टि टाईम स्नॅक्स प्रकार ४ - कॉर्न पकोडे

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
13 Oct 2014 - 2:12 pm

pakode 1

साहित्यः
१. स्वीट कॉर्न / मक्याचे दाणे - १ बाउल
२. बारीक चीरलेली हिरव्या कांद्याची पात - १ बाउल (नसेल तर पालक + बारीक चीरलेला कांदा घ्या)
३. गरजेप्रमाणे बेसन
४. तांदूळाचं पीठ - २ चमचे
५. मक्याचं पीठ - ४ चमचे (नसेल तर बेसनाचं प्रमाण वाढवा)
६. पेस्ट - ३ ते ४ चमचे (मुठभरं कोथींबीर, हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरं आणि पेरभर आलं)
७. चवीप्रमाणे मीठ
८. तळण्यासाठि तेल
९. चाट मसाला (वैकल्पीक)

pakode 2

कॄती:
१. एक ४ ते ५ चमचे कॉर्न बाजूला काढुन बाकि मिक्सर मधे भरडसर वाटुन घ्या

pakode 3

२. आता त्यात अनुक्रमे मका पीठ, बेसन, तांदूळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घाला. गरज लागली तरच पाणी घाला. बच्चेकंपनीचा भाग वेगळा काढुन वाटलेली पेस्ट मिश्रणात घाला. पकोडे कितपत तिखट हवे आहेत त्यानुसार पेस्ट मधे मिरच्या घ्या. ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल.

pakode 4 pakode 5

३. मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईस्त तेलात तळून घ्या. हलके गरम असतानाच आवडत असल्यास वरुन चाट मसाला भुरभुरवा. पकोडे/भजी मंद आचेवरच तळा. गॅस मोठा असेल तर पकोडे बाहेरुन तर लाल होतील / दिसतील पण आतुन कच्चे राहतील.

pakode 6 pakode 7

४. गरमागरम पकोडयांचा वाफाळाणार्‍या चहा किंवा थंडगार बियर सोबत आनंद लुटा. खा, खिलवा आणि स्वस्थ रहा.

pakode 8

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

13 Oct 2014 - 2:19 pm | त्रिवेणी

तुमच्याच तिक्क्र या रेसिपी ब द्द्ल बोलत होतो

मधुरा देशपांडे's picture

13 Oct 2014 - 2:20 pm | मधुरा देशपांडे

आहाहा...तोंपासु. मस्त पाकृ आणि फोटो.

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 2:22 pm | प्यारे१

आलास???????

भेटच तू!

विजय पिंपळापुरे's picture

13 Oct 2014 - 3:49 pm | विजय पिंपळापुरे

ह्यातला आणखी एक प्रकार म्हणजे ह्यात कोर्न फ्लेक्स आणि पनीर घालावे.

पटीस च्या आकाराचे बनवुन तळावेत.

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2014 - 3:59 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! बियर टाईम स्नॅक्स.... मस्तं.

व्वा! बियर टाईम स्नॅक्स.... मस्तं.

+१००. *drinks*

मस्त पाकृ.

विलासराव's picture

13 Oct 2014 - 4:33 pm | विलासराव

खा, खिलवा आणि स्वस्थ रहा

कधी खिलवता मग?

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 5:04 pm | दिपक.कुवेत

या कि ईकडे उडत उडत. हवं ते खिलवतो (निदान आत्तापर्यंतच्या पोस्ट केलेल्या पाकृपैंकि तरी).

का त्रास देतोस रे मित्रा ? ;)

{पनीर पकोडे प्रेमी } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 5:07 pm | दिपक.कुवेत

एकदा पनीर पकोडे पण करुन बघायचा प्लॅन आहे. केले कि डकवतो...

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

मरा तिच्यायला ! :-D
चाललो आता मी खाऊ गल्लीत.. भुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!

अनन्न्या's picture

13 Oct 2014 - 5:00 pm | अनन्न्या

तोंपासु.........

यशोधरा's picture

13 Oct 2014 - 7:22 pm | यशोधरा

एकदम भारी!

आता मी पण काय तरी रेशिपी टाकतोच राव उट्टं काढायला...लैच्च जळजळ करायला लावतो हा माणूस !! ;)

भाते's picture

13 Oct 2014 - 7:48 pm | भाते

तुझ्या पाकृने सोमवार सार्थकी लागला.

कुवेतमध्ये दिपक शिवाय आणखी कोणी मिपाकर आहे का? दिपकला अनेक वेळा प्रेमाने समजावुन सुध्दा हा काही सोमवारी पाकृ टाकायचे सोडत नाही!
यावर एकच ऊपाय! दर रविवारी त्याला कट्टयामध्ये गुंतवून ठेवायचे. नविन पाकृ करून बघायला वेळच मिळाला नाही पाहिजे त्याला.
तरच आपली या त्रासातुन सुटका होऊ शकेल. :)

मुक्त विहारि's picture

13 Oct 2014 - 10:24 pm | मुक्त विहारि

करतो काही तरी व्यवस्था...

दिपक.कुवेत's picture

14 Oct 2014 - 2:25 pm | दिपक.कुवेत

मग कोणत्या वारी पाकॄ टाकू निदान ते तरी सांग....

भाते's picture

14 Oct 2014 - 4:48 pm | भाते

सोमवारी सकाळी हिपासात पाकृ आणि फोटो बघितल्यावर त्रास होतो. विकांताला (शनिवार/रविवार) पाकृ आली तर ती करून बघण्याचा किंवा बाहेर जाऊन खाण्याचा पर्याय ऊपलब्ध असतो. :)

दिपक.कुवेत's picture

15 Oct 2014 - 10:52 am | दिपक.कुवेत

विकांतालाच वेळ मिळतो ना पाकृ ट्राय करुन बघायला तरी सुद्धा नक्कि प्रयत्न करुन पाहिन.

इशा१२३'s picture

13 Oct 2014 - 8:48 pm | इशा१२३

दुपारी रेसिपी वाचुन लगेच संध्याकाळी करुन पाहिली.खूप आवडली.

रेवती's picture

13 Oct 2014 - 9:20 pm | रेवती

नेहमीप्रमाणेच कौतुक!

सानिकास्वप्निल's picture

13 Oct 2014 - 9:25 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ आणि फोटो :)

तुमचा अभिषेक's picture

13 Oct 2014 - 9:55 pm | तुमचा अभिषेक

आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न कुठल्याही फॉर्ममध्ये आवडतेच. अगदी चिकन कॉर्न कॉम्बिनेशनवाले स्टार्टरही विशेष आवडीचे.
बायको माहेरी असल्याने तुर्तास हे वाचनखूण :)

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 10:13 pm | प्रचेतस

लै भारी

चकाणा ऐ स्पेशल डिश आवडली.

पैसा's picture

14 Oct 2014 - 4:53 pm | पैसा

मस्त रे दिप्या! मक्याचे दाणे घरात आहेत पण कांदापात नाहीये त्यामुळे आजचा बेत क्यान्सल!

दिपक.कुवेत's picture

15 Oct 2014 - 10:52 am | दिपक.कुवेत

हे म्हणजे दात आहेत तर चणे नाहित आणि....बाकि समजुन जा.

दिपक.कुवेत's picture

15 Oct 2014 - 10:55 am | दिपक.कुवेत

एकदा ट्राय करा आणि कळवा कसं होतेयं ते. पाकॄत एक सांगायचं राहिलं कि ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल. संमं हे वाक्य वरील पाकृत अ‍ॅड केलं तर पुढे वाचणार्‍यांना सोपं जाईल. धन्यवाद.