जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड

Primary tabs

हाडक्या's picture
हाडक्या in राजकारण
22 Sep 2014 - 4:35 am

जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.

आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्‍या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.

असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.

भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.

उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.

मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.

उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.

हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!

(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)

प्रतिक्रिया

अस्वस्थामा's picture

22 Sep 2014 - 5:11 am | अस्वस्थामा

आज चांस मिळाला.!
मी पयला.. :)

नानासाहेब नेफळे's picture

22 Sep 2014 - 5:20 am | नानासाहेब नेफळे

मान गये हाडक्या ,आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनो को!

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 3:22 pm | हाडक्या

वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2014 - 5:34 am | श्रीरंग_जोशी

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत).

तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील.

यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत.

भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता.

अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2014 - 5:34 am | श्रीरंग_जोशी

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत).

तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील.

यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत.

भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता.

अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

नानासाहेब नेफळे's picture

22 Sep 2014 - 6:01 am | नानासाहेब नेफळे

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Sep 2014 - 9:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2014 - 4:33 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-)
वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2014 - 4:38 pm | llपुण्याचे पेशवेll

हे म्हणजे शिवसेनेला स्वाभिमानाची तमा असेल तर आम्हालाही असे म्हटल्यासारखे आहे.

हाडक्या's picture

22 Sep 2014 - 5:08 pm | हाडक्या

(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

आशु जोग's picture

22 Sep 2014 - 9:46 am | आशु जोग

हाडक्यासाहेब
उत्तम उपाय सुचवलात

हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

आशु जोग's picture

4 Mar 2015 - 2:48 pm | आशु जोग

हाडक्यासाहेब

आम्ही आदरच राखला आहे...

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2014 - 10:37 am | पिवळा डांबिस

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.

युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत...
सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

अस्वस्थामा's picture

22 Sep 2014 - 2:34 pm | अस्वस्थामा

असं खरंच तुम्हाला वाटतं ? का बुवा ? अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 8:36 am | पिवळा डांबिस

अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?

असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा....
:)

राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 9:02 am | पिवळा डांबिस

विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो.
त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही.
एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा.
जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे.
परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

धर्मराजमुटके's picture

23 Sep 2014 - 9:32 am | धर्मराजमुटके

शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 9:58 am | पिवळा डांबिस

महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?

मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?

विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?

पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा...
हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं?
महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?

मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.

धन्यवाद

पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?

दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.

असेल तर प्लीज सांगा.

वर सांगितलंच.

राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!!

पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही....
आमेन.

पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते.
उ.दा.
१. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ?
२. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ?
३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ?

४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना.
५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत.

एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 4:21 pm | प्रभाकर पेठकर

सहमत.

राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

पिवळा डांबिस's picture

24 Sep 2014 - 2:28 am | पिवळा डांबिस

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच.
याबद्दल सहमत आहे.

पिवळा डांबिस's picture

24 Sep 2014 - 2:29 am | पिवळा डांबिस

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच.
याबद्दल सहमत आहे.

मराठी_माणूस's picture

23 Sep 2014 - 4:46 pm | मराठी_माणूस

नाशिक मधे काय केले हे तेथिल नगरिकांना विचारा , खरे उत्तर मिळेल

पुतळाचैतन्याचा's picture

24 Sep 2014 - 3:57 pm | पुतळाचैतन्याचा

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

हाडक्या's picture

24 Sep 2014 - 5:25 pm | हाडक्या

या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक.

पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)

एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.

अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना.

काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

पुतळाचैतन्याचा's picture

25 Sep 2014 - 4:16 pm | पुतळाचैतन्याचा

नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

हाडक्या's picture

24 Sep 2014 - 5:25 pm | हाडक्या

या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक.

पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)

एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.

अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना.

काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

मृत्युन्जय's picture

23 Sep 2014 - 10:49 am | मृत्युन्जय

पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 10:56 am | पिवळा डांबिस

आता म्हातारपणामुळे पुन्हापुन्हा टंकणं नाही जमत हो!! :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

माझी सहानुभूती आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 9:07 am | टवाळ कार्टा

+११११११

४-५ वर्षे होउन सुध्धा अजुन ब्लु-प्रिंट येतेच आहे

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 9:10 am | पिवळा डांबिस

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती?
मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 9:35 am | टवाळ कार्टा

ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले??
आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 10:22 am | पिवळा डांबिस

ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार?
एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे...
इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे...
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत.
उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात....
सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 10:32 am | नानासाहेब नेफळे

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात.
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही.

आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 10:43 am | पिवळा डांबिस

नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी,
आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,

नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत.
उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात....
सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!

उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच!
जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

नानासाहेब नेफळे's picture

23 Sep 2014 - 11:07 am | नानासाहेब नेफळे

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला.
शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 11:15 am | पिवळा डांबिस

तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते!
बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!!
:)

विलासराव's picture

23 Sep 2014 - 9:45 pm | विलासराव

ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही.

व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ.

मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे.

बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला.

दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस.
अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर मुहूर्त

यावेळी तरी राजसाहेब शब्दाला जागतील अशी आशा करतो. बघू काय म्हणताहेत ते.

शिद's picture

25 Sep 2014 - 4:49 pm | शिद

Manase

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:06 am | पिवळा डांबिस

ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे...
http://mnsblueprint.org/index.html
वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं.
बाकी आता धमाल येणारे!!!!!

हाडक्या's picture

26 Sep 2014 - 1:10 am | हाडक्या

ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे.
प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ?

एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:15 am | पिवळा डांबिस

हाडक्याजी,
ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा...
उगीच,
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून...
काय?
:)

विलासराव's picture

26 Sep 2014 - 9:08 am | विलासराव

अन्यथा द्या सोडून...
काय?
Smile

सोडुन दिलं.

क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?

अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी).

ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण.

मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.

ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.

समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर).

आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही.

अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..

अन्यथा द्या सोडून...

दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

पोटे's picture

22 Sep 2014 - 10:53 am | पोटे

काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

आदूबाळ's picture

22 Sep 2014 - 11:21 am | आदूबाळ

असं करून जागावाटपात Nash equilibrium येणार का?