निमोना

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
9 Jan 2015 - 11:42 pm

काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्‍या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile

मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile

तर चला- करूया निमोना.

साहित्यः- एक किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको)

क्रुती: अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही.

पुर्‍या आणि गरमागरम निमोना वाढा.आणि घरातल्यांचे तृप्त चेहरे पाहून खुश व्हा.

वि.सू: यात फार मसाले, तिखट काहीच नाहीये. तर्री वगैरे काहीच नाही. मटार आणि मसाले यांची अगदी मंद सुवासिक चव हीच या भाजीची खासियत आहे. उगीच खूप साहित्य घातलं तर ती चांगली न होता उग्र होते.
काही लोक यात कांदा, लसूण, बटाटा, टोमॅटो सगळं टाकतात, गरम मसाले वगैरे पण.आणि तेलात करतात. मग त्या भाजीला मटार पेस्ट घातलेला आलू-मटर म्हणतात. ;)अशी खरच करून पहा. आणि गरमच खा. साजूक तुपाची चव केवळ स्वर्गीय असते.

आता माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं वर्णन सांगते ज्यामुळे ही भाजी करण्याच्या प्रेमात पडले मी...
अतिथंडीची पहाट बनारस मधली, चक्क ब्राम्हमुहूर्त. पहाटेचे ३.३०-४ ची वेळ. सगळीकडे प्रचंड धुकं. बोलायला तोंड उघडलं की वाफच दिसणार. सगळे लोक भल्या पहाटे सुस्नात होऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेउन, पूजा करून बाहेर आलेत ती ही वेळ. मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा पूजासाहित्य, पुजारी, भक्तगण यांची लगबग आणि थंडीचा एक पहाटेचा मस्त वास. त्यातच फुलं, पूजासाहित्य यांचा एक दरवळ आणि ज्यांच दर्शन झालंय, त्या लोकांसाठी प्रसादासाठी उघडलेली दुकाने. यात काय असतं हो? तर मोट्ठ्या कढयांमधून रटरटणारा साजूक तुपातला निमोना आणि पुर्‍या. द्रोण भरून वाफाळणारा निमोना आणि पुर्‍या असं या वातावरणात जसं लागतं ते केवळ अवर्णनीय.

म्हणूनच शंभू महादेवांनी काशी ही माझी नगरी हे जाहीर केलं बहुतेक Wink

डिसक्लेमर- मी अजून काशीला गेलेली नाही.ज गेले असतील ते अजून काही सांगू शकतील.

प्रतिक्रिया

मितान's picture

9 Jan 2015 - 11:48 pm | मितान

भारी ! चविष्ट प्रकार ! लिहिण्याची शैलीही चवदार ! :)
एवढ्या रेशिप्या वाचून आता काशीच गाठावी म्हणते ;)

भारीच वाटतेय आणि खूपच सोप्पी पण आहे..

सखी's picture

10 Jan 2015 - 12:17 am | सखी

मस्तच वाटतोय प्रकार, करुन बघणार त्या घुटं चा नंबर लागला की. हे नावही मजेशीर आणि तुझी लिहण्याची शैली तर भारीच!

अगदीच निराळी पाकृ आहे. फोटू डकवल्यास भगवान शिवशंकर आपल्याला पावतील असे धागाकर्तीस वाटते का? ;)

हल्ली फोटोशिवाय पाककृत्या टाकण्याचा ट्रेंड सेट होतोय का मिपावर? तसं असेल तर उद्या आम्ही फोटोशिवाय पाककृत्या टाकल्या तर फोटो फोटो म्हणून ओरडा करु नये. अशा लोकांना या फोटोविरहित धाग्यांच्या लिंका देऊन हे धागे आले तेव्हा ही मंडळी कुठे होतीत असे विचारण्यात येईल.

सविता००१'s picture

10 Jan 2015 - 10:40 am | सविता००१

मी ढ आहे याबाबतीत. म्हणून.
आता परत टाकली ना कुठली पाकृ, तर नक्की टाकेन फोटो.

यशोधरा's picture

10 Jan 2015 - 1:35 am | यशोधरा

मस्त! भन्नाट लिहितेस अगदी :)

स्पंदना's picture

10 Jan 2015 - 11:09 am | स्पंदना

निमोना!!
ऐकुनच मस्त वाटतयं. बनारसच वर्णनही अगदी मस्तच!!

दिपक.कुवेत's picture

10 Jan 2015 - 6:39 pm | दिपक.कुवेत

सवितासारखीच...नं १. पण मटार पेस्ट आणि साजुक तुप ये कॉम्बो कुछ हजम नहिं हो रहा है....असो शेवटि पसंद अपनी अपनी.

