रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

आर्बि२३९९'s picture

9 Dec 2015 - 7:39 pm | आर्बि२३९९

माझे अनुभव कथन :

माझी thunderbird ५०० होती (एप्रिल २०१३ -डिसेंबर २०१४, साधारण ३०००० running झालं होतं ). पण Royal enfield च्या गाड्यांना लहान मुलांसारखे जपावे लागते असं मला वाटतं !. चेन adjustment ने तर लई काव आणला होता . अन त्यात दोन वेळा battery acid overflow होऊन बुडाखाली धूर निघाला होता त्यामुळे मी विकून टाकली .
Thunderbird touring साठी खूप चांगली आहे असा दावा आहे पण दिवसाला ६०० kms पेक्षा जास्त अंतर कापलं की दमायला व्ह्यायचे . त्यात ८० पेक्षा जास्त स्पीड ला body massage फुकट plus एकदम uncertain braking (तरी मी tyres Pirelli चे टाकले होते . Factory fitted एम आर एफ concrete झिजवतील पण त्यांना काही होणार नाही,एकदम कंडम ).
अजुन एक म्हणजे अत्यंत घाण आफ्टर सेल्स support . सर्वाधिक dealers ना फक्त फ्री servicing ची कुपन्स फाडण्यात इंटरेस्ट असतो असा माझा तरी अनुभव आहे . त्यामुळे बाहेरचा mechanic शोधलेला बरा (पुण्यात असे बरेच आहेत !)
अर्थात सगळेच negative points आहेत असं नाही ! ५०० चा लो एंड grunt दृष्ट लागावी असा आहे . त्यामुळे घाट कुठलाही असो ,२/३ gear मध्ये आरामात खेचायची . त्यात बुलेट ची engines एकदम लो स्पीड असल्यामुळे engine life amazing आहे .
हे काही फोटो :
चंबा ,हिमाचल प्रदेश
चंबा ,हिमाचल प्रदेश

साच पास ,हिमाचल प्रदेश
Sach pass

साच पास ,हिमाचल प्रदेश
Sach pass

वरंध घाट

alt

मरवन्थे बीच

alt

कन्याकुमारी
alt

वरंध घाट
alt

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 1:21 pm | टवाळ कार्टा

फोटो मस्त हैत

मोदक's picture

28 Dec 2015 - 1:08 pm | मोदक

सुंदर फोटो.

३५० ऐवजी ५०० का घ्यावीशी वाटली आणि थंडरबर्ड विकल्यावर कोणती बाईक घेतली?

आर्बि२३९९'s picture

28 Dec 2015 - 2:48 pm | आर्बि२३९९

५०० लवकर मिळत होती म्हणून :)
jokes apart , ५०० Fuel Injected आहे अन ३५० carbureted त्यामुळे ५०० ची power delivery स्मुथ आहे असे मला वाटते अन additional torque कुणाला नको ?
सध्या माझ्याकडे Kawasaki(ER-6n) आहे.

माझ्या क्लासीक ३५० ला अ‍ॅलॉय व्हील्स आणि त्याला ट्युबलेस टायर्स बसवायचे आहेत. (कारण बुलेट पंक्चर झाली तर काय होते ते कोणत्याही बुलेट मालकाला विचारा..)

बाजारात ७ हजार ते १० हजार पर्यंत दोन्ही व्हील्स मिळत आहेत. मात्र ज्याच्याकडे अ‍ॅलॉय व्हील्स बसवत आहे त्याच्या मते सध्या जे टायर्स वापरत आहे तेच टायर्स (ट्युबशिवाय) त्या अ‍ॅलॉय व्हील्स ला बसतात आणि तसेच चालतात.

माझ्या शंका
१) ट्युबलेस टायर्स आणि साधे टायर्स वेगळे असतात का? (बहुदा असावेत)
२) ट्युबशिवाय नुसते टायर्स अ‍ॅलॉय व्हील्स ला बसवले तर चालतात का? का काही अडचण येवू शकते?
३) माझी गाडी एकदाच पंक्चर झाली आहे आणि त्यावेळी सहा सात इंची खिळा वेडावाकडा घुसला होता. त्यामुळे टायरला जे नुकसान झाले आहे त्यामुळे तो टायर ट्युबलेस म्हणून वापरता येईल का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

अलॉय व्हील्सच्या बिलकुल नादी लागू नका!

कारणे खालीलप्रमाणे

1 गाडी वजनदार आहे उगा प्लॅस्टिक नाही

2 ऑफरोडिंग करण्यात खूप अडचणी येतात अन बंधने येतात

3 मायक्रोक्रॅक्स डेव्हलप होतात रिम्स मध्ये, त्या कुठल्याक्षणी कसा दगा देतील भरवसा नसतो, आमच्या एका मित्राने ओरिजिनल नामांकित कंपनीचे फिन रिम्स (कडबा कटर प्रमाणे 2 फिन्स असणारे) घातले होते, गाडी ग्रामीण भागात खूप फिरे, गाडीचा आस म्हणजेच होल्डिंग पिन का काय म्हणतात त्याच्याजवळ बारीक क्रॅक झाल्या होत्या एकदा जोरात खड्डा आला तर पुढली राम 2 तुकडे झाली अन गडी फेकला गेला ते त्याच्याच डेंटिन्गपेंटिंग मध्ये काही हजार गेले, तस्मात सांभाळून

मिफुस समाप्त

आता तुमचे प्रश्न

१) ट्युबलेस टायर्स आणि साधे टायर्स वेगळे असतात का? (बहुदा असावेत)

- होय वेगळे असतात.

२) ट्युबशिवाय नुसते टायर्स अ‍ॅलॉय व्हील्स ला बसवले तर चालतात का? का काही अडचण येवू शकते?

-असे बसवलेले कधीच ऐकले नाहीत

३) माझी गाडी एकदाच पंक्चर झाली आहे आणि त्यावेळी सहा सात इंची खिळा वेडावाकडा घुसला होता. त्यामुळे टायरला जे नुकसान झाले आहे त्यामुळे तो टायर ट्युबलेस म्हणून वापरता येईल का?

-चालत असल्यास बसवायला हरकत नाही, झालेल्या भगदाडास जर puncture curing epoxy solution (मिळते बाजारात ट्यूबलेस टायरचं puncture काढायच्या किट मध्ये) भरून सांधता आले तर तेच टायर वापरता येईल

अवांतर, लद्दाखहुन आला आहात तेव्हा जमल्यास टायरं बदलूनच टाका असे सुचवतो

अतिअवांतर

लद्दाखचे पुढले भाग लवकर टाका हि विनंती अजून किती वेळ करावी ते सांगा मालक जरा

धन्यवाद बापु. हे असले पण रिम नको का? त्या कडबाकुट्टी रिमचा प्रॉब्लेम माहिती होता म्हणून हे दिसल्याक्षणी विचार मनात आला..

.

आणि हो.. पंक्चर काढल्यानंतर टायरला काहीही सोल्युशन लावले नव्हते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला वाटते ही सिक्सटीन स्पोक्ड हार्ले स्टाईल रिम्स ची कॉपी असावी, जर लावायचेच असे ठरले असेल तर ओरिजिनल हार्ले 16 स्पोक शोधा, त्याला 16 आरे असतील अन quality सुद्धा उत्तम मिळेल बाकी थोडा वेळ द्या तुम्हाला punctureless टायर संबंधी उत्तर जमल्यास सचित्र देतो :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jun 2016 - 4:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

रिपोर्ट चांगला आहे. पराडो / अल्टिमेट कंपनआचे अलॉय बरे असतात असे वाचुन आहे. अजुन्तरी स्वानुभव नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

जावईबोआ आमचा एक मित्र 2 पाती प्राडो मुळेच तर जमा झाल्ता अकोल्याले हड्डीच्या हस्पतालातनी =))

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jun 2016 - 4:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

मग दुरच रहा मोदकराव! हे अलॉय काही खर नाही. न पेक्षा येमारेफचे दणकट टायर्स आहेत ते टाकुन घेत जा.

एमारेफ ट्यूबलेस जरा हार्ड आहेत, घासले जातात लवकर. ग्रीप चान्गलीय. सीबीजीला मी नॉर्मल काढून त्याच रीमला ट्यूबलेस टाकला. 100/90/18. अपोलो चा. जरा नरम वाटला.ग्रीप सुपिरिअर आहे. फ्रिक्षण कमी वाटतेय.
19 ईंचीत पिरेल्ली आहे का बघा. 18 आलेत मार्केटला. त्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत.
रीमात 16 प्राड़ो चांगले आहे. बरेच नवे आर इ ओनर टाकायलेत.
माज्यामते स्पोकस बेस्ट ओलताईम. ते वन टाईप सस्पेन्शनच असते.

