गाभा:
मी एका संधीच्या शोधात आहे, जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील.
भारतात राहून काही संधी आहे काय आमच्यासाठी/आमच्या विदर्भातील शेतकरी लोकांसाठी?
त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची, नवीन गोष्टी शिकायची, वाट्टेल तितका खर्च करायची, वाट्टेल तेथे येवून आपली भेट घेण्याची, ह्या आयुष्यातील लागेल तेव्हढा वेळ देण्याची माझी तयारी आहे.
मिपावरच्या "शोधा म्हन्जे सापडेल" या आय डी मुळे मला हे प्रखरतेने जाणवले आहे.
आशा आहे की सर्व मिपाकर आपआपल्या कुवतीनुसार मार्गदर्शन व प्रसंगी सर्व मदतही करतील.
आणि मिपाचा एक चांगला आदर्श जगापुढे ठेवू या.
प्रतिक्रिया
11 Dec 2014 - 1:55 pm | hitesh
सापडले की सांगा
11 Dec 2014 - 1:59 pm | आयुर्हित
जरा खाजवा कि! तुमचे खाजवा कि!! संधी शोधायला डोस्कं!!
11 Dec 2014 - 9:02 pm | मुक्त विहारि
हितेस भाउ, काउला विचारायला गेले असतील.
आता काउने सांगीतले की, येतीलच ते इथे.
11 Dec 2014 - 5:33 pm | प्रसाद१९७१
सध्यातरी विचार करण्याच्या कामाची आगावू रक्कम म्हणुन १ लाख पाठवा.
तुमच्या कडे पैसे आणि वेळ फार जास्त झालेला दिसतोय.
एखादी व्यक्ती असेल तर मदत करता येइल, पण अश्या ठीकाणी समस्याग्रस्तांनीच त्यांच्या समस्येवर उपाय काढायचा असतो. आणी समस्या असलेलीच लोक शोधायची असतील तर तुमच्या शहरातच विदर्भातल्या शेतकर्यांपेक्षा फार जास्त समस्या असलेली लोक सापडतील.
11 Dec 2014 - 6:55 pm | कंजूस
तुम्ही त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे मदतीला जाण्याची मानसिक आणि आर्थिक तयारी केली आहे -फार आनंद झाला. परंतू काही उपयोग होणार नाही कारण ते एका मोठ्या चक्रव्युहात अडकलेले आहेत.
11 Dec 2014 - 9:00 pm | मुक्त विहारि
मी ह्या उपक्रमात भाग घेवू इच्छित नाही.
11 Dec 2014 - 10:24 pm | खटपट्या
क्रुपया गंगाधर मुटे यांच्याशी संपर्क साधा.
11 Dec 2014 - 11:31 pm | रोहन कुळकर्णी
http://www.saveindianfarmers.com/web/
12 Dec 2014 - 12:00 am | रामपुरी
व्यनि करतो
.
.
.
.
.
.
.
कमिशन मिळालं की
13 Dec 2014 - 4:35 pm | यसवायजी
:))))
12 Dec 2014 - 12:29 am | अगोचर
आपली तयारी आहे हे वाचुन आनंद झाला. आपल्या प्रयत्नांचा नक्की उपयोग होइल. पण विदर्भातल्या शेतकर्यांची पण तेव्हढी तयारी (वाट्टेल तितका खर्च करायची सोडून) आहे का ?
12 Dec 2014 - 5:07 am | स्पंदना
विदर्भातल काय माहीती नाही भाऊ, पण म्या कोलापूरची शेतकरी हाय.
आन आमाला आवंदा कमी पिकलं म्हणुन जीव द्यावासा न्हाय वाटतं. आता का? कस? काय ठाव न्हाय खर, पण आमची पायाखालची जीमीन सरकत नसावी, आन त्यांना मातीची किंमत नसावी अस वाटतय. त्याधरनच तर गंमू ना परतिसाद द्याच सोडल. काय कळनाच बाबा. सगळ सरकारन करावं, ह्यान करावं, त्यान करावं?????? मग सोता काय करावं ?
13 Dec 2014 - 3:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कोणीतरी नविन पिढीतला असा विचार करत आहे हे वाचून बरे वाटले. तू तेथील शेतकर्यांच्या संघटनेशी संपर्क साधावास असे वाटते. शहरात राहून बटाटा-वांग्याचा रस्सा भुरकत 'सिस्टिम बदलली पाहिजे' म्हणणार्या लोकांकडून फार अपेक्षा ठेऊ नकोस.जेथे समस्या आहे तेथेच जावे लागेल.
13 Dec 2014 - 4:07 pm | अजया
माई,नवी पिढी कधी जाॅइन केलीस गं? सांगीतलं पण नाहीस!
13 Dec 2014 - 4:28 pm | जेपी
नाना आजकाल गाण म्हणतात" मै अठरा बरस का,तु कितनी बरस की....
13 Dec 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी
*KISSING*
*LOL*
14 Dec 2014 - 6:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे नाना-माई टी.व्ही. वरच्या एका प्र"शि"द्ध जोडप्यावरुन घेतलेले आयडी असतील काय?
15 Dec 2014 - 8:24 pm | श्रीगुरुजी
>>> हे नाना-माई टी.व्ही. वरच्या एका प्र"शि"द्ध जोडप्यावरुन घेतलेले आयडी असतील काय?
"बापू काणे" मधील खालील संवाद आठवला.
_______________________________________________________________________________
बापू मांडवात जागच्या जागी बसला आणि म्हणाला, "सर्वाधिकार स्वाधीन करीत असाल तर निघतो. नाही तर बांधा घड्याळ. नाव काय तुमच्या व्याह्यांचं?"
"नानासाहेब म्हणतात त्यांना."
सर्वाधिकार घेऊन बापू निघाला. वरपक्ष घुश्श्यातच होता. बिर्हाडाच्या दारात बसलेल्या पहिल्याच इसमाला बापूने सवाल केला, "कुठं आहे तो नान्या?"
"कोण नान्या?"
"मुलाचा बाप!"
"मग नान्या काय म्हणता? सबरजिस्ट्रार आहेत ते. आपण कोण?"
"त्याला सांग, रजिस्ट्रार आलाय म्हणून!"
आरड्याओरड्याने चार माणसे जमली. शेवटी वरपिता आला.
"नमस्कार!"
"कोण आपण?"
"बापू काणे. विवाह-सुधारणा-मंडळाचा चिटणीस."
"काय काम आहे?"
"किती माणसे आली आहेत आपली?"
"का?"
"परत पाठवून द्यायची तिकिटं काढायची आहेत तुमची."
"म्हणजे?"
"एस्.टी. सुटायला दोन तास अवकाश आहे -"
"हा काय मूर्खपणा आहे?"
"मूर्खपणा तुमचा की आमचा? पोराचं लग्न करायला काढता आणि मनगटात स्वतःचं घड्याळ विकत घेऊन बांधायची ताकद नाही त्याला? अडवता काय? ....."
लग्न सुखरूप पार पडले.
________________________________________________________________________________
हाच संवाद मिपावर खालील स्वरूपात असेल.
संपादक म्हणाले, "नाव काय त्या आयडीचं?"
"नानासाहेब म्हणतात त्यांना."
संपादकांनी सवाल केला, "कुठं आहे तो नान्या?"
"कोण नान्या?"
"माईचा डूआय."
"मग नान्या काय म्हणता? 'ग्रेटथिंकर' आणि 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' आहेत ते. आपण कोण?"
"त्याला सांग, ग्रेटेस्ट थिंकर आलाय म्हणून!"
शेवटी नानासाहेब आला.
"नमस्कार!"
"काय काम आहे?"
"किती डूआय आहेत आपले?"
"का?"
"तुमचे सगळे डूआय डीलीट करायचे आहेत."
"हा काय मूर्खपणा आहे?"
"मूर्खपणा तुमचा की आमचा? स्वतःच्या खर्या आयडीने लिहायची ताकद नाही? दहा-दहा डूआय वापरता काय? ....."
.
.
.
________________________________________________________________________________
15 Dec 2014 - 8:41 pm | जेपी
*ROFL*
15 Dec 2014 - 9:14 pm | शिद
जबराट. _/\_
15 Dec 2014 - 11:24 pm | टवाळ कार्टा
=))
16 Dec 2014 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा
=))))))
16 Dec 2014 - 1:12 am | डॉ सुहास म्हात्रे
16 Dec 2014 - 1:33 am | मुक्त विहारि
सगळे डू-आय-डी.... शॉक्स...
16 Dec 2014 - 11:49 am | नाखु
लेकीन शॉलेट मारा..