सविता००१'s picture

11 Jan 2015 - 6:45 pm | सविता००१

करून पहा ना
मिपा सुपर शेफ ना तू?????
मत बदलेल तुझं.
नाहीतर शेवटी तू म्हणतोस तसं शेवटि पसंद अपनी अपनी आहेच. :(

स्रुजा's picture

10 Jan 2015 - 7:56 pm | स्रुजा

वाह वाह ! काय मस्त वर्णन ! बनारस ला जायची इच्छा झाली तुझं वर्णन वाचून यात च सगळं आलं .

बाकी पदार्थ करून बघणार च :)

मुक्त विहारि's picture

10 Jan 2015 - 10:28 pm | मुक्त विहारि

एक अनवट पा.क्रु. दिल्या बद्दल....

मधुरा देशपांडे's picture

12 Jan 2015 - 1:20 am | मधुरा देशपांडे

करुन पाहिला. फार आवडला हा प्रकार. एक छोटासा बदल केला. एक चमचाभर शोप पण घातली मटार दाणे मिक्सर मधुन काढताना. बाकी तु लिहिलंस तसंच.
हा फोटो.
https://lh3.googleusercontent.com/-AX34wFuDLaM/VLLS9yHBpBI/AAAAAAAAEKI/7vRT2p1HJXM/w866-h577-no/DSC_0949.JPG

सविता००१'s picture

12 Jan 2015 - 9:35 am | सविता००१

कॉलिंग सूड........
बघ रे हा फोटू
काय ट्रेंड बिंड नाही सेट झालेला विदाउट फोटो रेसिप्यांचा ;)

आरोही's picture

12 Jan 2015 - 12:35 pm | आरोही

मस्त वाटतोय हा प्रकार ,पहिल्यांदाच ऐकला ..फोटो बघून जरा नीट कळला कसा दिसायला हवा ..
सवि रेसीपीसाठी आणि मधुरा फोटोसाठी धन्यवाद ग ...

पियुशा's picture

12 Jan 2015 - 10:11 am | पियुशा

मस्त मस्त मस्त !

पिशी अबोली's picture

12 Jan 2015 - 12:43 pm | पिशी अबोली

मी केला.. मी केला.. :)
फोडणी नेहमीप्रमाणे जाळल्यामुळे फोटो-बिटो नाही काड्।अले. पण मस्स्स्त लागला.. एकदम आवडेश.. मटार आणि तुपाची फोडणी दोन्ही आवडतात. दोघांचं काँबो मस्त...

वेल्लाभट's picture

12 Jan 2015 - 1:13 pm | वेल्लाभट

सुरेख वाटतोय ! करायला हवा.

स्नेहल महेश's picture

12 Jan 2015 - 4:25 pm | स्नेहल महेश

मस्तच वाटतोय प्रकार, करुन बघणार

रेवती's picture

12 Jan 2015 - 4:37 pm | रेवती

मधुरा, फोटू छान आलाय.

पैसा's picture

13 Jan 2015 - 3:50 pm | पैसा

पण लसूण न घालता मटार खायची कल्पना अमंळ पचली नै. म्हणून नेटवर शोधले तर कांदा/लसूण्/टोमॅटो घातलेली निमोनाची पाकृ मिळाली. नक्की करून बघेन.

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 4:10 pm | सविता००१

मी लिहिलंय की गं यात की लोक सगळं काही घालून् बनवतात निमोना.
तू कर गं पाहिजे तसा. हा मला येणारा/आवडणारा.
हाकानाका.
जाताजाता:- माझी एक रशियन मैत्रीण आहे. तिचं म्हणणं की तुम्ही भारतीय लोक कित्ती मसाले घालता? त्या मूळ पदार्थाची चव राहिल असं पहा की. छान लागतं. तर तशी ही रेसिपी. मटार चीच चव लागते यात.
आता अजून अवांतरः आमची रेसिपी बघ म्हणून तिने मला कोबीचं सूप दिलं प्यायला. (लोक तरी कसा कसा सूड उगवतात बघ). वरतून म्हणाली- येतो की नाही फक्त कोबीचा स्वाद? मी नि:शब्द ;)

चिपळूणकर's picture

16 Jan 2015 - 8:37 am | चिपळूणकर

मस्त पाककृती... नवीन आहे आणि सध्या मटारची बाजारात रेलचेल आहे तर करून बघायला पाहिजे.

आता पुढची पाककृती मटारची खीर का?

सविता००१'s picture

16 Jan 2015 - 3:33 pm | सविता००१

टाका ना मटारच्या खिरीची पाकृ.

चिपळूणकर's picture

17 Jan 2015 - 2:11 am | चिपळूणकर

पहिलीच पाककृती गोड गोड नको.....

स्वाती दिनेश's picture

17 Jan 2015 - 12:47 pm | स्वाती दिनेश

निमोना हा प्रकार एकदा करुन पहायला हवा, पाकृचे वर्णन मस्त!
स्वाती

मंजूताई's picture

18 Jan 2015 - 2:29 pm | मंजूताई

photo छान झाली भाजी - संडेस्पेशल