बापु, वैद्यसाहेब, अभ्याजी.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

त्याचे असे झाले की माझ्या दुसर्‍या गाडीचे काम करताना तेथे एका बुलेटला मी वर फटू दिला तसली रिम बसवायचे काम सुरू होते. रिमची किंमतही ठीकठाक वाटली व ट्युबलेस करता येईल म्हणून मी त्या दिशेने माहिती काढण्यास सुरूवात केली. (येथे धागा काढला - आणखी एक दोन शिनीयर लोकांना विचारले.)

ज्यांच्या बुलेटवर हे रिम बदलण्याचे काम सुरू होते त्यांचा मोबाईल नंबर घेतला होताच. त्यांना नंतर दोन तीन दिवसांनी विचारले तर कळाले की ते रिम त्यांच्या बुलेटला बसले नाहीतच आणि त्या ठोकाठोकीत बेअरींग गेले. ते वाढवलेले काम ऑथोराईज्ड वर्कशॉपमधून करून घ्यावे लागले.

त्यामुळे ट्युबलेसची आयड्या डोक्यातून काढून टाकली आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

तर मोदक भाऊ, वरील प्रमाणे कुटाणे असतात ट्यूबलेस टायरचं puncture काढायचे, प्रथम खिळा ओढून काढायचा असतो मग एक 'टी' आकाराचे टूल असते त्याला अगदी गिळगिळीत अशी एक रबरची नळी गुंडाळून भोकात कुचकतात अन बाहेर आलेली नळी तासून घेतात, झाले पंक्चर काढून! ह्यात एक स्टेप नाहीये, बाहेर आलेली रबर नळी कापून घेतली की त्याठिकाणी मी उल्लेख केलेले इपोक्सी सोल्युशन लावले जाते थोडे, ह्याचा वास रंग वगैरे आपण सायकलचे पंक्चर काढायला जे रालको वगैरे चे लालसर सोल्युशन वापरतो तसेच असते बघा

मोदक's picture

27 Jun 2016 - 5:10 pm | मोदक

धन्यवाद बापू...!!

इमर्जन्सीला हे आपणही करु शकतो. टायरवाले माणूस बघून कीतीही सांगतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 8:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

व्हय जी!

वामन देशमुख's picture

28 Jun 2016 - 10:40 am | वामन देशमुख

सदर धाग्याचे Practical Outcome:

बऱ्याच दिवसांच्या सर्वे, माहिती, सल्लामसलत, आंजा शोध, काथ्याकूट... इ नंतर शेवटी मी रॉयल एनफिल्ड बुलेट इलेक्ट्रा ३५० चा मालक झालोय.

खरंच खूप मस्त वाटतेय. जुनं शहर ते हायटेक सिटी या १८ किमीच्या प्रवासात मजा येतीय.

पुढच्या महिन्यात श्रीशैलमला जाण्याचा विचार करतोय.

RE

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jun 2016 - 10:46 am | कैलासवासी सोन्याबापु

खूप खूप अभिनंदन वामनपंडित आपले !! राईड मेटल राईड स्ट्रॉंग अँड वेलकम टू द फॅमिली :)

Dhananjay Borgaonkar's picture

28 Jun 2016 - 2:27 pm | Dhananjay Borgaonkar

अभिनंदन साहेब. वेलकम टु द क्लब.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jun 2016 - 4:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

इलेक्ट्रा मस्त दिसतेय! सीट बदलुन घेतलीय का?

वामन देशमुख's picture

4 Jul 2016 - 3:21 pm | वामन देशमुख

इतक्या उशिरा प्रतिसाद देतोय, क्षमस्व.

>>इलेक्ट्रा मस्त दिसतेय!

धन्यवाद! यासाठीच केला होता हा अट्टाहास!

>>सीट बदलुन घेतलीय का?

नाही. ओरिजिनलच सीट आहे.

वामन देशमुख's picture

28 Jun 2016 - 12:05 pm | वामन देशमुख

धन्यवाद, सोन्याबापू!

बुलेटची सर्व्हिसिंग शोरूम मध्ये न करता बाहेर करावी, असे इथल्या बऱ्याचजणांचे म्हणणे दिसतेय.

हैद्राबादमध्ये चांगली सर्व्हिस देणारे मेकॅनिक कुणी असतील तर सांगा.

मोदक's picture

28 Jun 2016 - 4:38 pm | मोदक

वेल्कम टू द क्लब..!!!

सुरूवातीचे सगळे सर्विसींग न चुकता ऑथोराईज्ड ठिकाणी करून घ्या. नंतर मेकॅनिककडे करा.

गणामास्तर's picture

28 Jun 2016 - 7:47 pm | गणामास्तर

मी पुढे जाऊन म्हणेन की सुरूवातीच्या फ्री सर्व्हिस ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटर ला करून परत एकदा बाहेर पण करून घ्या. कंपनीचे सर्व्हिस सेंटर दळभद्री आहेत.
माझा कुठलाही प्रॉब्लेम सर्व्हिस सेंटर ला व्यवस्थित दुरुस्त करून मिळालेला नाहीये.
गाडीची डिलिव्हरी मिळाली की पहिले बॅटरी आणि ऑईल लेवल चेक करून घ्या, माझ्या गाडीत पुरते 1 लिटर सुद्धा ऑईल नव्हते. आत्ताच्या सर्व्हिसिंग ला तिथल्या सुपरवायजर ला बोललो की दे नुसता शिक्का मारून सर्व्हिस बुक वर, कारण तसेही तू काही करणार तर नाहीचेस. उत्तरा दाखल नुसताच हसला हरामखोर.

मास्तुरे.. पिंपरीच्या पूना स्कूटर्स ला सर्विसींग करून देतात का विचार. ओरिजिनल पार्ट्स, ताबडतोब सेवा आणि भयंकर स्वस्त रेट आहेत.

माझ्या पॅशनचे चेन सॉकेट बदलले त्याला पुण्यातील खर्चाच्या तुलनेत निव्वळ ५०% खर्च आला. मी काही चुकते आहे का ते चार चार वेळा चेकवले पण ओरिजिनल स्पेअर्स आहेत.

Dhananjay Borgaonkar's picture

28 Jun 2016 - 2:24 pm | Dhananjay Borgaonkar

मला माझ्या बुलेटचे सीट बदलायचे आहे. पुण्यात कोणी बुलेट स्पेशालिस्ट माहित आहे का?
मला एक मुंबईचा पत्ता मिळाला आहे पण आता तेवढ्यासाठी मुंबईत कोण जाईल. त्याचा मोबाइल न्ंबर पण मिळाला पण तो चुकीचा निघाला.

सीट बदलायचे आहे म्हणजे नक्की काय करायचे आहे?

कोणती बुलेट आहे? मॉडेल?

Dhananjay Borgaonkar's picture

28 Jun 2016 - 8:59 pm | Dhananjay Borgaonkar

क्लासिक 500

मला नवीन सीट टाकायचे आहे. आधीचे सीट खराब झालय आणि त्याला स्प्रिंग आहेत.
मला बिना स्प्रिंगच सीट हवय. माझ्या मित्राने त्याच्या बुलेटला बसवलय पण त्याने ते मुंबईवरुन आणलय.

मी सुचवेन स्प्रिंगवाले सीट असूद्या. साध्या सीटपेक्षा कितीतरी जास्ती पटीने आरामदायक आहे.

नाना पेठे मध्ये बकेट सीट बसवून मिळेल, आनंदरावांचा मित्रच आहे. त्याच्याकडे चौकशी करा.

कॉलींग आनंदराव..

स्प्रिन्गवाले सीट चांगलेच पण तरीही बदलायचेच असेल आणि ठाण्याला आलात तर आराधना टॉकीजच्या समोर सीट स्पेशालीस्ट आहे. तुमच्या समोर तुमचे समाधान होइपर्यंत हवे तसे बदल करुन देइल.
स्प्रींगवाल्या सीटमधे तीघे बसताना मधल्याचे वांधे होतात.

मोदक's picture

29 Jun 2016 - 1:18 am | मोदक

नका हो.. बुलेटवर (किंवा कोणत्याही दुचाकीवर) तिघे बसणे हा त्या वाहनाचा अपमान आहे.

खटपट्या's picture

29 Jun 2016 - 1:25 am | खटपट्या

हो ते तर आहेच

Dhananjay Borgaonkar's picture

29 Jun 2016 - 12:14 pm | Dhananjay Borgaonkar

मला न्ंबर द्या ना प्लीज

मोदक's picture

29 Jun 2016 - 1:03 pm | मोदक

व्यनी केला आहे.

