फ्रेंच टोस्ट

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Oct 2014 - 12:02 pm

.

साहित्यः

२ अंडी
४ शिळे ब्राऊन ब्रेड स्लाईसेस (तुम्ही कुठलाही ब्रेड वापरू शकता व्हाईट ब्रेड, Challah ब्रेड, फ्रेंच Baguette पण शिळा वापरावा म्हणजे ब्रेड मिश्रण चांगले सोषून घेईल)
१/२ वाटी दूध
साखर चवीप्रमाणे
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स

.

पाकृ:

अंडी फोडून घेणे. त्यात दूध, साखर, व्हॅनिला एसेन्स घालून चांगले फेटून घेणे.
नॉन-स्टीक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा रोजच्या वापरातले तेल घालून गरम करावे. तुम्ही बटर ही वापरू शकता.
अंड्याच्या मिश्रणात ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी चांगले बुडवून घ्यावे व पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरीरंगावर शॅलो फ्राय करुन घ्यावे.
अशा पद्दतीने इतर ब्रेड स्लाईसेस फ्राय करुन घ्यावे.

.

तयार फ्रेंच टोस्टवर पिठीसाखर भुरभुरून ब्रेकफास्टला सर्व्ह करा.

.

नोटः

तुम्हाला फ्रेंच टोस्ट अजून रीच बनवायचा असल्यास त्यात दुधाबरोबर थोडे क्रिम वापरू शकता.
सर्व्ह करताना तुम्ही टोस्टवर मेपल सिरप, मध ड्रिझल करु शकता.
बटर व बेरीजबरोबर ही सर्व्ह करता येतं.
ह्यात व्हॅनिला एसेन्सऐवजी तुम्ही दालचिनीपूडचा वापर किंवा तिखट बनवायचे असल्यास मीठ, मिरपूड, लाल तिखट किंवा कुठलाही स्पायसी सॉस, चीज अंड्याच्या मिश्रणात घालून करु शकता.
ही पाकृ एगलेस बनवायची असल्यास बेसनात थोडे हळद, लाल तिखट, मीठ, चिरलेली कोथींबीर, मिरची घालून त्यात ब्रेड घोळवून शॅलो फ्राय करु शकता.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

18 Oct 2014 - 12:06 pm | तुषार काळभोर

हे सदर परत सुरू झाल्याबद्दल!!

आणि मी पहिल्यांदाच "पयला"!!

सानिकास्वप्निल's picture

18 Oct 2014 - 12:42 pm | सानिकास्वप्निल

ह्या सदरात चुकून पोस्ट झाली पाककृती...संमं प्लिज फ्रेंच टोस्ट पाककृती विभागात हलवाल का?

किसन शिंदे's picture

18 Oct 2014 - 12:17 pm | किसन शिंदे

हॅत्त तेरे की!! अंडं आहे म्हटल्यावर आमच्या कामाचे नाही हे टोस्ट. :-)

सस्नेह's picture

18 Oct 2014 - 12:23 pm | सस्नेह

चहासोबत अंड्याचे टोस्ट ??
मी खात नसले तरी कल्पना जरा विचित्र वाटते...
बाकी, सादरीकरण नेहमीप्रमाणे भारी !

टोस्ट आवडला.करुन पाहतो.अर्थात बिना अंड्याची.

स्नेहाकिंता याच्या नावात जरी टोस्ट असे असले तरी हे एकदम सॉफ्ट असतात.
@सारिकास्वप्लील : तिखट करायचे झाल्यास दूध वापरता येणार नाही.

सानिकास्वप्निल's picture

18 Oct 2014 - 12:52 pm | सानिकास्वप्निल

@ विजुभाऊ तिखट करायचे असल्यास दूध वापरायचे नाही.
@ स्नेहाकिंता ताई विचित्र काही नाही त्यात, फ्रेंच टोस्ट ही खूप जूनी पाककृती आहे व सर्रास नाश्त्याला बनवली जाते व खाल्ली जाते. बर्‍याच वेळेला ऑम्लेट बनवताना त्यात ब्रेड डिप करून नुसता फ्राय केलेला ब्रेड खाल्ला जातो तसलाच प्रकार. Pain Perdu (Eggy Bread) हे फ्रांसमध्ये नाश्त्याला, डेझर्ट म्हणून ही खाल्ले जाते.
चहा बरोबर ब्रेड-ऑम्लेट ब्रेकफास्टला लोकं खातातच त्यामुले मला तरी ते विचित्र वाटत नाही.
एका मिपाकराच्या (स न वि वि ) आग्रहावरून ही पाककृती दिली आहे.
धन्यवाद

सस्नेह's picture

18 Oct 2014 - 2:43 pm | सस्नेह

As breakfast ? मग बरोबरय.
ब्रेकफास्टवर चहा हवाच

स न वि वि's picture

3 Nov 2014 - 1:51 pm | स न वि वि

खुप खुप आभर.. :-) .. मी आत्ता पाहिले.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह!!!

फोटू छान आहे. ही कृती अंडे न घालता कशी करावी हे सांगितल्याबद्दल आभार.

यातली तिखट पाकृ मी बर्याचदा बनवते.कांदा,मिरची घालुन.

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2014 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर

मी ब्रेडच्या कडा काढून मधून तिरपे दोन भाग करतो म्हणजे एका स्लाईस मधून दोन त्रिकोण निघतात.
अंड्यात मीठ, मिरपूड आणि थोडे दूध घालून ब्रेड घोळवून सोनेरी रंगावर परतून घेतो.
हे गर्रम गर्रमच खाल्ले पाहिजेत.

पैसा's picture

20 Oct 2014 - 1:55 pm | पैसा

मी पण असेच करते नेहमी. आता गोड प्रकार करून बघेन.

शिद's picture

20 Oct 2014 - 6:19 pm | शिद

आम्हीपण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2014 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

फ्रेंच टोस्ट आवडता प्रकार आहे. मात्र तो मऊ आणि पुरेश्या अंड्यामध्ये लपेटलेला असावा. अर्थात ही माझी व्यक्तिगत आवड झाली... पण पिठीसाखर नको, जरा जास्तच गोड होतो... त्याऐवजी किंचीत मध जास्त आवडते.

साधारणपणे असा...


स्लर्र्र्र्र्प ! स्लर्र्र्र्र्प !! स्लर्र्र्र्र्प !!!

कवितानागेश's picture

18 Oct 2014 - 11:48 pm | कवितानागेश

किंचीत मध????
अहो पाकातला फ्रेन्च टोस्ट दिसतोय तो. :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2014 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

तो फोटो जालावरचा आहे... तसं लिहायचं र्‍हाऊनच ग्येलं... स्वारी ! मी नाय तेव्हडा मध घेत :)

एस's picture

19 Oct 2014 - 12:04 pm | एस

हाच्च प्रश्न मलाही पडला होता. बाकी आज एकादशी असल्यामुळे 'फ्रेंच टोस्ट' करायचा आमचा बेत हाणून पाडण्यात आला आहे असे खेदपूर्वक सांगू इच्छितो. :-(

सुहास झेले's picture

20 Oct 2014 - 11:28 am | सुहास झेले

खल्लास !!

व्वा, ही तर आमच्या पसंदीची पाकृ आहे!
घरी नेहमी तिखट प्रकार बनवतो.
आज गोड प्रकारही कळला. धन्यवाद.

इशा१२३'s picture

20 Oct 2014 - 3:02 pm | इशा१२३

एकदम छान आणि आवडते टोस्ट..छान फोटो...

उमा @ मिपा's picture

20 Oct 2014 - 3:23 pm | उमा @ मिपा

सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.

याचा तिखट प्रकार मी करते, खूप छान होतो, मुलांना भारी आवडतो.

आता हा गोड प्रकार नक्की करेन. हा प्रकार जास्त आवडेल असं वाटतंय.

उमा @ मिपा's picture

20 Oct 2014 - 3:23 pm | उमा @ मिपा

सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.

याचा तिखट प्रकार मी करते, खूप छान होतो, मुलांना भारी आवडतो.

आता हा गोड प्रकार नक्की करेन. हा प्रकार जास्त आवडेल असं वाटतंय.

उमा @ मिपा's picture

20 Oct 2014 - 3:23 pm | उमा @ मिपा

सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.

याचा तिखट प्रकार मी करते, खूप छान होतो, मुलांना भारी आवडतो.

आता हा गोड प्रकार नक्की करेन. हा प्रकार जास्त आवडेल असं वाटतंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Oct 2014 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्या बाउल मधे ठेवलेल्या अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे, काय आहे ते?

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Nov 2014 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

आजकाल कुरीयर मुळे पोष्ट ऑफिस मधले काम बरेच कमी झाले आहे. तेव्हा पोष्टातल्या लोकांना अंड्यावर शिक्के मारायचे काम द्यायला पाहिजे. त्यांना शिक्के मारण्याचा दांडगा अनुभव असतो.

पैजारबुवा,

ज्या कोंबडिने ते घातलयं तीचा वॉटरमार्क आहे तो :D

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2014 - 5:18 pm | टवाळ कार्टा

=))

सूड's picture

20 Oct 2014 - 6:38 pm | सूड

=))))

सानिकास्वप्निल's picture

20 Oct 2014 - 7:55 pm | सानिकास्वप्निल

व्हेरी फनी....

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 9:30 pm | अत्रुप्त आत्मा

@तीचा वॉटरमार्क आहे तो >>> धन्य!!! __/\__ :-D

बॅटमॅन's picture

21 Nov 2014 - 7:25 pm | बॅटमॅन

वॉटरमार्क =)) _/\_

हे वाचून त्या कोंबडीने जलसमाधी घेतली असती =))

आणि आम्ही ती पहायला गेलो असतो. ;)

विजय पिंपळापुरे's picture

21 Oct 2014 - 4:37 pm | विजय पिंपळापुरे

आणखी अशीच एक पाकृ बनवता येते.

अंडी फोडून घेणे.त्यात लाल तिखट, मिरे पुड, मीठ घालुन फेटुन घेणे.

२ ब्रेड स्लाईसेस घेवुन त्याला चिझ स्प्रेड लावावे.आवडत असेल तर चिझ स्प्रेड वर ओरेग्यानो घ्यालावे.

त्याचे चार तुकडे करावेत, मग फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून पॅनवर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करुन घ्यावे.
आणी गरम गरम खावेत.

चिझ स्प्रेड च्ञा जागी चिझ स्लाईसेस पण वापरु शकता.

ऋषिकेश's picture

4 Nov 2014 - 2:23 pm | ऋषिकेश

मी घरी गोड व तिखट दोन्ही प्रकार करतोच. यात आवडीनुसार अनेक वेरीएशन्स शक्य आहेत

रुचीपालट म्हणून किंचित जायफळापूडही छान लागते

तव्यावर भाजण्याऐवजी किंचित बेकिंग सोड्याची चिमुड घालून ओव्ह्नमध्ये भाजल्यास व वरून काही अर्ब्ज (जसे रोझमेरी, बेझिल इत्यादी) भुरभुरवल्यास वेगळी मजा येते

तिसरा आवडता पकरतानादोन स्लाईसमध्ये मेयो किंवा पातळसर चीझ घालून एकमेकांना चिकटवणे नी या जोडगोळीचा एकत्रपणे फ्रेंच टोस्ट करणे. तुफान लागतो

विजय पिंपळापुरे's picture

4 Nov 2014 - 5:54 pm | विजय पिंपळापुरे

ऋषिकेश तुमचा तिसरा प्रकार मी सागितलेल्या प्रकारा सारखाच आहे

एस's picture

4 Nov 2014 - 7:05 pm | एस

मला जमलं नाही असे टोस्ट बनवायला. म्हणजे असे कुरकुरीत झाले नाहीत. ब्रेड ताजे वापरल्यामुळे असेल कदाचित! असो, परत कधीतरी.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 11:58 am | प्रसाद गोडबोले

सुंदर !