नवीन महाराष्ट्र

जानु's picture
जानु in पाककृती
25 Sep 2014 - 11:04 pm

नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे.
नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते.
भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास.
कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते. शिवसेनेला लोकसभेसारखी कामगिरी आज तरी अशक्य दिसते कारण ती निवडणुक मोदी केंद्रीत होती.
राष्ट्रवादी ने भाजपा सेनेची युती तुटल्यावरच आघाडी तोडली. जर युती राहिली असती तर आघाडी तोडली नसती.

प्रतिक्रिया

जानु's picture

25 Sep 2014 - 11:08 pm | जानु

पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा's picture

25 Sep 2014 - 11:46 pm | पैसा

=)) =)) =))
चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

मुक्त विहारि's picture

26 Sep 2014 - 7:54 am | मुक्त विहारि

+१

श्रीरंग_जोशी's picture

25 Sep 2014 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: .

ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

येत्या पाच वर्षात कदाचित तुमचे आणि आमचे राज्य वेगळे असेल. ;)

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2014 - 8:43 pm | श्रीरंग_जोशी

सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे

छान पाकृ.

कृती:

१. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या.

२. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा.

३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'.

४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे.

५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

पोटे's picture

26 Sep 2014 - 2:44 am | पोटे

अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:45 am | पिवळा डांबिस

अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!!
पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही...
त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!!
:)

रामपुरी's picture

26 Sep 2014 - 3:09 am | रामपुरी

पण फोटू नसल्याने फाऊल धरण्यात आलेला आहे.

पहाटवारा's picture

26 Sep 2014 - 5:31 am | पहाटवारा

हि पाकृ. अंडं न मारता कशी करायची ते सांगा ब्वा !

-पहाटवारा

पोटे's picture

26 Sep 2014 - 11:18 am | पोटे

तर कांदे फेकावेत

काळा पहाड's picture

26 Sep 2014 - 11:20 am | काळा पहाड

आयात करून.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2014 - 6:07 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्हाआआ ! तों.पा.सु. :-D

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2014 - 8:25 am | प्रभाकर पेठकर

अंड्याच्या नांवाने गुरुजींच्या तोंडास पाणी सुटले? काय जमाना आलाय.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Sep 2014 - 9:15 am | माम्लेदारचा पन्खा

वाड्यावर या रातच्याला …. समदी सोय हाय !

विजुभाऊ's picture

26 Sep 2014 - 11:56 am | विजुभाऊ

पिडां काका
ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं
एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

हरकाम्या's picture

26 Sep 2014 - 10:49 pm | हरकाम्या

आपण लिहिलेल्या पार्ट्या येथे " तोंडी लावण्या " साठी वापरतात.

हे पाकक्रुती उपवासाला चालते का ?

अमोल केळकर's picture

26 Sep 2014 - 12:00 pm | अमोल केळकर

आम्हाला नको , ढोकळा फाफडा
बरी आमची झुणका भाकर
तिखट लागली फारच तर
तोंडीला घेऊ गोड गोड साखर

अमोल केळकर
सप्टेंबर २६, २०१४

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2014 - 8:44 pm | श्रीरंग_जोशी

चारोळी छानंच.

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 2:20 am | खटपट्या

चारोळी मध्ये पाचवी ओळ (अमोल केळकर) मिळवली असती तर यमक जुळून पाचोळी झाली असती. :)

विवेकपटाईत's picture

26 Sep 2014 - 8:35 pm | विवेकपटाईत

महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

आयुर्हित's picture

5 Oct 2014 - 1:03 am | आयुर्हित

जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील!
एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.

गौरीबाई गोवेकर's picture

1 Oct 2014 - 1:29 pm | गौरीबाई गोवेकर

गो बाय. हे गो काय