Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

काव्यान्जलि's picture
काव्यान्जलि in पाककृती
30 Sep 2014 - 10:58 am

साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड.

कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या. नंतर हव्या त्या शेप मध्ये कापून सर्व्ह करा लिंबाच्या सालीची बिस्किटे…

 Biscuits

प्रतिक्रिया

विलासराव's picture

30 Sep 2014 - 11:07 am | विलासराव

द्या पाठवुन. पण अंडे न घातला बनवुन.

एक प्रश्न आहे. बिस्किटं गार झाली की ट्रेला चिकटतात. शक्ती वापरून काढायला गेलं तर मोडतात. यावर काय उपाय? बटर पेपर वगैरे वापरायचा असतो का?

काव्यान्जलि's picture

30 Sep 2014 - 12:17 pm | काव्यान्जलि

बेकिंग ट्रे ला खाली तूप किंवा बटर लावलं कि बिस्किटे आपोआप निघतात.
पण त्या साठी ट्रे पूर्ण गार होऊ द्यायाचा . :)

बटर लावतो, पण तरीही हा लोचा होतोय.

जाड थर द्यायचा का?

इशा१२३'s picture

30 Sep 2014 - 12:23 pm | इशा१२३

छान चव येत असेल लिंबाची.

दिपक.कुवेत's picture

30 Sep 2014 - 1:59 pm | दिपक.कुवेत

दिसत नाहियेत का? बाकि पाकृ टेम्टींग दिसतेय (निदान वाचण्यापुरती)

सूड's picture

30 Sep 2014 - 2:38 pm | सूड

चोप्य पस्ते??

काव्यान्जलि's picture

30 Sep 2014 - 3:25 pm | काव्यान्जलि

चोप्य पस्ते?? म्हणजे ? नाही समजल.. मिपा वर नविन आहे ना त्यामुळं लाघुसंकेत नाही समजत …

वामन देशमुख's picture

30 Sep 2014 - 5:50 pm | वामन देशमुख

लाघुसंकेत नाही समजत

आपल्याला लाघुसंकेत लघुशंकेत असं म्हणायचं आहे का?
;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2014 - 4:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काव्यांजली, थोडा मैदा थोडी कणीक वापरून चालेल का? बिस्कीट पाहून मैदा समजला नाही तर खाता येईल. पण आपल्या हाताने एवढा मैदा खाववत नाही गं.

चोप्य पस्ते = copy-paste

आदूबाळ, पार्चमेंट कागद वापरून पहा. मी पाव भाजताना एका बाजूला पार्चमेंट पेपर, एका बाजूला फॉईल असणारा कागद वापरते. फॉईलच्या भागावर पाव ठेवते. भट्टीत भाजताना कागदाचा, खालच्या बाजूला असलेला पृष्ठभाग किंचित आक्रसतो, त्यामुळे पाव लगेच सुटतो.

विजुभाऊ's picture

30 Sep 2014 - 5:20 pm | विजुभाऊ

मराठीत ते लिहुन बघा . लिहीताना जी ईंग्रजी अक्षरी वापराल त्यावरुन उमजून येईलच

काव्यान्जलि's picture

1 Oct 2014 - 2:17 pm | काव्यान्जलि

३_१४ विक्षिप्त अदिती... कणि़क वापरुन पहाव लागेल.. मी तर नाहि try केल...

वामनपंडित --- मला लघुसन्केत(shortcut) म्हणायच होत...

मुक्त विहारि's picture

1 Oct 2014 - 11:26 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

विनि's picture

6 Oct 2014 - 5:50 pm | विनि

छान आहे.