टोमॅटो बास्केट सलाद

जागु's picture
जागु in पाककृती
17 Sep 2014 - 11:59 am

मायबोली.कॉम वर गणेशोत्सवा निमित्त आता कशाला शिजायची बात नामक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत माझ्या खालील कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषि़ मिळून माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.

साहित्यः
४ मोठे लालबुंद कडक सालीचे टोमॅटो
१ गाजर
१-२ पाती कांद्याचे छोटे कांदे
कोबी थोडा चिरून
बिट चे २-३ पातळ स्लाईस
काकडी (गोल चकट्या व थोडी बारीक चिरुन)
डाळींबाचे दाणे
पुदीना व कोथिंबीर सजावटीसाठी
चाट मसाला

कृती:
टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून घेऊन त्याच्या वरच्या बाजूला अर्ध्यापर्यंत दोन खाचा अशा मारा की मध्ये परडीची दांडी तयार होईल.

जिथपर्यंत अर्धवट कापल आहे त्याची एक एक बाजू मध्यावरून सरळ कापुन घ्या.

दोन्ही बाजू कापल्यावर असे दिसेल.

आता दांडीला लागलेला व राहिलेल्या टोमॅटोच्या भागातील गर काढून टाका म्हणजे असे बास्केट तयार होईल.

गाजर स्क्रॅपरने सोला आणि स्क्रॅपरच्या दातांच्या सहाय्याने गाजरावर सरळ रेषा ओढून गाजराचे गोल काप करा.
कांदा पातीच्या छोट्या कांद्यांना सोलून त्याचे मुळ काढून त्याला सुरीने खाचा पाडून त्याचे फुल बनवा व हवी तेवढीच दांडी ठेवा.
बिटाच्या पातळ स्लाईसला गोल दुमडा

कोबीच्या पानाचा छोटासा भाग घेऊन त्याची गुंडाळी करा.

आता बास्केट भरायला घ्या.
एका बास्केट मध्ये सगळ्या सलादची फुले भरून परडी सजवा. प्रत्येक परडीत पुदीना किंवा कोथिंबीरीची पाने सजावटीसाठी एक्-दोन ठिकाणी ठेवा.

आपल्याला हव्या त्या सलादच्या परड्या तुम्ही भरू शकता.
मी दूसरी परडी गाजराच्या फुलांची केली.

तिसरी परडी काकडीचे तुकडे व डाळींबाचे दाणे

चौथी परडी बारीक चिरलेल्या कोबीने भरली.

अशा प्रकारे चार परड्या भरून घेतल्या.

काकडीचे गोल काप करून ते डिशमध्ये मध्ये ४ व भोवती गोलाकार लावले. मधल्या चार कापांवर ४ परड्या ठेवल्या व बाजूच्या कापांच्या मध्यभागी फुलाच्या परागाप्रमाणे डाळींबाचे दाणे लावले. एका ठिकाठी पुदीन्याची छोटी फांदी घेऊन ती दोन काकड्यांच्या कापांमध्ये अडकवून त्यावर हलकी गाजराची फुले ठेवली.

आता चवीसाठी वरून चाट मसाला भुरभुरवला. आणि अशाप्रकारे टोमॅटॉ बास्केट सलाद तयार झाले.

अधिक टिपा :
सलादचे महत्व आपल्या अन्नामध्ये किती आहे हे मला तुम्हा सुज्ञांना सांगायलाच नको.
लहान मुले अशी बास्केट पाहुन खुष होतात.
तुमच्या आवडीप्रमाणे त्यात अजून सलादचे प्रकार घालू शकता.
माझ्या सा.बांनी तर सुंदर दिसते म्हणून तोडलेच नाही तसेच फ्रिजमध्ये ठेवले.

प्रतिक्रिया

सुंदर आहे. कल्पकतेला दाद..

पण एक मात्र पाहिलेय की अश्या शोभिवंत सॅलड्सबाबत (होडी, टोपली, चेहरा इत्यादि), ... ती दिसायला छान दिसतात, पण खाताना अवघड होतात. म्हणजे त्यात घटकांचे प्रमाण फार असमान होते.

उदा. सदर सॅलडमधे टोमॅटो फार जास्त आहे (क्वांटिटी आणि बाईटसाईझ दोन्हीबाबतीत), आणि इतर घटक तुलनेत थोडे.

यामुळे मिश्र सॅलडची चव यात येत नाही. टोमॅटोचा आंबटपणा जास्त होतो इत्यादि.

शिवाय वेस्टेज खूप होते. पाहुणे इतका आख्खा टोमॅटो खात नाहीत, ब-याचदा आतले पदार्थ खातात आणि बाहेरची परडी वगैरे फेकली जाते.

हेच कलिंगडाची किंवा इतर सजावट याबाबतही पाहिलेय.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर

गवि,

उपहारगृहातील फुड कार्व्हींग हे नयनसुख देण्यासाठी जास्त आणि उपयुक्ततेसाठी कमी असते. नयन सुख मिळाल्याने खाण्याचा 'मुड' बनतो आणि तुम्हाला जेवणाचा जास्त आनंद मिळतो.
वेस्टेज टाळता येते. दुसर्‍या कशात वापर करून. जसे, व्हेज कटलेट, व्हेज मंचुरिअन, व्हेज गोल्ड कॉइन्स इ.इ.इ.

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 1:11 pm | कवितानागेश

अरेच्चा! ही सजवलेली सॅलेद्स आपल्याला खायला ठेवली असतात का?
मी आजपर्यंत पाहिलेली, हात पोचणार नाही अशा ठिकाणे कुठेतरी लांब ठेवली असतात. :(

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 12:34 pm | टवाळ कार्टा

सहीच

सुंदर आहे. कल्पकतेला दाद..

असेच म्हणतो.
स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन. :)

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2014 - 1:00 pm | प्रभाकर पेठकर

माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम.

सॅलड बकेट मस्तच आहेत. नक्कीच, प्रथम पारितोषिक पात्र.

सविता००१'s picture

17 Sep 2014 - 1:14 pm | सविता००१

माबो मास्टर शेफचे हार्दिक अभिनंदन आणि आमच्या तर्फे सलाम असच म्हणते. मस्तच गं. मला खूप आवडली ही डीश

अजया's picture

17 Sep 2014 - 2:09 pm | अजया

मस्त दिसत अाहेत बास्केट्स.

मदनबाण's picture

17 Sep 2014 - 3:10 pm | मदनबाण

अभिनंदन... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

गवि धन्यवाद. तुमचे म्हणणे काही अंशी बरोबर आहे. पण लहान मुलांना असे प्रकार खायला आवडतात. सलाद न खाणारी मुल बास्केट आहे म्हणून खातात. शिवाय राहिलेल जिन्नस इतर पदार्थांसाठी वापरता येतच.

लिमाऊजेट, टवाळ कार्टा, गणपा, प्रभाकर काका, सविता, अजया, मदनबाण धन्यवाद.

सुहास..'s picture

17 Sep 2014 - 3:42 pm | सुहास..

दंडवत शेफ माऊली !

सोप्पा सुटसुटीत परंतु अतीव सुंदर प्रकार. लय भारी!

कपिलमुनी's picture

17 Sep 2014 - 4:58 pm | कपिलमुनी

जागू ताईचे अभिनंदन !

मस्त पण तेव्हढ्याच निगूतीनं बनवलेला प्रकार. छान दिसताहेत टॉमेटो बास्केट्स.

स्पर्धेत अव्वल नंबर काढल्या बद्दल आभिनंदन.

जाणकारांनी प्रकाश टाकावा. आम्हीपण अभिनंदन करू.

सुहास झेले's picture

17 Sep 2014 - 10:46 pm | सुहास झेले

व्वा व्वा... मस्तच !!

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन... नक्कीच अव्वल नंबर पाककृती आहे :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2014 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा

@माबो मास्टर शेफ हा इ-अ‍ॅवॉर्ड मिळाला.>> http://www.sherv.net/cm/emo/happy/cheering-clapping-smiley-emoticon.gif

खटपट्या's picture

18 Sep 2014 - 2:30 am | खटपट्या

सुन्दर !!!

वैशाली हसमनीस's picture

18 Sep 2014 - 5:58 am | वैशाली हसमनीस

मस्त,प्रथम क्रमांकास अगदी योग्य.अभिनंदन !

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 6:21 am | श्रीरंग_जोशी

फारच सुंदर. समोर आल्यास खावेसेच वाटणार नाही.

स्पंदना's picture

18 Sep 2014 - 8:09 am | स्पंदना

अभिनंदन जागु!!
सुरेख दिसतेय सॅलड!!

कविता१९७८'s picture

18 Sep 2014 - 9:47 am | कविता१९७८

जागु मस्तच

पोटे's picture

18 Sep 2014 - 11:00 am | पोटे

मस्त

दिपक.कुवेत's picture

18 Sep 2014 - 11:51 am | दिपक.कुवेत

आणि सलाद देण्याची ईनोव्हेटिव पद्धत आवडली.

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 1:23 pm | प्यारे१

मस्तय की