गोष्ट जुनी आहे.......
.
कारखान्यात कामे लावून दिली होती..
शांतपणे डेटर/क्रेडिटर च्या याद्या काढत बसलो होतो....साधारण ११ वाजत आले होते अन एक कस्टमर आत आला..
आल्यावर पाणी पिणे इत्यादी झाल्यावर..कळले तो एक सीनियर ट्ल रुम इंजिनियर आहे..नाव आठवत नाही पण जोशी बापट असे असावे.. (सोयीसाठी जोशी )
जोशी मुंबईतल्या.."एस्सेल प्याकेजिग" कंपनीतून आले होते..
"एस्सेल प्याकेजिग" हि कंपनी टूथपेस्ट च्या ज्या ट्यूब्ज व वरची कॅप असते त्या बनवणाच्या व्यवसायात आहे असे त्याच्या बोलण्यावरून समजले..
त्यांनी पिशवीतून एक टुलाचे सॅंपल मला दिले व बॅगेतून एक ड्रॉईंग माझ्या समोर ठेवले..
सॅंपल एक प्ल्यास्टिक डाय होता व त्याला थ्रेडिंग करायचे होते..सॅंपल वर नजर टाकली..ड्राइंग बघितले व त्याला म्हणालो.."काम होऊ शकेल"
कोटेशन देतो मान्य असेल तर ३-४ दिवसात काम करून काम झाले की फोन करतो...पेमेंट अगेन्स्ट डिलिव्हरी".
अहो प्लीज..४ दिवस काय ४ मिनिट पण थांबू शकत नाही..आज हे डाय नेले नाहीत तर सार काम कारखान्यात बंद पडेल..जोशी अजिजीनं म्हणाले..
प्लीज आज काम लावा अन कंप्लीट करा..पेमेंट ची काळजी करू मका मी चेक घेऊन आलो आहे"
कारखान्यात सगळेच नेहमीचं अर्जंट असते.हे मला माहीत होते..
ओके म्हणत त्याला कोटेशन दिले थोडी हिगल ह्यागल झाली अन ३५००/- ला एक पीस असा रेट मान्य झाला १५ नग होते....
शॉप फ्लोअर वर गेलो ऑपरेटर ला ग्राइंडिंग व्हील बदलायला सांगितले व ड्राइंग समजवून सांगितले ..त्याने चित्रात दाखविल्याप्रमाणे व्हील ला शेप दिला ..किती डेप्थ घ्यायची ते सांगोतले व जोब मशीनावर चढवला...
(टेक्निकल.हिच..टूथपेस्ट ची क्याप आपण सहजपणे उघडतो व बंद करतो..क्याप बंद असली व ट्यूब दाबली तरी पेस्ट बाहेर येत नाही..हे साधे वाटले तरी थ्रेड/आट्याला ला जो उतरता आकार (२०) दिला त्या मुळे हे घडत असते..ह्या आट्याना "बट्रेस थ्रेड" असे टेक्निकल नाव आहे)
जॉब तयार झाला होता मी व जोशीनी तो चेक केला ड्राइंग बरहुक्म काम झाले होते..मी ऑपरेटरला त्याच सेटिंग वर पुढचे जॉब करावयास सांगितले..(गव्हावर गहू.दळण...कारखान्याच्या भाषेत)
काम सुरू असल्याने मी व जोशी बाजूंच्या कॅन्टिन मध्ये चहा घ्यायला गेलो..गप्पा साधारण अश्या झाल्या.
टूथपेस्ट ची ट्यूब दाबली व दाब सोडला की परत आपल्या पहिल्या आकारात येते..कारण ट्यूब हि प्लास्टिक शीटचे ४-५ पातळ पदर (लेयर) एकमेकावर ठेवून त्याची लांब नळी बनवली जाते..मग साइज प्रमाणे ट्युबा कापल्या जातात व वरचा भाग लावून प्रिटींग करून वर कँप(बुच्चन) लावून फिलिंग साठी तयार होते.आतले फिलिंग ति ति कंपनी करत असते...
ट्यूब ची लांबी ..डायमीटर.. तसेच पेस्ट बाहेर येते त्या चोचे चा आय.डी..(इंटर्नल डायमीटर) आटे याचे स्टान्डर्ड आहे की कंपनी आपल्या मनाप्रमाणे ठरवते? मी विचारले..
स्ट्यान्डर्ड आहे.पण एक गंमत झाली अमेरिकेत व त्याने एक किस्सा सांगितला....(किस्सा ऐकीव आहे..ख.खो.दे.जा...कारखान्यात अश्या अनेक गप्पा असतात..पण किस्सा टेक्निकली चपखल आहे.)
