मराठी प्राथमीकशाळेतील इंग्रजी शिक्षणाबद्दलच्या शोध निबंधाचे निष्कर्ष

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 Nov 2014 - 12:07 am
गाभा: 

मराठी माध्यमाच्या शाळातूनच प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिलीपासून इंग्रजी भाषेचे शिक्षण महाराष्ट्रातील सर्वच मुलांना द्यायचा निर्णय शासनाने अमलात आणूनही काही वर्षे झाली आहे. भारतातील विद्यावाचस्पती म्हणजे Phd चे शोधनिबंध पहाण्यास मिळण्याची सोय http://shodhganga.inflibnet.ac.in या संस्थळावर उपलब्ध आहे. तिथे मराठी विषयक शोधनिबंध चाळता चाळता एक ताजा शोधनिबंध हाताशी आला. त्याच लांबलचक नाव खालील प्रमाणे आहे. (मिपा संपादक मंडळाने शतकी प्रतिसादाच्या धागालेखातही किमान दहा ओळी असण्याची अट घातलेली असल्यामुळे ते नाव पूर्णपणे खाली च्योप्यपेस्ट्वत आहे. ज्यांना डायरेक्ट शोधनिबंधावर जायचे आहे सुरवातीपासून अभ्यासायचे आहे त्यांच्यासाठी हा दुवा आणि ज्यांना सरळ कनक्लूजनचे पान (पहाणे पुरेसे असावे) त्यांच्यासाठी हा दुवा (खाली डिसक्लेमर जोडत आहे)

* A study of the problems of teaching english language in the primary marathi medium schools in kolhapur district south region with special reference to gadhinglaj ajara and chandgad taluka **संशोधिका Venkatrao, Balande Varsha ** मार्गदर्शक Mhangore, Gurudatta Shripatrao

डिसक्लेमर

१ अ) शोधनिबंधाचे शिर्षक आणि प्रस्तावनापाहून मराठी प्राथमिक शाळेत इंग्रजी शिकवण्यातील काही नेमक्या भाषाविषयक समस्या आणि भाषाविषयक सूचना काही पहावयास असे वाटले होते पण कदाचित तसे नसावे.

१ ब) शोधनिबंधात प्रत्यक्षात सांख्यिकीय सर्वेक्षण आणि काही जुजबी निष्कर्ष आहेत. तरीही एका चांगल्या विषयावर Phd शोधनिबंध करण्याचे सुचले आणि काही ना काही आकडेवारी आलीच आहे तर डोळ्याखालून घालण्यास हरकत नसावी. (म्हणून मिपावर दुवा देत आहे)

२) शोधनिबंध लिहिणारी नावे मराठी आहेत शोध निबंध महाराष्ट्रातील गावांवर आहे पण राजस्थानातील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविद्यालय अशा आटपाट ठिकाणच्या विश्वविद्यालयातून का केला गेला असावा याची मला कल्पना नाही, माझ्याकडे अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे नाहीत (माझे टोपणनाव माहितगार असलेतरीही) म्हणून कोणत्याही आटपाट संदर्भाने कृपया मला प्रश्न विचायायचे टाळावे.

३) शोधनिबंधातील नमुद काही तथ्ये आणि निष्कर्ष एकमेकांशी जुळत नसतील तर आवाक वगैरे तुम्ही होणार नाही पण ही डिसक्लेमरची फॉर्मॅलिटी पूर्ण करणे माझे काम आहे.

४) मराठी माध्यमात इंग्रजी शिकवण्याबाबतच्या विषयाबद्दलच्या सर्वेक्षणात ७४ % शिक्षक हिंदू आहेत १३% बौद्ध आहेत ६ % ख्रिश्चन अथवा मुस्लिम आहेत हे सर्वधर्मसमभावी तथ्य अथवा बहुसंख्य पालकांना २ मुले आहेत १० टक्के पालकांना ३ मुले आहेत आणि १८ % पालकांना १ मूल आहे कुटूंब नियोजनाच्या प्रभावाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हि आकडेवारी चे तथ्य सुखदायी असले तरीही त्यांचा शोधनिबंधाच्या मुख्य विषयाशी काय संबध असू शकतो याची मला कल्पना नाही. असाच प्रकार ८४ टक्के शिक्षक विवाहीत आणि १६ टक्के शिक्षक अविवाहीत आहेत या आकडेवारीचा आहे. या आकडेवारीआधार घेऊन वरून इंग्रजी भाषेतील पिएचडी मिळते आणि इंग्रजी भाषेच्या शिक्षणात सुधारणा होऊ शकते हे निश्चितच भूषणावह म्हणावयास हवे.

