खान्देशी भरीत

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
22 Jan 2015 - 10:06 am

बहुतेक आपल्या मिपावर आधीही आली आहे याची पाककृती.
पण म्हटलं मिपा आहे घरच तर होवु दे खर्च. आता अपर्णा ताई आणि मितान सारखे रसाळ वर्णन करून लिखाणाची माझ्याकडे प्रचंड कमतरता असल्याने आपली साधी सरळ डायरेक्ट पाककृतीच देते.
साहित्य-
भरताची वांगी(हिरवी) – 1 किलो,
कांद्याची पात – अर्धी जुडी,
लसूण+ मिरची पेस्ट- आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेवुन,
शेंगदाणे—1 वाटी,
तेल- 1 वाटी,
मीठ,
कोथंबीर.
कृती—
भरताच्या वांग्याना टोचे मारून तेल लावून गॅसवर छान भाजुन घ्यावे.
vangi
भाजलेले वांगे गॅसवरुन उतरवल्यावर लगेच झाकण ठेवावे. यामुळे वांगे छान मऊ होते.
सगळी वांगी अर्धा तासाने सोलून घ्यावीत. वांगी सोलताना त्यात थोडे तेल आणि वाफेचे पाणी दिसेल ते तसेच ठेवावे.
सोललेली वांगी एकदा चेक करून घ्यावीत, नाहीतर नोन-व्हेज भरीत खावे लागेल.आता ही वांगी बडगीत घेवुन मस्त कुटून घ्यावे.
ही बडगी
v
आता एका कढईत वाटीभर तेल(यात कंजूषी करू नये) चांगले तापवून शेंगदाणे छान तळून घेवुन बाजुला काढून ठेवावेत.
v
त्याच तेलात लसूण+मिरची पेस्ट मस्त फ्राय करून कांद्याची पात फ्राय करावी.
v

v
खुप शिजवु नये पातीला नाहीतर पात काळपट दिसेल. आता त्यात कुटलेले भरीत घालून एक वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. सगळ्यात शेवटी कोथंबीर घालुन गॅस बंद करावा.
v

खांन्देशात यात हळद घालत नाहीत. आणि उगाच थोडा टमाटा घातला असेही करू नये.
v
मी या बरोबर कळण्याच्या पुर्‍या केल्या होत्या.
कळण्याच्या भाकरी, पुरीची रेसीपी उद्या देते. त्याचे फोटो नवर्‍याच्या मोबाईल मध्ये आहेत.
फोटोची क्वालिटी मोबाईल ने घेतल्याने बर्‍यापैकी खराब असल्याची कल्पना आहे.
जाहिरात- आपला एक कॅमेराचा धागा रेफर करून नवीन कॅमेरा मागवण्यात आला आहे. आजच मिळणार असून तिकडे कॅमेरा दाखवण्यात येईल.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 10:13 am | त्रिवेणी

संमं फोटो थोडे मोठे करुन द्या न प्लीज. नेह्मी प्रमाणे आताही मार खाल्ला.

स्रुजा's picture

22 Jan 2015 - 10:21 am | स्रुजा

मस्त गं ! खमंग लागत असेल कान्दा पाती मुळे एकदम . तुझा खान्देशी मसाला नाही का घालायचा यात ?

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 10:24 am | त्रिवेणी

नाही. कोणताही मसाला, तिखट किवा हळद यांच्या मोहापासून दूरच रहावे.

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 10:25 am | सविता००१

झक्कास गं. आता हिरवी वांगी शोधून काढतेच.
सुंदर पाककृती.
आणि आता ही बडगी कुठे शोधू?? ;)

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 10:28 am | त्रिवेणी

भुसावळ ला.

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 10:33 am | सविता००१

:)

पाहिजेच होती ही त्रि स्पेशल भरीताची पाकृ.धन्स गं.
रच्याकने:-त्रिच्या हातचे हे भरीत खाऊन स्वतः करायचे आणि दुसरीकडे खायचे बंद केलेली,त्रि भरीतप्रेमी-अजया!!

