गृह कर्ज

सुहास पाटील's picture
सुहास पाटील in काथ्याकूट
17 Sep 2014 - 3:21 pm
गाभा: 

काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे.
त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे.
मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल

पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा.
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 3:38 pm | टवाळ कार्टा

घरच घ्या

आदिजोशी's picture

17 Sep 2014 - 3:42 pm | आदिजोशी

योग्य ठिकाणी, योग्य प्रकल्पात आणि भरवशाचा विकासकाकडे गुंतवणूक केल्यास इतका परतावा देणारी दुसरी गुंतवणूक नाही.
शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते.
घरातली गुंतवणूक आजच्या घडीला तरी १ नंबर आहे.

अनुप ढेरे's picture

18 Sep 2014 - 9:50 am | अनुप ढेरे

शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते.

हे असत्य आहे. शेअर मार्केट मधून पैसे मिळवायला स्वतः शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत असं अजिबात नाही. चांगला म्युचुअल फंड १५% अ‍ॅन्युअलाइस्ड परतावे नक्की देऊ शकतो.

आदिजोशी's picture

18 Sep 2014 - 2:28 pm | आदिजोशी

१५% हा तुमच्या मते 'कैक पटीने' परतावा असेल तर आनंद आहे.

माझा मुद्दा 'शेअर मार्केटमधून चांगला परतावा पाहिजे असेल तर दिवसभर त्यातच डोके खुपसून बसायला पाहिजे असं नाही.' असा होता.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 4:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अज्ञान, घोर अज्ञान !!!

आजचा गृहपाठ. चक्रवाढ व्याजाचा formula दहा वेळा लिहिणे. 5-10-15-20-25-30 अशा मुदतिसाठी 15% व्याजाने काय परतावा मिळतो याचा तक्ता बनवणे.

अनुप ढेरे's picture

18 Sep 2014 - 4:41 pm | अनुप ढेरे

अगदी अगदी. ५ वर्षात घराची किंमत दुप्पट हाही साधारण १५-१६% वार्षिक परतावा आहे.
म्युचुअल फंड १५% टक्यांहून जास्तं परतावा देऊ शकतात पण त्याच जोखीम थोडी अधिक.

सुहास पाटील's picture

18 Sep 2014 - 4:45 pm | सुहास पाटील

पण घर विकले गेले नाही तर ? हि रिस्क आलीच की

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 7:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तो ग्रोस परतावा. ब्रोकरेज, stamp duty आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज. हे सगळे धरून हिशोब केला तर बराच फरक पड़तो.

अनुप ढेरे's picture

18 Sep 2014 - 8:38 pm | अनुप ढेरे

अगदी अगदी. पूर्ण सहमत. वर अजून सोसायटी मेंटेनन्स, कर हे आहेच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 10:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ?

आजानुकर्ण's picture

18 Sep 2014 - 11:14 pm | आजानुकर्ण

सहमत.
सलमान रश्दी यांच्या घराची रोचक गोष्ट http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=21568

>>रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ?

+१
हेच, आता शेअर मार्केट व गोल्डबद्दल पण लागू होत आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज.

घराच्या लोनचा व्याजदर १०% प्रतिवर्ष मानला, लोनची राशी आणि स्वतःची राशी १:४ या प्रमाणात मानली, प्रॉपर्टीची किंमत ५ वर्षांत दुप्पट होते असे मानल, कॅपिटल गेन्स टॅक्ससाठी महागाईचा दर ५% मानला, कॅपीटल गेन्स टॅक्स २०% मानला, इन्कम टॅक्स ३०% मानला तर ....

लोन घेणे प्रॉपर्टीत तुम्हाला खूप फायदा करून देते. ही वाक्यरचना चुकीची आहे कारण असं अधिक परतावा देणार्‍या गुंतवणूकीत सोबत जोडायला कमी किमतीचे सहाय अन्यत्र मिळत नाही.

काळा पहाड's picture

18 Sep 2014 - 3:42 pm | काळा पहाड

माझ्या अंदाजाने घरातली गुंतवणूक ही फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कमी परतावा देते. आणि तुम्ही म्हणताय नं १?

एकोळी धागो? संपादकानुंऽऽऽऽ हंयसर येवा!!

पोटेन्शियल आसां... र्‍हांव दे हंयसरच.

(गरज नसतांना) दुसरं घर घेतलेल्या क्लायंटसचा अनुभव आहे.

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 7:21 pm | सुहास पाटील

अनुभव टंका कि राव

प्रसाद१९७१'s picture

17 Sep 2014 - 4:02 pm | प्रसाद१९७१

गरज नसेल तर दुसरे घर घेऊ नका. ५-७ वर्षा पूर्वी असे करणे योग्य होते. पण सध्या असे करु नये.
घराला maintainance cost पण असते. भाड्यानी दिले तर २% पण परतावा मिळत नाही.
५% रजिष्ट्रेशन फी, MSEB cost वगैरे गोष्टी वाया जातात. हल्ली वर्षिक सोसायटी खर्च सुद्धा २५-३० हजार असतो.
सरळ Liquid funds मधे टाका, टॅक्स जावून ८.५% कमीतकमी परतावा मिळेल आणि पाहीजे तेंव्हा पैसे वापरायला पण मिळतील.

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 6:45 pm | काळा पहाड

ही लिक्विड फंड काय भानगड आहे जरा इस्कटून सांगा. म्युच्युअल फंडच का?

प्रसाद१९७१'s picture

17 Sep 2014 - 7:23 pm | प्रसाद१९७१

liquid funds म्हणजे Mutual Funds नी Short Term Debt instruments चे चालू केलेले फंड. त्यात ते नॉर्मली सरकारी रोख्यात गुंतवणुक करतात. त्यामुळे जवळ जवळ Risk Free असते.
जशी बाकीची Mutual Fund ची युनीट विकत घेतली जातात तशीच ही पण घ्यायची किंवा विकायची असतात.

१. ह्यात Entry Or Exit Load बसत नाही. त्यामुळे एक पैसा सुद्धा वाया जात नाही ( कमीशन किंवा फी पोटी ).
२. ३ वर्ष गुंतवणुक ठेवली आणि युनिट विकली तर Long Term Capital Gain बसतो म्हणजे Indexation चा फायदा मिळतो. म्हणजेच जवळ जवळ Tax Free.
3. तुमचे जर Online Trading Account असेल तर, आज विकत घेतले तर उद्या तुमच्या डीमॅट ला जमा होतात. आज विकले तर उद्या पैसे जमा होतात. अगदी १ दिवस सुद्धा पैसे ठेवता येतात.
४. रोजच्या रोज NAV वाढतेच अगदी नक्की.

माझ्या अनुभवाप्रमाणे HDFC, ICICI Mutual Funds च्या योजनांमधे वार्षिक ९ ते ९.५% परतावा मिळतो. आणि ३ वर्ष थांबल्यास तो जवळजवळ टॅक्स फ्री असतो. इतका चांगला टॅक्स फ्री आणि पुर्ण सुरक्षीत तसेच liquidity असणारा दुसरा पर्याय नाही.

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 10:40 pm | काळा पहाड

ओक्के. यालाच अल्ट्राशॉर्ट डेट फंड असंही म्हणतात असं दिसतं. पण मला एक कळत नाही. याचं रिटर्न लाँग टर्म डेट फंड पेककरण्य जास्त कसं? मला वाटलं की डेट जितकं लाँग टर्म, तितकं रिटर्न जास्त हवं नाही तर लाँग टर्म इन्वेस्ट करण्याचा फायदा काय? बाकी हे म्हणजे फिक्स पेक्षा जास्तच उत्पन्न झालं, ते ही टॅक्स फ्री.

3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय ? 30% ?

प्रसाद१९७१'s picture

18 Sep 2014 - 9:28 am | प्रसाद१९७१

3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय>>>>

तुमच्या Income मधे धरले जाणार, जसे FD चे व्याज धरले जाते तसे.

प्रसाद१९७१'s picture

18 Sep 2014 - 9:29 am | प्रसाद१९७१

ह्या वर्षीच्या बजेट च्या आधी ही मुदत फक्त १ वर्षाची होती.

कवितानागेश's picture

18 Sep 2014 - 11:55 am | कवितानागेश

मला वाटतं २००५ पासून आहे. आणि ते कर्ज जर इन्कम टॅक्स बेनेफिटसाठी दाखवले असेल, तर ५ वर्ष विकता येत नाही.

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:01 pm | सुहास पाटील

प्रतिसाद टाकणार्यांचे धन्यवाद. अजुन चर्चा व्हावी हि अपेक्षा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Sep 2014 - 6:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फ्लॅट ऐवजी जमिनीमधे गुंतवा. (बंगलो प्लॉट्स किंवा एखादा बंगला). जेणेकरुन तुम्हाला मेंटेनंन्स कमीत कमी भरायला लागेल.

किंवा सोन्यात गुंतवा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Sep 2014 - 1:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

जमीन? अहो तुम्ही तिकडे रहात नसाल तर ती कधी जाईल समजणार पण नाही..कसले रिटर्न्स आणि काय

कवितानागेश's picture

18 Sep 2014 - 4:33 pm | कवितानागेश

खोस ला का घोस ला पाहिलाय का

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2014 - 8:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणुनचं एखादा बंगला सुद्धा म्हणालोय. कारण जमिनीचा भाव कमी असताना केलेली गुंतवणुक भविष्यात नेहेमीचं उत्तम रीटर्न्स देते. बाकी कर्ज नं काढता सुद्धा जमिन घेणं आता शक्य आहे. पुण्यात काही डेव्हलपर्स ई.एम.आय. बेसिस वर जमिन विकतात (त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माहीत नाही कारण हा व्यवहार मी स्वतः केलेला नाही.). ह्याचा फायदा म्हणजे जमिन ज्या दिवशी घेताय त्याच दिवशीच्या किंमतीएवढी रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्यानी भरता येते. डोक्यावर एकदम मोठ्या रकमेचा बोजा रहात नाही.

दुसरं घरं ही गरजेची वस्तु नसुन चैनीची आहे आणि कर्ज काढुन चैन करु नये असं माझं नेहेमीचं मत आहे.

सुहास पाटील's picture

18 Sep 2014 - 4:36 pm | सुहास पाटील

जमिनीची खरेदी विक्री चांगली ओळख असल्याशिवाय करू नये. त्यातच शहाणपणा आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2014 - 8:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१११

आमचा प्रतिसाद उडाला.योग्य प्रश्न विचारले होती की ?
:-(

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:31 pm | सुहास पाटील

प्रतिसाद पुन्हा टाका. हा धागाच आधी उडाला होता. धन्यवाद

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 6:31 pm | कवितानागेश

दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा.
आणि एकावेळेस २-३ लोन्स असणं बरं नाही.

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:33 pm | सुहास पाटील

वेल्थ टॅक्स ? एखादी लिंक दिलीत तर बर होईल

इन्कम्टॅक्स बेनेफिट मिळ्तो का दुसर्‍या घरासाठी?

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:52 pm | सुहास पाटील

मिळतो तर. उलट दुसर्या घरासाठी आपण पूर्ण व्याज वजावट दाखउ शकतो. पण भाड्याची इन्कम दाखवावी लागते

मित्रहो's picture

17 Sep 2014 - 6:36 pm | मित्रहो

दुसऱ्या घरासाठी कर्ज घेताना एक साधे सूत्र.
इएमआय मधील किती रक्कम व्याजात जाते हे बघणे, ते व्याज हे मिळणाऱ्या भाड्यापेक्षा जास्त नसावे. तसे जर झाले तर भारतात घराच्या किंमती ह्या FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त दराने वाढतात.
घर ही जास्त काळाची गुंतवणुक आहे. कितीही मार्केट चांगले असले, घर कितीही मोक्याच्या जागी असले तरी ते विकून हातात पैसे यायला विकायचा विचार केल्यानंतर कमीत कमी चार ते सहा महीन्याचा कालावधी लागतो.FD, शेअर विकून लगेच पैसा आणता येतो. या महत्वाच्या फरकामुळे दोन गुतवणुकीतली तुलना करता येत नाही.

मित्रहो

दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ? >>>

कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल ...आणी शेयर्स मध्ये तर खेळता पैसा लागतो ....अर्थात जर असे समजले तुमच्याकडे आता सध्या काही रक्कम आहे आणि ती गुंतवायची आहे तर ...येस्स !! जागा घ्या ...या तीन गोष्टी आहेत जिथे गुंतवा रक्कम वाय जात नाही ..रोटी , कपडा आणि मकान ...या तीन पैकी कुठे ही गुंतवा

प्रसाद१९७१'s picture

17 Sep 2014 - 6:44 pm | प्रसाद१९७१

सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय

सुहास..'s picture

17 Sep 2014 - 6:46 pm | सुहास..

सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय >>>

एकाहत्तर राव ...ते पाटील आहेत ..तो मी नाही :)

स्वप्नांची राणी's picture

17 Sep 2014 - 6:47 pm | स्वप्नांची राणी

आहो, धागा पाटलांनी काढलाय, पण बिनपाटलांना कळलेलं नाहिये...

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:48 pm | सुहास पाटील

> सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय

आहो तो मी नव्हे. नाव एक आहे पण व्यक्ती दोन प्रतिसाद टाकणारे आणि धागा टाकणारे दोन वेगळे सुहास आहेत

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 6:43 pm | सुहास पाटील

>>कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल
सुरवातीचे २०% ( ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो )असल्यावरच ८०% गृह कर्ज मिलते. तर इथे सुरवातीचे २०% कुठेतरी गुंतवायचे का ते वापरून अजून ८०% कर्ज घ्यायचे

कर्जाला शक्यतो नाही म्हणेन मी ..( मायला आयुष्य जात व्याजासकट भरता भरता :) ) सध्या ...एक पर्याय येतो ..गावकड्याला , जिथे हाय वे होताहेत एमआयडिसी आहे ..तिथे आर- झोन च्या जागा असतात ...सुरवातील काही रक्कम मग ठराविक हत्याने अश्या स्वरुपात ...जरा जेन्युयन ओळख ई, काढुन गुंतवुणक आहे फायद्याची ...शिवाय स्मार्ट सिटीच मध्ये पण असे काही पर्याय आहे का बघायला हवे ..

( मी दोन वर्षापुर्वी कवडीमोल घेतली होती औ.बाद -जालना रोडला , सध्याचा भाव .. ;) )

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 7:15 pm | कवितानागेश

आर-झोन म्हणजे काय असतं?

प्रसाद१९७१'s picture

17 Sep 2014 - 7:25 pm | प्रसाद१९७१

Residencial Zone

( बहुधा ) चार प्रकारच्या झोन असतात माऊ !

आर - रेसिडेन्शल
शेती झोन
कमर्शियल झोन ( जिथे मॉल्स, बिझीनेस ई. झोन्स )
मग एक सरकारी झोन असतो ( रिझर्व असतो , त्यात हजार प्रकार असतात, फॉरेस्ट, शेती-तळे, गाव-तळे, देवस्थाने, पुरातन अवषेश ई.ई. ... सध्या त्या लवासा वर , रिझर्व्ह वर रेसिडेन्सल केल्याचा आरोप आहे , अर्थात तो पहिला आरोप आहे )

शिवाय सेझ = स्पेशल ईकॉनॉमिक झोन ई. आहेतच

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 10:45 pm | काळा पहाड

रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Sep 2014 - 8:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१११

लवासा शहराचे आजरोजीचे नक्की स्टेटस कोणाला माहीत आहे का?

पूर्ण लीगल झालेय का? एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ?

सुहास..'s picture

19 Sep 2014 - 10:35 pm | सुहास..

गवि ...उत्तराचे तीन टप्पे

१ ) बांधकाम पुर्ण आहे

२ ) रेसिडेन्सल झोन पर्यावरण विभागाची परवानगी आल्याशिवाय कसे केले गेले , या बद्दल कोर्टात केस चालु आहे

३ ) ज्यांची ओनरशीप आहे त्यांच्या नावे झाली आहेत घरे !!

जाता जाता : बाकी तिथपर्यंत पिरंगुट जाणार्‍या रस्त्यालगतच्या गावाचे महाभले झालेय , नुसता कोट ने रेट चालु आहे एकराला !!

गवि's picture

19 Sep 2014 - 10:43 pm | गवि

धन्यु..

म्हणजे ओव्हरआल क्लीन नाही असंच दिसतंय. मधे टुरिस्ट म्हणून व्हिजिट घडली त्यात अर्धवट सोडल्यासारखे बरेच काही दिसत होते. एकूण लुक भग्न वाटला.

मित्राबरोबर तिथल्या बेस्ट व्यू पाँइटला जेवायला गेलो होतो. वरुन सगळ्या परिसराचं विहंगावलोकन करतांना, त्यानं एका वाक्यात समालोचन केलं `आयला नाशिकच्या घाटासारखं दिसतंय सगळं!' इट इज अ टोटल वेस्ट.

त्या तुलनेत सहाराचा अँबी-वॅली प्रोजेक्ट कमालेयं. सहाराश्रींची वाट लागली पण साला माहौल काय केलायं, जस्ट बियाँड हेवन! नज़र हलत नाही एकेका स्पॉटवरुन. बेतहाशा कॉस्टलीये पण कल्पना काय भरारी घेऊ शकते याचं नितांत सौंदर्यशाली दर्शन. तिथे फोर सिजन्सला जेवलो, माय गॉड, वॉट अ डेलिकसी. क्लायंटला म्हटलं :
`There can be only one thing a person can wish after such an ecstasy'
`What is that?'
`Death!'

प्यारे१'s picture

20 Sep 2014 - 12:32 pm | प्यारे१

>>> एकूण प्रोजेक्ट flop की यशस्वी ?

कुठल्याही प्रोजेक्टचं एक गणित असतं. वेळेचं आणि पैशाचं. लवासाबाबत ते चुकलेलं आहे एवढंच सांगू शकेन.

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2014 - 12:51 pm | संजय क्षीरसागर

मी पर्यावरण आणि प्रोजेक्ट अ‍ॅस्थेटिक्सबद्दल लिहीलंय. लवासात इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यामते वेडेपणा होईल. आणि अँबी-वॅलीचा तर विचार देखिल करता येणार नाही.

प्यारे१'s picture

20 Sep 2014 - 1:00 pm | प्यारे१

>>> अ‍ॅस्थेटिक्स.

माझ्या मते नॉट बॅड.
तुम्ही 'एकांत' ला गेलेलात का?
जनतेच्या अपेक्षा जास्त नाहीत. फेज १ पूर्ण बूक झालेली होती. मला थोडी माहिती आहे प्रोजेक्ट बद्दल. ;)

सुहास..'s picture

17 Sep 2014 - 10:50 pm | सुहास..

रिझर्व झोन म्हणजे असा झोन जिथे काका, दादा आणि ताईला त्यांना जिथे पाहिजे तिथे आर झोन करता येतो. म्हणजे तो त्यांना हडप करण्यासाठी रिझर्व असतो. >>

+१

पोटे's picture

18 Sep 2014 - 9:36 am | पोटे

मुर्ख लोक घरे बांधतात.

शहाणे त्यात भाड्याने रहातात.

हे तत्व वपुंच्या कोणत्या पुस्तकात आहे ?

सुनील's picture

18 Sep 2014 - 9:48 am | सुनील

वपु ह्या क्षेत्रातील जाणकार होते?

पगला गजोधर's picture

18 Sep 2014 - 10:25 am | पगला गजोधर

दुसरे घर घ्यावे ….

च्या बाजूने मत
http://www.deccanherald.com/content/138622/investing-second-home.html

च्या विरुद्ध मत
http://anandvijayakumar.blogspot.in/2013/04/is-buying-second-home-invest...

सुहास पाटील's picture

18 Sep 2014 - 10:39 am | सुहास पाटील

मंडळ अभारी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2014 - 8:35 am | प्रभाकर पेठकर

कर्ज घेऊन दुसरे घर घेण्यापेक्षा दोन दुकानं घ्यावीत. ह्या मताचा मी आहे.
दुकानांना भाडं चांगलं मिळतं (घरापेक्षा) शिवाय स्वतःला कांही व्यवसाय (अगदी आहे ती नोकरी सांभाळून) करायचा असेल तरी करता येतो. फक्त, दुकान घेताना मोक्याच्या ठिकाणी घ्यावं.
दुकान भाड्याने दिल्यास वाढत्या महागाईच्या प्रमाणात भाडं वाढवून घेता येतं. सहसा, सुस्थितीतील धंदा, जागा बदलण्याची जोखिम घेत नाही. फ्लॅटचा भाडेकरू दुसर्‍या फ्लॅट मध्ये सहज जातो आणि आपल्याला पुन्हा नविन भाडेकरू शोधावा लागतो.

विटेकर's picture

19 Sep 2014 - 10:36 am | विटेकर

उत्तम उपाय !

दुकानासाठी बँक कर्ज देते का ?

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2014 - 11:02 am | प्रभाकर पेठकर

कल्पना नाही. पण देत॑ असावी.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Sep 2014 - 11:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

काका, कमर्शियल ला सगळे हिशोब बदलतात. एकतर सगळ्या banks कर्ज देत नाहीत. व्याजाचा दर जास्त असतो, मुदत कमी. अर्थात EMI भरपूर वाढतो. त्यातून मेंटेनन्स जास्त पडतो.

रेसीडेंशियल ला पटकन भाडेकरू मिलतो. जागा रिकामी रहात नाही. कमर्शियल चे तसे नाही. दुकानांचे माहित नाही, ऑफिस स्पेस मध्ये oversupply आहे.

भाड़े जास्त असते हे १००% मान्य. सध्या रेट पण बरेच पडले आहेत. तरीही एकूण रीअल एस्टेट म्हणजे कटकट जास्त हे खरे. भाड्याने देताना एक महिन्याचे भाड़े ब्रोकरेज मध्ये जाते. घेता विकताना जास्त खर्च होतो.

विटेकर's picture

19 Sep 2014 - 11:29 am | विटेकर

विमेंशी सहमत , एकूणात रियल इस्टेट मधली गुंतवणूक तितकीशी फायद्याची नाही. आपण मालक असल्याचा एक फिल येतो तेवढाच !
पण हाती एकरकमी पैसा असेल ( कर्ज न काढता) तर दुकान घेणे घर घेण्यापे़क्षा नकीच फायदेशीर आहे म्हणून पेठकर काकांशी सहमती दाखविली.
दुसरा मुद्दा - खरोखरच मोदिंच्या १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या तर महानगरातील रेट पडतील , किमानपक्षी वाढणार नाहीत असा माझा अंदाज आहे आणि काही महानगरात आता घरांचे दर स्थिरावलेही आहेत ! माझ्या मित्राच्या बंगलोर मधल्या घराचे भाडे वाढते आहे , हप्ता निघतो आहे.( पण कर ही भरावा लागतो , ते पकडले तर जेवढ्यास तेवढेच ! ) पण गेली जवळ जवळ ४ वर्षे किंमत स्थिर आहे. एक ट्क्क्याने पण वाढली नाही.

कपिलमुनी's picture

19 Sep 2014 - 3:02 pm | कपिलमुनी

१०० स्मार्ट सिटी अस्तित्वात

:D :D

बाकी ५ वर्षांनी बोलू

पण मी हा मूर्खपणा केला आहे ! विटुकाकूला कोण समजावून सांगणार ? ( तो आद्य मूर्खपणा १७ वर्षापूर्वी केला आहे! )
जशी महागाई वाढत जाते तशी तशी घरभाडी वाढत जातात , आपले त्या घरभाड्यात निवृत्तीनंतर आपले भागेल असे तिचे अजब लॉजिक आहे. आणि त्या ह्प्त्यातून काही शिल्लक राहीलेच तर पी. एन जी चे देणे द्यावे लागते. सोने घेणे हा तर पराकोटीचा मूर्खपणा आहे ( हा माझा तिसरा ! )
म्युचल फंड हा सर्वात चांगला उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत :
१. आपला पैसा विकासाच्या कामसाठी वापरला जातो, पैसा व्यवहारात रहातो, पडून रहात नाही.
२. शॉर्ट / लॉन्ग टर्म पेक्षा स्मार्ट गुंतवणूक करावी. १५ % पेक्षा जास्तीचा हाव धरली नाही तर कधीही तोटा होत नाही आणि इतकीच माफक अपेक्षा असेल तर सकाळ संध्याकाळ डोके घालून बसावे लागत नाही. अधिक हाव केल्यास त्याचे व्यसन लागते .
३. दर सप्ताहाला / १५ दिवसाला / महिन्याला आपल्या कुवतीप्रमाणे नियमित रक्कम दिर्घकाळाकरता फंडात गून्तवावी. यातला "नियमितपणा आणि "दिर्घकाळ" हा महत्वाच भाग आहे . किती रक्कम हे महत्वाचे नाही.
४. पोवर ऑफ कम्पाउन्डीन्ग" हे तत्व समजून घ्यावे.
५. एन्ट्री - एक्जिट लोड चे नियम कसोशीने पाळावेत. एन्ट्री लोड लागतो तेव्हा आपण अधिकाची हाव करतो आहे का हा प्रश्न विचारावा. एक्जिट लोड लागत असेल तर आपली गुंतवणूक चुकली का ? हा प्रश्न विचारावा.
६.अधिक माहीती हवी असल्यास व्य. नि करावा

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 10:50 am | काळा पहाड

याच्यात तर दोनच आहेत. घर (दुसरा) आणि सोने (तिसरा). पहिला वाला कुठला?

विटेकर's picture

19 Sep 2014 - 11:10 am | विटेकर

आद्य मूर्खपणा .. १७ वर्षापूर्वी केला,

यसवायजी's picture

19 Sep 2014 - 11:33 am | यसवायजी

:))

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 12:05 pm | कवितानागेश

सोने सोडून बाकी सगळ्याशी सहमत. ... म्हणजे गुंतवणूकीबद्दल बरं का.
सोन्याचे दागिने किंवा वळं न घेता, ज्यात त्याची करणावळ विनाकारण जाते, सरळ जमेल तसे १,२,५,१० ग्रॅमचे कॉइन घ्यायचे.
मध्ये बॅन्केत मिळायची. पण हल्ली आरबीआयनी ते बन्द केलय. योग्य विक्रेत्याकडून पॅक्ड नानी घ्यायक्ष्ची. सोने नेहमी वाढतं आणि अडीअडचणीला त्यातून पटकन कॅश उभी करता येते.

विलासराव's picture

19 Sep 2014 - 12:10 pm | विलासराव

सांभाळायची कटकट नाही का? पटकन चोरीही होउ शकते ना?

बरं ते जौद्या, तुम्ही कॉईन कुठं ठेवलेत? पतकन सांगीतलंत तर बरं होईल.

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 12:18 pm | कवितानागेश

बॅन्केच्या लॉकरमध्ये. नंबर सांगू का? :D

विलासराव's picture

19 Sep 2014 - 12:22 pm | विलासराव

नंबर माहीती आहे. फक्त बेंक कोणती आहे ते सांगा. स्वीस बँक असेल तर तेही सांगू नका. फक्त कालजी घ्या,,,,,,कॉईनचीहो!!!!

अनुप ढेरे's picture

19 Sep 2014 - 12:17 pm | अनुप ढेरे

सोने नेहमी वाढतं

किंचित असहमत आहे. गेल्या ५-६ महिन्यात खाली आलेलं आहे. ३० हजाराहून २७ पर्यन्त. ज्यांने ३० ला वाढेल म्हणून घेतलं असेल त्यांना अजून किती वेळ थांबावं लागेल माहित नाही.

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 12:21 pm | कवितानागेश

ते long term investment म्हणून घ्यायचं असतं हो.

विटेकर's picture

19 Sep 2014 - 12:40 pm | विटेकर

सोने कधीच योग्य प्रमाणात वाढत नाही , त्यात फक्त भावना वाढतात.
१९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि आज २७००० आहे
१९८० साली सेन्सेक्स १०० रुपये होता आणि आज २७००० आहे
१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.
आता तुम्हीच सांगा !
SENSEX & NIFTY @ ALL TIME HIGH !!!!
Film actor Rajesh Khanna bought a bungalow in iconic Carter Road in Mumbai for Rs.3.5 lakhs in 1970. His heirs sold it recently for Rs.85 crores. The property has multiplied by 2428 times or an annualized return of 19.38% over 44 years.
Samudhra Mahal in Mumbai is another expensive property. A flat purchased in 1970 at Rs.700 per sq.ft was sold at Rs.1,18,000 per sq.ft in 2013. Money multiplied by 168 times in 43 years. This works out to an annualized return of 12.66%
In 1963, Godrej paid Rs.1 lakh to buy his first house, a 2916 sq.feet apartment at Usha Kiran, Carmicheal road, in tony South Mumbai. In 2011 he sold it for Rs.25 crore. Money multiplied by 2500 times over 48 years or an annualized return of 17.70%
In Dalal Street, Mumbai a sq.feet was Rs.100 in 1980. After 34 years, it sells at Rs.27,000 per sq.ft. Money multiplied by 270 times in 33 years. This works out to an annualized return of 17.90%.
The first three properties can be bought and owned by cream or elite of the society who are worth at least tens of crores, mostly hundreds of crores.
The last property in Dalal street; our father could have bought with whatever money available at his disposal. We can buy it even now. Our son or daughter would be able to buy it even 20 years down the line.
The last property is Sensex. A sq.feet is a metaphor for one unit. If dividend yield is also included (assuming 2% CAGR), Sensex would have delivered 20% annualized returns over last 34 years, higher than the most expensive prime properties in the country.
Good mutual funds and many stocks have delivered returns far superior to Sensex itself.
Power of equity is least understood in our country.
If we can withstand notional loss (if we don’t book) in portfolio during bear markets, not worry about daily price movements, it is possible to make much better money than what can be made out of best of real estate.
Give at least the same importance to equity as we give to real estate.
We don’t mind holding real estate for 20 or 30 years. Please do the same for equity ignoring bull and bear markets, notional profits and losses.
Many of us have been investing for last couple of years. Stay the course for at least another 15 to 20 years completely ignoring market fluctuations. We would be amazed at the fortune created for our retirement or to pass on to our children.
Happy Investing !!!!!!!

अनुप ढेरे's picture

19 Sep 2014 - 12:43 pm | अनुप ढेरे

बास बास, एक नंबर प्रतिसाद!

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 2:54 pm | कवितानागेश

पन एका वेळेस थोडी थोडी इन्वेस्ट्मेन्ट करायची असेल तर?
१९८० साली सोएन १३०० रुपये तोळा होते आणि १९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती .>
पण मला दर महिन्याला २००-२०० रुपये गुन्तवायचे असतील तर ४-४ महिन्यानी १-१ स्क्वे.फू. जागा कोण देणार?
जागा हा एकदम मोठा घास झाला. त्यासाठी आधीची पून्जी हवी.
आणि शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 3:18 pm | आजानुकर्ण

दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा.

सोने नॉन प्रॉडक्टिव अॅसेट आहे. त्याचाही वेल्थ टॅक्स पडतो. सोन्याच्या दरातील लॉँगटर्म वाढ महागाईदरापेक्षा जास्त नाही. शिवाय सांभाळायची जोखीम असतेच.

सुहास पाटील's picture

19 Sep 2014 - 3:36 pm | सुहास पाटील

वेल्थ टॅक्स !!! नक्की काय भानगड आहे ? जरा विस्कटून सांगा

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 3:53 pm | आजानुकर्ण

राहत नसलेले - थोडक्यात दुसरे - घर, गाडी, सोने, कॅश अशा सर्व नॉन प्रॉडक्टिव अॅसेटना पकडून ३० लाखापेक्षा जास्त नेट अॅसेट असतील तर त्यावर प्रत्येक वर्षी १ टक्का या दराने कर भरणे आवश्यक आहे. एफडी, स्टॉक्स, म्युच्युअल फंड यांना प्रॉडक्टिव अॅसेट असल्याने या कॅल्क्युलेशनमधून वगळता येते.

खालील दुव्यावर प्राथमिक स्वरुपाची थोडी माहिती आहे.

http://www.thehindubusinessline.com/features/know-all-about-wealth-tax/a...

सुहास पाटील's picture

19 Sep 2014 - 4:21 pm | सुहास पाटील

t if a property is used to conduct business or if it forms a part of stock-in-trade or has been rented out for at least 300 days in a year, wealth tax is not applicable on such property.

दुसरे घर रेंट वर दिले तर हा तक्ष पडत नाही असे दिसतंय

सुहास पाटील's picture

19 Sep 2014 - 4:24 pm | सुहास पाटील

मुद्दा असा कि घर भाड्याने दिले तर हा TAX पडत नाही

अनुप ढेरे's picture

19 Sep 2014 - 9:02 pm | अनुप ढेरे

भाड्यावर टॅक्स भरावा लागतो. म्हणजे भरणं अपेक्षित असतं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Sep 2014 - 9:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सुरुवातीला भाड्यापेक्षा व्याज जास्त असते. चिंता नसावी :-)

सुहास पाटील's picture

22 Sep 2014 - 2:37 pm | सुहास पाटील

हो पण इथे मुद्दा वेल्थ TAX चा होता जो फक्त घर रिकामे राहिले तर भरावा लागतो. आणि एकदा का तुम्ही निवृत झालात तर बहुतेक तुम्ही ३०% TAX मध्ये बसलाच असे नाही

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Sep 2014 - 3:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

Index fund मध्ये SIP सुरु करावे :-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Sep 2014 - 3:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शेअर्सची सगळ्यांना माहिती नसते. रिस्क असते.

Index fund मध्ये SIP सुरु करावे :-)

१९८० साली दक्षिण मुम्बैत ८०० -९०० रु स्के. फू भावाने जागा होती आज २०,००० च्या आस-पास असावी.

ओ मालक तो स्वस्ताईचा जमाना गेला. अंधेरी/जोगेश्वरीत या भावाने मिळाला तरी खूप.

विटेकर's picture

19 Sep 2014 - 2:35 pm | विटेकर

अन्युलाईज्ड रिट्न किती ते सांगा .

अशा ठिकाणी फ्लॅट्/बन्गला/रो हाऊस (आपापल्या ऐपतीप्रमाणे) घ्या की जिथे आता किमती कमी आहेत आणि भविष्यात तो एरिआ डेव्हलप होणार आहेत उदा. पुण्याच्या जवळ पण सद्ध्या हद्दी बाहेर. बरीच गावे पुणे महापालीका आणि पिंपरी चिंचवड महापालीकेमधे येणार आहेत.अजुनही १ बीएचके २० ते २२ लाखापर्यंत मिळतो. २ बीएचके ३५ ते ४० पर्यंत.सध्या बार्गेनींगलाही चांस आहे.
दुस-या घरावर लोन घेतले तरी त्यावर इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो हे वर सांगितले आहेच. मिळणा-या भाड्यावर टॅक्स द्यावा लागतो. (३० टक्के स्टॅ. डिडक्शन + मिळकत कर वजा करून). पण तुमचे कर्जावरील व्याज मिळणा-या भाड्यापेक्षा जास्त असेल तर उलट तुम्हाला रीफंड मिळेल.

तुमच्याकडे कॅश असेल तर दुसरीकडे गुंतवा. त्याचे मिळणारे व्याज (टी डी. एस. जावून. पत्नीच्या, आईच्या, निव्रुत्त वडीलांच्या अथवा सज्ञान मुलांच्या नावावर गुंतवणूक केली तर टी डी. एस पण वाचेल.) अधिक इन्कम टॅक्स बेनिफीट आणि घराच्या लोनसाठी गेलेले व्याज यातला फरक बघा. तुम्हाला किरकोळ व्याजावर लोन मिळालेय असे लक्षात येइल.

सहा सात वर्षांनी घराची किंमत निश्चित वाढलेली असेल.
घर विकल्यानंतर कॅपिटल गेनवर टॅक्स निश्चितच भरावा लागेल.
पण तो वाचविण्यासाठीही मार्ग आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 4:59 pm | प्रसाद गोडबोले

ह्म्म . ह्याविषयावर अनेकवेळा वादविवाद झालेत आमच्या मित्रपरिवारात अन कुटुंबातही .
स्वकर्टुत्वावर एक घर घेवुन झाले आहे , पण ते आई बाबांसाठी , गावाकडे .घर घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वाडा बांधु असे एक माझे मत आहे , आणि स्वतः रहाणार नसु तर घर घेण्यात काय अर्थ आहे ? मला स्वतःला घराची आसक्ती नाही ,
ऐसी गृहांची स्थिती। मिथ्या आली आत्मप्रचिती। जन्म दो दिसांची वस्ती। कोठे तरी करावी।| - समर्थ .

( मी आपला मस्त २००० रुपायाचा क्वेच्चा चा टेन्ट घेतलाय , आता कोठेही आयुष्य काढु शकतो :) )

पण तरीही एकदा कॅल्क्युलेशन्स करु समजा ५०लाखाचे गृहकर्ज काढले (त्या साठी तुम्हाला आधी तुमच्या खिष्यातुन १७-२० लाख घालावे लागतील , बॅन्क फक्त ७५-८० टक्केच लोन देते )
तर साधारण २० वर्षांच्या हिशेबाने ढोबळमानाने महिन्याला सुमारे ५०००० हप्ता पडेल . आता समजा हेच घर घ्यायच्या ऐवजी तुम्ही भाड्याच्या घरात राहिलात तर महिन्याला अंदाजे १५००० भाडे पडेल उरलेले ३५००० दर महिन्याला दाम दुप्पटीत टाकत राहिलात तर१साधारण ७ वर्षाने दाम दुप्पट ह्या हिशेबाने ७+७+७=२१ वर्षे असे सोपे अ‍ॅझमशन करुयात अर्थात तुमचे साठलेले सर्व पैसे अ‍ॅट थे एन्ड ऑफ २० बर्ष साधारण आठपट होणार . म्हणजे
३५००० * १२ = रफली चार लाख एका वर्शाचे ह्या हिशोबाने

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचणे म्हणजे निव्वळ टाइम पास म्हणुनच ठिक आहे.
आपण ह्या विषयावरची टाईम्सने वेळोवेळी दिलेली माहिती वाचली तर अजुन घोंधळातच पडाल व मी का लिहिले ते ही लक्षात येईल.

अशा मोठ्या प्रश्नावर एकांगी विचार करणे चुक ठरते.
सर्व बाजू तपासून पाहून मगच सल्ला देणे संयुक्तिक ठरेल.
व्यनि कराल तर अधिक माहिति घेवुन नक्किच योग्य तो सल्ला देता येईल.

योग्य सल्लाच आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपुर मोबदला देवु शकेल.

पोटे's picture

20 Sep 2014 - 5:38 pm | पोटे

पैसे पोस्टात ठेवावेत.

एकोळी प्रश्नाचे एकोळी उत्तर

ज्ञानव's picture

22 Sep 2014 - 12:26 pm | ज्ञानव

मध्ये पैसे अडकवले तर व्याज मिळेल जे करपात्र तर असेलच पण इंफ्लेश्नला मात करण्यासाठीसुद्धा उपयोगी नाही. मग एफ डी करूच नये का?
घर घेतले तर मिळणारा परतावा (भांडवलवृद्धी, भाडे + भाडेवृद्धी) सुद्धा करपात्र (अर्थात काही गणितानंतर) आहे.
मग घर किंवा दुकान किंवा जमीन घेऊच नये का?
शेअर्स तर फुल टू बदनाम, रिस्क ओरिएन्टेड आहे आणि म्युच्युअल फंड्स किचकट विषय आहे मग नकोच ते.

सोने वाढते कुठे? ते गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि आता गडगडले आहे.

इतके नकारात्मक वातावरण "गुंतवणूक" ह्या विषयात बरेच वेळा आढळते.
(आणि जे हि मते मांडतात तेच भरपूर गुंतवणूक करतानाही आढळतात)

पण जर तुमच्याकडे एफ डी करण्या इतके पैसे आहेत आणि घर घेण्याबाबत दुविधा आहे तर मी म्हणेन एक चांगला बिल्डर (हा आणि कुठे सापडतो ?) बघा आणि बुकिंगला पैसे गुन्तवा.

जर तुम्ही त्या बिल्डरशी लॉंग टर्म नाते तयार करू शकलात तर त्याच्या अनेक प्रोजेक्टेस मध्ये तोच तुम्हाला चांगले पैसे कमावून देईल.
बुकिंगला पैसे लावताना तुम्ही जी रक्कम लावलीत ती (आणि जर तुम्हाला कर्ज मिळत असेल तर त्यावरचे व्याज) किंवा एकूण लागलेले भांडवल आणि मार्केट रेट ह्याचा सतत अपडेट ठेवा जेव्हा वार्षिक परतावा ३०% किंवा जास्त असेल तेव्हा विकून मोकळे व्हा. हा परतावा तुम्ही गुंतवणूक कोणत्या स्टेजला केली त्यावरही अवलंबून असतो असे निरीक्षण आहे (भूमिपूजनाला, पायाभरणीला, २०% ते ५०% बांधकाम झाल्यावर ई.)
हा मार्केट मधला बाराही महिने चालणारा एक प्रकार आहे पण ह्यात नफ्यावर लागू होणारा कर आणि मार्केट रेट ह्याचे गणित तसेच बिल्डरशी तुमचे निर्माण होणारे नाते महत्त्वाचे आहे.
तुम्ही गुंतवणूकदार म्हणून बिल्डरशी व्यवहार करणे आणि तुम्ही सदनिकाधारक होण्याच्या इराद्याने व्यवहार करणे ह्यात जमीन आस्मानचा फरक पडतो.

आता वर मी जे म्हंटले आहे तसे करणे म्हणजे बरेचजणांना नकोसेच होते कारण त्यात "बरीच" मेहनत आहे.
(बिल्डर फसवतोच हे गृहीतकही काम करते.)

आता तुम्ही ह्यात कुठे फिट होता ते पहा आणि निर्णय घ्या.

पुतळाचैतन्याचा's picture

8 Nov 2017 - 2:43 pm | पुतळाचैतन्याचा

बँकिंग सेक्टर मध्ये थोडी ओळख वाढावा....आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक घरे एन पी ए म्हणून विकायला येतात ती अगदी 20% स्वस्त, क्लीयर टायटल मिळतात...थोडी माहिती काढली तर सहकारी बँक, सरकारी बँक यांच्या मॅनेजर बरोबर सेटिंग लावून अशी घरे मिळतात...निव्वळ गुंतवणुकीचे किडे करायचे असतील तर थोडे डोके घाला ह्यात.