(मला) अपवाद म्हणून काही वाटलेली उर्वरीत नमुद काही तथ्ये येणे प्रमाणे

१२) Near about 50% students in the schools selected for present study are not attending classes regularly

१३) 53% of the irregular students are the working students either in the houses or in the
agricultural farms ( हे प्राथमिक शिक्षणाबद्दल चालू आहे)

१४) Students in the classrooms of 64% of teachers selected for the present study donot have
private coaching classes for English language.

१५) 82% of the teachers selected for present study have their school going children. Out of
total school going children of teachers, 64% of teacher’s children have enrolled in Marathi medium schools and only 34% of children are in the Eng lish medium schools.

१६) It is noticed that the students in the classrooms of 47% of teachers are scholars in English
language, they are getting scholarship for their performance in English language

१८) The percentage of teachers, who are not satisfied with the teaching of English language is
59%, remaining 41% of teachers are not satisfied with their own performance in the classroom teaching of English

१९) Out of the total teachers selected for study, 46% teachers have difficulty with the teaching of grammar, vocabulary and pronounciation, 20% of teachers have difficulty in the teaching of grammer and pronounciation and 14% teachers have difficulty with vocabulary in the teaching of English in the classroom

२०) Out of total teachers selected for study, 65% of teachers have undergone some sort of
training and 35% teachers did not undergo any training in the last five years

२१) English is not a difficult language to both teach and learn for 62% teachers and it is
difficult for remaining 38% of teachers.

२२) 66% of teachers have shown their willingness to participate in training programmes
of English language teaching where as 34% of teachers are not willing to do so

२३) 62% of teachers have shown positive response towards the prescribed text books and
remaining 38% of teachers feel that the text book is difficult both to teach and learn

२४) The different teaching aids for teaching of English language are available for 58%
teachers only

२५) The audio visual aids are available for 54% teachers only.

३१) ....., it is remarkable that 47% of teachers have given preference to workshops. Thus it is clear that the teachers donot want to be passive listeners in training programmes but they expect active participation from their side.

३२) It is observed that more than 65% of teachers selected for present study are very much aware of the skill in spoken language and use of modern technology and audio visual aids to improve process of teaching learning. It is notable worthy that these teachers are working in rural areas

३५) It is observed that 52% of teachers are taking efforts to improve interest among students
in the learning of English language and remaining 48% of teachers are not taking any special effort for the same.

३६) It is noted that 66% of teachers are not taking much efforts to motivate their students to
make use of English language as a language of day to day communication

३७) It is striking that 83% of teachers selected for present study are not satisfied with the
quality of teaching English language in the area under study

३८) Students in area under study are good in reading but comparatively poor in writing and
speaking skill of English language

४०) 48% of teachers selected for present study are of the opinion that the government should
close all the Marathi medium schools and open new English medium schools

४१) It is found that 69% of teachers are not satisfied with their salary

data collected from parents

१) 86% of students in the area under study are the wards of farmers and landless agricultural
labourers.

२) According to all the parents selected for present study, their wards are most regular in the
school and are attending school daily and regularl (आधीच्या क्रमांक १२चे तथ्य येथे पुरेसे जुळत नाही )

६) The wards of 56% of parents have enrolled in government Zilla Parishad schools and the
wards of remaining 44% of parents have enrolled in private aided schools

७) Wards of 56% of parents have enrolled in Marathi medium schools and 44% of parents
have enrolled their wards in English medium schools

८) It is noticed that the wards of 28% of parents selected for study have private coaching classes in the last twelve months and majority of wards of 72% parents donot have private coaching classes

९) The ward of only 19% parents is scholarship holders and the wards of remaining 81% of
parents are not the scholarship holders. आधीच्या आणि या स्कॉलरशीपच्या फिगर्सही वेगवेगळ्या येताहेत

१६) Today's learning of English language is experience of joy only for 32% of parents and it
is not joyful for remaining 68% of parents. (पॅरेंट्सना जॉयफूल वाटतकी नाही हे सर्वेक्षणात पाहील विद्यार्थ्यांना जॉयफूल वाटत की नाही याची काही आकडेवारी यात नाही.

२७) All the parents selected for present study are of the view that the government should
close all the Marathi medium schools and start new either pure English medium schools
or at least semi-English medium schools या विषयावर शिक्षक पालकांचा भर असणारच पण सर्वच कनक्लूजन मध्ये विद्यावचस्पतींचाही या विषयावर जरा अधिकच भर आहे.