आणखी कोणाला हवा असल्यास मला व्यनी केलात तरी चालेल.

खटपट्या's picture

4 Jul 2016 - 6:16 am | खटपट्या

हे ही बघण्यासारखे आहे.

https://www.youtube.com/watch?v=hYzuqAX2A3A#t=681.681308

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Jul 2016 - 9:19 am | अनिरुद्ध.वैद्य

नुकतंच चेन सारखी आवाज करते ढीली झालिये म्हणून वर्कशॉपमध्ये गेलो होतो. तर तिथे सांगण्यात आले की चेन व्यवस्थित आहे, तर स्प्रॉकेट गेले आहे. साधारण २०००० किमि गाडी चालली आहे. मला एक प्रश्न पडतोय की ईतक्या लवकर स्प्रॉकेट खराब होउ शकते का? कारण जुन्या पल्सारचे स्प्रॉकेट चान्गली ६०००० किमी चालली तरी गेले नाही.

शिवाय क्लच केबला वेगळाच इश्यु, १.५ वर्षात दोनदा तुटलीय :(

गाडी शहरात जास्त प्रमाणात चालवता का?

चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक दिसते त्याचे दात नीट चेक करा, त्या दातांची उंची झिजल्यामुळे कमी जास्त झाली असेल तर बदलावेच लागेल.

हे चेन स्प्रॉकेटचे मागचे व्हील आहे. (अंतर्जालावरून घेतलेला फोटो आहे - माझी गाडी इतकी घाण नसते ;) )

.

माझ्या गाडीचे २०,००० किमी पूर्ण झाले असतानाच मागच्या चाकाचे पांच सहा दात तुटले / झिजले. त्यामुळे कट् कट् आवाज येत होता. २३०० रूपयांना संपूर्ण किट (मागचे चेन व्हील, पुढचे चेन व्हील आणि चेन) असे बदलून घेतले. (ऑथोराईज्ड शोरूम मध्ये.)

माझ्या पॅशन प्लसचे पहिले स्प्रॉकेट ४०,००० किमी ला बदलावे लागले. तेंव्हा गाडी फक्त आणि फक्त हायवेला चालली होती. १०% सुद्धा ट्रॅफिकमध्ये चालली नसेल. नंतर फक्त ट्रॅफिकला चालायला लागली तेंव्हा पॅशनचे सुद्धा २०,००० किमी मध्ये गेले, या किट बदलामध्ये बहुदा ओरिजिनल कीट वापरले नसावे अशी शंका आहे म्हणून इतके लवकर गेले. पण त्या अनुभवावरून आता मागच्या आठवड्यात पुन्हा हिरो चे ओरिजिनल कीट बसवले आहे.

तुमच्या गाडीला आणखी एक क्लच केबल बसवून घ्या. एक वापरातली आणि दुसरी बॅकप. पहिली गेली की फक्त हँडल आणि इंजिन येथे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक बसवायला लागते.
..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते. याबाबत अधिक माहिती तज्ञ लोक्स देतीलच.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:41 am | टवाळ कार्टा

माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे आणी जवळपास ८००००+ किमी चालली आहे...अज्जून एकदाही क्लच केबल तुटणे, चेन स्प्रॉकेट तुटणे, क्लच प्लेट झिजणे असे काहीही प्रॉब्लेम्स आलेले नाहियेत...टचवूड्ड...असो....जरा खालची लिंक पहा

http://riderzone.in/never-buy-royal-enfield/

माझी आणि त्या लेखकाची मते परफेक्ट जुळतात

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 10:42 am | टवाळ कार्टा

आणि माझी बाईक ९०% वेळा शहरातच चालवलेली आहे

मी शाळेत असताना एक छत्री घेतली होती. ती जर ऊन-पाऊस-वार्‍यात वापरलीच नसती तर अजून टिकली असती आणि म्हातारपणी माझ्या नातवंडांना "खानदानकी निशानी" म्हणून देता आली असती.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:09 am | टवाळ कार्टा

उदाहरण समजले नाही...१.५ लाखाची बाईक जर ५००००+ किमी कोणताही पार्ट खराब न होता फक्त शहरात नाही चालू शकत तर काय उपयोग...आणि हेच काम अगदी सगळ्यात स्वस्तात मिळणारी बजाज CT100 आरामात करते

जिन्क्स's picture

4 Jul 2016 - 12:34 pm | जिन्क्स

Reliability हा एकमेव निकश असणार्यांनी रॉयल एन्फिल्डच्या वाटे जाऊ नाही. २०००० किमी पर्मोच्च रायडिंग सुख देणार्या गाडीवर थोडेफार खर्च करायला मी कधीही तयार असेल. अखेर पसंद अपनी अपनी.

सुबोध खरे's picture

4 Jul 2016 - 12:55 pm | सुबोध खरे

बुलेट ना घेण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बेभरवशीपणा. खर्च हा मुद्दा अलाहिदा आहे. त्याची होणारी कटकट नकोशी आहे.
विश्वसनीयता हा गुण बुलेट मध्ये कधीच नव्हता. क्लच केबल तुटणे, सुटे भाग गंजणे काहीतरी कुरबुरी सतत चालू असणे अशा अनेक तक्रारी पासून बुलेट मालकांची कधीच सुटका होत नाही. शिवाय कंपनीची कार्यशाळा(workshop) किंवा सेवा केंद्रे अत्यंत बेफिकीर आहेत. कंपनी कडे तक्रार केली असता त्या बद्दल कंपनी काहीही करीत नाही. केवळ गाड्या विकल्या जातात याबद्दल कंपनीची "बेफिकिरी" आहे या कारणास्तव बुलेट कधीच घेणार नाही.
याउलट होंडाच्या मोटारसायकली मी आणि माझा भाऊ मिळून ४ मोटार सायंकाळी आणि ४ स्कुटर्स वापरल्या( वापरत आहोत).
चार पैकी तीन मोटार सायकल एक लाख पेक्षा जास्त किमी चालवल्या आहेत. चौथी युनिकॉर्न ५०००० च्या वर किमी असून अजून चालवत आहे डबल सीट घेऊन मुंबई गोवा, मुरुड चा समुद्रकिनारा फिरून आल्या आहेत. मुंबई पुणे ट्रीप तर कितीतरी. पर्वतीच्या टेकडीवर मागच्या बाजूने सुद्धा चढवली. वाटेल तेथे आणि वाटेल तशी चालवून त्याचे सुटे भाग कधी गंजत नाहीत तुटत नाहीत की स्प्रॉकेट कधी बदलायला लागले आहे. सायलेन्सर तुटला किंवा अशा तत्सम तक्रारी कधीच येत नाहीत. हे सर्व दोन वर्षात फक्त एकदा सर्व्हिसिंग करून.
तेंव्हा बुलेट आणि जपानी मोटार साकारली यांच्या गुणवत्तेत तुलना अजिबात होत नाही.
बुलेट चालवणारे हे केवळ हृदयाच्या विचाराने चालतात. आणि त्यांनी तसेच चालावे. गुणवत्तेबाबत तुलनेच्या फंदात पडू नये.

बुलेट चालवणारे हे केवळ हृदयाच्या विचाराने चालतात. आणि त्यांनी तसेच चालावे. गुणवत्तेबाबत तुलनेच्या फंदात पडू नये.

+११११

टका तू शाळेत असतास तर तुझ्याकडून १०० वेळा लिहून घेतले असते. :)

या लॉजिकने डिस्कवर करते ती सगळी कामे टीव्हीस मोपेड पण करते.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 12:45 pm | टवाळ कार्टा

करते की...मग टिव्हिएस मोपेडसुध्धा एनफिल्डपेक्षा जास्त रिलाएबल आहे =))

बर्र.. मग तुम्ही मोपेड घ्या आणि आम्ही एन्फिल्ड घेतो.
आंम्ही आमच्या आवडीची गाडी घेवून त्याबद्दल चर्चा करत असताना तुम्ही "ती गाडी बेकार आहे" असे तुमचे मत एकदा नोंदवले हे ठीक. तुमच्या मताचे तुणतुणे वाजवणे या धाग्यावर अस्थानी आहे असे वाटत नाही का..?

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 12:59 pm | टवाळ कार्टा

चालतेय की...पण बुलेटवाले "बुलेटसारखी दुसरी गाडी नाही...कुठेही बिंधास न्या" असे म्हणतात त्याचे काय :P