गाभा:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे..........
उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का?....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय? तुम्हाला सुध्दा अश्या कुणाकडून अपेक्षा आहेत का?
प्रतिक्रिया
20 Sep 2014 - 7:55 pm | धर्मराजमुटके
नाय म्ह्जी मी काय म्हंटो ?
जसा माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हाय तसाच तो हिनदूनचा पण हाये, मुसनमानाचा पण हाय नी किरिस्तावांचा पण हाय ना ? मग सर्व धरमानचा आदर करु दे की गा ? पित्रुमोक्श पाळला तर काय तकलीप हाय का ? आकरा म्हयने आन १५ दिस माराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा राहूदेगा. पन १५ दिस तरी तो हिनदूनच्या वाट्याला येउन द्या की गा !
ते अंनिस पागल हाय वं. राहून द्या जावा. कमसेकम रिपाईवाले तरी हा ईडा हुचलतील का गा ?
20 Sep 2014 - 7:57 pm | प्यारे१
भाषा लईच सुधारली की दणक्यात.
एम सी पी, रिपाइं नं तातडीनं फॉर्म भरायला हरकत नाही.
20 Sep 2014 - 8:10 pm | मृगनयनी
अतुल झोड यांच्या प्रति एक शब्दाशी सहमत! :) विशेषतः फुले शाहु आंमबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. या वाक्यातील "आंमबेडकर" हा शब्द प्रचन्ड आवडल्या गेल्या आहे!!!... :) :)
भटुरड्यांवर आणि पेशवाईवर मणसोक्त टीका करनार्या तथाखतित जान्ता राजा'च्या पक्षाकडून किमान ही अपेक्षा न्हवती. अरेरे!.. शेवटी भटांनी घालून दिलेल्या परंपरांचाच आदर करावा लागतोये.. ह्म.. ह्म.. हं...हं..हं.. :)
20 Sep 2014 - 8:06 pm | श्रीरंग_जोशी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे. मग खरंच या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलणे शोभते का? अंनिसने पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल.
टंकलेखन सहाय्य
20 Sep 2014 - 8:24 pm | श्रीरंग_जोशी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ आज पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. परंतु अजून पर्यंत आघाड्या तयार झालेल्या नाहीत. किंबहुना तयार असून सुद्धा घोषित केले नसेल. कारण सध्या पितृपक्ष सुरू आहे.
उठता बसता, जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी हे राजकारणी फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अशा अंधश्रद्धा जोपासणे शोभते का? अंनिसचे पितृपक्षात निवडणुक अर्ज दाखल करण्याचे आव्हान किती उमेदवार स्वीकारतात ते पाहावंच लागेल. विशेषतः जाणत्या राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. तुमचे मत काय? तुम्हाला सुद्धा अशा अपेक्षा कुणाकडून आहेत का?
21 Sep 2014 - 1:58 pm | प्रतापराव
फक्त राजाच जाणता आहे नि बाकीचे बिन अकली आहेत का ?.
साऱ्यांनी अर्ज भरावा खुशाल.
स्वताच्या पूर्वजांना घाबरण्यात कसला आलाय मर्दपणा. म्हणे पूर्वज भूतलावर येतात म्हणून शुभ कार्य करायचे नाही. अरे चांगली सुवर्णसंधी येतेय पूर्वज येतात करा शुभ कार्ये.
कसल पुरोगामी नि कसल काय. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही. इथे समाजसुधारक इतर राज्यांपेक्षा जास्त झाले कारण इथे अंधश्रद्धाही जास्त होत्या नि आहेत.
21 Sep 2014 - 2:24 pm | टवाळ कार्टा
+११११११११११
फक्त याबाबतीत असहमती...बाकीची राज्येसुध्धा जवळपास आपल्यासारखीच आहेत...अगदी केरळ सुध्धा
22 Sep 2014 - 11:59 am | बबन ताम्बे
ज्यांनी Oh My God मधून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केले, तेच परेश रावळ लोकसभेच्या निवडणूकीचा अर्ज मुहूर्त बघून भरण्यास गेले. ( पेपरमधील बातमी ).
22 Sep 2014 - 12:05 pm | काळा पहाड
आवो, ते यॅक्टर व्हते.. इक्त पन समजतनाय तुमा जेन्टल्मन लोकास्नी?
22 Sep 2014 - 12:12 pm | टवाळ कार्टा
झेन्टल्मन
22 Sep 2014 - 12:14 pm | मृगनयनी
@ बबन तांबे.... सिनेमात किंवा नाटकात अॅक्टर्स जे काही काम करतात किंवा बोलतात.... ते लेखकाने लिहिलेले असते व डायरेक्टरने डिरेक्ट केलेले असते. तसेच अॅक्टर्स'ना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे किंवा तत्सम मोबदलाही मिळतो. (व तो विषय तिथेच संपतो.) त्यामुळे त्या अॅक्टरने त्याच्या पर्सनल आयुष्यातही पिक्चर'सारखेच वागावे.. अशी अपेक्षा कुणी ठेवणे - हे बालिशपणाचे वाटते.
आणि "हेराफेरी"- १ व २ मध्ये "बाबुराव आपटे" सच्छिद्र बनियन परिधान व लुन्गी परिधान करीत होते.. तर मग "परेश रावल" यांनी खासदार झाल्यावरही तोच कॉस्च्यूम ठेवावा का? ;) .. =))
22 Sep 2014 - 12:45 pm | बबन ताम्बे
हे वाचा. परेश रावळ इथे काय म्हणतात बघा.
http://movies.ndtv.com/bollywood/paresh-rawal-defends-oh-my-god-against-...
जो अॅक्टर ह्याच विषयावरील नाटकाचे १५० च्या वर शोज करतो तो फक्त व्यावसायिकतेसाठी करतो हे म्हणणे भाबडे पणाचे ठरेल.
हेराफेरी वगैरे इतर चित्रपटांची उदाहरणे इथे गैरलागू आहेत.
22 Sep 2014 - 1:10 pm | काळा पहाड
प्रभाकर पणशीकरांनी तो मी नव्हेच चे हजारो प्रयोग केले. म्हणजे त्यांनी पण लखोबा लोखंडे सारखंच वागायला सुरवात केली पाहिजे, हो ना?
22 Sep 2014 - 2:04 pm | पोटे
निळू फुलेंचं काय होईल मग ?
22 Sep 2014 - 2:18 pm | बबन ताम्बे
प्रश्न अंधश्र्द्धेला खतपाणी घालण्याचा आहे. आणि लेखाचा मुद्दाही तोचआहे मी दिलेल्या लिंकमधे परेश रावळ स्वतःच काय म्हणत आहेत पहा.
The film is an adaptation of his Gujarati play Kanji Virrudh Kanji and features him as an atheist.
"There was no fear of backlash at all. We were always very sure of what we were saying and doing on ritualistic religion and the way it controls the life of the common man," said Paresh Rawal.
"I had performed the same story in play form in front of a thousand audiences for 150 shows in Gujarati and Hindi repeatedly. The play has also been performed in Punjabi and English. We never had any protests," Paresh Rawal stressed.
"A live audience could've easily expressed its displeasure at our ideas in the play. Not once did we face any protest. So, I knew we were on stable ground with the film. There was no one throwing shoes in any of the shows. Audiences from the older and younger generations have appreciated the idea beyond the play," he added.
Paresh Rawal isn't bothered with the spate of protests against the film.
"Even in Punjab we've been able to release the film almost everywhere. The protestors are seeing and hearing what they want to. And if we are daunted by protests, we'd never be able to extend the reach and impact of the visual medium, be it theatre, television or cinema," said the 62-year-old.
Though the actor believes in God in real-life, he rues that religion is now being merchandised in the country.
"I believe in God. But the costly ways recommended to reach him are wrong. Just who benefits from all the showy rituals, I don't know," he said.
23 Sep 2014 - 3:23 pm | बबन ताम्बे
आचार्य अत्र्यांनी समाज प्रबोधनासाठीच काही नाटके लिहिली. "तो मी नव्हेच " हे त्यातलेच एक.
ओ माय गॉड , कांजी विरूध कांजी चा हेतू समाज प्रबोधनच आहे हे परेश रावल पण म्हणत आहेत.
21 Sep 2014 - 5:16 pm | अतुल झोड
मपा च्या सर्व मित्रांना सांगताना आनंद होत आहे की, पितृपक्षात निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिलेले आव्हान आपले प्रकाश दादा आंबेडकर यांनी स्विकारले आहे व आपले उमेदवार घोषित केलेले आहे हो....
21 Sep 2014 - 5:20 pm | नाव आडनाव
"आपल्या" प्रकाश दादांना आधिच माहित आहे निकाल - त्यामुळे त्यांना कशाचाच फरक पडत नाही :)
22 Sep 2014 - 12:38 pm | प्रतापराव
प्रकाश आंबेडकर ह्यांचे आभार. अश्या अंधश्रद्धान्विरुद्ध कुणीतरी उभे ठाकले ह्याचा आनंद होतो.त्यांनी जी उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात त्यांचे २ विद्यमान आमदारही आहेत.
22 Sep 2014 - 12:21 pm | बाळ सप्रे
बाय द वे.. अंनिसने "आवाहन" केलय. "आव्हान" नव्हे!!
22 Sep 2014 - 3:58 pm | श्रीगुरुजी
>>> उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का??....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल
म्हणजे आता कोणी अर्ज केव्हा भरायचा हे सुद्धा अंनिस ठरविणार आणि कोणाच्या श्रद्धा अंधश्रद्धा आहेत आणि कोणाच्या डोळस आहेत हे सुद्धा अंनिसनेच ठरवायचे? भारतात सर्व नागरिकांना आपापल्या श्रद्धा जपायची अनुमती व हक्क घटनेने दिलेला आहे अशी आमची समजूत होती. पण तसे दिसत नाही. श्रद्धा जपण्यासाठी अंनिसची परवानगी अनिवार्य आहे असं दिसतंय. जो कोणी आपल्या श्रद्धेनुसार एखादे काम करतो व ते काम एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा दिवशी करताना समाजाला कोणताही त्रास नसेल किंवा समाजाचे नुकसान नसेल तर त्याला आक्षेप घेणार अंनिसवाले कोण?
>>> .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय?
विरोधी पक्षांच्या उमेदवाराची जात काढून जाहीररित्या जातीयवादी भाषण करणारा हा तथाकथित जाणता राजा हे काही अजाणतेपणे करत नाही. तो जाणूनबुजूनच जातीयवादी विष कालवत असतो. त्याच्याकडून कसली डोंबलाची अपेक्षा करणार?
>>> तुम्हाला सुध्दा अश्या कुणाकडून अपेक्षा आहेत का?
आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विशेष अपेक्षा आहेत. गेली अनेक वर्षे या दोन लुटारू टोळ्यांनी प्रचंड लूटमार करून जनतेला छळले आहे. निदान आतातरी त्यांनी लूटमार थांबवून व जातीयवादाचे विष पसरविण्याचे थांबवून निवडणुक न लढता जनतेला छळातून मुक्त करावे अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
22 Sep 2014 - 4:03 pm | विजुभाऊ
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.
त्याना अपेक्षीत असलेला महाराष्ट्र त्यांच्या नम्तर काही काळातच संपला.
23 Sep 2014 - 8:32 am | चौकटराजा
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.
हा देश अमुक अमुक विभुतीचा आहे हा शब्द प्रयोगच गैर आहे. अमोरिका जॉर्ज वॉशिंग्टनची नव्हे. ती अमेरिकनांची आहे.
फ्रान्स जोन ऑफ आर्कचा नव्हे तो सार्या फ्रेंच नागरिकांचा आहे. तसेच महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? हे वाक्य असे म्हणता येईल की महाराष्ट्राची भूमी आंबेडकर फुले यांच्या महान कृतीस्पर्शाने पावन झालेली आहे. बाबासाहेबांची राज्यघटना हा तर भयानक शब्दप्रयोग आहे. ती राज्यघटना वी द पीपल ऑफ इंडिया
यांची आहे. समाज हा कोणत्याही विभुतीपेक्षा कधीही मोठाच !
23 Sep 2014 - 3:29 pm | हाडक्या
चौरा.. थोडक्यात पण पर्फेक्ट! +१११
23 Sep 2014 - 6:07 pm | बॅटमॅन
एक नंबर चौराकाका! पण या आयडेंटिट्या अशा हायजॅक केल्यात की सांगता पुरवत नाही.
23 Sep 2014 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
चौराकाका, एखाद्या विभूतीमागे लपलं की कसं गार्गार वाटतं ! मग आपल्याला जे सोईचे ते करायला मोकळे... कोणी आक्षेप घ्यायला आलं तर त्या विभूतींची विटंबना करतोय म्हणून त्याच्या अंगावर धावून जायला पण बरं पडतं ;) :)
24 Sep 2014 - 7:15 pm | प्रतापराव
महाराष्ट्रात आंबेडकर फुले यांचे खेरीज दुसरे कोणी पुरोगामी नव्हतेच की काय? सहमत. महाराष्ट्रात अनेक पुरोगामी नेते होवून गेले पण त्यांच्यात आक्रमकतेची कमी होती. आता फुलेंचे उदाहरण घेवू.आया बहिणी विधवा झाल्या कि त्यांचे टक्कल करण्याची रानटी पद्धत आपल्या इथे होती. ह्या रानटीपणाला अंकुश लावण्यासाठी त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला. तसेच अस्पृश्यांना शिक्षण देणे, मुलींना शिक्षण देणे हे हि त्या काळात जेव्हा त्यांची पत्नी मुलींना शिकवण्यासाठी जाई तेव्हा विकृत लोके दगड मारीत. अश्या ह्या विकृत समाजात मानवतेची ज्योत लावली ती ज्योतीरावांनी. आंबेडकर एका अस्पृश्य घरात जन्माला आले. आपल्या महान समाजात जनावरांना तलावात पाणी पिण्याची मुभा होती पण माणसांना नव्हती ह्या विकृतीवर त्यांनी हल्ला केला चवदार तळ्यावर आंदोलन केले. एक मृतप्राय झालेल्या समाजात त्यांनी जीव फुंकला. आता ह्या गोष्टीमुळे ज्यांना आपला तोटा झाला असे वाटते ते त्यांचा विरोधच करणार.समाज विभूतीन्पेक्षा मोठा असतो हे नवीनच एकले. परंपरेच्या नावाने स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडणारा समाज मोठा कि ते रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या विभूती मोठ्या.
25 Sep 2014 - 9:01 am | चौकटराजा
विभूति मार्ग जरूर दाखवितात पण तो स्वीकारणे व न स्वीकारणे स्वीकारला तर तो पुढे नेत रहाणे हे समाजच करतो. या विभूतीनी मार्ग दाखविला तो समाजाने स्वीकरला व एवढेच नाही तर पुढे चालवला. यात समाजाचेच मोठेपण दिसून येते. अरेरावी चालविणारे समाजही आज आहेतच. त्यांच्या अरेरावीला पुरून उरेल असे काम दुसरा समाजच करू शकतो विभुति नव्हे. जुलमी ब्रिटनचा वसाहत वाद असताना अमिरिकेत सामान्य लोकच लढले. किंवा कुकर्मा हिटलर विरूद्ध नेते नाही तर
प्राणाची बाजी लावली सामान्य लोकानी.
25 Sep 2014 - 4:42 pm | प्रतापराव
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाला नेतृत्वाची गरज असते ज्यातून त्याला चांगली दिशा मिळते. सचिन क्रिकेटपेक्षा मोठा नाही पण क्रिकेटचा शोध लावणारा एखादा व्यक्तीच असेल ना.? त्याने शोध लावल्यावर समाजाला तो खेळ कळला. विना नेतृत्व माणूस हा फक्त कळप बनून राहील. आता जुन्या काळातील काही अनिष्ट परंपरा ह्या समाजाला प्रिय होत्या. साधारण बुद्धीचा मनुष्यहि सांगू शकतो कि ह्या परंपरा वाईट आहेत पण हे तेव्हाच्या समाजाला कळले नव्हते. धर्माची ग्लानी त्यांच्या डोळ्यावर होती. मग अचानक एखादे नेतृत्व उदयाला आले नि अनिष्ठ रुढींच्या विळख्यात पडलेल्या समाजपुरुषाला फटके पडले. नेत्याची हि कृती इतर लोकांनाही हिम्मत देवून जाते.त्याशिवाय तेव्हा इंग्रज सरकार असल्याने ह्या रुढींचा पायबंद होवू शकला हि सुद्धा सत्य बाब आहे. त्याजागी एखादा राजा किंवा कुठली शाही असती तर हे होवू शकले नसते. कारण समाजाला चेहरा नसतो ते देण्याचे काम नेतृत्व करते.
25 Sep 2014 - 12:46 pm | प्रतापराव
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर यांचा आहे हीच मुळी एक जोपासलेली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.>>
चौकटराजा महाराष्ट्राला संतांचीही भूमी म्हंटली जाते हि जोपासलेली श्रद्धा कि अंधश्रद्धा?
25 Sep 2014 - 1:17 pm | चौकटराजा
समाजाचाच देश असतो. विभूतिंचा नाही. कोणाही एका पेक्षा समाजच मोठा. विभूतींचे मोठेपण आहेत. पण समाजच जर बहिरा
असेल तर विभूतींचे ऐकणार कोण ? सचिन कितीही मोठा खेळाडू असला तरी तो क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठा नाही. लताबाई संगीत शास्त्रापेक्षा मोठ्या नाहीत. जसे म्हटले जाते ..मानव मर्त्य आहे. मेलडी थोर आहे अमर आहे. लेनिनचे पुतळे
रशियात अगदी निर्दयपणे पाडले गेले. हिटलरचे घर नेस्तनाबूत करण्यात आले. ते ही एके़काळी त्यांच्या देशात ( भले बलेबळे का होईना) विभूतीच होते.
आपल्या प्रश्नाचे उत्तर असे की.. पाया असलेले माउली श्रेष्ठच कळस असलेले तुकोबा श्रेष्टच पण आजही अजरामर असलेला
वारकरा पंथ हा खरा हिरो.
23 Sep 2014 - 8:55 am | पिवळा डांबिस
सध्याचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे हे समजणं हाच मुळात एक गैरसमज आहे.
जिथे 'वारकरी' रस्त्यावर आंदोलन करून लोकांच्या गाड्या तोडतात,
जिथे महाराष्ट्राच्या जन्मापासून राज्यकर्ती असलेली जमात स्वतःला मागास ठरवून आरक्षण घेते,
जिथे श्री. दाभोळ्करांची भरदिवसा, भररस्त्यात हत्या होते, आणि खुनी महाराष्ट्रिय पोलिसांना सापडत नाही...
तो महाराष्ट्र पुरोगामी कसा?
23 Sep 2014 - 3:00 pm | प्यारे१
महाराष्ट्र राजकारणी आहे हे मात्र नक्की.
वारकर्यांमध्ये राजकारण आलं.
महाराष्ट्राच्या जन्माआधीपासून असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये (आणि नंतरच्या तर प्रश्नच नाही) राजकारण आधीपासून होतंच.
दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला राजकारणाची पेक्षा नवराजकारण्यांची पार्श्वभूमी आहे असं मानायला (मोक्याच्या)'जागा' आहेत.
23 Sep 2014 - 3:26 pm | मदनबाण
+१०० हेच म्हणतो ! { आज पिडां काकांनी चौफेरे टोलेबाजी केलेली आहे. :) }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
25 Sep 2014 - 11:20 am | विजुभाऊ
पिडां काका एकद्दम बरोब्बर.
जॉर्ज वॉषिंग्टनच्या देशातले लोक सुद्धा फुलेआमबेडकरानच्या देशाबद्दल बोलतात तेव्हा तर ते जास्त प्रकर्षाने जाणवते ;)
25 Sep 2014 - 11:58 am | नाव आडनाव
पिवळा डांबिस सर,
"राज्यकर्ती असलेली जमात..." अख्खि जमात राज्यकर्ती आहे का हो?
25 Sep 2014 - 12:57 pm | बॅटमॅन
नाहीच की.. पण असा विचार करून पहा.
"प्रत्येक .... राज्यकर्ता नसतो पण जवळपास प्रत्येक राज्यकर्ता .... च असतो."
23 Sep 2014 - 10:18 am | खटपट्या
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. :)
23 Sep 2014 - 6:07 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
25 Sep 2014 - 12:50 pm | कानडाऊ योगेशु
जिनियस ऑफ द इयर आलिया भट्ट च्या नावावर हा जोक सहज खपवता येईल! :D
23 Sep 2014 - 6:11 pm | सूड
तुमचा निवडणूक नावाचा जो काही तमाशा चालतो त्यावर विश्वास आहे हे पाहून फारच कवतिक वाटलं.
मला विचाराल तर या देशाचं काय्येक होऊ शकत नाही !!
23 Sep 2014 - 8:53 pm | अविनाशकुलकर्णी
वर्षानु वर्षे समाज शाहु फुले आंबेडकर याच्या विचारावर सरकार समाज चालत नाहि या बद्दल रडण्या पेक्षा त्या विचारानी जाण्यात समाजाला का रस..स्वारस्य राहिले नाहि याचा पण विचार करावा का?
्कदाचित ते विचार कालबाह्य झाले असुन त्यात काहि दम नाहि असे पण समाजास वाटत असावे..
्केवळ थोराचे व बहुजन समाजसुधारकाचे विचार म्हणुन त्यावर कुणी बोलत नसावे..
24 Sep 2014 - 3:27 pm | अतुल झोड
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा - एका आमदार महाशायांना असे वाटत होते कि "फुले शाहू आंबेडकर" हि एकच व्यक्ती आहे. थोडी अतिशयोक्ती वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही. ...................................................................................................
हो राव हे पण शक्य आहेच