खरड फळा रे खरड फळा

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
5 Feb 2015 - 5:06 pm

खरडफळा रे खरडफळा,
जरी तुझा रंग नाही काळा,
तुझ्या अंगी विविध कळा,

येथेच होते सुरुवात मिपाकरांची अभिवादनाने,
मुख्य धाग्यापेक्षा इथेच जास्त खडाजंगी घडे,

कोणी काढतो इथे दुसर्याच्या नावे गळा,
पॉपकॉर्न खात जग बघती तेवढाच विरंगुळा,

पडिक मिपाकरांचा हा जालिय मेळावा,
अहोरात्र इथे केव्हाही टंकाळा,

खरडफळा रे खरडफळा,
जरी क्षणिक लाभले आयुष्य तुझला,
तरी मिपाचा तु भरजेरी शेला.

खरडफळा रे खरडफळा.

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 5:16 pm | प्रचेतस

झकास हो देर्देकर.
बाकी ह्या खरड'फ़ळ्या' मुळे फळा ह्या लोकप्रिय कवितेची आठवण झाली।

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 5:29 pm | सस्नेह

बा लीलाधरा, कुठे आहेस तू ? =D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2015 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा

+++++११११११ कचकुन सहमत हाय!

मात्र त्या काव्याचे जनक .. श्री. लीलाधर स्वामी महाराज हे सध्या प्रा"पंचिक सुखात विहरत असल्यामुळे, त्याच्या(प्रत्यक्ष मिळालेल्या :-D ) परिणाम रूपावर भाळुन लळा ,नावाची एक गोंडस बालकविता पाडण्यात व्यस्त आहेत,असे कळले आहे!

कंजूस's picture

5 Feb 2015 - 6:16 pm | कंजूस

थाळीपेक्षा फुटाणे बरे.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 7:36 pm | मुक्त विहारि

पण कधी-कधीच

कंजूस's picture

6 Feb 2015 - 3:42 pm | कंजूस

थाळी =पुर्ण लेख
फुटाणे =चटपटीत छोटा विचार

चचुकडीची आठवण झाली दर्दुकाका!!

लीलाधर's picture

5 Feb 2015 - 8:53 pm | लीलाधर

फळा फळा रे फळा फळा
येथे जमतो नव कवींचा मळा

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 9:03 pm | प्रचेतस

गोड माझा बाळा, त्याचा लागला लळा
आला उमाळा, प्रतिभा वाहिली भळाभळा

बदलायला मी दुपटी रोज, शिकतोय मी बाळा
सोनुलं तुजला बघून लागला मज लळा

दोनोळींनी काम नाही चालायचं.लिलाध्रा,फुल कविता पाड.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2015 - 9:13 pm | अत्रुप्त आत्मा

++++११११११११

गणेशा's picture

5 Feb 2015 - 11:37 pm | गणेशा

छान ..

खरडफळा खरेच असा आहे काय ?

बहीरखेडकर's picture

10 Feb 2015 - 11:00 pm | बहीरखेडकर

गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला
लागला तुझा लळा..

कवि...