट असते . ओडिओ विडिओ गाईड म्हणून आईपोड टच मिळतो . मस्त माहिती मिळते
rome2
test

२.रोमन फोरम : कलोझीयम च्या जस्ट मागे. त्यामुळे कलोझीयम आणि रोमन फोरम एकाच वेळी करणे सोयीस्कर आहे
Rom3

३. पिएझ्झा नोवोना
rome4

४. पेन्थॆओन
rom5

५. सेंट पिटर्स चर्च : http://biglietteriamusei.vatican.va/musei/tickets/do?action=booking
वेटीकन म्यूझीयम साठी आधी तिकीट काढलेले बरे .वरच्या लिंक वर आहे इन्फो .
rom6

हा खालच्या टोप व्हियु साठी डोम वर जाण्यासाठी लिफ्ट आहे ,पण नंतर पायऱ्या पण बर्याच आहेत त्या पण डोम च्या कर्व ला लागून . छोट्या मुलांना घेऊन थोडा त्रास होतो पण मस्त आहे . कष्ट घेण्यासारखा व्हियु आहे
r7

35
36
वेटीकन म्यूझीयम मधल्या पायऱ्या
9

६. सेंट अन्जेलो कॅसल
9

७. स्पानिश स्टेप्स : आम्ही गेलेलो तेव्हा त्रेवी फौंटन आणि स्पानिश स्टेप्स चे बरेच काम चालू होते . त्रेवी फौंटन पूर्ण बंद होता
10

८. पिएझ्झा डेल पोपोलो
11

९. पिएझ्झा वेनेझिया
12

१०. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अधून मधून मुलाला असा ब्रेक दिला कि तो पण खुश आणि आम्ही पण खुश . फुल १ तास भर दंगा आणि खाणे पिणे झाले कि फुल चार्ज . त्यामुळे आम्ही कुठेही एक पोइण्ट फिरून आलो कि निवांत अर्धा एकतास ब्रेक घायचो. रोम फिरण्याचा विथ स्मौल चैल्ड तसा फार काय त्रास झाला नाही
13

-------------------------------
व्हेनिस :
-------------------------------
व्हेनिस साठी रोमा टर्मिनि पासून आधी बुकिंग केले होते असल्याने फार त्रास नव्हता . ट्रेन प्रवासाला साधारण पाउणे चार तास लागतात . प्रवास चांगला आहे आणि ट्रेन पण फास्ट आहे . थोडे फार कण्ट्रि साईड चा एरिया मधून जाते . पण माझा बराच वेळ ट्रेन च्या एका डब्या मधून दुसर्या डब्यात मुलाच्या मागे फिरण्यात गेला . फुल टाईम पास आणि पळापळ चालू होती . लहान मुलांचे एक बरे असते . भाषेचा प्रोब्लेम काही येत नाही . तो आणि एक म्हातारी आजी मस्त मराठी आणि इटलीअन मध्ये गप्पा मारत होते १५-२० मिनिट . त्याच्या खेळण्यातल्या गाड्या दाखवत काय वाटेल ते सांगत होता तिला . आणि ती पण मन लाऊन आइकत उत्तरे देत होती .

स्टेशन मधून बाहेर पडले कि लगेच त्यांचा मेन कॅनल सुरु होतो . खरोखर पाण्यामध्ये शहर . फर्स्ट इम्प्रेशन तरी फर्स्ट क्लासच होते . वा क्या बात है टाइप फिलिंग .
तिथे वोटर टेक्सी चा पास मिळतो ( वेपेर्रेतो ) http://www.actv.it/en/company/company हे घेतले कि काम झाले . सगळा प्रवास त्या पास वर मस्त होतो .
तो पास घेतला आणि त्या अपार्ट्मेण्ट वाल्याला फोन केला . airbnb.com पहिलाच अनुभव आणि पेपाल वरून पैसे दिलेले होते त्यामुळे अजूनच रिस्क . पण तो माणूस ठरलेल्या जागी लगेच आला आणि अपार्ट्मेण्ट मध्ये घेऊन गेला . अपार्ट्मेण्ट अगदी मेन लोकेशन ला बुक केले होते (रेअलतो ब्रिज च्या जवळ ) आणि एक फुल फार्निशड् फ़्लेट च होता .त्यामुळे तसा निवांत झालो .

व्हेनिस तसे मस्त गप्पा मारत इकडे तिकडे फिरण्याचे ठिकाण आहे . सगळे शहरच टुरिस्ट स्पॉट आहे ( मेन बेट, कनाल , गंडोला आणि अजुबाजूची छोटी बेटे ) त्यामुळे वेळ कसा गेला तेच काळत नाही .
ग्रांड कनाल सर्वात मस्त आहे , सेन मार्को स्केअर आणि चर्च , रेअलतो ब्रिज , मुरानो आणि बुरानो अशी दोन बेटे आहेत . त्यापैकी बुरानो चांगले आहे .

गंडोला राईड मस्त असती . आम्ही गेलेओ तेव्हा साधारण ८० युरो अर्ध्या तासासाठी घेत होते . आम्हाला एक ओस्ट्रेलिअन कपल भेटले आणि त्यांनी शेअर करणार का म्हणून विचारले. एका गंडोला मध्ये ४-५ लोक मस्त बसून एन्जोय करू शकतात . पण त्यामुळे एक फायदा झाला. आम्ही कॅमेरे एक्सचेंज केले आणि फोटो काढले दुसर्या कोण तरी काढल्याशिवाय गंडोला मधले फोटो चांगले येणे अवघडच आहे . सेल्फी ला काय मजा नाय :-)

व्हेनिस खरोखरच एक अमेझिंग एक्सपीरिअन्स आहे . छोटे मोठे कनाल , गल्ली बोळ , रस्ता चुकणे , कनाल साईड ची रेस्तोरन्तस , पाण्यात पाय सोडून बसणे , गंडोला राइड , कलरफुल घरे सगळेच मस्त

बचना हे हसीनो मधल्या खुदा जाने के गाण्यामधली पहिली २-३ मिनिटे मस्त दाखवले आहे व्हेनिस.
https://www.youtube.com/watch?v=KXQmkPrmaPw

18

65
ह्या खालच्या चित्रामध्ये जो मागे टोवर दिसत आहे तिथून मैन व्हेनिस चा पेनेरोमा मस्त दिसतो
19

वरच्या फोटो मध्ये जो टोवर दिसत आहे तिथून काढलेला पेनेरोमा
21

22
24

रेअलतो ब्रिज
26

30

45

बुरानो बेट
28

45

चिरंजीवानी पण ट्रीप मस्त एन्जोय केल्याने जास्त मजा आली

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

8 Feb 2015 - 11:10 pm | खटपट्या

खूप मस्त लेख आणि फोटो !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Feb 2015 - 11:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो अतिशय मस्तं!!!!

श्रीरंग_जोशी's picture

9 Feb 2015 - 12:49 am | श्रीरंग_जोशी

फोटो खूप सुंदर आहेत. वर्णन निवांतपणे वाचतो.

जुइ's picture

9 Feb 2015 - 2:11 am | जुइ

सुदंर फोटो!!

अर्धवटराव's picture

9 Feb 2015 - 2:25 am | अर्धवटराव

सुंदर प्रवासवर्णान. छायाचित्रं देखील उत्तम. सगळ्यात बेस्ट चिरंजीवांचा फोटो :)
लगे रहो.

चौकटराजा's picture

9 Feb 2015 - 5:21 am | चौकटराजा

आता यातील फोटो बरेचसे आंजावर पहायला मिळतात. उत्सुकता असते ती तुमचा " मिनिट टू मिनिट" प्रवास कसा झाला याची. काही सूचना उदा. मेट्रोमधे गर्दी होती. या उपयुक्त आहेतच. बाकी रोमचा व व्हेनिसचा लांबलचक इतिहास इथे दिला नाहीत ते चांगलेच झाले.पण दिवस १ स़काळचे -- ७ - लिओनार्दो एअर पोर्ट ते टर्मिनी.... मग दिवस १ -- सकाळचे १० -अमुक अमूक असे दिले असते म्हणजे आमच्या सारख्या भावी प्रवाशाला ते स्टॉप टू स्टॉप नियोजन करायला मार्गदर्शक ठरले असते. आठवत असल्यास तशा प्रकारे हा धागा परत लिहावा ही नम्र विनंति. बाकी आपण दिलेल्या वेब साईटचा संदर्भ फारच उपयोगी आहे. धन्यवाद.

