आजोबा...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
3 Nov 2014 - 10:39 am

आजोबा जर कागद असते तर
त्यानं त्यांची नाव केली असती
आजोबा जर डोंगर असते तर
त्याने खोल उडी घेतली असती
आजोबा अंगणात उभे असले की
त्याला चक्क झाड वाटतात
हाताच्या फांदीला लोंबकाळलं की
आजोबा चक्क झोका होतात
झोका घेताना
तो कधीच घाबरत नाही
डोळे मिचकावून
बघितले की
भीती कसली वाटत नाही ….
आजोबा काही काम करताना
करतो त्यांचं लक्ष विचलित
घुसळतो अंग नि अंग
हलकेच घुसतो मिठीत ....
आजोबांना वाटून जाते
तो .म्हणजे ..
मी आहे ...?
का …
मी म्हणजे….
तो आहे .....??
मग
फुटून जातो मायेचा पाझर
आजोबांच्या काळजातून ....
आणि आजोबा बघू लागतात
मायेच्या पाझरणा-या झ-याला
आपल्याच रक्तातून …!!

प्रकाश

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

3 Nov 2014 - 1:20 pm | गणेशा

कविता अतिशय सुंदर, मनाचा बांध ओलांडणार्‍या आठवणी .. मस्त.

आठ्वणी अश्याच असतात.. कधी त्या डोगरावर चढून जातात, हलकेच त्याच्या कढ्यावरुन दरीत झोकुन देतात ..
कड्या कपार्‍यात हिंडुन येतात, अगदी झाडाचे पान बनुन.. मनाच्या वादळात ही उंच उंच जातात .. आठवणी अश्याच असतात.
- गणेशा
(बर्याच वर्षानी आलो .. पहिलीच कविता वाचली ही )