मदत हवी आहे - मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in काथ्याकूट
6 Nov 2014 - 12:22 pm
गाभा: 

मी खरंच ब्लँक झाले आहे...

काही महिन्यांपुर्वी टेचात एक जवाबदारी घेतली होती... मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण शिकण्यास मदत व्हावी म्हणुन काही प्रेझेन्टेशन बनवायचे आहे.. त्यात चित्र / हलती चित्र (अ‍ॅनिमेशन) वगैरे वापरुन मुलांना "बघुन / वाचुन" समजेल अशा स्वरुपात हे काम करायचे आहे. ह्यात नाम, सर्वनाम, क्रियापदे, प्रत्यय, अव्यय इ सगळंच आलं.. मला क्रियापदे आणि प्रत्यय हे काम दिलं गेलं...

मुलं पहिली - चौथी ह्या वयोगटातली असावीत.. मी शाळेला भेट देऊ शकले नाही पण हे काम ज्याने सुरु केले त्याच्या कडुन कळालं की साधारण ४ पायर्‍या आहेत.. त्याला आपण पहिली ते चौथी म्हणु.. पण वयोगट सामान्य मुलांपक्षा जास्त असु शकतो.. मुळात ही मुलं इतर मुलांचाच अभ्यासक्रम शिकतात.. परीक्षाही तीच देतात.. आणि मग अर्थातच मागे पडुन शिक्षण सोडुन देतात. अगदीच मोजकी मुलं दहावी पास होतात...

मला इतका बिनडोकपणा आणि क्रुरपणा शिक्षणखात्याकडुन अपेक्षित नव्ह्ता...
असो....

तर सुरवात केली ती साध्या क्रियापदांनी.. .gif शोधुन काढल्या.. खाणे, पिणे, हसणे, रडणे, बसणे, तळणे, फुटणे वगैरे चित्र लगेच सापडली.. पण आहे-नाही हे कसं सांगावं ते कळेना.. ही मला न सापडलेल्या क्रियापदांची लिस्ट..
हवे - नको, आहे- नाही, लावणे (ह्यात किती तरी छटा आहेत, रेडिओ लावणे, भांडण लावणे, कडी लावणे..), शोधणे - सापडणे, आठवणे - विसरणे, ओलांडणे, कंटाळा येणे, खोटं बोलणे....

काही मला सापडत नाहीयेत.. काही मला कळतच नाहीयेत की काय शोधु..

पुढचा प्रश्न विभक्ती प्रत्यय....
समजा मला बोलता येत नाही तर मी "मला पाणी हवे आहे" हे हातवारे करुन सांगेन. तेव्हा "मी".."पाणी" अशा मुख्य गोष्टींकडे मी निर्देश करेन.. मी, माझा,मला.. ह्यात ही क्रिया एकच असेल.. मला माहित नाही की ह्या मुलांना जी हातवार्‍यांची भाषा शिकवली जाते ती नक्की कशी असते.. पण ही भाषा बोलताना विभक्ती प्रत्यय लागत असतील का? नसतील तर ह्या मुलांना हे कसं समजवावं?

मी एक तक्ता बनवुन देऊ शकते.. पण मग ते तर त्यांना पुस्तकातही मिळेल..

मला सांगा की मी कसं समजावुन सांगु? कुणाला मुकबधिर मुलांसोबत कामाचा अनुभव असेल तर कृपया मदत करावी...

प्रतिक्रिया

आपला धागा लेख वाचल्या नंतर या मागच आव्हान उमगल. काम सहज सोपे लहान असणार नाही हे लक्षात येते आहे. इंटरेस्ट असेल तर खाजगी आणि शासकीय डोनेशन मागवून काम करावे असे सुरवातीसच सुचवावेसे वाटते आहे . कदाचित "मुकबधिर मुलांसोबत कामाचा अनुभव" शिवाय सहज पुढे जाता येणार नाही. (याचे कोर्सेस वगैरे असतात असे वाटते) मुकबधिरांसाठीच्या हातवारे भाषे संबंधी इंग्रजीतील प्राथमिक माहिती युट्यूब विकिहाऊ इत्यादी स्थळांवरून कदाचित मिळावयास हवी. पण इंग्रजीतील माहिती जशीच्या तशी उपयोगी होणार नाही हेही खरे परंतु ते लोक कोणती साधने कशी वापरतात हे कदाचित लक्षात येण्यास उपयोग होईल.

दुरदर्शनच्या मुकबधीरांच्या बातम्या आणि इतर अशाच चित्रफितींचे साठी संपर्क करून कॉपीराईट मुक्तता मिळवून त्याचे कट पेस्टींगने वेळ वाचू शकेल असे वाटते.

खाप्रे डॉट ऑर्ग मुकबधिरांना आर्थीक मोबदला देऊन काम करून घेत असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर वाचले होते. दुर्दैवाने खाप्रे डॉट ऑर्ग सध्या बंद आहे असे दिसते.

विकिंमाध्यमाच्या संदर्भाने काही मदत लागत असल्यास कळवावे.

या चांगल्या कामास शुभेच्छा

पिलीयन रायडर's picture

6 Nov 2014 - 1:54 pm | पिलीयन रायडर

आम्ही आमच्या कंपनी तर्फे हे काम करत आहोत. त्यामुळे मर्यादा आहेत. त्यातल्या त्यात जे शक्य आहे ते करतोय.
मी विभक्तीबद्दल गुगलत असताना हे पान सापडले. तुम्ही लिहीले आहे काय? थोडं सोप्प करुन लिहीता येईल का तिथे? म्हणजे उदाहरणच दिले आहे.. मुळ विभक्तींचा तक्ता हवा होता. मी गडबडीत वाचलं आहे.. अजुन नीट वाचुन सांगते..

तसं मला अजुन एक पान मिळालं.. हे जास्त सोप्पं वाटलं..

माहितगार's picture

6 Nov 2014 - 2:24 pm | माहितगार

होय, ते उद्योग माझेच आहेत. ह्या (आपणास सोप वाटलेल्या पानातील) विभक्ती पानातील मुंगी शब्दाच्या विभक्ती मॅन्यूअली भरल्या आहेत.

आपण हे जे दुसरं पान आहे त्यात एका साचा-पानात 'शब्द भरायचा तो शब्द सर्व विभक्ती प्रत्ययांसोबत दिसतो. (मुख्य उद्देश विभक्ती शोधण्याचे मिळवण्याचे काम लवकर होऊ शकते अमराठी लोकांना सोपे जाऊ शकते.) असा प्रकार, थोडा अधीक प्रकारात मराठी विक्श्नरीवर विक्शनरी:प्रत्यय उपसर्ग अभ्यास येथे उपलब्ध केला आहे.

विकिपीडियात साचा पान कसे काम करते याची माहिती या ऑनलाईन गूगल सादरीकरणातून मिळू शकेल.

येथे साधुसाधित शब्द बनताना धातूला (क्रियापदे) जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांची रूपे आणि क्रियापदांची मोठी यादी आहे.

अर्थात माझ्या उपरोक्त प्रयोगशीलतेचे मूळ हेतु वेगवेगळे राहीले आहेत अर्थात आपणास कसा बदल हवा आहे ते सांगीतल्यास काय करता येईल ते पहाता येईल. भारतीय विभक्ती प्रत्ययांसाठी काही साईन लँग्वेज/चित्रलिपी असल्यास खरेतर बरे पडेल असे वाटते.

जाता जाता इंग्रजी विकिपीडियावर हा लेख आढळला.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे हे काम करत आहोत. त्यामुळे मर्यादा आहेत.

एनीवे आर्थीक मर्यादा याना त्या प्रकारे येणार ह्याची कल्पना आलीच, त्यात कंपनी असल्यामुळे एनजीओ प्रमाणे सरकारी अनुदानेही मिळणार नाहीत. दानशूर मिपाकरांनो विचार करा एवढेच म्हणावेसे वाटते.

पिलीयन रायडर's picture

6 Nov 2014 - 2:34 pm | पिलीयन रायडर

अहो प्रश्न पैशाचा नाहीये.. आम्ही फक्त स्टडी मटेरियल बनवुन देत आहोत जे त्यांच्या शिक्षकांना उपयोगी पडेल.. Visual Aid सारखं.. पण ते ही करता करता तोंडाला फेस आलाय.

वाटलं तसं अजिबातच सोपं काम नाहिये हे..

माहितगार's picture

6 Nov 2014 - 3:04 pm | माहितगार

जो ऑनलाईन शोध घेतो आहे बहुधा अद्याप भारतात साईन लँन्ग्वेजच प्रमाणीकरण झालेल नाही. महाराष्ट्रात मराठीसाठी एकसारखी साईन लँग्वेज वापरली जाते का याची माहिती घ्यावी लागेल.

तुम्ही म्हणता तो व्याकरणीय प्रॉब्लेम लक्षात आला पण ज्यावर कधीच काही मॅन्यूअल काम पण झाल असेल-नसेल ते स्क्रॅचपासून करणे आले. तुम्ही शाळेत एक वेळ भेट देऊन पाहू शकाल त्याने शिक्षकांशी पूर्ण संवाद साधला जाणार नाही शिक्षक तुमच्या ऑफीसमध्ये बोलावणे आले की खर्च चालू झाला. तुम्ही वेळ वाचवला नाहीत तर पुरेसे काम होणार नाही वेळ वाचवण्याच्या कामासाठी खर्च येत असतो वर्कींग कॅपीटलचे महत्व अधोरेखीत करण्याच्या दृष्टीने आर्थीक बाबी बद्दल म्हणालो एवढेच असो.

कंजूस's picture

6 Nov 2014 - 2:02 pm | कंजूस

वाचलं पण सुचत नाही.

बॅटमॅन's picture

6 Nov 2014 - 2:24 pm | बॅटमॅन

एक आगंतुक सल्ला असा, की मूकबधिर लोकांची भाषा जाणणार्‍या कुणाशी संपर्क साधावा. लय काय काय माहिती मिळू शकेल.

माहितगार's picture

6 Nov 2014 - 2:31 pm | माहितगार

हम्म.. मुकबधीरांचे पण सुशिक्षीत पालक बघावे लागतील. शिक्षक शोधले तर त्यांच्या मोबदल्याच्या अपेक्षा सहाजिक असणार ज्या अ‍ॅडीशनल स्पॉन्सरशीप शिवाय सहज होऊ नाही शकणार.

पिलीयन रायडर's picture

6 Nov 2014 - 2:32 pm | पिलीयन रायडर

हो ते डोक्यात आहेच.. सगळ्यात सोप्पं म्हणजे त्या शाळेला जाऊन भेट देणे.. पण त्यांची आणि आमची वेळ जुळत नाहीये. तोवर उशीर होऊ नये म्हणुन हा धाग्याचा प्रपंच..

ही भाषा जाणणारं दुसरं कुणी माहित नाही मला..

माहितगार's picture

6 Nov 2014 - 4:02 pm | माहितगार

सहज शोध घेतला (तसा तुम्हीही घेतला असणारच) तेंव्हा इथे कदाचित काही उपयुक्त माहिती मिळेल असं वाटलं....

पुण्यात असाल तर खालील शाळा आहेत असं या दुव्यात सापडलं, (तिथेच देशभरातील इतरही शाळांची माहिती आहे), यांपैकी कुठेतरी तुम्हाला हवी ती माहिती मिळेल कदाचित:

SUHRUD MANDAL, PUNE'S CHINCHWAD BADHIR MUK VIDHYALAYA,
SECTOR NO. 26,
P.C.N.T.D.A.SINDHU NAGAR,
NIGADI,
PUNE – 411044

MUK BADHIR VIDHYALAYA,
J.E.S - MUK BADHIR VIDHYALAYA,
AT POST-JUNNER,
PUNE – 410502

INDIAN RED CROSS SOCEITY'S SCHOOL FOR THE DEAF,
5TH FLOOR, ATUR SANGATANI RED CROSS HOUSE,
NO. 11 M.G. ROAD,
PUNE – 411001

C.R. RANGANATHAN RESIDENTIAL SCHOOL FOR DEAF,
S. NO. 161/13, ADARSHA COLONY,
KRANTI CHOWK,
ROAD NO. 1. TINGARENAGAR, VISHRANTWADI,
PUNE – 411015

RESIDENTIAL SCHOOL FOR DEAF,
SURVEY NO. 156, MAZADA BLDG.,
FLAT NO. 1, MOHANWADI, YERWADA,
PUNE - 411006

Y.M.C.A. GARLAND CRAIG MEMORIAL SCHOOL FOR THE DEAF,
6, ARJUN MARG,
NEAR RACE COURSE,
PUNE – 411001

BADHIR MOOK SHIKSHAN KENDRA,
805, SMRUTI, BHANDARKAR ROAD,
SHIVAJINAGAR,
PUNE – 411004

MAHARASHTRA FELLOWSHIP FOR DEAF,
93/3, MOHAMMAD WADI RD., HADAPSAR,
NEAR H.V. DESAI EYE HOSPITAL,
PUNE - 411028

एस's picture

6 Nov 2014 - 7:14 pm | एस

शुभेच्छा देण्यापलिकडे सध्या काही करू शकत नाही याची खंत आहे. पण आपणांस या कार्यात भरघोस यश लाभो ही प्रार्थना... मला काही सापडल्यास जरूर कळवेन.

कंजूस's picture

6 Nov 2014 - 9:43 pm | कंजूस

बोलतांना मूक बधिरांना विभक्तिंची फारशी गरज लागत नसावी. आपणही दूरच्या गच्चीवरच्या व्यक्तीशी खुणेने सांगण्याची वेळ आली तर काय करू? कमीतकमी खुणांनी सांगू ना ?उदा॰
१)पुस्तकावर/कांवर नाव/नावे लिही.
२)कुत्र्याला मारू नको.
३)पतंगाची दोरी सोड.
४)आई घरात नाही.
५)बाबांना बोलव.

रामपुरी's picture

6 Nov 2014 - 11:37 pm | रामपुरी

त्यामुळे एवढे सांगू शकतो की खुणांच्या भाषेत (sign language) मध्ये विभक्तींची (आणि एकूणच व्याकरणाची) फारशी गरज भासत नाही. मला वाटतं, कि एका शब्दाची विविध रुपे लिहून दाखवुन त्याचा वाक्यात उपयोग कसा होतो हे खुणांच्या भाषेत दाखविल्यास उपयोग होऊ शकेल. चित्र दाखवून फार उपयोग होणार नाही असं वाटतंय. उदा पडणे हे क्रियापद घेतलं तर त्याचे वेगवेगळे अर्थ त्याना माहीत असतील पण त्याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रूपे कशी होतात हे वाक्यात उपयोग करुनच त्याना जास्त लवकर कळेल. काम मोठं आहे यात शंकाच नाही. शुभेच्छा...
पुण्यात असाल तर पेरूगेट जवळ भावे स्कूलला भेट द्या असं सुचवेन.

निखिलचं शाईपेन's picture

7 Nov 2014 - 12:49 am | निखिलचं शाईपेन

यापैकी क्रियापदे अशी समजावून सांगता येतील. एक लहान मुलगा आणि एक मुलगी असे दोन स्वयंसेवक नट घ्या. त्यांना हि क्रियापदे अभिनय करून दाखवायला सांगा जसे हवे आहे म्हणजे एक बाल नट दुसऱ्याला खुणेने एखादी गोष्ट हवी का ते विचारतो आणि तो खुणेने (उदा थम्ब्स अप, किंवा हाताने दे ची खूण करून) हो म्हणतो. त्याच वेळी तोंडाने पण हो म्हणायला लावा. विडिओच्या सुरुवातीला आणि नंतर क्रियापद लिहिलेले दाखवा. त्यानंतर या विडिओ आवाजा शिवाय जिफ मध्ये कनवर्ट करा.

-निखिल

मदत अशी खरच काही करु शकत नाही, पण शुभेच्छा मात्र देउ शकते.
एक विचारु का? एकदा भाषेशी ओळख झाली की मग ही मुलं वाचु शकत नाहीत का? मग वाचनातुन त्यांना व्याकरण शिकवता येउ शकेल ना?

माहितगार's picture

7 Nov 2014 - 9:36 am | माहितगार

भाषेशी ओळख झाली

खाणाखूणांच्या भाषेतून विभक्ती आणि बर्‍याच शब्दांच्या छटा सुटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण खाणाखूणांच्या भाषेतून एकुण संवादाचे प्रमाण कमी होते त्यामुळे खाणाखुणा आणि भाषा यात या लोकांसाठी एक दरी शिल्लक राहतेच. भाषेची ओळखच पूर्ण होत नसेल तर लिखित मजकुर पूर्ण सहज सुगम होणार नाही. पाणी दाखवून पाणी हा शब्द दाखवल्यास तो ते चित्र म्हणून लक्षात ठेवेल मणी दाखवून मणी हा शब्द चित्र म्हणून लक्षात ठेवेल. पण 'ण'चे मूळात उच्चारणच माहित नसल्यास दोन्ही ठिकाणी ण का येतोय ते समजणारच नाही. स्थळ/गावांची नावांची पहिली ओळख आणि नकाशा वाचनही या मुलांना कसे करवले जात असेल असा प्रश्न पडतोय. एकुण हे सहज सोप प्रकरण नक्कीच असणार नाही.

व्यक्तीगत संवादात खाणाखूणा करून दाखवता येते. पण या विशीष्ट आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांच्या निरतंर आणि स्वतःची स्वतः अभ्यासण्याची क्षमता आणि दस्तएवज हाताळण्याची क्षमता ज्याचा पुढील जीवनातील व्यावसायीक निर्णय क्षमतेशीही संबंध असेल त्यात विभक्ती क्रिया आणि इतरही व्याकरणाचे ज्ञान उपयूक्त आणि महत्वाचे ठरणारे असेल असे वाटते.

माहितगार's picture

7 Nov 2014 - 11:01 am | माहितगार

विकिमीडिया कॉमन्सवरील अ‍ॅनीमेशन्स कुठे वापरता आल्यास पहावे असे सुचवावेसे वाटते. उदाहरणार्थ फिरणे या क्रियेसाठी रोटेशन अ‍ॅनिमेशन कॅटेगरीतील मल्टीपल अ‍ॅनिमेशन्स एकाच वेळी दाखवल्यास कदाचीत फिरणे संबंधीत विवीध क्रिया एकदम दाखवता येतील. फिरणे क्रियापद माणूस फिरतो, पृथ्वी फिरते सोबत सोबत दाखवलेतर क्रिया कदाचित कन्फ्यूज होतील का ?

माहितगार's picture

7 Nov 2014 - 11:26 am | माहितगार

रेडिओ लावणे एवजी पंखा लावणे टिव्ही लावणे अशा क्रिया दाखवणे अधीक सोपे जाईल. असे वाटते.

भांडण लावणे मध्ये आधी केवळ भांडणे दाखवून = भांडण आणि = भांडण लावणे असे दाखवता येईल असे वाटते.

पिशी अबोली's picture

7 Nov 2014 - 12:13 pm | पिशी अबोली

साईन लँग्वेज बद्दल मला काहीच महिती नाही. पण भारतात वापरली जाणारी साईन लँग्वेज ही 'इंडो-पाक साईन लँग्वेज' च्या स्टँडर्ड ने बनवली जात असावी. माझ्या माहितीप्रमाणे यात खुणांसोबतच तोंडाने बोलणे यालाही महत्व आहे, व सर्वसाधारण भाषेप्रमाणेच याचे व्याकरणही तितकेच गुंतागुंतीचे आहे.
त्यांना मराठी व्याकरण शिकवायचं, म्हणजे नक्की काय शिकवायचंय हे मला नीटसं कळलेलं नाही. त्यांना परस्परांशी संपर्क करण्यासाठी शिकवायचं आहे, का जी मराठी भाषा सर्वसाधारणपणे वापरली जाते, ती समजण्यासाठी (एस्पेशली, वाचण्यासाठी) शिकवायचं आहे, ते बघावं लागेल. मला जेवढं लक्षात आलं, त्यावरून असं वाटतंय की त्यांच्या साईन्स ठरलेल्या असतील. त्यांना संकल्पना शिकवायच्या आहेत, राईट?
वर निखिलचे शाईपेननी सांगितलेली कल्पना मला वाटतं, क्रियापदांसाठी वापरता येईल. आहे/नाही साठीही ही कल्पना वापरता येईल. (उदा. पाण्याने भरलेला ग्लास-पाणी आहे, पाणी ओतून टाकले-पाणी नाही अशी उदाहरणे जी सर्वसाधारणपणे नवीन भाषा शिकवताना वापरली जातात त्याचे व्हिडिओ बनवता येतील का?) क्रियापदांच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा हव्या असतील तर मला वाटतं त्याबद्दल पुरेशी माहिती इंटरनेट वर मिळावी. त्यापलीकडे जाऊन मराठीची भाषाशास्त्रीय व्याकरणे आहेत, पण ती कॉपीराईटेड आहेत. त्यामुळे त्याबाबतीत नक्की काही सांगू नाही शकत.
विभक्ती हा ट्रिकी भाग आहे. संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण शिबिरांची पद्धत इथे कदाचित उपयोगी पडेल. तिथे आधी षष्ठी विभक्तीपासून सुरुवात होते कारण ती शिकवण्यासाठी सोपी आहे. (माझा हात, माझे पुस्तक, माझी शाळा इ.) पुन्हा इथे व्हिडिओज तयार करावे लागतील. द्वितीया/चतुर्थीमधे मराठीत शिकवण्याइतका फरक नाही. (दे या क्रियापदासाठीचा व्हिडिओ इथे वापरता येईल-मला दे इ.) पंचमी, सप्तमी शिकवणं सोपं जावं.
याव्यतिरिक्त मराठीमधे अनेक प्रत्यय या विभक्तींसाठी वापरले जातात. त्यांची लिस्ट बनवावी लागेल. पण मुळात विभक्ती ही संकल्पना समजली तर हे कठीण जाऊ नये.
मी फारच व्हेग बोलत असेन कदाचित, पण हे एवढंच आत्ता सुचतंय. काही मदत लागली, तर मी नक्की करेन.

माहितगार's picture

7 Nov 2014 - 5:33 pm | माहितगार

त्यापलीकडे जाऊन मराठीची भाषाशास्त्रीय व्याकरणे आहेत, पण ती कॉपीराईटेड आहेत.

अपंग व्यक्तींसाठी तयार करावयाच्या साधनांसाठी पण संबंधीतांना योग्य मोबदल्याची किंमत/रॉयल्टी द्यावी लागते पण ओनरला कॉपीराईट लायसन्स विथहोल्ड करणे अभिप्रेत नसते. सुयोग्य फॉर्मॅट मध्ये विनंती आल्यास भारत सरकारचे कॉपीराईट ऑफीस हस्तक्षेप करू शकते.

माहितगार's picture

7 Nov 2014 - 5:51 pm | माहितगार

विभक्ती हा ट्रिकी भाग आहे. संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण शिबिरांची पद्धत इथे कदाचित उपयोगी पडेल. तिथे आधी षष्ठी विभक्तीपासून सुरुवात होते कारण ती शिकवण्यासाठी सोपी आहे. (माझा हात, माझे पुस्तक, माझी शाळा इ.) पुन्हा इथे व्हिडिओज तयार करावे लागतील. द्वितीया/चतुर्थीमधे मराठीत शिकवण्याइतका फरक नाही. (दे या क्रियापदासाठीचा व्हिडिओ इथे वापरता येईल-मला दे इ.) पंचमी, सप्तमी शिकवणं सोपं जावं.

विभक्ती चालू करण्या पुर्वी एकवचन अनेकवचन दाखवावे लागेल. कारण वचनानुसार विभक्ती बदलतात ते प्रथमेत होऊन जाईल. आपण म्हणता तसे माझे तुझे इतरांचे या संकल्पना त्यांना सहसा माहित असणार, षष्ठी विभक्ती कशा सांगावयाच्या ते पहावे लागेल. आधी संबोध विभक्ती दाखवून द्वितीया आणि चतुर्थी विभक्त्या दाखवल्यास सोपे जाईल का ?

पंचमीत कशातरीपासून वाली संकल्पना आहे आणि सप्तमीत कशाच्या तरी आत ही संकल्पना आहे त्याही विद्यार्थ्यांना माहित असणार शिक्षकांसोबत एकदा भेट झाली की विभक्ती कशा दाखवायच्या उलगडा होईल असे वाटते. म्हणजे विभक्तींबद्दल अगदीच संकल्पना शिकवणे असे होणार नाही.

भांडण लावणे सारखी अनपेक्षीत क्रियापदे आणि शोधणे - सापडणे, आठवणे - विसरणे, ओलांडणे, कंटाळा येणे, खोटं बोलणे. अवघडच असेल

या प्रेझेंटेशनच्या मदतीने त्यांना परीक्षेचा अभ्यास करायला मदत व्हावी असा उद्देश आहे का?

उच्चार समजणा-या मुलांना सोपी पुस्तकं वाचायला देऊन व्याकरण शिकवता येईल का? मात्र ते प्रेझेंटेशनमध्ये कसं घ्यावं समजत नाही.

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2014 - 12:41 pm | पिलीयन रायडर

मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे ह्या मुलांना नॉर्मल मुलांसारख्याच (खरं तर त्याच.. तोच अभ्यासक्रम.. तोच पेपर) परीक्षा द्याव्या लागतात. म्हणुन त्यांना मराठी ह्या विषयासाठी हा अभ्यासक्रम आहे. त्यात ४ पातळ्यांवर हा अभ्यासक्रम आहे.

मी क्रियापदे समजावण्यासाठी अशा .gif चा वापर केलाय.

1

2

ह्या प्रमाणे मला बर्‍याच क्रियापादांसाठी चित्रे मिळाली...

मी त्या शाळेलाच भेट देण्याचे ठरवले आहे. मला जी माहिती कळेल ती इथे नक्की टाकेनच.

राजाभाउ's picture

7 Nov 2014 - 1:14 pm | राजाभाउ

माझे भाउजी मुकबधिर शाळेत शिक्षक आहेत कोल्हापुरात, त्यांची कदाचित मदत होउ शकते, हवा आसल्यास त्यांचा फोन नं. वगैरे देउ शकेन.

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2014 - 1:54 pm | पिलीयन रायडर

जमल्यास व्यनि करावा..धन्यवाद!!

जगी सर्व सुखी मिपाकर आहेत...

मधुरा देशपांडे's picture

7 Nov 2014 - 3:05 pm | मधुरा देशपांडे

प्रेझेन्टेशन स्वरुपात सांगायचे असेल तर काही कल्पनांसाठी एखादे परकीय भाषा शिकतानाचे पुस्तक मिळाले तर काही त्यावरून सुचू शकेल का? जसे की उदा. जर्मन, फ्रेंच वगैरे. भाषा शिकताना त्यात क्रियापद, शब्द या सगळ्यासाठी अशा पुस्तकांमध्ये बरीच चित्र वापरली जातात. आता नेमकी तशी चित्र आन्जावर शोधायची हे करावे लागेल पण कदाचित काय शोधायचे यासाठी मदत होऊ शकेल. आणि यात काही क्रमाने ही क्रियापद शिकवली जातात बरेचदा. उदा. एक चित्र सकाळी शाळेत निघालेल्या मुलाचे, मग शाळेत गेल्यावर पुस्तक वाचणे, खेळाच्या तासाला खेळणे अशा क्रमाने चित्रांच्या स्वरुपात समजावले जाते आणि वेगवेगळ्या क्रियापदांची ओळख होते. असे काही करता येईल का?
मी काल माझी दोन तीन पुस्तकं चाळली आणि कदाचित थोडी मदत करू शकेन. तू वर सांगितलेली क्रियापदे बघून विकांताला मला चित्रे किंवा तत्सम शोधत आलं तर पाठवते. पण नक्की हे असं हवंय की अजून काही हे मला कळत नाहीये.

माहितगार's picture

7 Nov 2014 - 5:19 pm | माहितगार

हम्म.. आपण परभाषी विद्यार्थ्याला मराठीतील शब्द समजावून देतोय असा विचार करून काम केले तर कदाचीत किंचीततरी सोपे जाईल असे वाटते.

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2014 - 3:44 pm | पिलीयन रायडर

क्रियापदं शिकवणं अवघड नाहीये... मला विभक्ती कशा सांगाव्यात हे कळत नाहीये... म्हणजे मुळात त्यांना त्याची गरजच नाहिये. आजवर पडली नसेलही.. त्यांना की कन्सेप्ट किती विचित्र वाटेल..

मला वाटतं की मी त्या शाळेत जाउन आले की अजुन नीट उलगडा होईल...

पिशी अबोली's picture

7 Nov 2014 - 4:04 pm | पिशी अबोली

पिराताई स्टँडर्ड साईन लँग्वेज मधेपण विभक्ती किंवा तत्सम काँन्सेप्ट्स असतात. सो त्यांना माहीतपण असेल. विभक्ती आणि त्यांची नावं नाही अगदी, पण अशा प्रकारच्या भाषिक स्ट्रॅटेजी माहीत असतील.
शाळेत जाऊन येणे बेस्ट आय्डिया.. ऑल द बेस्ट...

साईन लँग्वेजमध्ये विभक्ती वा तादृश कल्पना कशा सांगत असावेत, एतत्संबंधी काही माहिती असल्यास द्यावी, ही विनंती.

माझे सासू-सासरे दोघेहि मूक-बधिर आहेत. त्यांच्याशी बोलताना आलेल्या experiemce वरून एक सांगु शकते कि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबरोबर communicate करण्यासाठी त्यांच्या आकलन क्षमतेनुसार किवा सोयीनुसार काही खुणांचे संकलन केलेले असते. काही ठराविक खुणा सोडल्या (alphabets, काही कृती) तर प्रत्येक मूक-बधिरचा स्वतःच्या आजुबाजूच्या माणसांना कळेल असा तो खुण-संचय असतो. Sign language प्रमाणीकरण जर केलेले असेल, तरीही प्रत्यक्ष व्यवहारात खुणा वापरताना व्यक्ती सापेक्ष बदल होतात हा माझा अनुभव आहे.

त्यांच्याशी msg द्वारा communicate करताना आम्ही फक्त काही शब्द एका मागोमाग लिहितो. Msg लिहिताना विभक्ती किंवा प्रत्यय वापरले तर त्यांचा गोंधळ होतो, अर्थ समाजत नाही. e.g. "मला घरी यायला उशीर होणार आहे. बस traffic मध्ये अडकली आहे" हा msg जसाच्या तसा पाठवला तर त्यांचा गोंधळ होतो. काही शब्द "यायला", "अडकली", "होणार" त्यांना काळात नाही. हा msg आम्ही असा लिहितो " मी घर उशीर येणार. बस traffic खूप." हा msg त्यांना लगेच कळतो.

मूक-बधिर शाळेत शिकवणाऱ्या काही लोकांचे contact numbers सवडीने व्यनि करीन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Nov 2014 - 5:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्य.नि. केलाय.

पिलीयन रायडर's picture

11 Nov 2014 - 1:49 pm | पिलीयन रायडर

सध्यापर्यंत मिळालेली माहिती:-

समजा त्या मुलांना म्हणायचे आहे : माझा
तर स्वतःकडे खुण करुन "झा" ची साईन करायची..
मला - स्वतःकडे बोट करुन "ला" ची साईन करायची.

जर एखाद्या वस्तुच्या लिंगाकडे निर्देश करायचा असेल तर - त्या वस्तुची साईन आणि स्त्री/पुरुष/नपुसकलिंगाची साईन

आता विचार करा, ह्या मुलांना लिंग आणि वचन दोन्ही एकदम समजायला हवे.. त्यात पण त्या प्रमाणे क्रियापद सुद्धा बदलायचे आहे.. योग्य विभक्ती वापरायची आहे... आणि हे सगळं साईन्स वापरुन...

म्हणजे खरं तर स्वतःकडे बोट दाखवुन काम झालं असतं..पण टेक्निकली करेक्ट असण्यासाठी "झ"/"ल" पण सांगायचे...

मी मराठी भाषेसाठी साइन्स असणारं प्रभा घाटेंच पुस्तक आहे म्हणे.. ते शोधतेय.. कुणाला ठाउक असल्यास सांगावे..

माहितगार's picture

11 Nov 2014 - 2:28 pm | माहितगार

प्रभा घाटेंच पुस्तक मिपाप्रतिसादातून उपलब्धता कितपत शक्य होईल याची शंका वाटते आहे. http://ayjnihh.nic.in/hindi/aboutus.asp अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान येथे त्यांचे संपर्क क्रमांक दिसत आहेत त्या संपर्क क्रमांकावर विचारल्यास कदाचित माहिती मिळू शकेल असे वाटते. किंवा संबंधीत शिक्षकांशी संपर्क करूनच.