पोळी पापडी चाट

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
18 Sep 2014 - 12:50 pm

नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो.

chat 1

साहित्यः
अ. पापडी साठि:
१. शीळ्या पोळ्या - ४ ते ५
२. तळण्यासाठि तेल

ब. चटण्या:
१. आंबट/गोड चटणी साठि: चिंच, खजुर, चवीनुसार मीठ/गुळ - चींचेचा कोळ, वाफवलेले खजुर मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या. त्यात चवीप्रमणे गुळ/मीठ घालुन गोड चटणी तयार करा
२. तिखट हिरव्या चटणी साठि: मुठभर कोथिंबीर/पुदिना, २-३ हिरवी मिरची आणि पेरभर आलं घेउन मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या

क. सारण:
१. उकडून कुस्करलेला बटाटा / मोड आलेले वाफवलेले मुग (त्यात चवीपुरतं मीठ घालून)
२. बारीक चीरलेला कांदा / टोमॅटो - १ बाउल प्रत्येकि

ड. ईतर पण महत्वाचे:
१. फेटलेलं दहि
२. बारीक नॉयलान शेव
३. चाट मसाला

chat 2

कॄती:
अ. पोळी पापडी साठि:
१. शीळ्या पोळ्या एक एक करुन पोळपाट किंवा चॉपींग बोर्ड वर घ्या व त्यांना फोर्क ने टोचे मारुन घ्या जेणे करुन त्या तळताना फुगणार नाहित

Chat 3

२. आता त्यांच्या साईडच्या कडा काढून टाका. त्या फेकून देउ नका त्यासाठि खालील टिप बघा. कडा काढल्यावर उरलेल्या चौकोनाचे बाईट साईज तुकडे करा

chat 4 chat 5

३. मंद आचेवर गोल्डन बाउन होईस्त हे तुकडे तळून घ्या. तळलेत कि टिश्यू पेपर वर काढा जेणेकरुन अतीरीक्त तेल शोषलं जाईल. तळण नको असेल तर नॉनस्टिक तव्यावर थोडसं तेल टाकून परतून घ्या. पण त्यात फार वेळ जातो आणि गॅस मंदच ठेवावा लागतो अन्यथा पोळ्या खालून करपतात. बेस्ट म्हणजे ओव्हन असल्यास तुकडे बेक करुन घ्या.

chat 6 chat 7

चाटसाठि:
१. सर्विंग डिश/प्लेट मधे तयार पापड्या ठेवा. त्यावर एक ते दिड चमचा बटाटा - मूग मिश्रण घाला. बारीक चीरलेला कांदा / टॉमॅटो घाला
२. आता वरुन चिमुटभर चाट मसाला भुरभुरा
३. आता अनुक्रमे त्यावर तिखट - गोड चटण्या, फेटलेलं दहि घाला
४. वरुन नायलॉन शेव आणि परत हलकसा चाट मसाला भुरभुरवून पोळी पापडी चाट सर्व करा

टिपः पोळ्यांच्या कडा कापल्यात कि त्या सुद्धा तेलात खरपूस तळून घ्या व बाहेर काढल्यात कि त्या गरम असतानाच त्यावरुन मसाला भुरभुरवा. चहा किंवा रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो.

मसाला - प्रत्येकि १/२ चमचा चाट मसाला आणि तिखट, चवीनुसार मीठ

chat 8

प्रतिक्रिया

चमचमीत चाट अन तोंपासु फोटो

कंजूस's picture

18 Sep 2014 - 1:47 pm | कंजूस

कमालच आहे.

डिप्ती's picture

18 Sep 2014 - 1:58 pm | डिप्ती

फोतो दिसत नहि

जागु's picture

18 Sep 2014 - 2:23 pm | जागु

छानच.

उमा @ मिपा's picture

18 Sep 2014 - 2:37 pm | उमा @ मिपा

पाकृ आणि फोटो तोंपासु

पोटे's picture

18 Sep 2014 - 2:44 pm | पोटे

मस्त

मालक पायाचा फोटु द्या सैपाकघरात लावतो. ;)

मृत्युन्जय's picture

18 Sep 2014 - 3:46 pm | मृत्युन्जय

अशक्य सुंदर आहे. शिळ्या पोळ्यांची फोडणीची पोळी आम्हाला खुपच प्रिय आहे. पण या पदार्थासाठी कधीतरी त्याचाही त्याग करायला मी तयार आहे :)

सुहास..'s picture

18 Sep 2014 - 3:48 pm | सुहास..

महामस्त पाकृ !!

( स्वगत : वाश्या , लेका उपासाच्या दिवशी रेसीपी चा विभाग उघडत जावु नकोस )

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 4:12 pm | प्रभाकर पेठकर

मस्त. एक वेगळीच पाककृती.

>>>>रंगीत पाण्याबरोबर मस्त साईड चखणा होतो.

अरे दारू म्हण की मर्दा! इथे स्तनाग्रांवर निसंकोच चर्चा होत असताना, 'दारू' शब्द उच्चारायलाही तुला लाज वाटते? ह्हात्त्तुला काय म्हणू?

दिपक.कुवेत's picture

18 Sep 2014 - 5:24 pm | दिपक.कुवेत

रंगीत पाणी म्हटलं काय किंवा दारू...नशा चढायची थांबणार आहे का? भावना पोचल्याशी मतलब!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2014 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ
http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

इशा१२३'s picture

18 Sep 2014 - 5:16 pm | इशा१२३

फोटो पाहुनच ....करावे लागणार चाट..

लिस्ट वाढतेय बरंका दीपकशेठ!

लई छळ मांडता राव तुम्ही 'शेफ'रलेले लोक ;)

आदूबाळ's picture

18 Sep 2014 - 5:48 pm | आदूबाळ

पाकृ आवडलीच, पण या पाकृचा "टॉलरन्स झोन" छोटा आहे. म्हणजे तुकडे तळताना ते कमी/जास्त तळले गेले तर पूर्ण चाटचा विचका होईल.

"हैद्राबादी मिरची का सालन" आणि "तवा पुलाव" मध्ये टॉलरन्स झोन कसा मोठा होता. थोडं इकडे तिकडे झालं तरी चालत होतं.

दिपक.कुवेत's picture

18 Sep 2014 - 7:02 pm | दिपक.कुवेत

तळण्याची एवढिच भीती वाटत असेल तर तुकडे भाज तरी किंवा बेक तरी करुन घे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2014 - 9:34 pm | प्रभाकर पेठकर

तुकडे मंद आंचेवर तळावेत. फक्त तेल व्यवस्थित तापल्यावर (आधी एक तुकडा तेलात सोडून कसा तळला जातोय ते पाहावे) थोडे थोडे करून सर्व तुकडे तळून घेतल्यास कमी/जास्त न होता व्यवस्थित तळले जातील.

रेवती's picture

18 Sep 2014 - 5:50 pm | रेवती

आता एखादे दिवशी चार जास्तीच्या पोळ्या करून ठेवीन. पाकृ छान आहे. एकदम चटपटीत!

सुहास झेले's picture

18 Sep 2014 - 6:38 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणेच.... सिंपली ग्रेट :)

राघवेंद्र's picture

18 Sep 2014 - 6:40 pm | राघवेंद्र

छान पाकृ.
तळण्यापेक्षा,पोळ्या थोडे तेल लाउन भाजल्यातर ?

दिपक.कुवेत's picture

18 Sep 2014 - 6:59 pm | दिपक.कुवेत

तो पर्याय मी आधीच दिला आहे (जरा पाकॄ डिट्टेल वाच बरं) पण ते एक एक तुकडे भाजायला फार वेळ जाईल. निदान माझ्यात तरी तेवढा धीर नाहिये....चाट डोळ्यासमोर असल्यावर :)

राघवेंद्र's picture

18 Sep 2014 - 7:26 pm | राघवेंद्र

मी फक्त फोटो पाहिले. :)

यशोधरा's picture

19 Sep 2014 - 12:57 am | यशोधरा

किती सुंदर रे दुष्टा!

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 1:03 am | कवितानागेश

वॉव. :)

खटपट्या's picture

19 Sep 2014 - 1:17 am | खटपट्या

मस्त !!!

मुक्त विहारि's picture

19 Sep 2014 - 4:15 am | मुक्त विहारि

आणि छळून घे...

आता डोंबोलीत आलास की १५ दिवस डोंबोलीलाच रहावे लागेल...

दिपक.कुवेत's picture

19 Sep 2014 - 11:57 am | दिपक.कुवेत

ह्या वेळि पा़कॄ गुरवारी टाकलेय बरं...

वैशाली हसमनीस's picture

19 Sep 2014 - 5:31 am | वैशाली हसमनीस

मस्त--------तोपासु

चित्रगुप्त's picture

19 Sep 2014 - 6:01 am | चित्रगुप्त

व्वा. शिळ्या पोळ्यांचे लाडू आणी फोडणीचा कुस्करा खात आलोय, आता यात आणखी एक मस्त भर पडली.

स्पंदना's picture

19 Sep 2014 - 7:07 am | स्पंदना

किडनॅप करु या का याला पण?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2014 - 8:36 am | अत्रुप्त आत्मा

+++++१११११

दिपक.कुवेत's picture

19 Sep 2014 - 11:58 am | दिपक.कुवेत

तब्येतीत खा आणि मस्त रहा.

शिद's picture

19 Sep 2014 - 1:31 pm | शिद

मस्तच!

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Sep 2014 - 12:19 am | माम्लेदारचा पन्खा

ह्या नरपुन्ग्वाने काय करुन ठेवलय त्याची त्यालासुद्धा कल्पना नाहीये....

महान शोध आहे हा......

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Sep 2014 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

लै भारी पाकृ

आवडल्या गेली आहे.

पैजारबुवा,

ganu's picture

20 Sep 2014 - 11:09 pm | ganu

हेच तुकडे जर तेल,लाल तिखट आणि मीठ लावून मंद अग्नी ठेऊन तव्यावर खरपूस आणि कडक भाजून घेतले तर अजून चवदार लागतील.चूक भूल द्यावी घ्यावी.

दिपक.कुवेत's picture

20 Sep 2014 - 11:17 pm | दिपक.कुवेत

जी टिप मधे आयडिया दिली आहे त्याहून हि वेगळी आहे का?

मदनबाण's picture

21 Sep 2014 - 10:40 am | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }