✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सांगा असतो का कधी मी माझा?

न — निमिष सोनार, Tue, 11/25/2014 - 20:19
एका सामान्य माणसाची आत्मकविता- सांगा असतो का कधी मी माझा? ---------------------- नाही नसतोच कधी मी माझा! नाही नसतोच कधी मी माझा! असतो मी शिक्षकांचा, असतो जेव्हा शाळेमध्ये! असतो मी सवंगडी अन भावंडांचा, खेळतो जेव्हा अंगणामध्ये! असतो मी बाॅसचा, असतो जेव्हा आॅफिसमध्ये! असतो मी कस्टमरचा, असतो जेव्हा व्यवसायामध्ये! असतो मी बायको मुलांचा, असतो जेव्हा घरामध्ये! असतो मी आई वडीलांचा, असतो जेव्हा घरामध्ये! असतो मी मित्रांचा, बसतो जेव्हा त्यांचेमध्ये! असतो मी सैतानाचा, करतो जेव्हा पापकृत्ये! असतो मी देवाचा, करतो जेव्हा पुण्यकर्मे! सांगा मग जन्म ते मृत्यू या मध्ये असतो का कधी मी माझा? मृत्यूनंतर सुद्धा असतो मी आठवणीत सर्वांच्या! मग सांगा असतो का कधी मी माझा? मग सांगा असतो का कधी मी माझा? कधी सापडेल मला माझे, हरवलेले मीपण? की मीपणाच्या मनातसुद्धा, बसलेले असेल दुसरेच कोण? ते दुसरे कोण सुद्धा, हरवून बसलेले असेल का त्याचे मीपण? मीपण हरवलेले आपण सर्वजण, एकाच वाटेवरचे प्रवासीगण! चला मिळून शोधू हरवलेले मीपण चला मिळून शोधू हरवलेले मीपण...

प्रतिक्रिया द्या
2660 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मी माझा तर माझा कुणाचा!!!

जेपी
Tue, 11/25/2014 - 20:22 नवीन
मी माझा तर माझा कुणाचा!!! संदर्भ -सुर्यकांत खोकले.
  • Log in or register to post comments

मी माझा तर माझा कुणाचा!!!

गणेशा
Tue, 11/25/2014 - 20:31 नवीन
मी माझा तर माझा कुणाचा!!!
मस्त एकदम. वल्ली कडुन ऐकले होते तेंव्हा खो खो हसलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मस्त कल्पना..

गणेशा
Tue, 11/25/2014 - 20:30 नवीन
कल्पना मस्त आहे कवितेची.. पण 'असतो' हा शब्द खुप वेळा आला आहे त्यामुळे थोडी लय बिघडते आहे. कविता वाचुन एक विचार आठवला .. जो नसतो स्वताचा कधी.. ..तोच कदाचीत सामान्य माणुस असतो.. जो फ्लॅट चे EMI भरता भरता म्हतारा होतो आणि आपल्या मुलांच्या हातात चाव्या ठेवुन त्याच प्लॅट मध्ये कोणाड्यात राहतो.. तोच कदाचीत सामान्य माणुस असतो.. जो दिलेले सर्व काम वेळेत पुर्ण करुन हि दूसर्‍यांचे काम करता करता रात्र ऑफिसात घालवतो. तोच कदाचीत सामान्य माणुस असतो. पोरीवर लाईन मारता मारता पोरगी वेगळी लाईन पकडते तरी झुरत जगणारा.. कदाचीत सामान्य माणुस असतो. सुखा पेक्षा दु:ख जास्त भोगुनही त्यास सामोरे जाताना उगा हसत हसत जगतो ..तोच कदाचीत सामान्य माणुस असतो.
  • Log in or register to post comments

केला बदल.. जस्ट २ मिनिट्स

निमिष सोनार
Tue, 11/25/2014 - 21:35 नवीन
असतो मी शिक्षकांचा, शिकतांना शाळेमध्ये! असतो मी सवंगडी अन भावंडांचा, खेळतांना अंगणामध्ये! असतो मी बाॅसचा, काम करतांना आॅफिसमध्ये! असतो मी कस्टमरचा, विकतांना व्यवसायामध्ये! असतो मी बायको मुलांचा, जगतो जेव्हा घरामध्ये! असतो मी आई वडीलांचा, जगतो जेव्हा घरामध्ये! असतो मी मित्रांचा, बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!
  • Log in or register to post comments

मस्त आहे

गणेशा
Wed, 11/26/2014 - 18:09 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

.

स्वप्नज
Tue, 11/25/2014 - 21:42 नवीन
विडंबनाची कळ आलीय.... पीतो मी नेहमी स्लाईस किंवा मिरींदा.. मग सांगा पीतो का कधी मी माझा? ह.घ्या.
  • Log in or register to post comments

WHAT ????

खटपट्या
Wed, 11/26/2014 - 02:22 नवीन
WHAT ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

अश्लील

बॅटमॅन
Wed, 11/26/2014 - 17:11 नवीन
अश्लील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

लिहीताना जरा तरी विचार करावा

सूड
Wed, 11/26/2014 - 17:37 नवीन
लिहीताना जरा तरी विचार करावा माणसानं !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

:-)

स्वप्नज
Wed, 11/26/2014 - 20:03 नवीन
अय्यो राम पाप.... शिव शिव शिव....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

माझा... आवडलं

अर्धवटराव
Wed, 11/26/2014 - 20:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

(No subject)

जेपी
Wed, 11/26/2014 - 17:54 नवीन
*shok*
  • Log in or register to post comments

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा

प्रसाद गोडबोले
Wed, 11/26/2014 - 18:03 नवीन
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ||
  • Log in or register to post comments

विडंबना च्या कळा येताहेत .. पण

निमिष सोनार
Fri, 11/28/2014 - 15:46 नवीन
विडंबन ची डिलिव्हरी कधी होईल ...?? :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा