मांद्यपर्वातील भैरवी

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
19 Oct 2014 - 3:36 pm

पळता पळता वाटे
अदृश्य राहिली वाट
मी चढतो आहे कधीचा
हा आयुष्याचा घाट

ठिणगीच्या स्पर्शाने
राखेत पेटते आग
पृथ्वीच्या भाग्याचा
का नक्षत्रांना राग?

सूर्यास्ताच्या साक्षीने
वणवा पेटवतो आज
ओल्या जखमेवर आता
का सुटली आहे खाज?

दाटून मेघ येता
मणक्यात चमकते वीज
गोठून भावना गेल्या
अन मेंदू झाला फ्रीज !

मज ठाऊक नाही कोठे
ह्या आभाळाचा अंत
मी उद्या निघालो आहे
पोचेन कालपर्यंत !

कवी ---
(विदाऊट) ट्रेस

विडंबन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

19 Oct 2014 - 3:58 pm | संजय क्षीरसागर

नुसता यमक जुळवता आला म्हणजे कविता होत नाही.

संजय क्षीरसागर's picture

19 Oct 2014 - 4:02 pm | संजय क्षीरसागर

नाही तर अशी फसगत होते!

अवतार's picture

19 Oct 2014 - 6:44 pm | अवतार

म्हणून तर कवीचे नाव (विदाऊट) ट्रेस ठेवले आहे. त्याचे काय आहे, हे बऱ्याच वर्षांपूर्वी ग्रेस वाचला तेव्हाच लिहिले होते. आज इथे लिहावेसे वाटले म्हणून लिहिले एवढेच. हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे. त्यात काहीही अर्थ नाही हे माहिती आहेच. तेव्हा वाहवा मिळण्याची अपेक्षाच नाही.

संजय क्षीरसागर's picture

19 Oct 2014 - 8:47 pm | संजय क्षीरसागर

हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे

तर या विडंबनाबद्दल माझं मत व्यक्त करतो :

अत्यंत गलिच्छ आणि हिणकस. त्यामुळे या प्रयत्नांना दाद तर सोडाच, साधी सौंदर्यदृष्टी सुद्धा नाही.

अवतार's picture

19 Oct 2014 - 9:03 pm | अवतार

रसग्रहण करावं तर ते असं !!

पैसा's picture

19 Oct 2014 - 9:08 pm | पैसा

ढासू कवितेचे फाडू रसग्रहण.

पिंपातला उंदीर's picture

19 Oct 2014 - 9:28 pm | पिंपातला उंदीर

काहि लोक कळो ना कळो प्रत्येक धाग्यावर लोकाना बेशर्म (माफ करा बेशर्त) सल्ले देत अस्तातच कि. चालयचच

हे काय रेटनी टेंडर घेतात हो =))

पैसा's picture

19 Oct 2014 - 7:16 pm | पैसा

क्या बात है!

>>>>>>सूर्यास्ताच्या साक्षीने
वणवा पेटवतो आज
ओल्या जखमेवर आता
का सुटली आहे खाज?>>>>>

भळभळणार्‍या भयकारी जखमांना ज्या विलक्षण ताकदीने भरजरी भाषेची भगवी वस्त्रे घालून ज्या नज़ाकतीने सादर केले आहे त्याला नजीकच्या भूतकाळात तोड नाही.

>>>>>गोठून भावना गेल्या
अन मेंदू झाला फ्रीज !>>>>>

इथे तर भव्य भीषण भावनांना ममतेचा ओलावा मिळून त्यांचे दही झाल्याची साक्षात्कारी अनुभूती आली.

>>>मी उद्या निघालो आहे
पोचेन कालपर्यंत !>>>>

क्या बात है! जियो मामू!! शुभास्ते पंथान: संतु!!

(अवांतर: या कवितीचे माहीत नाही, पण या प्रतिसादाचा अर्थ लावणार्‍याला अक्षरी दहा रुपयांचे बक्षीस झाईर करत आहे. स्वत:च्या जबाबदारीवर अर्थ लावावा आणि मला पटला तर स्वखर्चाने गोव्याला येऊन बक्षीस घेऊन जावे.)

अवतार's picture

19 Oct 2014 - 7:35 pm | अवतार

:))))))
क्या बात है !! खुद्द कवीला देखील न जाणवलेला अर्थ उलगडणे हेच खरे रसग्रहण !!

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2014 - 9:16 pm | बोका-ए-आझम

मै तो हूँ पागल
ये कहूँ हर पल
कर कोई हलचल
होने दे होने दे
कोई दीवानगी!

पाषाणभेद's picture

20 Oct 2014 - 10:00 am | पाषाणभेद

छान कविता. आणखीन येवूद्या.

प्रचेतस's picture

20 Oct 2014 - 10:18 am | प्रचेतस

आवडली.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2014 - 11:20 am | पिलीयन रायडर

मिपावर सध्या हे नक्की काय चाललंय त्याची मला कल्पना नाही.. पण जर ग्रेसच्या कवितांचे विडंबन करायचा प्रयत्न चालु असेल तर कीव वाटली..

...ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे..

..स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित... पण त्यात ग्रेसला ओढण्याचा नतद्रष्ट्पणा करु नकात...

आणि ह्या कवितेचा एकंदरितच ग्रेसशी काही संबंध नाही असं म्हणणं असेल तर एक कविता म्हणुन ठिकच आहे...

ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेतच... पण त्या लोकांना कळत नाहीत म्हणुन टाकाऊ निश्चित होत नाहीत.. कळत नसल्या, पटत नसल्या तर त्याच्या वाटेलाच जाऊ नका.. सोप्पं आहे..

स्कोर सेटलिंग चालु आहे का? असेलही कदाचित

देअर यू आर पिरा !

लेखन विचारांची अभिव्यक्ती आहे, त्यामुळे आडात तेच पोहोर्‍यात येणार. तस्मात, अशा प्रकारचं विडंबन आणि त्याला प्रोत्साहन देणार्‍यांच्या सौंदर्यदृष्टीची कल्पना न केलेलीच बरी.

खुद्द पु.ल. देशपांडे यांनी देखील केले आहे (आणि ते ह्या विडंबनापेक्षा अधिक जहाल आहे). विडंबन करणे म्हणजे नतद्रष्टपणा नव्हे.
ग्रेसच्या कविता वाचणे मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून दिले आहे. ग्रेसच्या काही कविता मला आवडतात. बऱ्याच आवडत नाहीत. त्यांच्या शब्दांतील गूढत्व हे समजण्यापेक्षा अनुभवणे महत्वाचे आहे. ग्रेसने माझ्या आयुष्यातील काही क्षण उजळून टाकले हे मी विसरू शकत नाही. त्यामुळे ग्रेसविषयी मला आदर नाही असे समजण्याची चूक कृपया करू नये. प्रतिभा, मग ती कोणाचीही असली तरी मला त्याविषयी कायमच आदर वाटत आला आहे. प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या प्रतिभेचे नसून त्यांच्या शैलीचे आहे.

महान प्रतिभेचे विडंबन करण्याइतकी प्रतिभा आपल्यापाशी नाही हे कबूल करायला काही प्रतिभा लागत नाही. मुळात मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी निव्वळ टाइमपास म्हणून लिहिले होते. आज इथे टाकावेसे वाटले म्हणून टाकले. त्याला गलिच्छ, हिणकस म्हटले काय किंवा नतद्रष्टपणा म्हटले काय, माझ्या भावना (खरोखरच) दुखावल्या जाणार नाहीत. त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही.

धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

20 Oct 2014 - 9:17 pm | संजय क्षीरसागर

ग्रेसच्या कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन इथे द्याल का? ते हसवून जाईल. ग्रेसचा नांवासकट उपमर्द करत कुठेही असा ओंगळपणा आणणार नाही. तस्मात, युक्तीवाद फेल आहे.

पुढे म्हटलंय `प्रस्तुत विडंबन हे ग्रेसच्या `प्रतिभेचे' नसून त्यांच्या `शैलीचे' आहे'.

ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे. (आणि जो `पुलंनी केलेलं विडंबन' वाचेलं, तो असलं दु:साहस करु धजणारच नाही).

त्याउप्परही जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही.

अभिनंदन! स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!

पैसा's picture

20 Oct 2014 - 9:42 pm | पैसा

पुढचा भाग अजून येऊ द्या.

संजय क्षीरसागर's picture

20 Oct 2014 - 10:32 pm | संजय क्षीरसागर

म्हणून सांगवं लागतंय. अशी विडंबनं झाली नाहीत तर याप्रकारचे धागे मी उघडत देखिल नाही.

तस्मात, असे प्रयत्न पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या.

धागा प्रकाशित झाल्यावर (आणि त्याचा बाजा वाजल्यावर) सदस्यानं, तो `मागे घ्यावा अशी विनंती करणं' हे दुसर्‍यांदा झालं आहे.

अवतार's picture

20 Oct 2014 - 10:17 pm | अवतार

ते हसवून जाईल

हे विडंबन देखील ज्यांना हसवायचे त्यांना हसवून गेलेच आहे. तुम्हाला ते ओंगळ, गलिच्छ, हिणकस.... कसेही वाटले तरी मला त्याने शष्प फरक पडत नाही!

ते शैलीवर हुकूमत असणार्‍याचं काम आहे.

शैलीवर हुकुमत कोणाची आहे हे ठरवण्याचे सर्वाधिकार साहित्य परिषदेने तुमच्याकडे दिल्याचे लेखी पुरावे असल्यास ते कृपया इथे प्रसिद्ध करावेत.

स्वतः बरोबर प्रशंसकांनाही चपराक हाणल्याबद्दल!

बाकी तुमची नेमकी कोणत्या शैलीवर हुकुमत आहे ते ह्यातून दिसत आहेच!

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे! पण तुम्हाला प्रत्येक वेळी अधिक सांगावे लागते ह्यातच सर्व आले !

संजय क्षीरसागर's picture

20 Oct 2014 - 10:48 pm | संजय क्षीरसागर

जर हा धागा अश्लाघ्य किंवा नतद्रष्ट वाटत असेल तर उडवून टाकायला देखील माझी हरकत नाही

यातच सगळं आलंय! आता सारवासारवीचा उपयोग नाही.

अवतार's picture

20 Oct 2014 - 11:01 pm | अवतार

:))
तुम्हाला हा धागा उडवण्याची एवढीच घाई असेल तर तुम्हीच उडवून टाका ! तसेच मिपावर कोणी, काय आणि कसे लिहावे याची एक संक्षीस्मृती प्रसिद्ध करा !

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2014 - 11:51 am | संजय क्षीरसागर

तस्मात, स्वतःचा गोंधळ स्वतःलाच निस्तरावा लागतो.
बाकी हौसच असेल तर`स्मृती' स्वतःची तयार करावी.
माझी संहिता आहे: कुणाचीही खोडी काढण्यात मला काहीही रस नाही, पण (शक्यतो) पंगा घेऊ नका.

अवतार's picture

21 Oct 2014 - 1:24 pm | अवतार

आणि मिन्नतवारी करणे ह्यात फरक असतो हे ठाऊक नसणारी व्यक्ती विरळाच! धागा उडवण्याची घाई तुम्हालाच आहे. म्हणून म्हटले उडवून टाका. जमत नसेल तर उगाच पंगा घेऊ नका.

मी काय पंगा घेणार? तुम्हीच धागा काढलायं आणि उडवायला सांगतायं.
त्यातून सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या पोस्टबद्दल म्हटलंय :

हे अत्यंत फालतू दर्जाचे काव्य आहे

तिथेच विषय संपलायं.

अवतार's picture

21 Oct 2014 - 1:46 pm | अवतार

मग वाढवताय कशाला?

निराकार गाढव's picture

24 Oct 2014 - 11:14 am | निराकार गाढव

हॉ, कून गाढवताय?.. ..सॉरी, वाचण्यात चूक झाली. म्हणून पुन्हा पुन्हा वाचणं महत्वाचं.

पैसा's picture

21 Oct 2014 - 1:49 pm | पैसा

संहिता जोशी माझी फायरब्रँड मय्यतरीण आहे. बोलावू का?

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2014 - 9:12 am | पिलीयन रायडर

तुम्ही हे विडंबन कधी आणि कोणत्या भावनेनी केलं हे मला माहिती असण्याचं कारण नव्हतं.. पण सध्या मिपावर यत्र तत्र सर्वत्र ग्रेसच्या कवितांवर चर्चा करण्याचे (आणि त्या निमित्ताने त्या कवितांची टर उडवण्याचे..) पेव फुटले आहे.. त्यात तुमचा धागा आल्यावर जो व्हायचा तोच समज झाला.. त्यामुळेच तुमच्या प्रयत्नाला मी नतद्रष्ट्पणा म्हणाले.. विडंबन करणे ह्या प्रकाराला नव्हेच.. पुलंनी निश्चितच टर उडवणयसाठी विडंबन केले नसणार...

शिवाय पुलंच उदाहरण देत आहात म्हणुन सांगते की तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे.

प्रतिभावंत माणसाचा आदर वाटायलाच हवा.. तरीही तुम्हाला ग्रेसच्या प्रतिभेचा आदर वाटतो हे वाचुन आनंद झाला..

तुम्हाला दुखवायचे काहीच कारण माझ्यापाशी नाही... पण तरीही माझ्या प्रतिक्रियेने तुम्ही दुखावले गेला नाहीत हे वाचुन बरं वाटलं... (बाकी मी कुठेही गलिच्छ, हिणकस किंवा अश्लाघ्य वगैरे शब्द वापरलेले नाहीत हे रेकॉर्डसाठी सांगुन ठेवते..)

हा धागा रहावा की उडवावा हा माझा प्रश्न नाही.. तुम्ही ग्रेसच्या कवितांचं काय करावं हा ही माझा प्रश्न नाही..

मी तुमच्या कवितेवर फक्त माझं मत व्यक्त केलं..

तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला आहे.

मान्य. मीच सर्वश्रेष्ठ आहे असा माझा दावा नाही. पण पुलंच्या ज्या पुस्तकात हे विडंबन आहे त्याचे नावच "खिल्ली" आहे. ज्यांच्या प्रतिभेविषयी आदर वाटतो त्यांची प्रत्येक कृती आवडलीच पाहिजे असे मला वाटत नाही. तसेच त्यांची टोपी उडवल्याने फार मोठा अपमान होतो असेही मला वाटत नाही.

मुळात माझ्या ह्या कवितेविषयी फार नाजुक भावना नाहीत.
त्यामुळे त्यावर कसेही मत व्यक्त केले तरी मला फारसा फरक पडत नाही. तरीही केवळ गैरसमज होऊ नये म्हणून लिहिले.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

भगवद्गीतेचं विडंबन वाचून ख्या ख्या करणार्‍यांच्या ग्रेस-अस्मितेची गळवे आज उघडी पडली.

विडंबनाच्या निमित्ताने माझे चार पैशे.

१) जगाची विभागणी ग्रेस समजणारा आणि न समजणारा किंवा ग्रेस आवडणारा आणि ग्रेस न आवडणारा या दोनच कंपूत झालेली नाही. या दोन्ही प्रकारांशी देणेघेणे नसणारा एक फारच मोठ्ठा वर्ग अस्तित्वात आहे.

२) जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते.

३) ग्रेस ही कोणाच्या मालकीची वस्तू नव्हे. किंबहुना कोणत्याच लेखकावर किंवा त्याच्या लिखाणावर कोणीच हक्क सांगू नये. (इथे हक्क म्हणजे कॉपीराईट नव्हे.) त्यामुळे कोणाचेही विडंबन झाले म्हणून अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही.

४) अल्लाची चित्रे काढली म्हणून चित्रकाराच्या मरणाचा फतवा काढणारी तालिबानी वृत्ती, किंवा एम एफ हुसेन मेला ते बरे झाले म्हणणारी वृत्ती आणि ग्रेसचे विडंबन करू नये म्हणणारी वृत्ती यात मला तत्त्वतः काही फरक दिसत नाही.

५) ग्रेसचे विडंबन फक्त पुलंनीच करावे असं म्हणणं असेल तर लता आणि आशा यांच्यानंतर सिनेमातली गाणी बंद करायला हवी होती. आपल्या आवडत्या लेखक कलाकाराचे इतकेही दैवतीकरण आणि अस्मिता प्रदर्शन करायची काय्येक जरूरी नाही.

ही माझी वैयक्तिक मते आहेत आणि त्यावर कोणतीही चर्चा मला अपेक्षित नाही. माझे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करू नये. धन्यवाद!

पिंपातला उंदीर's picture

21 Oct 2014 - 3:16 pm | पिंपातला उंदीर

हजार वेळा सह्मत

हाण तेजायला. तुफ्फान फटकेबाजी. एकही मुद्दा सोडलेला नाय.

खच्चून सहमत हेवेसांनल.

अवतार's picture

21 Oct 2014 - 4:08 pm | अवतार

माझ्या धाग्यावर लिहिले म्हणून नव्हे तर मनापासून!

या वर्षातील मिपावर मी वाचलेला सर्वात उत्तम प्रतिसाद!

*प्रतिसाद चोरत आहे ;)

कविता आणि 'पैसा' यांचा प्रतिसाद आवडले.
गतमिपाकर संक्षी यांनी उगाचच अवमान/हतोत्साहित करणारे प्रतिसाद देलेले बघून खेद वाटला.

कवितानागेश's picture

21 Oct 2014 - 3:46 pm | कवितानागेश

आधी गंभीरपणे वाचायला लागले कविता. 'अवतार' नाव वाचूनच तसे आपोआप झालं! :)
पण,
ओल्या जखमेवर आता
का सुटली आहे खाज? >>> या २ ओळींवर मन थबकलं... आणि तिथल्या तिथे लोळायला लागलं... =))

कवितानागेश's picture

21 Oct 2014 - 3:57 pm | कवितानागेश

बाकी एकंदरीत विडंबनाबद्दल बर्‍याच दिवसांपासून लिहायचंच आहे.
वर अवतार आणि पैसा यांनी लिहिल्याप्रमाणेच वाटतय,... की विडम्बनात वाईट काय?
विडंबन हा एक अत्यंत अहिम्सक आणि केवळ 'थट्टामस्करी' म्हणण्यासारखा प्रकार आहे. आणि थट्टा कुणाचीही होउ शकते. थट्टा म्हणजे अपमान नाही. त्याउलत थट्ता झाल्यामुले विनाकारण पेटून उठून, इथे जो नव्यानी 'बदला घेण्यासाठी विडंबन' हा जो हास्यास्पद, पोरकट प्रकार सुरु झालेला दिसतोय तोच मूळात चुकीचा आहे, अगदी फार फार मोठ्ठा विनोद आहे!! जगात अनेक ठिकाणी, अनेकांनी विडंबनाचा आधार आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी घेतलेला आहे. ते विडम्बन जोपर्यंत द्वेषानी, रागानी किंवा गलिच्छपणे केले जात नाही, तोपर्यंत वाचणार्‍याला खुद्कन हसवणारंच असतं.
तसेही 'मिसळपाव'ला विडंबन नवीन नाही. जुने धागे शोधा जरा...
तिन्ही लोक आनंदाने, भरुन गाउ दे, तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाउ दे!
ही आपली टॅगलाईन तरी वेगळ्ं काय सांगतेय?

निराकार गाढव's picture

24 Oct 2014 - 3:23 pm | निराकार गाढव

@ जे लिखाण वाचून कोणाच्याही ओठावर एक इंच का होईना हसू येईल ते लिखाण मी यशस्वी समजते.

आणंद माज्ज्या पोटात गं माईना.

चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत.

आणंद माज्ज्या पोटात गं माईना....

चला, यावरून एक गोष्ट सिद्ध होतेः आम्चे गुर्जी यशस्वी लेखक आहेत. त्येंणी लिवायला सुरुवात क्येली रे क्येली की समदे पोरं पोरी प्वॉट धरून हसत बसतात.

प्यारे१'s picture

25 Oct 2014 - 6:10 pm | प्यारे१

च्यायचं गाडाव! ;)

अर्धवटराव's picture

25 Oct 2014 - 9:46 pm | अर्धवटराव

ग्रेस साहेबांपेक्षा कमि दुर्बोध, आणि दुर्बोधतेवर विचार करायला लावण्या इतपत इंटरेस्टींग काव्य.

अवांतारः प्रत्यक्ष्य ज्ञानदेवांच्या रचनांचं विडंबन/लोणचं करणार्‍या स्वप्रतिभावंतांच्या प्रतिसादांना विनोदापलिकडे फार गांभिर्याने घेऊ नये :)

:)))

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !