महाराष्ट्राचे केजरीवाल !

ओंकारा's picture
ओंकारा in काथ्याकूट
10 Nov 2014 - 4:24 am
गाभा: 

>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

>>> बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.

या विषयावरील अधिक विश्लेषणासाठी वाचा - http://www.onkardanke.com/2014/11/blog-post_9.html

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

10 Nov 2014 - 9:38 am | वेल्लाभट

असंच वाटायला लागलंय. पण दुसरा पक्ष काही फार बरी खेळी खेळतोय असं नाही हे त्याहून खरं. योग्य वेळी योग्य ते 'शहाणपण' सुचो अशी सदिच्छा व्यक्त करण्यापलिकडे अत्ता तरी काही शक्य नाही.

आता किती शिवबंधन राहतील आणि किती तुटतील हेच फक्त पहायचे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

मनीषा's picture

10 Nov 2014 - 11:40 am | मनीषा

अत्यंत एकांगी लेखन ....

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे लक्षात राहिलेले दिसत नाही अपल्या ...
टीका करावी , पण जरा हातचे राखून ...म्हणजे थोडी कमी केली तरी चालेल - पण उगाच अवाच्या सव्वा नको , नाही का?
या सगळ्या गोंधळातून जी फलनिष्पत्त्ती होईल, ती अखंड महाराष्ट्राच्या हिताची असू दे ....हीच इच्छा !

तुमच्या ब्लॉगवरील लेख इथे दिलात तर बरे ...
तिथे जाऊन वाचणे जमेलच असे नाही.

सतिश गावडे's picture

10 Nov 2014 - 11:51 am | सतिश गावडे

लेखाच्या अर्धवटपणाच्या संदर्भात हेच म्हणतो.

जे काही लिहायचं ते इथेच लिहा की. दर वेळी काय अर्धवट लेख इथे टाकून "पुढचा भाग माझ्या ब्लोगवर वाचा" म्हणुन जाहिरात करायची.

कंजूस's picture

10 Nov 2014 - 12:59 pm | कंजूस

पक्षाचा ज्या मतदारांवर विश्वास आणि मदार आहे त्यांची संख्याच कमी होत चालली आहे ।बाळासाहेबांच्या काळात जो मतदार होता त्यातले किती राहिले (उदा॰मुंबईत)?आता त्यांनी काय करावे, बोलावे, किती माघार घ्यावी ते आपण कोण/कसं सांगणार ?

राजकीय धाग्यांना बंदि असावी असे मला मनापासुन वाटते.

दूसरी गोष्ट धाग्याची , मते मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण एकतर्फी आपलेच म्हणने बरोबर असे समजुन लिहिने चुक.
येथे खुद्द मोदीला पण आपण कुठला निर्णय नक्की केलाय शिवसेने बद्दल हे बेधडक सांगता येत नाही तर आपण काय मत देणार .

तरी पण एक बारामती कर म्हणुन सांगतो ..
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे आधीच ठरलेले आहे हे सगळे राजकारण. शिवसेने ला दोष देण्यात काही अर्थ नाही .
भाजप समर्थक असलेल्यांनी त्यांच्या चुकांवर पण पांघरुन घालु नये.

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, यांचे संबंध त्यांच्या तळाकडील कार्यकर्त्यांपर्यंत होते, आणि त्यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांच्या मागे कार्यकर्ते ठाम असतात, भले त्यांची संख्या कमी का असेना आणि ती त्यांची खरी संपत्ती म्हणावे लागेल. मास लिडर असे महाराष्ट्र भाजप मधेय गोपिनाथ सोडले तर कोणी नाहीये, आणि थोड्या फार प्रमाणात एकनाथ खडसे होते.

ज्याचा जय त्याचेच म्हणणे ऐकले जाते हे ठिक पण शिवसेनेला कमी लेखुन चालणार नाही. भाजपा ने शेवटची निवडनुक जिंकली असे वाटुन घेणे सर्वस्वी चुकीचे आहे. आणि भाजपा जरी दाखवत असेन की आम्ही चर्चेस तयार आहोत तरी ती धुळफेक आहे, मोदिंवर विश्वास ठेवायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचे म्हणने असेल तर मोदींना पटकण निर्णय का घेता आला नाही हा सवाल उपस्थीत होतो. विश्वास कोण कोणावर ठेवणार आणि.. शिवसेना नेते भेटले शरद पवारांना तर तुम्ही बोलताय, मग मोदी- शरद पवार भेट काय गुजराती सामोसे खायला झाली होती का ?

दूसरी गोष्ट केजरीवाल यांची, राजकारण जमले नाही , यु टर्ण घेतले. ठिक आहे. पण सामान्य माणुस मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचु शकतो हे त्यांनी दाखवले.. हे पुरेसे आहे, आणि स्वच्छ माणसाला पुढे जाता येते राजकारणात हे दिसते.

आणि दिल्लीत कॉग्रेस ने बाहेरुन पाठिंबा दिला म्हणुन केजरीवाल ला भाजप बोलत होते, मग येथे राष्ट्रवादीची पाठिंबा चालतो का ?

प्रदीप's picture

10 Nov 2014 - 6:13 pm | प्रदीप

राजकीयच काय, कुठल्याही विषयावरच्या धाग्यांवर इथे बंदी असावी. इतकेच नव्हे तरः
* अशुद्ध* मराठी (जसे, 'बंदि, दूसरी, पदा पर्यंत, केजरीवाल ला....) वरही बंदी हवी.
* अशुद्ध* नावे घेण्यावरही (गणेशा, ओंकारा, प्रदीपा) बंदी हवी.

बंदी कशाकशावर असावी, ह्या विषयाच्या धाग्यावर मात्र बंदी नको. तसेच काय शुद्ध, आणि काय अशुद्ध ह्याच्या चर्चेवरही नको.

बोला तर, जय महाराष्ट्र!!

मुक्त विहारि's picture

10 Nov 2014 - 2:11 pm | मुक्त विहारि

"गोल गरगरीत वाटोळा रुपया हा खरा देव."

हे वाक्य सार्थकी लावायला सगळेच धडपड करतात.

असो... चालू दे...

कपिलमुनी's picture

10 Nov 2014 - 2:45 pm | कपिलमुनी

असे ट्रेलर धागे इथे दाखवून पिक्चर आमच्या ब्लॉगवर बघा

अशा लेखांवर कारवाई करावी

हाडक्या's picture

10 Nov 2014 - 4:43 pm | हाडक्या

+१ ... आणि अशा जाहिराती चालत असतील तर त्या लोकांकडून त्याचे पैसे तरी घ्यावेत आणि 'ADVT' असे लिहावे शीर्षकात.

आनन्दिता's picture

12 Nov 2014 - 9:25 am | आनन्दिता

+११
ब्रोब्र

भाग्यश्री कुलकर्णी's picture

11 Nov 2014 - 11:09 am | भाग्यश्री कुलकर्णी

या विषयाची दुसरी बाजु भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवर लिहीलीये.

एक बाजु ओकांरा यांनी लिहीली.दुसरी बाजु भाऊ तोरसेकरांनी लिहीली.

कोनीतरी तिसरी बाजु लिहावी.
कारण नेहमी तिन बाजु असतात.

यांची ,त्यांची आणी सत्याची

अर्धवटराव's picture

11 Nov 2014 - 11:20 pm | अर्धवटराव

उद्धव ठाकरेंना केजरीवाल म्ह्णा कि आणखी काहि, पण त्यामुळे भाजपाचा निर्लज्जपणा झाकला जात नाहि. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याऐवजी भाजपने जर संपूर्ण सदनाला पाठिंब्याचे आवाहन केले असते तर बात कुछ समझमे आती है. रा.काँ. शी सरळ सरळ हातमिळवणी करुन भाजपने आपले मातिचे पाय फार लवकर दाखवले.
अर्थात, भाजपच्या जागी शिवसेना असती तर त्यांनिही तेच केलं असतं. किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि.

सर्व गणित उरकुन अगदी शेवटचा निकाल द्यायचा तर सर्व पक्ष "जैसे थे" स्थितीत राहातील. काँग्रेसची शक्ती क्षीण झाली आहे ति परत वाढायला वेळ लागेल. भाजपचा तोरा थोडाफार खाली उतरेल पण यापुढे सर्वात मोठा पक्ष तोच असणार. पवार साहेब आपली तुट शिवसेना आणि भाजपकडुन थोडी थोडी भरुन काढणार. सेनेचा ग्राफ थोडा खाली जाणार. मनसे आपली करमणुक करण्यापुर्ती तग धरुन राहाणार. गलिच्छ आहे हे सगळं.

वॉल्टर व्हाईट's picture

12 Nov 2014 - 2:16 am | वॉल्टर व्हाईट

>>किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि.

हे कसे काय बुवा ? तुम्हाला वेळ असेल आणी सहज शक्य असेल तर किमान दोन गोष्टी सांगा ज्याने वाचकांना या वाक्यात तत्थ्य आहे असे वाटेल.

अर्धवटराव's picture

12 Nov 2014 - 3:04 am | अर्धवटराव

पवारांच्या वरदहस्तात (आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा, मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे, आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे) कि भाजपच्या पापात (आता तर सामना कंठरवारे बोंबलतय याबद्दल)

वॉल्टर व्हाईट's picture

12 Nov 2014 - 5:17 am | वॉल्टर व्हाईट

पवारांच्या वरदहस्त या वाक्याबद्दल उत्सुकता आहे.

>>आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा,
>>मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे,
>>आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे

या सगळ्याबद्दल बातम्या शोधायचा प्रयत्न केला, विषेश काही हाती लागले नाही. पण ठिक आहे विदा हवाच आहे असे नाही. तर सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?

अर्धवटराव's picture

12 Nov 2014 - 6:14 am | अर्धवटराव

तिच तर खासीयत आहे बारामतीकरांची ;)

सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?

मातोश्रीवर चहा खुप आवडतो पवारांना असं म्हणतात. शिवाय त्यांच्या आवडत्या गुटख्याची सोय पण तिथे होते म्हणे.
दुय्यम कारण असं कि वसंतसेनेनी आपली न्युसन्स व्हॅल्यु बर्‍यापैकी मेंटेन केली महाराष्ट्रात. तेंव्हा मराठी राजकारणातला हा एक कोन लोभसवाणा वाटतो पवारांना.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2014 - 6:59 am | मुक्त विहारि

ज्या आवडीने ते बटाटे वडा चाखतात , त्याच आवडीने ते सूप पण पितात...

अर्धवटराव's picture

12 Nov 2014 - 7:26 am | अर्धवटराव

कि वड्याच्या गाडीवरुन सूप वाल्याला वेगळं व्हायचा सल्ला पवारांनीच दिला होता. जीवंतपणीच दंतकथा बनुन जावे इतके थोर आहेत आमचे साहेब.

चौकटराजा's picture

12 Nov 2014 - 8:46 am | चौकटराजा

" आता सरमिसळ राजकारण रहाणार आहे तेंव्हा किंग होण्यापेक्षा किंग मेकर होऊन " वसूली" करणे जास्त सोपे जाणार आहे तेंव्हा तू माझ्या सारखा वेगळा पक्ष काढ व पुन्हा विलीन होण्याच्या सूचनांना फाट्यावर मारीत रहा " असा कानमंत्र
" पावर साहेबानी " " सूप स्पेशालिस्टला " दिला असावा.

स्वामी संकेतानंद's picture

12 Nov 2014 - 9:17 am | स्वामी संकेतानंद

सध्यातरी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन फडणवीस महाराष्ट्राचे केजरीवाल झाले आहेत. आता आपण भाजपला राष्ट्रवादीची टीम-बी म्हणायला मोकळे!

हाडक्या's picture

12 Nov 2014 - 5:56 pm | हाडक्या

अगदी अगदी..

आता आप ला नावे ठेवणारे, नाशकात रा.कॉ.चा पाठिंबा घेतला म्हणून मनसेला शिव्या घालणारे 'भाजपा' हितचिंतक मिपाकर काय म्हणतात ते पहायचे आहे.

(आज नाना नेफळ्याची तीव्रतेने आठवण येते आहे.. त्याचा आता नवीन डु-आयडी कुठला ते पण समजेनासे झाले आहे, 'अगदी भाजपी कोण आणि काँग्रेसी कोण कळेना' तशीच गोष्ट झालीये..)

'नेफळट' नामक नवीन वाक्प्रचार बनवावा असे वाटून राहिलेले आहे.

बॅटमॅन's picture

12 Nov 2014 - 6:01 pm | बॅटमॅन

ऊप्स वाक्प्रचार नाही शब्दप्रयोग.

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 12:15 am | हाडक्या

*lol*

जेपी's picture

12 Nov 2014 - 6:00 pm | जेपी

नानाचा डुआयडी पायजे.

देतो hitesh भाई