मोबाईल पेमेंट

टीपीके's picture
टीपीके in काथ्याकूट
15 Nov 2014 - 10:17 pm
गाभा: 

ॲपलने ॲपल पेमेण्टस चालू केल्यावर गेले अनेक दिवस मोबाईल पेमेंट या विषयावर शोधाशोध करत होतो . त्यातुन कळलेली ही माहीती. भारतात गेली सुमारे पाच वर्ष ही सोय उपलब्ध आहे आणि ती सुध्धा अगदी साध्यातसाध्या फोनवरही, परंतू फार काही हिचा प्रचार दिसत नाही.

गेली काही वर्ष financial inclusion हा माध्यमांचा आवडता विषय झाला आहे, खासकरून जनधन योजना चालु झाल्यापासून. परन्तू यातली किती खाती टिकतील या बद्द्ल सगळ्यांनाच शंका आहे, जी माझ्यामते फार रास्त आहे. याचे माझ्यामते खरे कारण म्हणजे, बँक खात्यावाचून तळागाळातील जनतेचे फार काही अडत नाही, सगळाच रोखीचा कारभार आणि त्यातून उत्पन्न फार नसल्याने शिल्लकही नाही, त्यामुळे कर्ज नाही, आणि सरकारी कर्ज जरी खात्यात मिळाले तरी बँकेची शाखा जवळपास नसल्याने त्याचा वापर कठीण . अर्थात आता आधार क्रमांक,सबसिडी बँकेत या मुळे चांगला फरक पडू शकतो. बघू काय होते ते.

सुदैवाने आता मोबाईल सर्वत्र झाले आहेत, अगदी गरीबातल्या गरीबाकडे मोबाइल आहे, अगदी बेसिक का होईना पण आहे. National payments corporation of India ने अनेक products develop (निर्माण ?) केली आहेत ,त्यातील २ म्हणजे *९९# आणि IMPS .

*९९# हा युनिवर्सल (मराठी?) बँकिंग क्रमांक आहे, तर IMPS (immediate mobile payment service ) ही नावाप्रमाणे मोबाईल वरून पेमेंट करायची सोय आहे.
*९९# बद्दल या लेखात मी फार काही लिहिणार नाही, तुम्ही वापरून बघा आणि आपले अनुभव शेअर करा.

IMPS मध्ये तुम्हाला तुमचा फोन बँकेकडे नोंदणी करावा लागतो आणि बँकेकडून MMID घ्यावा लागतो. MMID म्हणजे Mobile Money ID . प्रत्येक खात्याला एक MMID असतो. एक मोबाईल अनेक खात्यांना संलग्न असू शकतो. त्याच बरोबर बँक आपल्याला एक MPIN (Mobile पिन ) देते, हा आपला मोबईल पासवर्ड असतो. हि तयारी एकदाच करावी लागते. एकदा हे झाले की तुम्ही भारतात कुठेही असला तरी फक्त मोबाईलचा वापर करून अनेक कामे करू शकता, जसे बिल भरणे , कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करणे इत्यादी इत्यादी . सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे समोरच्याकडे MMID नसला तरी चालते, तुम्ही सरळ त्याच्या बँक खात्यात भरणा करू शकता. पेमेंट झाल्यावर तुम्हाला आणि समोरच्याला लगेच पेमेंट confirmation चा SMS येतो.

तुमच्याकडे MPIN असला तरी तुम्हाला प्रत्येक transaction (मराठी ?) साठी SMS पाठवुन किंवा *९९# ही सुविधा वापरून one time password (OTP) घ्यावा लागतो . यात तुमची सेन्सेटिव्ह माहिती कुठेही वापरली जात नसल्याने हा प्रकार फार सुरक्षित वाटतो. या पद्धतीने तुमचे क्रेडीट /डेबिट कार्ड न वापरताही तुम्ही websites वरून खरेदी करू शकता .

थोडक्यात अत्यंत छान सोय आहे.

दुर्दैवाने हे थोडे कोंबडी आधी की अंडे असे झाले आहे, फार प्रचार नसल्याने फार दुकानदार ही सोय देत नाहीत आणि दुकानदार ही सोय देत नसल्याने जनता उदासीन आहे, अर्थात हे तुम्ही उलटेही वाचू शकता.

भारतात नसल्याने मी ही सोय वापरली नाही, तुमच्यापैकी कोणी वापरली आहे का? तुमचे काय अनुभव? तुम्हाला ही सोय आवडल्यास कृपया याचा प्रचार नक्की करा (या लेखाचा नाही, या सोयीचा :) )

हे काही videos

IMPS

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

15 Nov 2014 - 10:26 pm | पाषाणभेद

IMPS (immediate mobile payment service) आधीच वापरत आहे. एकदम सोपे आहे. लगेच पैसे मिळतात/ पाठवता येतात.
अन मी पयला.

टीपीके's picture

15 Nov 2014 - 10:48 pm | टीपीके

तुम्ही कुठे कुठे ही पध्धत वापरता? जेव्हा रिक्षावाले, भाजीवाले या पद्धतीने पैसे स्विकारतील तेव्हा खरी मोबाईल पेमेंट क्रांती झाली समजायची

बहुगुणी's picture

15 Nov 2014 - 10:47 pm | बहुगुणी

धन्यवाद!

hitesh's picture

15 Nov 2014 - 11:08 pm | hitesh

उधारीचा व्य्वहार कसा करायचा ?

मुक्त विहारि's picture

15 Nov 2014 - 11:25 pm | मुक्त विहारि

आता भारतात गेलो, की आमच्या बँकेत चौकशी करतो...

मुवि, आपल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेत खाते असेल तरी जमणार, जिथे ही सुविधा आहे त्या बँकांची नावे येथे बघा

पुतळाचैतन्याचा's picture

16 Nov 2014 - 9:07 pm | पुतळाचैतन्याचा

एक जुना किस्सा आठवला...एक क्लायण्ट आला होता मोबयील बँकिंग पेमेंट सिस्टीम चे पेटंट करायला. त्याचा स्टेट बँकेवर विनोदी आरोप होता कि मोबयील बँकिंग ची कल्पना तेचि असून स्टेट बँकेने त्याला न विचारता आणि रोयाल्टी न देता ती सुरु केली आहे...त्याने स्टेट बँकेवर केस ठोकली...तेचा दावा फोल निघाला...पण बँकेने कोणतेही टेंडर न काढता आपल्या माणसाला ते काम दिल्याचे सिद्ध झाले असे माझ्या कानावर आले...घातला हात आन निघाला साप...!!!

टोपीवाला's picture

18 Nov 2014 - 1:00 pm | टोपीवाला

मी बरीच वर्ष mobile बँकिंग सुरळीत वापरत असताना *९९# वरून कारागिरी करून पहिली अन mobile बँकिंग बंद पडलं. शेवटी पुन्हा नवीन user id घेऊनच सुरु कराव लागलं. तेव्हा सावधान