वांगे पावटे भाजी

hitesh's picture
hitesh in पाककृती
20 Dec 2014 - 4:45 am

साहित्य ..

हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो

तेल , मोहरी , जिरे , हळद

एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे.

तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला

दोन चमचे दही.

-------------------------------------------

कृती..

पावटे उकडुन बाजुला ठेवावेत.

थोड्या तेलात मोहरी व जिर्‍याची फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या व कढीपत्ता घालावा.हळद घालावी.

मग कांद्याचा कीस घालुन परतावे. मग टोमॅटो कीस घालुन परतावे.

या मसाल्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजवावे. वांगी अर्धवट शिजली की उकडलेले पावटे घालावेत. थोडे पावटे क्रश करुन त्याची पेस्ट करुन घालावी.

सर्व शिजले की मीठ , तिखट , गूळ व गरम मसाला घालावा.

शेवटी गॅस बंद केला की दोन चमचे दही घालुन मिसळुन घ्यावे.

________________________

1

प्रतिक्रिया

hitesh's picture

20 Dec 2014 - 4:47 am | hitesh
खटपट्या's picture

20 Dec 2014 - 4:51 am | खटपट्या

આ શું છે?
એક માત્ર ફોટો ?

लिंक चुकलीय. तुमच्या इमेजची Direct link कॉपी केली ती

http://s12.postimg.org/sxpvuy171/vangepavte.jpg

आहे .
फोटो

hitesh's picture

20 Dec 2014 - 9:24 am | hitesh

धन्यवाद.

खटपट्या's picture

20 Dec 2014 - 4:49 am | खटपट्या

हीतेसभाई,

फोटो एड क्रुपा॑ करीने :)

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 5:20 am | मुक्त विहारि

त्यांना गुजराथी येते का?

सर्व त्याना हितेसभाई बोलतात म्हणून वाटलं गुजराती असतील.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 5:52 am | मुक्त विहारि

अरे बाबा,,,

त्यांनी स्वतःला मायबोलीवर "काउ" हे नांव घेतले आहे...

आता "काउ" म्हणजे चिमणरावांची "काउ" असा समज पण लोकांनी करून घेतला तर....

अवतारी मंडळी काय वाट्टेल ती नावे घेवू शकतात...

टोमेटोचा कीस कसा केला ?हिरवे असतील तर करता येतो.

hitesh's picture

20 Dec 2014 - 7:00 am | hitesh

लाल टोम्याटोचा किसणीवर कीस करता येतो

@कंजुस काका, टमाटा फ्रिजर मध्ये टाकुन त्याचा खिस करता येईल.नायतर जुलीयन टाईप बारीक कापायचा.
अवांतर-हितेसभाय,मस्त आमच्या नानालापण आवडायची वांगे पावट्याची भाजी.

कंजूस's picture

20 Dec 2014 - 8:33 am | कंजूस

फोटो

hitesh's picture

20 Dec 2014 - 9:31 am | hitesh

तुम्हालाही धन्यवाद

सस्नेह's picture

20 Dec 2014 - 11:29 am | सस्नेह

आम्ही याला वरणं वांगं म्हणतो.
बाकी टोमॅटो कसा काय किसला समजलं नाही. आणि भाजीला टोमॅटोचा रंगही दिसत नाही.

hitesh's picture

20 Dec 2014 - 12:39 pm | hitesh

एक टोम्याटोचा २ ते ४ चमचे कीस होईल.. तो बाकी भाजीत मिसळुन जातो. रंग येत नाही

विनोद१८'s picture

20 Dec 2014 - 11:50 am | विनोद१८

...टोमॅटो नव्हे 'तांबाटु' म्हणावे, ही भाजी कशाशी खातात ??

बाकी तुमचे कसे काय सुरु आहे?

फेब्रुवारी महिन्यात फ्री आहात ना?

पैसा's picture

20 Dec 2014 - 12:41 pm | पैसा

नक्की करून बघेन.

अजया's picture

20 Dec 2014 - 7:29 pm | अजया

छान पाकृ.

..तयारी असेल तर एक कट्टा करूया, बोल हितेसभाय.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 9:40 am | मुक्त विहारि

सहमत आहे...

मिपावरचे सगळ्यात भारी अवतारी आहेत हे...

अशा अवतारांना भेटायला मला पण आवडेल...

hitesh's picture

21 Dec 2014 - 10:43 am | hitesh

.

सतिश गावडे's picture

21 Dec 2014 - 11:55 am | सतिश गावडे

अहो तिकडे काऊने ने मायबोलीवर हीच भाजी टाकली आहे. वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे ! या नावाने.

काउ हा तुमचा मायबोलीवरील आयडी आहे का? की तुमच्या "प्रिय व्यक्तीचा"?

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 1:28 pm | बोका-ए-आझम

;)

..मी 'किसलेला तांबाटु व दोन चमचे दही' इ. साहित्य सहर्ष आणु शकेन, बाकीचे साहित्य इतर आणतीलच.

जेपी's picture

21 Dec 2014 - 2:13 pm | जेपी

*ROFL*

निवेदिता-ताई's picture

21 Dec 2014 - 8:20 pm | निवेदिता-ताई

छान वाटतीये... करुन पहायला पाहिजे..

अटली सरस वानगी लाखी मोकलावी ते माटे धन्यवाद!! ;)

च्यायला मी कन्नडमध्ये दोन शब्द बोलले की वशाडी येते आणि हिते तर गुजराथी र्‍याम्पेज चालले आहे. चोलबे ना!

सूड's picture

23 Dec 2014 - 3:54 pm | सूड

=))))

बोका-ए-आझम's picture

23 Dec 2014 - 3:14 pm | बोका-ए-आझम

माई मोड आॅन:

अरे हितेशा, भाजी चांगली आहे पण ह्यांना टमाट्याने अॅसिडिटी होते. वर परत वांगं,पावटे आणि दही पण. म्हणजे आम्लपित्तनाशक आणि वातनाशक काढे घेऊनच ही भाजी बनवावी लागेल!

माई मोड आॅफ.

बाकी पाकृ चांगली आहे!पुपाप्र!

पैसा's picture

23 Dec 2014 - 4:20 pm | पैसा

:ROFL:

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 7:33 pm | टवाळ कार्टा

अग्गाग्गा =))

बॅटमॅन's picture

24 Dec 2014 - 2:00 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

अजया's picture

23 Dec 2014 - 3:34 pm | अजया

=))

मृत्युन्जय's picture

23 Dec 2014 - 4:38 pm | मृत्युन्जय

हितेश्भाई आमच्या जागो मोहन प्यारेंचे अवतार हैत होय. आम्ही उगाच इतर आयडींवर संशय घेउन राह्यलतो. असो. इतर आयडी पण एकाच मूळ आयडीचे अवतार असण्याची शक्यता नाकारता येत नाहिच म्हणा. चिकाटी लय दांडगी हाय हे मात्र मान्य करायला हवे

प्यारे१'s picture

23 Dec 2014 - 9:45 pm | प्यारे१

खुलासा सुरु - प्यारे आणि जागोमोहन प्यारे हे दोन वेगवेगळे आयडी आहेत. - खुलासा संपला.

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 10:36 pm | काळा पहाड

काकडी वाळलिये हो