"एक टूल इंजिनिअर (जोशी सारखा) अमेरिकेतील एका पेस्ट बनवणा-या कारखान्यात गेला व त्याने डायरेक्टरला जाहिरातीवर एक पैसा हि खर्च न करता मी आपला सेल २५-३०% वाढवून देतो असा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला...जाहिरातीवर एक पैसा खर्च नाही म्हटल्यावर तो मालक हुरळला..कारण पेस्ट प्रॉडक्ट मध्ये जाहिरातीवर प्रचंड खर्च होत असतो.."क्या आप के टुथ पेस्ट मे नमक है? असे म्हणणारी करीना वा आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत मोहक हास्य करणारी माधुरी यांच्या जाहिरातीचा मारा मिनिटा मिनिटाला आपल्यावर होत असतोच.त्याचा खर्च हि भयानक असतो...व तो मालक तयार झाला ..या हुशार इंजिनिअरने ट्यूब च्या चोचीचे जे भोक असते ज्यातून पेस्ट बाहेर येते त्याचा डायमीटर २५-३० % वाढवला..व तसे बदल डाय मध्ये केले..हा फरक इतका सूक्ष्म होता ..की इतरांच्या लक्षात येणे अवघड होते..परिणाम स्वरूप रोज सकाळी ट्यु दाबल्यावर जी लोळी ब्रशावर येते ति २५-३०% जास्त येऊ लागली व अर्थात सामान्य माणसाच्या घरात ३-४ जण पेस्ट वापरत असल्याने पेस्ट ३० दिवसाच्या(उदा) ऐवजी २५ दिवसात संपू लागली...ह्या प्रकारे सेल मध्ये वाढ झाली..मात्र काही दिवसांनी हि बातमी लिक झाली..व स्पर्धक कंपन्यांनी हि लबाडी उघड केली नंतर म्यानुफ्याक्चरिंग कंपन्यांची मीटिंग झाली व एक स्टान्डर्ड ठरवले गेले..मी मात्र मनातल्या मनात त्या अमेरिकन टूल डिझाईनरच्या शक्कल ला सलाम केला..
नंतर कारखान्या वर आलो..काम तयार होतेच बिल तयार केले चेक घेतला..
जाताना हात मिळवणी करताना जोशी म्हणाले..तुम्ही मुंबैला येत असता का?
साधारण महिन्यातून २-३ वेळा येणे होते कामानिमित्त..मी म्हणालो..
आपण "एस्सेल वर्ल्ड" पाहिले का? नाही मी म्हणालो पण ऐकून आहे अम्युझमेंट पार्क आहे..असे"
तुम्हा नक्की बघा मी त्या ग्रुप मध्ये असल्याने तुमच्या परिवारासाठी ४ कॉम्प्लिमेंटरी पासेस पाठवून देईन..नक्की बघा...जोशी..
शुअर...मी म्हणालो..नंतर मी ति गोष्ट कामाच्या गडबडीत विसरून गेलो..
मात्र नंतर आठवड्याने एस्सेल चे एक पाकीट आले,,फोडले तर आत जोशीनी ४ पासेस पाठविले होते.
अर्थात काम हिची नोकरी मुलींच्या शाळा या मुळे मुंबईला जाणे लांबत राहिले..
शेवटी ’एस्सेल वर्ल्ड" काही बघणे झाले नाही..
प्रतिक्रिया
25 Dec 2014 - 7:12 pm | विअर्ड विक्स
शीर्षक नि गोष्टीचा मेळ नाही समजला. स्वतः अभियांत्रिकी कार्यालयात कारकुनी करत असल्याने गोष्ट आवडली.
26 Dec 2014 - 4:10 am | hitesh
एस्सेल पॅकेजिंगमध्ये भाऊ होता तेंव्हा ती सगळी फ्याक्टरी आतुन पाहिली आहे. लॅमिनेटेड टूठ पेस्टचा जमाना तेंव्हा नुकता सुरु झाला होता. १९९२. मस्त वाटते बघायला.
26 Dec 2014 - 11:37 am | hitesh
फ्याक्टरी वाशिंदला होती.
आता कुठे आहे ?
26 Dec 2014 - 9:34 am | योगी९००
IT मध्ये जाण्याच्या आधी एका प्रतिथयश कंपनीत Injection moulding machine चे marketting करायचो त्यामुळे एस्सेल पॅकेजींग आणि तशा बर्याच कंपन्या बघीतल्या आहेत. त्या सर्व आठवणी तुमच्या लेखाने जाग्या झ्याल्या.
लेख आवडला..
सकाळी ट्यु दाबल्यावर जी लोळी ब्रशावर येते
लोळी या शब्दाला खूप हसू आले.