लेक लाडकी

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जनातलं, मनातलं
4 Aug 2008 - 7:09 pm

लेक लाडकी
.

आठवणींच्या गावाची सफर करत मागे मागे जात इथे येऊन पोहचले. इथून आणखीन मागच काहीच दिसत नाहीये, हिच ती पहिली आठवण!! मला फूलपंखी दिवसांमध्ये घेऊन जाणारी..

मी तीन-साडेतीन वर्षांची असेन, बालवाडीत जाणारी.. बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा. आमची बालवाडी आणि आमच्या गावातलं महिला मंडळ एकाच छता खाली जमायच.. आणि मग आमचे सामाईक असे सांस्कृतिक कारेक्रम व्हायचे.

कोणता दिवस होता बरं तो.. कांदे-नवमी /सरस्वती-पुजन /की नवरात्र.. आता नक्की आठवत नाही ... धुवाधार पाऊस पडत नव्हता.. म्हणजे पावसाळा संपत आलेला.. नवरात्रिचेच दिवस असावेत.. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या.. भाग तर मी सगळ्यातच घेतला असणार, ते प्रत्येक गोष्टीत बुडवून निघण्याचे दिवस होते.. काही येत असो नसो सगळ्यात भाग घ्यायचा.. आई आणि बाई जे जे सांगतील ते ते करत जायचं.. धाव म्हटलं की धावायचं.. नाच म्हंणटल की नाचायचं.. मला नक्की काय काय येत होत नव्हत त्या दोघीच जाणोत.

पण त्या वर्षी मला माझं पहिलं बक्षीस मिळाल.. माला पहिला नंबर मिळवून देणारी ती फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती.. तेव्हाचा माझा चेहरा आता आठवत नाही पण बाकी ध्यान आज ही नजरे समोर उभं राहत. आईनं मला खूप छान सजवलं होत.. मोरपंखी रंगाची मऊसूत रेशमी साडी.. तिच्यावरची काळी रंगाची चौकटींची नक्षी..माझ्या खांद्या येव्हड्या केसांचा.. आत बॉल ठेवून बनवलीला अंबाडा, त्याच्यावर गुंडाळलेला अंगणातल्या जाईच्या फुलांचा गजरा.. कपाळावरची छानशी चंद्र कोर.. आणि त्या रुपाला विसंगत अशी माझ्या हातातली कापडी भावली.. माझी ठकी तीला सोडून मी कुठेच जायचे नाही.. आणि माझ्या कडून घोकवून घेतलेल्या दोन ओळी. गोड दिसत असेन नाही!!

तेव्हाचा फोटो असता तर आणखीन मज्ज आली असती. नाही तर नसो!! हा ही एक फोटोच आहे की शब्द चित्र म्हणू हवं तर.. तेव्हा पासून हे असे फोटो साठवण्याची सवयच लागली.. आता एक एक फोटो डव्हलप करत चालली आहे.. तेव्हा छायाचित्र काढण माझ्या हातात नव्हत, पण म्हणून काय झालं चित्र आणि शब्दचित्र मी रेखू शकतेच की!

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची.. याच त्या दोन ओळी.
ज्यांचा अर्थ ही तेव्हा नीटसा कळला नव्हता.. आईनं या ओळी म्हणताना दोन्ही हात पुढे गंफून इकडून तिकडे तिकडून इकडे मुरकल्या सारखे डुलायला सांगितले होते.. हे शब्द बडबडत स्वप्नांच्या दुनियेत टाकलेलं पहिलं पाऊल.. मला बक्षीस देऊन गेलं.. आणि जोडिला काही प्रश्न..
लेक लाडकी या घरची...
आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची.
माझ्या आठवणींची.

===================================
स्वाती फडणीस .......... २७-०७-२००८

कथा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2008 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण डेव्हलप केलेले शब्दचित्र छान आले आहे.
अजून येऊ द्या अशीच शब्दचित्रे !!!

अवांतर : बाकी आपली स्मरणशक्ती दांडगी आहे. आमचा तर गेलेला क्षण थेट विस्मरणाच्या खात्यात जमा होतो. :)

-प्रा.डॉ. दिलीप विसरभोळे

प्राजु's picture

4 Aug 2008 - 7:27 pm | प्राजु

मनातल्या विचारांना.. स्वगताचे सुंदर रूप दिले आहेस स्वातीताई तू. तुझ्या फॅन्सिड्रेस च्या आठवणींमुळे मला माझी फॅन्सीड्रेस स्पर्धा आठवली, मी वासुदेव झाले होते त्यात...
मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती फडणीस's picture

5 Aug 2008 - 11:04 am | स्वाती फडणीस

:)

किर्ति's picture

5 Aug 2008 - 11:50 am | किर्ति

स्वाति ताइ तुमचा लेख खुप आवडला
बालपणी च्या खुप आठवणी ताज्या झाल्या

स्वाती फडणीस's picture

5 Aug 2008 - 11:15 pm | स्वाती फडणीस

:)

पावसाची परी's picture

1 Sep 2008 - 5:16 pm | पावसाची परी

>>लेक लाडकी या घरची...
आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची.
माझ्या आठवणींची.

त्या आठवणी/प्रश्न येणार आहे का पुढे?

ऋषिकेश's picture

1 Sep 2008 - 9:25 pm | ऋषिकेश

हा हा!@ फँसिड्रेस स्पर्धेचा उत्साह माझ्यापेक्षा माझ्या मातोश्रींनाच अधिक मला इतक्या विविध रुपात तिने लोकांसमोर आणलं आहे की खरा कसा दिसतो असा शाळेतल्यांना प्रश्न पडावा :) ;)
मी वेषभुषा स्पर्धेत पुढील गोष्टी झालो होतो:
-सूर्यफूल
- डोलणारी बाहुली (पंचिंग डॉल असते ना मारलं की परत वर येते ती)
-विठ्ठलाची मुर्ती
-बुजगावणं
- बाकी कृष्ण, मेंढपाळ,हवालदार वगैरे नेहेमीचे होतेच

बाकी लेख मस्त!

-(बहुरंगी) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 11:16 am | विसोबा खेचर

आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची. माझ्या आठवणींची.

सुंदर....

स्वाती, जियो....!

तात्या.

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 1:02 pm | अनिल हटेला

स्वाती ताई !!!

तुमचा लेख वाचुन अगदी माझ्या भाची ची आठवण झाली !!

२००६ साल च्या गॅदरींग ला तीने अगदी असाच पोशाख ( नौ वारी साडी चा) केलेला...

आणी अगदी तल्लीन होउन लेक लाडकी वर छोटासा डान्स केलेला ....

बक्षीस ३ -या क्रमांकाच मिळाल तीला ........

पण अगदी डोळ्यात साठवुन ठेवलीये ती प्रतीमा...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्वाती फडणीस's picture

22 Sep 2008 - 12:41 pm | स्वाती फडणीस

[:)]