२९) It is observed that, according to the parents, their wards must use English as a language
of day to day communication

३०) Most of the parents felt that their wards have maximum difficulties in the learning of
English grammar. (जर सर्वेक्षण केलेले ८६ टक्के पालक शेतकरी आणि भूमीहीन मजूर असतील तर त्यांना आपल्या मुलांच ग्रामर कच्च राहतय हे कळण्यास नेमका मार्ग कोणता ?)

३५) It is observed that majority of parents are not encouraging their wards to watch English
channels on TV and to read English newspapers which may improve the skills of
language

संशोधिका महोदयांनी बर्‍याच प्रयत्नांनी संशोधनाअंती राष्ट्रीय शिक्षण निती कशी असावी या बद्दल संशोधनातून बहुमोल मार्गदर्शन केले आहेच. अधिक काय लिहिणे आपण ते स्वतहा अभ्यासणे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Nov 2014 - 1:05 am | मुक्त विहारि

भाषा शिकण्यासाठी मुलतः ४च टप्पे असतात.

१. ऐकणे

२. बोलणे

३. सिनेमा किंवा इतर कुठलेही द्रुक-श्राव्य माध्यम

४. शंका विचारणे

ह्या नंतर येते ते लेखन आणि वाचन.

पण

मुळात आपली शिक्षण पद्धतीच इतकी विचीत्र आहे की, आधी वाचन आणि मग लेखन....अशा उलट्या क्रमानेच जात असल्याने, घोकंपट्टी शिवाय पर्यायच नसतो.....

असो,

मी तरी वर्गापेक्षा बाहेरच जास्त शिकलो....

तसेच अद्याप पण आपण इंग्रजांच्याच काळांतले गोपाळ, सीता करत बसलो आहोत.

शहरातल्या किती लोकांकडे शेती आहे? किंवा बैलगाडी आहे?

मला तरी शाळेतले इंग्रजी आवडले नाही, कारण त्या पुस्तकातली कुठलीच व्यक्ती माझ्या आजू-बाजूला न्हवती. आभासी जगांत काय शिकणार? आणि मुळांत कुठल्याही भाषेत सर्वात महत्वाची असतात ती क्रियापदे.

साधा एक आंबा घेतला तरी बरीच वाक्ये केवळ क्रियापदे बदलल्याने तयार होतात.उदा.

I CUT a Mango.

I PUT a Mango.

I SMELT a mango.

I TOUCHED a mango.

I GAVE a mango.

शाळेतल्या ह्या धेडगुजरी पद्धतीने मला अजिबात इंग्रजी येत न्हवते.दहावीचा शिक्का कपाळी लागला ते केवळ ग्रामर मुळे.

पण ह्या अपयशाचा फायदा असा झाला की, मी गुजराथी ऐकून आणि बोलूनच शिकलो.अज्जुनही मला गुजराथी लिहीता येत नाही.वाचता मात्र येते.पण मला गुजराथी लिहीता जरी येत नसले तरी माझ्या गुजराथी मित्रांबरोबर मी गुजराथी बोलू शकतो.

कंजूस's picture

29 Nov 2014 - 9:09 am | कंजूस

मुवि +१ अगदी वर्मावर बोट ठेवले आहे .
या लेखाचा आणि त्यातल्या शोनि॰चा उद्देश अभ्यासणे असल्यामुळे तो केला आहे. बाकी फिएचडी (PhD)करणे आणि त्यातले विषय यावर नकारात्मक विचार मांडून कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा आरोप करून घेण्याची इच्छा नाही तसेच एक दोन निरीक्षणे करून सर्व मराठी शाळांतील इंग्रजी शिकवण्यावर भाष्य करणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होईल.

विशाखा पाटील's picture

29 Nov 2014 - 10:19 am | विशाखा पाटील

उदंड झाले संशोधन आणि सुमारांची सद्दी...'with special reference to' असे टाकले की पिचडीचा मार्ग मोकळा...मूळ मुद्दा भाषा शिक्षणाचा- एकीकडे तालुक्यातल्या मराठी शाळेतील इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास आणि दुसरीकडे निष्कर्षात 'uniformity in content'. हे कसे काय साधेल?
बाकी भालचंद्र नेमाडेंच्या कालच्या मुलाखतीवरूनवरून इंग्रजी शिक्षणाचा विषय आत्ता पुन्हा चर्चेला येईल.