संभाषण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 3:39 pm

ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते.
ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित..
एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते..
एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति..
एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता..
एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे
काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते
१ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल..
एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...

भाषा

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Oct 2014 - 3:43 pm | माम्लेदारचा पन्खा

कुठुन प्रसवता ह्या विषयांना ?

पिंपातला उंदीर's picture

29 Oct 2014 - 3:47 pm | पिंपातला उंदीर

अश्लील अश्लील : )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Oct 2014 - 4:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काय रे हे अवी? आंतरजालिय मराठी लिखाण उच्च दर्जाचे असले पाहिजे असे तू नेहमी म्हणतोस त्याचे काय?

धनंजय माने इथेच राहतात का ? :p

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 8:54 pm | अर्धवटराव

=)) =)) =))

पाषाणभेद's picture

30 Oct 2014 - 10:26 am | पाषाणभेद

मागचा एक धागा फार चवदार होता. पण गेलाच तो.

धनंजय माने इथेच राहतात का ?
आज या अमर संवादाला आणि चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्या मध्ये हा संवाद आहे, त्या चित्रपटाला ३२ वर्ष पूर्ण झाली !
२३ सप्टेंबर १९८८ साली ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला.

‘अशी ही बनवाबनवी’चे ‘हे’ दहा संवाद आजही खदखदून हसवतात

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2014 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा

ऊंssssssssss!!!!! :-D

योगी९००'s picture

29 Oct 2014 - 5:16 pm | योगी९००

ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते.
त्यांना Filler असे म्हणतात. बर्‍याच वेळेला फिलर शब्द वा वाक्य बोलताना आपण विचार करत असतो की पुढे काय बोलावे ते.

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 5:27 pm | काळा पहाड

विषय सँभाँषंण असा हवा होता.

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 5:45 pm | बॅटमॅन

यालाच पादपूरके म्हणतात. संस्कृतातले पादपूरक 'तु, हि, च, स्म, ह, वै' हे होत. त्यातही चवैतुहि जास्त वापरतात. संस्कृत शिक्षणाचा प्रभाव असलेले जुन्या काळातले लोक पादपूरकांनाच चवैतुहि असेही म्हणत.

या संबंधाने एक श्लोक आठवला.

उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः |
प्रभाते कूजते कुक्कु चवैतुहि चवैतुहि ||

यामागील कथा येणेप्रमाणे: कोणे एके काळी एका राजाश्रित कवीने एक श्लोक रचला, 'उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद' च्या थाटात. गोविंदचे झाले राजेंद्र. तो त्याला सांगतोय, हे राजेंद्रा, ऊठ. बरं, उठून करायचं काय? 'मुखं प्रक्षालयस्व', तोंड धू.

पण 'मुखं प्रक्षालयस्व' मध्ये ७ अक्षरे आहेत अन वृत्तात बसायला टोटल ८ म्हणजे अजून एक अक्षर पाहिजे. कवी चांगला जिलबीपाडू होता, त्याने एक 'ट' जोडला उगीच. पुढे मग 'प्रभाते कूजते कुक्कु', सकाळी कोकिळा कूजन करते. काय कूजन करते? तर 'चवैतुहि चवैतुहि'. उगा जागा भरायची म्हणून पादपूरणासाठी (पाद = कवितेतला श्लोकाचा पाव भाग, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे.) कायपण!

अकुंच्या धाग्याच्या निमित्ताने हा श्लोकही आठवला, धन्यवाद.

योगी९००'s picture

29 Oct 2014 - 6:27 pm | योगी९००

__/\___
आपले पाद कोठे आहेत? (पाद=पाय, दुसरा प्राकृत अर्थ न घेणे).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2014 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले पाद कोठे आहेत?

-दिलीप बिरुटे

बॅटु हे आपली असामान्य प्रतिभा केवळ केवळ प्रतिसादात व्यर्थ घालविता त्यासाठी त्यांचा तीव्र निषेध त्रिवार निषेध !
त्यांनी तत्काळ एक दमदार लेख संस्कृत भाषे वर लिहावा ही अत्यंत आग्रहाची मागणी तारस्वरात करत आहे.
स्वर्गात इंद्र
केंद्रात नरेंद्र
महाराष्ट्रात देवेंद्र
मिसळपावीवर बॅटेंद् !!!!
बंधु आपले संस्कृत चे ज्ञानकण कुठे कुठे विखुरलेले आहेत कृपया लिंका पुरवाव्यात.
आपली वचने वेचण्यास उत्सुक
मारवा

अविनाश पांढरकर's picture

30 Oct 2014 - 11:38 am | अविनाश पांढरकर

स्वर्गात इंद्र
केंद्रात नरेंद्र
महाराष्ट्रात देवेंद्र
बाहेरुन शरदचन्द्र
मिसळपावीवर बॅटेंद् !!!!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 11:49 am | टवाळ कार्टा

=))

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2014 - 6:57 pm | बोका-ए-आझम

भयानक सुंदर दिलखेचक माहिती!

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 9:42 am | समीरसूर

आवडली. :-)

पुष्कर's picture

27 Jan 2015 - 3:51 pm | पुष्कर

मी ह्या श्लोकाची जी दोन व्हर्जन्स ऐकली आहेत, त्यात 'प्रभाते रटते कुक्कु' आणि 'एष आह्वयते कुक्कु' असे होते. ते असो. कुक्कुटः चा अर्थ कोंबडा असा होतो ना? पिक म्हणजे कोकिळ असा माझा समज आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा

खतरनाक किस्सा !

सुनील's picture

30 Oct 2014 - 8:44 am | सुनील

बॅटमन यांनी दिलेली माहिती रोचक! पूर्वीचे मराठी कवीदेखिल 'अन्' इत्यादी शब्दांचा असाच उपयोग करीत.

संस्कृत काय किंवा मराठी कवी काय, दोहोंना आपल्या रचना वृतात बसवण्यासाठी अशा फिलर्सची आवश्यकता वाटत असावी.

परंतु, अकु म्हणताहेत ते थोडे वेगळे आहे. ते विविध लोकांच्या बोलण्याच्या लकबींविषयी विचारताहेत. अशा लकबी सहसा दुसर्‍यांकडून उचलल्या जात असतात.

आमचा एक जुना साहेब असाच कुठलाश्या आम्रविकावारीत 'डाउन द लाईन' हा शब्दसम्मुच्चय शिकून आला आणि अक्षरशः कुठेही वापरू लागला!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Oct 2014 - 9:56 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आउट ऑफ द बॉक्स , इट्स नॉट रॉकेट सायन्स हे शब्दसमुच्चय अधून मधून ऐकू येतात.तुमचे ते आय टी वाले बोलताना डीझाईन्,लॉजिक्,पॅटर्न हे शब्द पर्त्येक वाक्यात घुसवतात असे हे म्हणतात.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 10:00 am | टवाळ कार्टा

ये बंदेको ईश्शु समझाही नही :)

मुक्त विहारि's picture

30 Oct 2014 - 10:09 am | मुक्त विहारि

झक्कास.....

लेखन....विचार्मंथन आवडले...

खटपट्या's picture

30 Oct 2014 - 10:58 am | खटपट्या

बेसिकली......
यु नो.....?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2014 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी बरोबर, करेक्ट, अ‍ॅक्च्युअली, द्याट्सइट्, आय शप्पथ, मी कधीच खोटं बोलत नै, लिगल मत, राग येईल पण बोलतो. असंय तर ते, आयसी, वाट्स रॉंग यार,

वेल्लाभट's picture

30 Oct 2014 - 11:06 am | वेल्लाभट

अ‍ॅक्चुली कायै न.... बेसिकली..... सी; असं आहे की.... असो.
बाकी?

समीरसूर's picture

30 Oct 2014 - 11:14 am | समीरसूर

आमची एक सहकारी नेहमी 'पर्कोलेट' हा शब्द वापरायची. कुठून तरी ओढून ताणून संदर्भ आणायची आणि 'इट वुईल पर्कोलेट टू अ लार्जर ऑडियन्स...' सुरू व्हायची.

आजकाल 'इंप्रूव्ह' साठी भारी शब्दपर्याय म्हणून बरेच लोकं 'इंम्प्रोवाईज' वापरतात. :-) माझा एक मित्र हाच शब्द वापरायचा मग मी त्याला 'इम्प्रूव्ह' आणि 'इम्प्रोवाईज' मधला फरक समजावून सांगीतला...

हा लेख वाचून यू नो.. आय वॉज लाईक.. आय वॉज लाईक ..वाऊ..आय मीन ..आय मीन इट्स लाईक वॉव..

आय वॉज लाईक..इज धिस अकु? आय मीन धिस इज ऑस्सम मॅन..

आदूबाळ's picture

30 Oct 2014 - 12:46 pm | आदूबाळ

+१

"आय वॉज लाईक" हे "आय सेड" चं नव-इंग्रजी रूप आहे हा प्रकाश टकु-यात पडायला वेळ लागला होता.

प्रमोद देर्देकर's picture

30 Oct 2014 - 12:10 pm | प्रमोद देर्देकर

आला आला अकुंचा धागा आला ,
पण अकु गेले गावाला

ह्या अकुंचे असेच असते ते कधी परत धाग्यावर हजेरी लावतच नाहीत.

आता लेखन विषयी ....

आमच्या ऑफिसमधले नग आहेत त्यांना अशा सवई आहेत एकजण म्हणत असतो " यु नो " " यु नो "

तर दुसरा म्हणत असतो "बेसिकली आय थिन्क / बेसिकली व्हॉट हाप्पन्ड यु नो "

तरुण तूर्क म्हातारे अर्क नाटका मध्ये प्राध्यापक बारटक्के हे पात्र ( मधुकर तोरडमल ) असेच बोलते - ह्याच्य ह्याच्यामध्ये हेच नाहि .

नीलस्वप्निल's picture

23 Sep 2020 - 6:20 pm | नीलस्वप्निल

बर ....मोथे साहेब वापरायचे... आता मनसे साहेब वापरतात