त्रिवेणी, सुंदरच करतेस तू भरीत !
अनाहिता कट्ट्याला खाल्लेल्या तुझ्या हातच्या भरताची चव अजून आठवतेय.

भरतासाठी आणलेल्या वांग्यात खुळखुळा वाजावा एवढ्या बिया असतिल तर काय करावे ?
बडगी नसेल तर कशात कुटावे ?

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 10:39 am | मुक्त विहारि

तसे आमच्यात पण खान्देशी गूणसुत्रे असल्याने, भरीत प्राणप्रिय...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Jan 2015 - 12:39 am | निनाद मुक्काम प...

जळगाव वरून आमचे नातेवाईक वांगी घेऊन येतात मग घरी भरीत होते , खानदेशी
एकदा कोकणस्थ घरी वांग्यांचे भरीत म्हणून काहीतरी लिबलिबीत खाल्ले , होते, त्याची आठवण झाली.
मासे कायस्थाने व भरीत देशस्थाने करावे असे आमचे आजोबा म्हणतात

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 10:52 am | त्रिवेणी

तशी वांगी घेवुच नयेत. वांग घेताना त्यावर टकटक आवाज करून बघावा.
आणि बडगी नसेल तर हात साबणाने स्वच्छ धुवून स्मश करावे.

मस्त मस्त !!! आता परत करावे लागणार भरीत !आणि हो कट्ट्याला खाल्लेले तुझ्या हातचे भरीत खरेच खूप सुंदर झालेले ...
आणि हो खानदेशी भरीत अगदी याच प्रकारे करावे उगीच त्यात हळद ,टोमाटो,जिरे मोहरी यांचे प्रयोग करू नयेत ..
चल बघते परत कुठे भरीताचे वांगे मिळतायेत का ! कळण्याचे पीठ अजून आहे घरात त्यामुळे लगेच बेत करण्याचा विचार आहे .

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 12:24 pm | मदनबाण

आह्ह... :) मला वांग्याच्या भाजी पेक्षा वांग्याच भरीत जास्त आवडत !
बाकी मंध्यंतरी माझ्या बायडीच्या माहेरकडच्या स्त्री मंडळीं पैकी एकीने मला द्राभा नावाचा पदार्थ खाउ घातला होता... { मी तो पदार्थ खाउन झाल्यावर त्याची स्तुती केल्यावर बायडीची अंमळ जळजळ झाली ! ;) } तो खानदेशी पदार्थ आहे असे कळले ! तसेच बरहाणपुर {बुर्‍हाणपुर} मधे हा पदार्थ केला जात असल्याचे समजले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

विशाखा पाटील's picture

22 Jan 2015 - 2:31 pm | विशाखा पाटील

द्राभा नाही हो, दराबा.

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 3:10 pm | मदनबाण

ओह्ह... यस यस्स... करेक्ट करेक्ट ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

इशा१२३'s picture

22 Jan 2015 - 12:26 pm | इशा१२३

त्रिवेणी मस्त!तुझ्या वांग्याच्या भरीताची चव सुरेखच असते.धन्यवाद पाककृती.

सानिकास्वप्निल's picture

22 Jan 2015 - 12:51 pm | सानिकास्वप्निल

मस्तंच गं !!

मला हे भरीत आपली मिपाकर मैत्रीण स्मिताने खायला आणि बनवायला शिकवले आहे :)
ह्या भारतभेटीत मला बडगी एका मत्रीणीने भेट दिली आहे लवकरच त्यात भरीत ठेचून बघणार आहे.

बाकी तुझ्या हातच्या भरीताचे कौतून खूप ऐकले आहे , नेक्स्ट कट्ट्याला नक्की घेऊन ये त्रि :)

काहि कारणान मला वांग खाय्च नाहीए आणि सगळ्या जणी इतकं वाखाणत खातायत म्ह्ण्ल्यावर अंमळ झालेली जळ्जळ त्रि न घरी दिलेल्या भरताला घरातुन आलेली ही पोच, 'या मावशीकडुन शिकुन घे ग मस्त पोट्भर जेवावं लगतय यच्यासोबत' इति चिरंजीव.

धन्स इथे पा.क्रु. दिलिस

खांदेशी भरीत नाव काढले की कधी खायला मिळेल असे होते.
आमची कृती किंचीत वेगळी आहे. लसूण, मिरची, कोथिंबीर त्या बडगीमधेच ठेचून घेतो अाणि त्यातच सोललेली वांगी ठेचतो. शेंगदाण्यांबरोबर पोपटी हिरव्या मिरच्या पण तेलात तळतो.
हिवाळ्यात ठाण्यात हिरवी वांगी बघितली आहेत. अाणि अामच्या डोंबिवलीमध्ये जळगाव, भुसावळकडुन काही बायका वांगी अाणि ईतर खांदेशी भाज्या विकायला आणतात.
यंदा हिवाळ्यात इकडे मुक्काम असल्याने मनसोक्त भरीत हाणण्यात अाले अाहे.

विशाखा पाटील's picture

22 Jan 2015 - 2:43 pm | विशाखा पाटील

अहाहा! काय आठवण करून दिलीस! भरीत, कळण्याची भाकरी, केळीचं पान. ठेचा...कढी नाही का केलीस? इकडे वांगी मिळतात, पण त्यात भरपूर बिया. अन कळण्याचं पीठ संपलय. त्यामुळे खूप जळजळ होतेय :(

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif
.
.
.
.
http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png

पैसा's picture

22 Jan 2015 - 3:28 pm | पैसा

कट्ट्याला हेच झणझणीत भरीत होतं एकदम! जाम मजा आली होती!!

इरसाल's picture

22 Jan 2015 - 3:32 pm | इरसाल

दिशी र्‍हायलं नं ते.
बामणोदच्या वांग्याहीची आठवण इ र्‍हायली.इकडे कुकडे मियतच नाही ना तें
वावा टाक्याले इसर्लात का.

आरोही's picture

22 Jan 2015 - 3:44 pm | आरोही

आढी म्हणजे कुढी रे भो? डोम्बोली ले खान्देशी वांगे मियता आस ऎकेल हाय मिन्ह त !! पाय भो नेम्बंदी शोध्जो जरा कुढी मुढी भेटी बी जातीन भरतान वांगे तुले ....

मनुराणी's picture

22 Jan 2015 - 10:52 pm | मनुराणी

अापल्याले तं भेटता भो वांगे पाहिजे तवा. अन् बिबडे तं सिंगापूरले येता भो मले.

उमा @ मिपा's picture

22 Jan 2015 - 4:12 pm | उमा @ मिपा

भरीत खुप आवडतं, त्याचाही वेगळा प्रकार असेल हे माहिती नव्हतं
नक्की करेन पण सगळ्यांनी इतकी नावाजलेली तुझ्या हातची चव नाही यायची त्याला.

कालच भरीत केलं होतं तेंव्हा तुझ्या हातच्या खाल्लेल्या भरताची आठवण झाली. खूपच चविष्ट झालं होतं. आता पाकृ मिळालीये व तू मसालाही दिलायस. करून बघते.

मधुरा देशपांडे's picture

22 Jan 2015 - 5:06 pm | मधुरा देशपांडे

मस्तच गं त्रि. आवडता प्रकार. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली पद्धत पण मनुराणी म्हणाली तशी आहे. आता असेही करुन बघेन. फक्त हिरवी वांगी मिळत नाहीत. :(

मनुराणी's picture

22 Jan 2015 - 6:18 pm | मनुराणी

मधुरा, मला पण सिंगापुरात हिरवी वांगी मिळत नाहीत. तुला जांभळी मोठी वांगी मिळाली तर बघ. आणि वांगी घेताना वांगे हातात घेऊन हलके लागतेय का बघावे. जड असेल तर त्यात बिया खूप असतात. त्याचे भरीत चांगले लागत नाही अजिबात. छान हलकी वांगी निवडून घ्यावीत.

