पाया सूप

गौरीबाई गोवेकर's picture
गौरीबाई गोवेकर in पाककृती
14 Oct 2014 - 2:07 pm

गेली अनेक वर्ष माझ्या गुढघेदुखी पुढे मी गुढघे टेकले होते. सुरवाती सुरवातीला या व्याधीचं जरा कौतुक वाटायचं एका एका बाजूला डोलत डोलत चालताना म्हातारी झाल्याचं मस्त फिलिंग यायचं. पण दुखायला लागलं आणि सगळी मजा निघून गेली. त्या आधीच कित्येक वर्ष याच कारणाने मैफिली बंद करायला लागल्या गळा गाता होता पण गुढघा बोंबलला. शिवाजी महाराजांना नाही का याच गुढघी रोगानं ग्रासलं होतं? हिंदवी स्वराज्याच स्वप्न तेंव्हापासून बोंबललं ते बोंबललच.

डॉक्टर म्हणायचे आजी याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्जरी करून गुढघा बदल शस्त्रक्रिया करायची. पण याला माझी तयारी नव्हती.

सुरवातीला आणल्या त्या घट्ट ईलेस्टीकच्या पुंगळ्या. पायातून घालायच्या आणि मोज्यासारख्या चढवत गुढग्यावर आणून ठेवायच्या घट्ट आवळ बसून बरं वाटायचं दु:ख कमी व्हायचं गुढघे पण या चढवलेल्या कोटांमधे फुशारक्या मारायचे. पुढे त्यांना ह्याच काही नवल उरलं नाही. सरळ हे घातलेले कोट कधीही उतरवून टाकायचे मग चालला चालता ह्या पुंगळ्या गुढग्यावारून पावलाशी यायच्या.

मग सुरू झाली ती विविधं तेलं. वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचून ती आणायची आणि वापरून बघायची. गुण आला नाही की दूररं ट्राय करायचं. त्यांचीही गत पुंगळ्यांसारखीच झाली.

एकदा एका वर्तमान पत्रात एक जाहिरात वाचली. गुढग्यावर पडणारा शरीराचा भार बायपास करून कमी करणाऱ्या एका पायावर घालायच्या पट्टेरी यंत्राची. पूर्वी पोलियो झाल्यावर नाही का लोखंडी कांब असलेला बुट घालत? तसच काहीसं दिसत होतं. जयपूरची कंपनी होती. एकाची किंम्मत बारा हजार. जयपूर फुट बद्दल खूप चांगलं ऐकलं होतं. मागवला वापरायला लागले. जड जड वाटायचं. दुखण्याच्या दृष्टीने काही उतार नाही. पन्नास हजाराचे भारी (वजनाने) पाय घेऊन चालायला लागले खरी पण आता नवीनच समस्या उद्भवली. ते यंत्र माझ्या त्वचेवर चालताना घासलं जाउन जखम व्हायला लागली मग ते ही नको असं झालं.

आता सगळे मार्ग संपले अस वाटलं. वेदना वाढतच होत्या. वेदनाशामके घेण्यावर पण बंधने आहेत. किती म्हणून घ्यायची. त्याचाही परीणाम होईनासा झाला. मग़ शेवटी शस्त्रक्रियेला शरण जायचं ठरवलं. गेल्या वर्षी याच महिन्यात पहिला गुढघा बदलला. आणि एप्रिलमधे दुसरा. संपूर्ण रिकव्हरीला एक वर्ष लागलं. पण दुखण गेलं. मुलं म्हणतात आता दुखायसारखं आहेच काय तुझ्या पायात पोटऱ्यांपासून मांड्यांपर्यंत ईन्फ्रास्टक्चर आहे. डॉक्टर मात्र लाख मिळाला. माझ्या मोठ्या नातवाच्या वयाचा आहे. मी गायिका आहे/होते हे कळल्यावर माझी जरा आपुलकीने विचारपूस करायचा. त्याला शास्त्रीय गाण्याची खूप आवड आहे. ऑपरेशन करता करता. भिमसेन, किशोरी, केसरबाई ऐकतो म्हणे.

सांगायचा मुद्दा काय की आता जरा सगळ्यातुन सावरून जरा मिपा वर यायला जमतं आहे. स्वयंपाकघरात तर कित्येक महिन्यात पाऊल नाही टाकलं. पण हे सेक्शन मला माझं स्वैपाघरच वाटतं. या सगळ्या कृत्या वाचते आहे. आणखी काही काळाने काही ट्राय करेन. काही नविन टाकेन. पण या किचनमधे येणार मात्र रोज. इथे आल्यावर मला माझ्या किचनचाच फिल येतो.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

14 Oct 2014 - 2:22 pm | दिपक.कुवेत

तर आजी आता थांबू नका. पार डेझर्ट पर्यंत गाडि जाउदे...हां आता थोडा वेळ लागेल पण असो मिपाकर आहेतच सांभाळायला. गुडघ्याचं दुखणं पळालं हे महत्वाचं.

दिपक.कुवेत's picture

14 Oct 2014 - 2:23 pm | दिपक.कुवेत

कुठे उपलब्ध होतील? एकायची फार ईच्छा आहे.

सूड's picture

14 Oct 2014 - 2:58 pm | सूड

हेच विचारतो!!

गौरीबाई गोवेकर's picture

14 Oct 2014 - 5:31 pm | गौरीबाई गोवेकर

गाण्याच्या टेप्स आहेत माझ्याकडे. तेंव्हा आतासारख्या सी डी वगैरे काही नव्हत्या. मोठमोठी स्फूल टेप्सची रिळावर रेकॉर्ड करायचे. काही कॅसेट पण आहेत. यू ट्यूब वगैरे हे खुप अलोकडचे. पुणे, दिल्ली, लखनौ अशा रेडिओस्टेशनांच्या संग्रही असतील असल्या तर. आता गात नाही.

तुम्ही माहेरच्या अभ्यंकर का हो आजी??

गौरीबाई गोवेकर's picture

14 Oct 2014 - 5:33 pm | गौरीबाई गोवेकर

मी गोव्यातली शिरोडकर माझं पूर्वीच आडनांव.

शिरोडकर म्हळ्यार शेट/शेटे मूं??

अनुप ढेरे's picture

14 Oct 2014 - 6:50 pm | अनुप ढेरे

हॅहॅहॅ

आज्जी येत रहा इथे ! प्रकॄतीची का़ळजी घ्या.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Oct 2014 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

तब्बेतिची काळजी घ्या, वेदनेकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा.
गाणे परत सुरु करा. ऐकायला समोर कोणी सापडला नाही तर इकडे अपलोड करत जा.
तुमचे गाण्याबद्दलचे ज्ञान / अनुभव इकडे लिहित जा. वाचणारे बरेच जण आहेत इकडे.
झाला तर त्यांचा फायदाच होईल. (आणि तुमचाही वेळ चांगला जाईल)
आम्ही तुम्हाला ऐकायला / वाचायला उत्सुक आहोत.

पैजारबुवा,

तुम्हाला इथे किचनचा फील येतो हे चांगलय .

तुम्हाला संधीवात आहे हे कळ्लं .. त्या बद्दल सहानुभूती बर्का !

पण सूप कसं करायचं सांगा की .

गौरीबाई गोवेकर's picture

14 Oct 2014 - 5:37 pm | गौरीबाई गोवेकर

मनिषा संधीवात नाय गो. गुढग्याचे कार्टिलेज का काय असत ना ते झिजले होते. आता गुढघेच बदलले. जॉनसन अँड जॉनसन चा ईनप्लांट बसवलाय मी आता वेदनारहित चालू , फिरू शकते. गुढघा ९० अंशातच वाकवणे मांडी घालून बसणे अशक्य अस असल तरी आता वेदना नाहित.

विजय पिंपळापुरे's picture

14 Oct 2014 - 4:33 pm | विजय पिंपळापुरे

त्याच्या कहाणीला त्यानी नाव दिलय पाया सुप

शीर्षक आवडलं. चपखल आहे. लवकर बर्‍या व्हा!!

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 5:46 pm | प्रभाकर पेठकर

वजनामुळे (१२० कि.) गुडघ्यातील कार्टिलेजीस झिजून येणारे दुखः मीही सोसतो आहे. सुदैवाने तुम्ही वर्णिल्याइतकी परिस्थिती वाईट नाही. पण मांडी घालून बसणे, भारतिय शौचालयात बसणे, कारमध्ये बसणे-उतरणे आदी त्रास भरपूर आहे. वजन कमी करणे हा एकमेव उपाय आहे पण तेच मेलं होत नाहिये.

गौरीबाई गोवेकर's picture

14 Oct 2014 - 6:34 pm | गौरीबाई गोवेकर

कार्टिलेज झिजून तिथल्या साध्याच्या हाडांचे बारीक बारीक तुकडे होतात असे तुकडे सांध्यात विखूरले की एक एक तुकडा खूपत रहातो त्याच्याच वेदना होतात म्हणे. माझं वजन काय तस फार नव्हत कधीच पण तरी हा त्रास. नशीब एकेकाचं

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

@पण या किचनमधे येणार मात्र रोज.
इथे आल्यावर मला माझ्या किचनचाच फिल येतो.>> किच्चु'ताईची आठ्वण आली! http://www.sherv.net/cm/emoticons/dogs/cute-puppy-crying-smiley-emoticon.gif

गौरीबाई गोवेकर's picture

14 Oct 2014 - 6:35 pm | गौरीबाई गोवेकर

किच्चुताई कोण आहे?

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 6:38 pm | बॅटमॅन

खल्लास समर्पक शीर्षक हो गौरीबाई!!!!! काळजी घ्या आणि जसे जमेल तसे इथे लिहीत चला. अनेकानेक शुभेच्छा!!!!

शिवाय जमल्यास आपल्या तरुण नातेवाईकांना हाताशी धरून आपल्या रेकॉर्डिंग्स नवीन तंत्राद्वारे इंटरनेटवर आणता येतील का ते पहा.

जर एखाद्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडे गेल्या असत्या किंवा केरळला जावुन पंचकर्म केले असते तर सांधे नक्की चांगल्या अवस्थेत राहिले असते, ठिक आहे इथुन पुढे काळजी घ्या.

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 6:44 pm | प्रभाकर पेठकर

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
पुढील भारतभेटीत नक्की तुमची भेट घेऊन आयुर्वेदिक उपचारावर विचार/अमल करेन. धन्यवाद.

बाबा पाटील's picture

14 Oct 2014 - 7:14 pm | बाबा पाटील

तुम्हाला मदत करायला आनंदच वाटेल.

वरती बर्‍याच जणांनी म्हंटल्याप्रमाणे तुमची ध्वनिमुद्रित गाणी (आणि गाणंही) जिवंत राहू द्या. मी कॅसेटमधल्या गाण्यांपासून MP3 files करणारं एक सोपं उपकरण आणलं आहे, त्याचा वापर करून खूप जुनी संग्राह्य गाणी/ संगीत digital स्वरुपात साठवू शकता.

आणि वर्षभराच्या विश्रांतीनंतर आलात, आता तुमच्या पाककृतीही येऊ द्यात पुन्हा एकदा.

गौरीबाई गोवेकर's picture

17 Oct 2014 - 6:41 pm | गौरीबाई गोवेकर

हे उपकरण ईंटरनेट खरेदी आहे की कसे? की इतरत्र दुकानात पण मिळेल. चौकशी करायला सांगते

मी इंटरनेट वर खरेदी केली पण फिलिप्स कंपनीने भारतात त्यांच्या आधिकृत दुकानांमध्ये “Rip-All” AZ1586 Sound machine हे उपकरण विक्रीला आणलं आहे असं दिसतं, किंमत ५००० रुपयांच्या आसपास आहे. चौकशी करून हे मिळतंय का पहा आणि चांगलं वाटलं तर मिपाच्या वाचकांना इथे कळवा.

रमेश आठवले's picture

16 Oct 2014 - 10:41 pm | रमेश आठवले

एक मटणाच्या सूप (रस्सा) ला उर्दू भाषेत पाया असे म्हणतात. हा लेख पाककृती विभागात आल्यामुळे त्या कृतीची आठवण झाली.
http://cooks.ndtv.com/recipe/show/paya-curry-519236
http://www.bawarchi.com/recipe/hyderabadi-paya-curry-oesl7Vfajhjah.html

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Oct 2014 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिल्यांदा तर पाया सूपाची पाकृ आहे असे वाटले. पण पहातो तर स्वतःच्या दुखाण्यावरचा खुसखुशीत शैलीतला लेख निघाला !

वयपरत्वे होणारे हे दुखणे कोणाला जास्त तर कोणाला कमी, कोणाला लवकत तर कोणाला उशीरा होते... मात्र वापराने होणारी सांध्यांची झीज हेच कारण. त्यातुन तुम्ही रिप्लेसमेंटचा (उशीरा का होईना पण) योग्य पर्याय निवडून उत्तम फायदा होण्यापर्यंतची वाटचाल केली आहे हे वाचून आनंद वाटला.

तुमच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

मिपावर तुमचे (परत) स्वागत आहे ! मिपा तुमचेच आहे. अश्याच मिपावर येत रहा आणि लेखन करत रहा !!

गौरीबाई गोवेकर's picture

17 Oct 2014 - 7:02 pm | गौरीबाई गोवेकर

किती बरे वाटले हे वाचून. एवढ्या आपुलकीने बोलणारी माणसं या आभासी जगात. क्षणभर खरच वाटत नाही. धन्यवाद