तिला नेहमी वाटतं

खटपट्या's picture
खटपट्या in जे न देखे रवी...
21 Sep 2014 - 1:00 am

तिला नेहमी वाटतं....

असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं
नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं
राग आला तरी समजूत काढणारं
अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं
आपल्या नकळत आपली काळजी घेणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं
गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं
किती झिडकारलं तरी परत येणारं
गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं
आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं
त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

21 Sep 2014 - 2:46 am | जेनी...

ओय होय ..... खट्टु काका ;)

काकुन्ना म्हैते का हे ??? :D

खटपट्या's picture

21 Sep 2014 - 2:52 am | खटपट्या

काकुन्ना म्हैते का हे ???

तू पण अशी मनकवडी हायस ना जेनीताई…
पण हे माझे मनोगत नाहिचै मुळी.
आजूबाजूला मित्र असतात ना. त्यांची तडफड बघून स्फ़ुरलिय हि कविथा. :)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2014 - 6:35 am | अत्रुप्त आत्मा

@कविथा>>> =))

दक्षिण भारतियान्बरोबर राहून सवय लागलिय !!
आथ्मा !!!

ही आमची कविथा. आमचा हिच्यावर फार जीव? ;)

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:17 pm | खटपट्या

*wink*

दिपक.कुवेत's picture

21 Sep 2014 - 5:57 pm | दिपक.कुवेत

तुला भारीच काळजी हो जेनीआज्जी....

भिंगरी's picture

21 Sep 2014 - 7:27 am | भिंगरी

साजुक तुपासारख शुद्ध प्रेम,
ज्याच्या नशिबी तो खरा भाग्यवान.

पाषाणभेद's picture

21 Sep 2014 - 11:02 am | पाषाणभेद

ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...

मृगनयनी's picture

21 Sep 2014 - 11:39 am | मृगनयनी

पाषाणभेद

ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...

पाषाणभेद.. ही पोरगी साजुक तुपातली असं नसून "ही पोली साजूक तुपातली" असे आहे... :) .. :)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Sep 2014 - 11:51 am | जेम्स बॉन्ड ००७

च्छ्या.... आजकालची गाणी म्हणजे..

दिपक.कुवेत's picture

21 Sep 2014 - 5:58 pm | दिपक.कुवेत

कशी काय असते ब्वाँ?

मदनबाण's picture

21 Sep 2014 - 10:25 am | मदनबाण

मस्तच ! :)

आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2014 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त आवडली कविता.

-दिलीप बिरुटे
(अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणा-या मैत्रिणीचा फ्यान)

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. मिपावर माझी हि पहिलीच कविता.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 11:34 am | टवाळ कार्टा

या पोरी अशाच नादाला लावतात आणि नंतर "मी तुझ्याकडे अशा द्रूष्टीने कधी बघितलेच नाही" असे बोलून उसात निघून जातात :(

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 11:36 am | खटपट्या

आणुभव हाय वाट्ट !!!

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 12:29 pm | टवाळ कार्टा

असे आण्भव सगळ्यांचेच अस्तात ;)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Sep 2014 - 11:52 am | जेम्स बॉन्ड ००७

या जेव्हा नादाला लावतात तेव्हा आपणच त्यांना उसात घेउन जावे..

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 12:30 pm | टवाळ कार्टा

हा "उस" तो "उस" नव्हे

जेम्स बॉन्ड ००७'s picture

24 Sep 2014 - 9:30 am | जेम्स बॉन्ड ००७

दोन्हीकडे घेउन जाण्याचा जोर जर पार्श्वात नसेल तर या भानगडीत पडुच नये..

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2014 - 11:04 am | टवाळ कार्टा

पार्श्वात जोर फक्त कुठेतरी घेउन जायलाच लागतो...मग तो उस असो वा वडगाव बुद्रुक ;)

जेम्स बॉन्ड ००७'s picture

24 Sep 2014 - 9:35 am | जेम्स बॉन्ड ००७

वत्सा, यासाठी तुला लादेन ध्यान्धार्णा करुन आपली निर्लज्जपणाची पातळी प्रचंड वाढवुन घ्यावी लागेल. सांसारिक जीवनात असे अण्भव येतच अस्तात. तेव्हा लवकरात लवकर लादेन ध्यान्धार्णा करुन आपल्या कातडीची जाडी वाढवुन घेणे. यामुळे एकतर मदनबाण तुम्हाला लागणार नाहीत आणि तुम्हाला उसावर बसवुन ती उसात गेली तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही.
निर्लज्ज व्हा.

-निर्लज्जेश पोरीपटवी..

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2014 - 11:06 am | टवाळ कार्टा

चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच) श्री.श्री.श्री.आमिर "गुलाम" खान यांचा बस, ट्रेन आणि मुलींचा नियम पाळतो ;)

=))

नेहेमी खरे बोलावे म्हणुन मुली खर्रे खुर्रे बोलतात :D

पैसा's picture

23 Sep 2014 - 2:29 pm | पैसा

चांगली आहे कविता

स्पा's picture

23 Sep 2014 - 2:34 pm | स्पा

वाह

आवडेश

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 6:22 pm | बॅटमॅन

ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं

असं कोणी पाहिजे असेल तर ती मुलगी हरामखोरच म्हटली पाहिजे.

(प्रतिसाद कदाचित संपादित होईल, पंखही लागतील. पण तसं झाल्यास ते इम्मॅच्युअर मनोवृत्तीचेच निर्देशक आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2014 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

डिटरंट लावून प्रतिसाद टाकण्याची सोदाहरण ष्टैल ! ;) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2014 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुलगी हारामखोर म्हनायचं माझ्या जिवावर येतं काहींचा अनुभव असेलही तसा पण सर्वच तशा नसतात. कितीही आयुष्यात व्यस्त असू देत...पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.

- दिलीप बिरुटे
(तिच्या आठवणीत रमलेला)

ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढू नका राव. पोरगी झुलवणार हे माहिती असूनही त्या पोरानं विचारपूस करावी ही अपेक्षा अप्पलपोटेपणाची नाही काय तेवढं सांगा. एक आक्षेप काय घेतला तर लगेच अख्ख्या स्त्रीजातीवर कशाला लावता?

आय हाय .. क्या प्रतिसाद हय ... दिबी काका ... मस्तच
लाइक इट !!!

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 10:14 pm | खटपट्या

पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.

हे बाकी एकदम खरं !!

दिपक.कुवेत's picture

24 Sep 2014 - 6:54 pm | दिपक.कुवेत

कशी आहेस तू?

हेय दिपु काका इ अम फिने :) होव अरे योउ ???

खटपट्या's picture

24 Sep 2014 - 11:47 pm | खटपट्या

काही हालचाल झाली का ?