मधुरा देशपांडे's picture

22 Jan 2015 - 7:24 pm | मधुरा देशपांडे

हो अगं मी जांभळी वांगीच आणते आणि बाकी खान्देशी पद्धतीने करते. :)

स्रुजा's picture

22 Jan 2015 - 9:48 pm | स्रुजा

छान टिप मनुराणी .

बाकी कळणा म्हणजे काय कुणी सांगेल का ?

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 9:53 pm | त्रिवेणी

कळणा= बाजरी+अक्खे उडीद समप्रमाणात+थोडे मेथी दाणे+मीठ हे सर्व जाड्सर दळुन आणणे.
आरोही बाजरी ऐवजी ज्वारी घेते.
उद्या देते ग डीटेल पाकृ.

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2015 - 5:20 pm | दिपक.कुवेत

प्रत्यक्ष खाल्लेंल्यांकडुन वर्णन एकुन!!

त्रिवेणी's picture

22 Jan 2015 - 5:51 pm | त्रिवेणी

वांग्यांनचा सिजन आहे अजुन. कोणकोण येणार भरीत खायला. परत भरीत करुया.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे ही आभार.
आणि संमं धन्यवाद.
@रेवक्का मसाला नको ग त्यात.
@इरसाल- वोवा नुस्तास खाई लेतस आम्हून. वोवा थोडा उग्र र्हातस म्हणूनसन नाही वापरतस आम्ही भरीतमा.

निवेदिता-ताई's picture

22 Jan 2015 - 10:41 pm | निवेदिता-ताई

त्रिवेणी - कट्टयाला खाल्लेल्या भरीताची चव अजुन जिभेवर आहे.
आता उदयाच बनवते हे भरीत.

मग तो मसाला कुठं वापरू गं? आता मसाला वापरून करण्याच्या पदार्थाची कृती टाक बै!

शेंगदाणे तळले होती त्याच काय केलं? :(
त्या कट्ट्या पासून जो तो नुसता त्रीवेणी भरीत करुन राहय्लाय!! (सॉरी जी ती.....राह्यलीय)

भरीत शिजवायच असत हेच माह्यती नव्हत!! आता या पद्धतिने करुन पाहते.
आणि हो तू,मनुराणी, आरोही काय काडबुड करुन राह्यले बे!!

वेल्लाभट's picture

23 Jan 2015 - 2:24 pm | वेल्लाभट

आमच्याकडे अनेकदा करते आई. जबरदस्त. तेलात कंजूशी नको यात; हे मात्र खरं हं एकदम. काय लागतं ! आहा हा हा ! वाह.

अत्रन्गि पाउस's picture

23 Jan 2015 - 5:27 pm | अत्रन्गि पाउस

जळगावहून येतांना पोत्यात भरून वांगी आणि बोरे आणायचो ...पण हल्ली इथे मिळतात ती फैज्पुरी वांगी....
रच्याक्ने : एके ठिकाणी तळलेले सुक्या खोबर्याचे तुकडे होते भरीतात ..ते पण मस्त लागले होते ...

त्रीवेणी तुझ्या हातच्या भरिताची चव अजुन जिभेवर रेंगालतिये...आता भरीत खायला तुझ्याकडेच येइन म्हणतीय..:)

काकाकाकू's picture

26 Jan 2015 - 5:13 am | काकाकाकू

त्याचं पुढे काय करायचं? कुटून टाकायचे वाढायच्या आधी?

मराठी_माणूस's picture

30 Jan 2015 - 10:05 am | मराठी_माणूस

हाच प्रश्न पडलाय

व्वा. तोंडाला पाणी सुटले.

प्रियाजी's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | प्रियाजी

मी पण आज भरीत केले.घरी खुप आवडले. पण फोटो टाकता येत नाही.

चाणक्य's picture

27 Mar 2016 - 1:35 pm | चाणक्य

एकदम फर्मास जमले.