सांगलीचा भडंग's picture

9 Feb 2015 - 2:36 pm | सांगलीचा भडंग

सगळ्यांचे आभार. मिसळपाव चा सदस्य बरेच दिवसा ( वर्षापासून ) असलो तरी बराच वेळ फक्त वाचनमात्र भूमिकेमधेच असतो .
@ चौकटराजा : डिटेल प्रवास लिहिला असता तर ते फारच कंटाळवाणे झाले असते .लिहायला पण आणि वाचायला पण . त्यामुळे फक्त साधारण अंदाज येईल असत प्रयत्न केला आहें

राम्राम सांगलीकर. मजा आली धागा वाचून अन फटू बघून. सायटी दिल्यात ते बरे केलेत म्हणजे बाकीच्यांनाही मदत होईल.

(एक मिरजकर) बॅटमॅन.

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 2:48 pm | सविता००१

पण मला सगळ्यात हे आवडलं. - लहान मुलांचे एक बरे असते . भाषेचा प्रोब्लेम काही येत नाही . तो आणि एक म्हातारी आजी मस्त मराठी आणि इटलीअन मध्ये गप्पा मारत होते १५-२० मिनिट . त्याच्या खेळण्यातल्या गाड्या दाखवत काय वाटेल ते सांगत होता तिला . आणि ती पण मन लाऊन आइकत उत्तरे देत होती .
कित्ती गोड

केदार-मिसळपाव's picture

9 Feb 2015 - 7:28 pm | केदार-मिसळपाव

सुरेख लिहिलेय. आवडले बुआ. अजुन अनुभव लिहित राहा.

सर्वसाक्षी's picture

9 Feb 2015 - 7:41 pm | सर्वसाक्षी

सर्व चित्रे सुंदर टिपली आहेत. सुरेख सफर.

चोरटेपणाचा अनुभव / त्रास? इटालीत चोरट्यांचा सुळसुळाट अस्ल्याचे ऐकुन आहेत. बस- ट्रेन मध्ये गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापणे, शहरात फिरत असताना मोटरसायकलवरुन आलेले भुरटे कॅमेरा वा पर्स खेचून पळतात,अगदी विमानतळावरही बॅगा गायब होतात म्हणे. शिवाय एकट्या दुकट्याला रात्री काहीतरी कुरापत काढुन लुटले व बसमधुन उतरवले जाते असा अनुभव ऐकला होता.

आपला अनुभव कसा काय?

सांगलीचा भडंग's picture

10 Feb 2015 - 2:49 am | सांगलीचा भडंग

वयक्तिक अनुभव तरी आला नाही काही पण हो आधी बरेच ऎकले होते . आणि तसेही मेन टुरिस्ट स्पोट /रस्ता सोडून फार बाहेर कुठे गेलो नाही . एक जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे बेसुमार बांगलादेशी होते । सगळ्या टुरिस्ट स्पोट अल्मोस्ट तेच फेरीवाले होते पाण्याची बाटली , खेळणी , फुले, सोवेनिअर आणि बरेच काही .

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:41 pm | दिपक.कुवेत

व्हेनीसचे विशेष आवडलेत.

पैसा's picture

9 Feb 2015 - 7:47 pm | पैसा

खूप छान लिहिलंय अन फोटो तर खासच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2015 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख सफर.

-दिलीप बिरुटे

भारी फोटू व वर्णन! तुमचा मुलगा गोड आहे.

सांगलीचा भडंग's picture

10 Feb 2015 - 2:49 am | सांगलीचा भडंग

आभारी आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Feb 2015 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त सफर आणि फोटो !

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2015 - 2:04 am | प्रभाकर पेठकर

व्हेनिस आणि रोम दोन्ही शहरे सुंदर आहेत. ऐतिहासिक आहेत.

तसेच, नेपल्स जवळचे, ७९ साली ज्वालामुखीच्या राखेत गाडले गेलेले पाँपेई शहर आणि तिथले अवशेष पाहताना आश्चर्यही वाटते आणि झालेल्या हा:हा:काराने अंगावर काटाही येतो. त्या अवशेषात एक जातं पहायला मिळालं आमच्या गाईडने, 'तो जुन्याकाळचा ग्राईंडर आहे, हल्ली पाहायला मिळत नाही' अशी माहिती दिली. तिला मी, 'भारतात अजूनही हा 'ग्राईंडर' वापरतात' अशी माहीती पुरविल्यावर तिला आश्चर्याचा जबरदस्त धक्काच बसला. ७९ सालीही पाँपोई शहरात पाणीपुरवठ्याची उत्तम व्यवस्था होती. तांब्याची पाईप लाईन होती. तिचे अवशेष आजही पाहायला मिळतात. पाँपोई शहर ११००० लोकवस्तीचं होतं. तिथे भरपूर व्यस्त असे समुद्री बंदार (पोर्ट) होते. त्यामुळे तिथे अनेक देशीच्या खलाशांची ये-जा आणि वास्तव्य असे. त्यांच्या सेवेसाठी तिथे सर्व सुखसोयी होत्या. क्लब, जिम, सार्वजनिक न्हाणीघरे, उपहारगृहे आणि वेश्यावस्तीही होती. वेश्यांचा मोहल्ला आजही पाहायला मिळतो. वेश्यांच्या दुकानांमधून, भारतातून आयात केलेली, कामसुत्राची चित्रे चितारलेली दिसून येतात. रस्त्याला, मोहल्याला जशी नांवे असतात तसे इथल्या वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या मोहल्याबाहेर, दगडात कोरलेले पुरुषांच्या उद्दीपीत लिंगाचे शिल्प आहे. तेच गल्लीची दिशादर्शक म्हणून वापरले आहे.
सार्वजनिक सभागृह, कोलॅसिअम सारखे खेळगृह, अपोलो (सूर्य) मंदिर, श्रीमंतांची घरं, गुलामांची घरं, सर्वसामान्यांचे मोहल्ले, पाणपोया इ.इ. आखिव आणि रेखिव शहराचे अवशेष दाखवितात. हे शहर ७९ सालचं आहे. म्हणजे आजपासून १९३६ वर्षांपूर्वीचे आहे. सकाळी साडेदहावाजता ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि लाव्हा तसेच राख पाँपोई शहरावर आली. राखेचा जवळ जवळ ४ ते ६ मीटरचा थर बसून शहर गाडले गेले. ११ हजार वस्तीपैकी २ ते अडीच हजार लोकांची प्रेते उत्खननात सापडली बाकी लोकांचे काय झाले अजून माहिती नाही.

आधीपासून अत्यंत सुपीक असणार्‍या पाँपेईची जमीन ज्वालामुखी उद्रेकानंतर अधिक कसदार झाली. आजही तिथे राहण्यास, वस्ती करण्यास सरकार मनाई करते आहे. पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होईल आणि तो ७९ सालापेक्षा अति भयानक असेल असे अनुमान आहे. तिथली जागा सोडून इतरत्र स्थाईक होण्यासाठी सरकार तिथल्या लोकांना प्रोत्साहन देते. आर्थिक मदतही करते. पण लोकं जागा सोडत नाहीत. 'एकदा झालं म्हणून काय झालं, आता उद्रेक होणार नाही' अशी तिथल्या लोकांची (गैर) धारणा आहे.

इटालीला कधी गेलात तर पॉम्पोईला जरूर जरूर भेट द्या.

सांगलीचा भडंग's picture

10 Feb 2015 - 2:53 am | सांगलीचा भडंग

हो पाँपेई ची थोडी माहिती काढली होती पण जायला जमले नाही . नेपल्स च्या जवळ कॅप्री म्हणून एक बेट , ते पण भारी आहे असे फोटो बघून तरी वाटते . रोम वरून वन डे ट्रीप होऊ शकेल असे वाटते

मस्त प्रतिसाद ! पॉम्पोई चे काही फोटो बघितले होते आंजा वर. त्याचं संग्रहालय पण आहे ना तिथे. नुसतं बघताना आणि त्या संदर्भात गूगलून वाचताना पण अंगावर काटा आला होता. तुमचं वर्णन पण जबरदस्त !

सांगलीकर तुमचं लेखन आणि फोटो पण आवडले. लिन्क्स दिल्या ते खास च आवडलं. आणि खरंच फार गोड मुलगा आहे तुमचा. अजून असेच मस्त प्रवास करा आणि आम्हाला छान छान फोटो दाखवा.

रेवती's picture

10 Feb 2015 - 7:06 pm | रेवती

प्रतिसाद आवडला काका!
नुकतेच त्या शहराबद्दल समजले होते. मुलं आजकाल त्या शहराच्या आठवणीवर बेतलेलं गाणं म्हणत असतात.

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2015 - 6:19 am | नगरीनिरंजन

प्रतिसाद आवडला! तुम्ही स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती!

एकदा झालं म्हणून काय झालं, आता उद्रेक होणार नाही' अशी तिथल्या लोकांची (गैर) धारणा आहे.

मुळात पहिल्यावेळीही उद्रेक व्हायची सगळी लक्षणे दिसत असूनही लोक ढिम्म हालले नाहीत. माणसाचा मेंदू होपलेसली ऑप्टिमिस्टीक असतो; काही वाईट घडेल अशी शक्यताही त्याला नकोशी वाटते; खात्रीतर सोडूनच द्या. "अन्या: स्थावरमिच्छन्ति" एवढेच नसून स्थावरं गृहीतही धरले जाते. सध्याही हे लागू आहेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2015 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

पेठकर साहेब तुमचा युरोप सहलीचा लेख अजून प्रतिक्षेत आहे... टाका लवकर वेळात वेळ काढून.

पदम's picture

10 Feb 2015 - 3:13 pm | पदम

छान फोटो

मितान's picture

11 Feb 2015 - 10:51 am | मितान

चांगलं प्रवासवर्णन !

गणेशा's picture

11 Feb 2015 - 11:17 am | गणेशा

अप्रतिम प्रवास वर्णन.

लिंक्स दिल्या ते बरे झाले.
फोटो छान .. मुलाचा फोटो मस्तच.

असेच फिरत रहा..

इशा१२३'s picture

12 Feb 2015 - 12:26 pm | इशा१२३

छान वर्णन आणि अप्रतिम फोटो.रोम फार सुंदर आहे.जुने अवशेष कष्टाने जपले आहेत.कलोसियम आणि आजुबाजुचा परिसर जुन्या रोममधे फिरत असल्याचा अनुभव देतो.केवढ्यातरी जुन्या वास्तु अस्तित्व दाखवतात.त्रेवी फौंटन आम्ही गेलो त्यावेळेस सुरू होत पण आतोनात गर्दी.वेटिकन म्युझियमा तर भली मोठी रांग.इस्टर असल्याने गर्दी आहे अस गाईडने सांगितले.
पिसा टॉवरच्या इथे पुर्ण खबरदारि घेउनहि एका महिला टोळीने आमच्या टुर बरोबर असलेल्या एका काकुंचा पाउच पळवलाच.लक्षात यायच्या आधिच अगदी पाच मिनिटात एक लहान मुलगी तो पाउच दुसर्या एकांच्या हातात देउन पळाली.पैसे गेलेच. नशीबाने पासपोर्ट आणि एतर गोष्टी मिळाल्या.इटली चोरांचा अनुभव असा मिळाला.पण तरि इटली आवडले.
वरचा पेठकर काकांचा प्रतिसाद माहितीपुर्ण.पाँपेई बघायचय अजुन.ते राहिलच.

सुधीर कांदळकर's picture

19 Feb 2015 - 7:36 am | सुधीर कांदळकर

व्हेनिस जबरदस्त्च.

आवडले.

प्रियाजी's picture

22 Feb 2015 - 3:24 pm | प्रियाजी

लेख खूप आवडला. फोटोही अतिशय छान. आमच्या सहलीच्य आठ्वणी परत ताज्या झाल्या. लिन्क्स दिल्याबद्द्ल धन्यवाद. तुमच्य मुलाला गोड पापा. मुलाच्या कलाने हे सर्व पहाण्यात तुमची ही कसोटी लागली असेल. तरीसुध्हा एवढे सुंदर फोटो काढ्ण्यात तुमच्या पत्नीचीही नक्कीच मदत असणार त्यासाठी त्यांनाही सलाम.

अमुक दिवसांत आणि लहान मुलगा बरोबर आहे लक्षात ठेवून ट्रीप आखली आणि कशी आखली ते लिंकसह दिल्यामुळे एक आदर्श प्रवासनियोजन झाले आहे. इथे मांडणीही चांगली केली आहे.
-तासगावला आजोळी सुट्टी घालवलेला मिपाकर.