अभिनेता - "देवेन वर्मा "कालवश झाले.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
2 Dec 2014 - 11:33 am
गाभा: 

हिंदी चित्रपटस सृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता देवेन वर्मा यांचे आज र्‍हदयविकाराने सकाळी पुणे येथे निधन झाले.
आपल्या सहज अभिनयाने त्याने रसिकांच्या मनाचा कोपरा काबीज केला होता.
कॉमेडी ऑफ एरर्स वर बेतलेल्या "अंगुर" चित्रपटातील त्यांचा संजीवकुमारसोबतचा डबलर रोल मधला सहकलकार हा त्यांचा सर्वात भावलेला रोल.
सिलसिला मधे "विद्यार्थी" या अमिताभ ला समजवणार्‍या मित्राचा रोल असो किंवा "रम्गबिरंगी" सिनेमात अमोलपालेकरला वेगवेगळ्या भूमीका निभवायला सांगणारा मित्र असो. त्यानी कधी खलनायकी भुमीका केल्या नाहीत मात्र वाट्याला आलेल्या छोट्याशा भुमीकेत असे काही रम्ग भरले की ती भुमिका लोकांच्या लक्षात राहिली.
देवेन वर्मानी मराठी चित्रपटातही काम केले" दोस्त असावा तर असा" मधली थोडीशी खलनायकी भूमिका असूनही त्यात त्यानी नैसर्गीक अभिनय केला.
दिल चित्रपटातील त्यानी अभिनीत इन्स्पेक्टर रसिकांची दाद मिळवून गेला.
अनुपमा , मिलन ,देवर ,कोरा कागज ,चोरी मेरा काम मधील प्रविन चम्द्र शहा च्या भुमीकेसाठी त्याना फिल्म फेअर चे सर्वोत्कृष्ठ विनोदीअभिनेत्याचे अ‍ॅवॉर्ड देखील मिळाले.
"बेशरम " नामक एका चित्रपटात त्यानी तिहेरी भुमिका म्हणजे मुलगा , बाप आणि मुलाची आई अशी धमाल केली होती.
त्याना फिलम फेअर चे दुसर अ‍ॅवॉर्ड "चोर के घर चोर " साठी मिळाले. मात्र चतुरस्त्र अभिनयाची क्षमता असणारा हा अभिनेता मर्यादीत प्रकारच्याच भुमिका करत राहिला. असे असूनही त्यानी त्यात कधीही साचेबद्ध पणा जाणवू दिला नाही.
अंगुर चित्रपटात सोबत संजीवकुमारसारखा सहज अभिनयाचा सम्राट असूनही देवेन वर्मानी त्या चित्रपटासाठी विनोदी अभिनेत्याचे अ‍ॅवॉर्ड मिळाले होते.
फारुकशेख अभिनीत "किसी से ना कहना" चित्रपटातील मोजक्याच प्रसम्गात त्यानी बहार आणली होती.
अमोल पालेकरांच्या गोलमाल चित्रपटात त्यानी"देवेन वर्मा"हीच भूमिका केली होती.
२००० सालानंतर त्यांच्या फारशा भूमिका दिसल्या नाहीत
आपल्या सहजसुंदर अभिनयाने चित्रपट रसिकांच्या आठवणीत स्थान निर्माण केलेल्या या धुरंधर अभिनेत्याला श्रद्धांजलीचे एक पान अर्पण.........

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

2 Dec 2014 - 12:03 pm | योगी९००

देवेन वर्मा यांना विनम्र श्रद्धांजली...!!

आजच तीन जण गेले असे कळले.. मराठी अभिनेता श्याम पोंक्षे, माजी मुख्यमंत्री अंतूले यांचेही आज निधन झाले.
श्याम पोंक्षे आणि मा. अंतूले यांना विनम्र श्रद्धांजली...!!

अनुप ढेरे's picture

2 Dec 2014 - 2:30 pm | अनुप ढेरे

श्रद्धांनजली!
त्यांची मला आवडलेली भूमिका...

-

मदनबाण's picture

2 Dec 2014 - 2:44 pm | मदनबाण

अत्यंत वाईट वाटले ! :(

मदनबाण.....

विजुभाऊ's picture

2 Dec 2014 - 3:12 pm | विजुभाऊ

खट्टा मिठ्ठा मधली त्यांची लग्नाळू पारशी मुलाची भुमिका देखील सुंदर होती.
देवेन वर्मानी भुमिका छोटी असली तरी त्याची छाप चित्रपटभर रहायची.
चित्रपट सम्पल्यानंतरही ती भूमिका आठवली जायची

विकास's picture

3 Dec 2014 - 10:00 pm | विकास

मस्त अभिनय - विनोदी, मिश्कील सर्व काही...

तिमा's picture

2 Dec 2014 - 4:32 pm | तिमा

'बुढ्ढा मिल गया' चित्रपटांतही त्यांनी फारच चांगले काम केले होते.
'आपके हसीन रुखपे आज नया नूर है' या गाण्यांत नायक धर्मेंद्र, पियानोवर पोळ्या लाटत असताना, शेवटच्या कडव्यांत देवेन वर्मा आणि रेहमान यांची एन्ट्री ड्रॅमॅटिक आहे.

यश राज's picture

2 Dec 2014 - 5:50 pm | यश राज

वाईट बातमी.

अंगुर चित्रपटातला त्यांचा अभिनय खुप सुंदर होता,खास करुन 'प्रितम आन मिलो' या गाण्यातला त्यांचा मुद्राअभिनय निव्वळ लाजवाब

अर्धवटराव's picture

2 Dec 2014 - 10:17 pm | अर्धवटराव

अगदी "आपल्यातला" वाटणारा अभिनेता गेला :(
त्याने मनमुराद हसवले. काहि थोड्या सिरीयस भुमीका देखील फार उत्तम केल्या. किशन कुमारचा (बहुतेक) डेब्यु मुव्ही "आजा मेरी जान" मधे खलनायक देखील वठवला.
लाजवाब माणुस. विनम्र श्रद्धांजली.

अवांतरः पद्मिनी कोल्हापुरेचा एक सिनेमा होता... त्यात ति एका "माडीवाल्या" बाईची मुलगी असते. त्यात देवेन वर्माने अरुणा ईराणीच्या अत्यंत भोळसट नवर्‍याची भुमीका केली होती. तसेच दूरदर्शनवर एका सहृदय घरमालकाच्या भुमीकेत देवेन वर्माने एक सिरीयल केली होती. त्यांची नावे आठवतात का कुणाला ?

सुधीर's picture

3 Dec 2014 - 10:34 am | सुधीर

देवेन वर्मा आणि श्याम पोंक्षे यांनाही. विनोदी अभिनय अंगविक्षेप, असभ्य भाषा न वापरता सौम्यपणेही करता येतो हे त्यांच्या अभिनयातून दिसून यायचे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Dec 2014 - 7:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

श्रद्धांजली.
६०-७०ते अगदी ८०च्या मध्यापर्यंत,चित्रपटांतले विनोदी प्रसंग पाहण्यासारखे असायचे.त्या पाहण्यासारखे करण्यार्यात देवेन्वर्मा ह्यांचा सहजसुंदर अभिनयाचा वाटा होता.बुद्धीला पटतील असे सुसंस्कृत चित्रपट बासू चॅटर्जी,मुखर्जी,गुलझार ह्यांनी ७०च्या दशकात आणण्यास सुरुवात केली.देवेन ह्यांचा अशा चित्रपटांतला अभिनय अनेकांना भावायचा.
अंगूर असो वा गोलमाल वा नरम-गरम्,देवेन ह्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहील.