मिरवणूक

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
8 Sep 2014 - 11:45 pm
गाभा: 

पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला, या प्रेमवेडीला या प्रेमवेडीला
ही दुनिया पितळेची ही दुनिया पितळेची
ही पोळी साजुक तुपातली, हीला लागलाय म्हावर्‍याचा वास
तुज्या पिरतीचा इन्चू मला चावला
जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला
अहो रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली
आता माझी सटकली... मला राग येतो..
गोल गोल चामडयाला दांडकं हे घासतंय

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

9 Sep 2014 - 1:22 am | प्यारे१

एकोणीस फेब्रुवारी,
जयंती (तिथीप्रमाणे)
चौदा एप्रिल,
गणेशस्थापना ते अनंत चतुर्दशी (तारखेप्रमाणे),
घटस्थापना ते दसरा (तारखेप्रमाणे),
सहा डिसेंबर,
पंचवीस डिसेंबर,
एकतीस डिसेंबर,
रोज पहाटे ५, दु. १२, दु. ४, सं. ७, रा. ९.
अधेमधे श्रमपरिहार, लग्न, वाढदिवस, यात्रा इ.इ.

आदूबाळ's picture

9 Sep 2014 - 1:38 am | आदूबाळ

जबरी. आनंद शिंदे की जय

खटपट्या's picture

9 Sep 2014 - 2:07 am | खटपट्या

बस एवढीच मिळाली ?
शोध घेतल्यास अजून सापडतील
उदा. - लाल लाल पेप्सी कोला, पोरी पायजेल का तुला.

(प्रतिसाद उडविल्या जाणार नाही अशी आशा करतो)

धन्या's picture

9 Sep 2014 - 12:16 pm | धन्या

बस एवढीच मिळाली ?

ही गाणी प्रातिनिधीक उदाहरणे आहेत.

गणेशोत्सवाचा मुळ उद्देश केव्हाच बाजूला पडला आहे. ईश्वरपूजेच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले पावित्र्य, मांगल्य, शांतता फेकून दिले आहे लोकांनी. असे उत्सव हे केवळ निमित्त आहेत, धिंगाणा घालण्यासाठी.

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात.

हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत. निवडणुकांच्या दिवसांमध्ये त्याने पाजलेल्या बीयरला आणि खाऊ घातलेल्या चिकन आणि मटणाला जागून शहरभर घसा फाटेपर्यंत झिंदाबादच्या घोषणा देत पेट्रोल जाळत फीरणारी. तो वळवेल त्या दिशेला वळणारी.

पूर्वी मी वृत्तपत्रांमधील दुचाक्यांच्या अपघातांच्या आणि त्यातील जिवीतहानीच्या बातम्यांनी व्यथित होत असे. म्हणून अशा बातम्यांचा जरा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. अशा बातम्यांमध्ये असणारा वयोगटातील दुचाकीचालक कसे गाडया चालवतात याकडे लक्ष देऊ लागलो. निष्कर्श हा होता, त्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बेदरकारपणा हा एक घटक होता. त्यांना रहदारीच्या नियमांशी, रस्त्याच्या वेगमर्यादेशी, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षीततेशी काही घेणं-देणं नाही. त्यांच्या भाषेच्या व्याकरणात "आ**ल्या" हे संबोधन आहे.

जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये धिंगाणा घालणारा आणि दुचाकींवरुन मोठया वाहनांखाली जाणारा वर्ग वेगळा नाही.

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर आणि समर्पक विवेचन.

प्रसाद१९७१'s picture

9 Sep 2014 - 1:07 pm | प्रसाद१९७१

हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. कुणातरी राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं आहेत>>>>>>>>> उगाच ह्या लोकांना Victim असल्यासारखे वागवू नका. ही मेंढरे वगैरे काही नाहीत, ह्यांना माहीती आहे ते काय करत आहेत ते आणि दुसर्‍यांना ( दुसरे म्हणजे फ्लॅट मधे रहाणारे आणि नोकरी करणारे नालायक )त्रास होतो हेही माहीती आहे. हा त्रास जाणुन बुजुन देण्यात येतो.
राजकारणी लोकांकडुन चांगली किम्मत वसूल पण करुन घेतात ही मेंढरे.

विटेकर's picture

9 Sep 2014 - 1:28 pm | विटेकर

तुमच्या प्रतिसादातच त्याचे उत्तर आहे.

राजकारण्याने हाताशी धरलेली ही मेंढरं

मी या निष्कर्षापर्यन्त आता आलो आहे की , या देशाच्या दुरावस्थेला हे हरामखोर राजकारणी जबाबदार आहेत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांची नजर गेली , ते ते क्षेत्र त्यांनी नासवले. यांना निवडणूकीच्यावेळी टपोरीगिरी करायला / दारु आणि पैसा वाटायला हे तरुण लागतात. आनि मग त्यांना पोसणे आले. हे नालायक अशा पिढ्याच्या पिढ्या नासवतात. हे मेले ( रां-चे लवकर मरत पण नाहीत ),की त्यांची पोरे/ पोरी/ पुतणे / भाचे तेच काम नेटाने पुढे सुरु ठेवतात. दारु आनि चिकन द्यायचे आणि विनासायास आपले काम काढून घ्यायचे !
याला उपाय एकच, तुम्ही -आम्ही मतदान करुन या नालायकांना हाकलून देणे. त्याची सुरुवात या लोकसभेच्यावेळी झाली. हेच स्पिरिट कायम ठेवले तर हळू हळूच पण परिस्थिती सुधारेल. काही काळ दगडापेक्षा वीट मऊ अशी स्थिती राहील पण आपण नेट लावला तर झक्कत जागेवर येतील.
ज्या दिवशी आपण खरोखर काम केले तरच लोक निवडून देतात अन्यथा तुरंगात जावे लागते हे त्यांना एकदा कळले की मिरवणूकीतीलाच काय एकूण सार्वजनिक जीवनातील हा हिडीसपणा थांबेल.

पिंपातला उंदीर's picture

9 Sep 2014 - 2:53 pm | पिंपातला उंदीर

जरा बारकाईने पाहिले तर अशा जयंत्या, मयंत्या आणि उत्सवांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घालणारे हे एकतर श्रमजीवी वर्गातील तरुण आहेत किंवा अशा श्रमजीवी वर्गातील युवावस्थेतील मुलं आहेत. शहराल्या विद्रुप करणार्‍या चौकाचौकातील फ्लेक्स बोर्डांवर यांचेच छोटे मोठे फोटो असतात.

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . बाकी लेखाच्या (?) आशयाशी सहमत

गणेशोत्सवाचा मूळ उद्देश वगैरे लोक म्हणतात तेव्हा एक विचारावेसे वाटते- कुठला गणेशोत्सव? टिळकांनी सुरू केला तो उत्सव सामाजिक-राजकीय उद्देशाने. भक्ती इ. ला मेन स्थान त्यात नव्हते, ते आपलं उपचारापुरतं. त्या दृष्टीने पाहिले तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे.

तस्मात भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

>>भक्ती इ.इ. पाहिले तर आजच नाही, ती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या गेला तेव्हाच वारली असे म्हणावे लागेल.

सहमत !! :)

प्यारे१'s picture

9 Sep 2014 - 3:51 pm | प्यारे१

>>>> सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सामाजिक-राजकीय समीकरणांशी एकदम निगडित आहे आणि आजही तो बरकरार इ. आहे.

राजकीय अपप्रवृत्ती आणि भपका टाळला तर बरोबर आहे.

प्रसाद१९७१'s picture

9 Sep 2014 - 4:47 pm | प्रसाद१९७१

सहमत.

अगदी टीळकांच्या काळी डॉल्बी वगैरे असते तर तेंव्हा पण जोरात वाजवले असते.

ऋषिकेश's picture

10 Sep 2014 - 9:26 am | ऋषिकेश

+१

पलिकडल्यावर्षी हेच मत अधिक विस्ताराने लिहिले होते

विक्रान्त कुलकर्णी's picture

9 Sep 2014 - 12:19 pm | विक्रान्त कुलकर्णी

चार बोटल व्होड्का...
बडे दिनो के बाद मिली है ये दारु...
जॉनी जॉनि तु ने पी है ? नो पापा...
वगैरे... दारु सम्बधातील गाणी सुपर डुपर हीट है......

विक्रान्त कुलकर्णी's picture

9 Sep 2014 - 12:29 pm | विक्रान्त कुलकर्णी

हिन्दून्चे सण हे फक्त दुसर्याना त्रास देण्यासाठी बनले आहेत. कोणता सण अपवाद आहे ? पूर्वी गुढिपाडवा हा शान्त्पणे घरी साजरा केला जाणारा सण होता. सध्या सकाळच्या वेळी प्रभातफेर्या काढून त्याचा सुद्धा चुतडा केला आहे. काही संस्कृती रक्षकाना हे पटणार नाही. पण त्रास जसा विसर्जन मिरवणूकीचा होतो तेव्हढाच या प्रभात फेर्‍यांचा सुद्धा होतो.. सगळिकडे सवंगपणा वाढत चालला आहे हेच खरे.. विसर्जनामध्ये श्रमजीवी असतील तर गुढीपाडव्याच्या प्रभात फेर्‍यांमध्ये बुद्धीजीवी.. एकन्दर काय तर पातळी तीच असते....

विजुभाऊ's picture

9 Sep 2014 - 12:36 pm | विजुभाऊ
विटेकर's picture

9 Sep 2014 - 12:41 pm | विटेकर

तुम्हाला हिन्दू नववर्षाची सकाळची प्रभातफेरी खटकते आणि ३१ डिसें. च्या रात्री दारु पिऊन चालणार धांगडधिंगा चालतो का ? आणि "चुतडा" म्हणजे काय ? प्रभात फेरीमध्ये दारु पिऊन वरची गाणी गात कोणी हिडीस नाचत का? की टिका केली की बुद्धीजीवी काही बोलणार नाहीत असे तुम्हाला वाटते ?
तुमचा नेमका प्रोब्लेम काय आहे ?
विषय कोणत्या धर्माला टार्गेट केले आहे हा नसून टिका करताना काही सारासार विवेक आहे कि नाही हा प्रश्न आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2014 - 1:35 pm | प्रसाद गोडबोले

वरील गाण्यांची लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याचशा लिन्क ऑफीसात बॅन आहेत ... (मला जर आयटी टीम ने ह्या प्रकरणात त्रॅक केले तर धन्या ती तुझी जबाबदारी अन मग तुझी काही खैर नाही *diablo* )

बर इथे लिरिक्स द्या ना लेको , मिपावर पण जरा नाचुन घेवुयात *dance4*

विक्रान्त कुलकर्णी's picture

9 Sep 2014 - 1:37 pm | विक्रान्त कुलकर्णी

मी प्रवृत्ती बद्दल बोलत आहे... ठाण्यामध्ये या... रस्त्यावरील वाहतुकीचा झालेला बट्ट्याबोळ पहायला मिळेल.. भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा.. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की सगळ्या प्रकारात संकृतीच्या नावे धांगड्धिन्गा घालणे चालु आहे.. मग ते ३१ डिसेंबर असो नाही तर विसर्जन असो..

भले प्रभात फेर्‍यांमध्ये दारु पिउन नाचत नसले तरी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचे आविर्भाव पहा

माझ्या अंदाजाने प्रभातफेरी फक्त आर एस एस ची असते. त्यातले तरूण आविर्भाव वगैरे करतात असं मला वाटत नाही. बाकीच्या प्रभात फेर्‍या असल्या तर मला माहीती नाही.

डॉल्बीच्या दणदणाटाने ३ गणेशभक्तांचा मृत्यू

गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. :(

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर

हज्जारोंच्या आनंदात फक्त तिघांचा मृत्यू म्हणजे कांहीच नाही. *sad* . *sad*

सस्नेह's picture

9 Sep 2014 - 3:42 pm | सस्नेह

आनंद कसला ? ही तर झिंग, बेहोशी, मस्ती...!
देव अन नैतिकता याच नव्हे तर माणुसकी, सहानुभूती, दया यासुद्धा संवेदना यांच्या बोथट झाल्या आहेत.
हा कसला समाज आपण घडवतो आहोत ? तरुणाईच्या या मानसिकतेला फक्त राजकारणीच जबाबदार आहेत का ? मिरवणुकांमध्ये नाचणारे तर समाजाच्या सर्व थरांमधले लोक दिसतात. पण बीभत्स गाणी अन नृत्ये करणारे मात्र आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातली तरुण मुले दिसतात. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ही कीड शिरली आहे.
मला वाटतं , ही कीड कशी आहे त्याची वर्णने अन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ती कशी काढता येईल यावर या माध्यमातून चर्चा व्हावी.
यासाठी मला सुचलेले उपाय
१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे.
२)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा.
३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.
आणखी कुणाला काही सुचत असल्यास लिहावे.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 5:06 pm | काळा पहाड

१)मिरवणुकामध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांवर सामाजिक व धार्मिक संस्थांचे नियंत्रण असावे.
२)मिरवणुका ठरलेल्या वेळेतच संपवण्यावर भर द्यावा. त्यानंतर संपल्यास आर्थिक बोजा आकारावा.
३)मुळात एका गल्लीत एकाच गणपती ही संकल्पना रूढ व्हावी.

१. न्यायालयाने पाच थराच्या वर मनाई लावताच आव्हाड गुरूजी न्यायालयाच्या नावे कसे प्रेमळ स्वरात बोलत होते ते तुम्ही पाहिलंच असेल.
२. हे जर सांगितलं तर स्व. ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव कसं "हिंदुंच्या सणावर बंधनं आणतायत" ची कॅसेट लावतात ते आपण पाहिलंच असेल.
३. असं जर काही सांगितलं तर दादा (धरण फेम) यांच्या कार्यकर्त्यांना "वसुली" करण्यावर बंधनं येणार नाहीत काय?
तस्मात,
राजकारण्यांना गाडा.. सगळं सुरळीत होईल.

विक्रान्त कुलकर्णी's picture

9 Sep 2014 - 3:01 pm | विक्रान्त कुलकर्णी

अमळ generalization होते आहे असे वाटत नाही का ? लक्ष्मि रोड वरील विसर्जन मिरवणुकी मधील सहभागी लोकांचा वर्ण कदाचित उजळ असेल किंवा कपड्यांचा पोत वेगळा असेल पण धीगान्याच प्रदर्शन करण्याची आसुरी वृत्ती तीच असते . हि वृत्ती एका विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित नाही तर दुर्दैवाने आपल्या पूर्ण समाजात आहे . आमच्या उच्चभ्रू वैगेरे समजल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये या वर्षी याच वृत्ती ने याच गाण्यावर धिंगाणा घातला होता . एकदम मान्य....

तरी पुण्यातले लोक म्हणत होते गणपती सोवळ्यातला देव आहे त्याला असं सार्वजनिक करु नका. टिळकांनी ऐकलंनीत कुठे, आता बघतांय ना ??

गेल्या दहीहंडिला ठाण्यामध्ये एका गोविंदाला डॉल्बीच्या तालावर नाचताना हृद्यविकाराचा तिव्र झटका येऊन प्राण गमवावे लागले होते. Sad

नाही, मला अजिबात दु:ख झालं नाही. सगळे डॉल्बी वाले असेच "जावेत" ही देवाकडे प्रार्थना.

डॉल्बी वाल्याला नाही अ‍ॅटॅक आला. डान्स करणार्‍या (दहीहंडीवाल्या) गोविंदाला आला. त्या आधी त्यानं किती टाकलेली, किती खा पी केलेलं त्याचा उल्लेख नाही बरं का!

डॉल्बी मुळं अ‍ॅटॅक आला, दहीहंडीच्या डॉल्बीमुळं आला की डॉल्बी हे केवळ निमित्त झालं? एखाद्या लग्नात डॉल्बी लावली असती आणि तिथं कार्यकर्ता गेला असता तर अ‍ॅटॅक आला नसता असं काही नसावं.

डॉल्बी वाईटच पण बाकी ३६४ दिवस काय करतात हे लोक पण त्याबरोबर महत्त्वाचं आहे की! अर्थात त्याबरोबरच दहीहंडीच्या वाढत्या थरांच्या पेक्षा लोकांच्या वाढत्या हव्यासाची काळजी जास्त वाटते आहे.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 5:52 pm | काळा पहाड

तेच ते. डॉल्बी लावणारा मस्त झोपला असेल घरी जावून सीडी लावल्यानंतर. हे नाचणारे अडाणढेंगे जे डॉल्बीवर नाचत होते, त्यांना म्हणतोय मी डॉल्बीवाले. बाकी आता ईंटर्व्ह्यु घेतो त्या मध्ये पब्लिक ला विचारणार आहे एक्स्ट्रा क्युरिक्युलर अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल. जर एखादा म्हणाला गणपती आणि तत्सम गोष्टीमध्ये भाग घेण्याची आवड आहे/होती, तर सरळ दरवाजा.

कपिलमुनी's picture

10 Sep 2014 - 4:50 pm | कपिलमुनी

आणि सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याची चुकीची भूमिका !

उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 5:09 pm | काळा पहाड

उमेदवाराचे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्य याची गल्लत होते आहे .

तशाच, धर्म आणि राज्य या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नकोत का? जेव्हा ढोलताशा वाजवून लोकांच्या शांततेवर अतिक्रमण केलं जातं तेव्हा "खाजगी आयुष्य" आणि "सार्वजनिक व्यवहार" हे वेगवेगळे ठेवण्याबद्दल का ऐकून घेतलं जात नाही? धर्म हा तुमच्या चार भिंतींच्या आत हे सुशिक्षित जगाचं सूत्र असताना केवळ तुमच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध केली तर मतं जातात म्हणूनच राजकीय संरक्षण आहे ना? आणि लोकांनी असा आरडा ओरडा करणार्‍या लोकांचा निषेध कसा करायचा? शांतता-प्रदूषण नावाची काही गोष्टच नसते ना! तेव्हा या आरडा ओरडीत शांतता हवी असणार्‍या माणसाचा आवाज कसा ऐकू जाणार? जरा विचारा लक्ष्मीरोड वर रहाणार्‍या लोकांच्या काय भावना आहेत गणेशोत्सवाबद्दल ते (टीपः मी तिथे नव्हे तर खूपच शांत भागात रहातो, पण मला त्यांची वेदना समजू शकते). शांततेचा अधिकार हा खरं तर नागरिकांच्या मूळ हक्कांपैकी एक असायला हवा होता, नव्हे, जर त्या काळी डॉल्बी असत्या तर तो घटनेतही समाविष्ट केला गेला असता. जो उमेदवार लोकांच्या शांततेच्या अधिकारावर गदा आणतो, तो उद्या ऑफिसमध्ये लोकांच्या इतर हक्कांवर गदा आणणार नाही, कशावरून?

निखळानंद's picture

9 Sep 2014 - 5:27 pm | निखळानंद

९ पैकी ४ गाणी मला ओळखीची आहेत..
म्हणजे मी पास म्हणायचा ना ?

ती emoticons कशी टाकतात ते अजून मला कळलं नाहीये.
कोणी मदत करेल काय ?
पास होण्यातला आनंद चेह-यावर दिसायला हवा ना..

शिद's picture

9 Sep 2014 - 6:16 pm | शिद

ती emoticons कशी टाकतात?

येथे मदत मिळेल.

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2014 - 9:58 pm | प्रसाद गोडबोले

हा एक मस्त लेख सापडला ह्या चर्चेच्या अनुषंगाने

http://vikramedke.com/blog/simply-psecular/

काउबॉय's picture

10 Sep 2014 - 1:49 am | काउबॉय

याची चाल येउ कशी कशी मी नांदायला हो येउ कशी कशी मी नांदायला सारखी वाटते.

पोरी जरा जपून दांडा धर,
याची चाल यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी.. कान्हा वाजवी बासरी वरुन धापल्या सारखी वाटते.

~ आसिफ.

काउबॉय's picture

10 Sep 2014 - 3:04 am | काउबॉय

हा असा दिशाहीन वर्ग आहे ज्याला आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही.
पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची ?

दिशाहिनांची जबाबदारी उचलायला समर्थ व्यक्तीचे विचार ते नक्कीच टाळत नसावेत. पण आशा व्यक्ती त्रोटक आहेत हे खरे दुखणे न्हवे काय ?

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 10:55 pm | काळा पहाड

पण मग त्यांनी काय करायला हवे ? दिशाहिनान्ना दिशा द्यायची जबाबदारी कोणाची त्यांचा वापर काराणारेंची की त्यांच्या त्रासाबद्दल गळा काढणारेंची

अच्छा म्हणजे चोरी करणार्‍या व्यक्तीला सुधारण्याची जबाबदारी ज्याची चोरी केलीय त्याची असते तर !! खरंच न्यायालयांनी असे समर्पक निर्णय दिले तर किती खटले लवकरात लवकर निकालात निघतील !!!

त्रास कोणाला होतआहे त्याने परिस्थिति सुधरण्यात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर किमान अमुक तमुक बिघडवतो चा डंका का वाजवावा ? तो बिघड्वतोय तर आपण सुधारायला काय केले ? धागे काढले ?

अवतार's picture

10 Sep 2014 - 8:47 pm | अवतार

याऐवजी मरवणूक हा शब्द समर्पक वाटावा अशी वेळ आली आहे.