स्पॅनिश ऑम्लेट (घरगुती)

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in पाककृती
8 Sep 2014 - 6:19 pm

साहित्य :-
१. ३ अंडी
२. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे)
३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे)
४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी
५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे)
६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
७. चवी नुसार मीठ - मिरपुड
८. तेल

1.

१. सर्वप्रथम थोडे जास्त (एखाद डाव) तेल फ्राईंग पॅन मधे गरम करावे, त्यात बटाटे टाकुन लालसर मऊ शिजे पर्यंत शिजवावेत
2.

3.

२.आता बटाट्यात पहिले कांदे अन मग सिमला मिर्ची घालावी , हे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीए, थोडे क्रंची सोडावे (पुढे अंड्यात शिजते हे सगळे, फक्त बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावेत)

4.

३. हे थोडे शिजल्यावर ह्यात टोमॅटो घालावेत

5.

४. आता ह्यात मीठ अन मिरपुड घालुन फेटलेली ३ अंडी घालावीत

6.

हे ऑम्लेट कडे कडेने थोडे सेट करावे

7.

आता सर्वात ट्रिकी पार्ट आहे, ह्या फ्राईंग पॅन वर फेस टु फेस बसेल अशी एक चिनी मातीची प्लेट घ्यावी, ती पॅन वर ठेऊन पॅन उलटा करावा, जेणे करुन ऑम्लेट उलटे होऊन फ्लिप होईल. आता ऑम्लेट ची शिजलेली बाजु वर येईल अन कच्ची खाली, ह्या कच्च्या बाजु कडुन ऑम्लेट हळुच परत पॅन मधे सोडावे, बाजुने थोडे तेल (एखादा चमचा) चारी बाजुने सोडावे.

8.

दोन्हीकड्न नीट शिजल्यावर प्लेट मधे काढुन घ्यावे, फायनल प्रॉडक्ट असे काहीसे दिसेल, हे वापरलेल्या तेला मुळे जास्त हेल्दी तर नाही म्हणवणार पण भाज्या पोटात जातात सो अगदीच डायट बरबाद आयटम नक्कीच नाही

9.

10.

टिप :- माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या ट्रेडीशनल स्पॅनिश ऑम्लेट ला घालतात त्याच आहेत, ह्यात वेरियेशन म्हणजे रंगीत सिमला मिर्ची, सन ड्राईड टोमॅटोज,मश्रुम, विविध प्रकारची चीज पनीर इत्यादी ही वापरता येईल (चीज सगळ्यात शेवटी घालावयाचे अन फ्लिप मारायच्या आधी अलगद छोट्या चमच्याने ढवळुन चीज अन भाज्या एकत्र करायचे.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

8 Sep 2014 - 6:24 pm | अनुप ढेरे

फटु नाही दिसत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 6:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला बी दिसंना देवा, मी पहिल्यांदाच फोटो वगैरे लोड करतो आहे , पिकासावर लोड करुन मग इकडे लिंक्स टाकल्या खर्या, रेजोल्युशन ३०० * ४०० ठेवले, काही चुकले का ? माझे ऑम्लेट का हुकले ?? *lol*

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो काडताना क्यामेर्‍यात फ्लीम टाकाया इसारला म्हनावं का काय ? :)

हल्ली पिकासा त्रास देतो. गुगल फोटो वापरल्यास बहुदा समस्या येत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

हांग अश्शी ! क्येलं का नाय गुगलनं काम ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

केलं बहुदा बेट्याने!!! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो लै बेस हाय्त. आपली आवडती डिश !

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 6:22 am | कैलासवासी सोन्याबापु

थैंक्स एक्का!!

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:31 pm | दिपक.कुवेत

आधी फोटो....मगच प्रतीसाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 6:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या स्टेप्स काय काय केल्या त्या, थोडे गाईड तरी करा फोटो कसे काय झाले असेल/ दुरुस्त कसे करु? मग मला काही करता येईल देवा

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:42 pm | दिपक.कुवेत

ते आता ईथे तुला कळेलच पण अंडे न घालता हिच पाकृ देउन दाखव हा पुढे येणारा संभाव्य प्रश्न मी आधीच विचारतोय....

कांदा बटाटा ढोबळी मिरची भाजी म्हणायचंय का आण्णा?

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:52 pm | दिपक.कुवेत

:D

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय म्हणायचे ते आता फोटो मुळे कळालेच असेल , प्यारे १! ;)

त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून टाकल्यास काय उरेल बापू? 'मिस्क' भाजीच ना?
मी तेच वर म्हटलंय.

एस's picture

8 Sep 2014 - 10:27 pm | एस

ऑम्लेटमधून अंडे कसे काय काढून टाकायचे? आणि ते आक्खे निघते की कसे? ;-)

अंडे की मम्मी कु मतलब मुर्गी कु बुलाना और बोलना अपने बच्चे कु बुला लिओ|

मुर्गी कुकुSSSचकू करे तो मतलब आवाज दिये तो अंडे कु समझ में आती बात|
बोलेतो वो अंडा अपनी मम्मी के पीच्चे निकल लेता|
अगर उस्कु थोडा नमक मिर्ची लगा रैता तो थोडा साबुन डालके पानी मार लेना|
पूSSSरा निकल जाता|
समझे मियाँ?

नंतर त्या ऑमलेटचे काय करायचे?

प्यारे१'s picture

9 Sep 2014 - 10:56 pm | प्यारे१

मिक्स भाजी म्हणून खायचं.
क्या यारो? हमकोईच सब करना तो आप क्या करोगे जी?

नंतर त्या अंड्याचे काय करायचे?

उत्तरः मिपावरील नवीन पाकृला हीच पाककृती हे अंडे घालून करता येईल का असे विचारायचे.

;-)

हाहा, सॉरी बरं का सोन्याबापू, तुमच्या धाग्यावर जरा दंगामस्ती घालतोय आम्ही! :-)

प्यारे१'s picture

10 Sep 2014 - 4:55 pm | प्यारे१

सॉरी कशाला? ह्या धाग्यावर निम्मी अंडी-ऊप्स- निम्मे प्रतिसाद बापुंचेच आहेत.
टीआरपी वाढवल्याबद्दल बापुच स्पॅनिश ऑम्लेट खाऊ घालतील तुम्हाआम्हाला. (बापु हलकं घ्या)

बाकी पुणेकर जनरली बापूंना 'बाप्पू' का म्हणतात?

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 5:02 pm | दिपक.कुवेत

बापुंचा घालायच्या अंड्याच्या अंदाज चुकतो असचं त्यानीच एका प्रतिसादात खाली म्हटलयं

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 5:04 pm | दिपक.कुवेत

ऑम्लेट नाइफ + फोर्क नी खाणं योग्य कि चमच्याने?

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2014 - 2:18 am | प्रभाकर पेठकर

>>>>बापुंचा घालायच्या अंड्याच्या अंदाज चुकतो

आयला, अंडी बापूंनी घातली आहेत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2014 - 8:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चुकतं कधी कधे प्लॅनिंग अंड्यांचं =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 11:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला सॉरी शक्तिमान! मी जरा कंफ्यूज झाल्तो!! _/\_

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 1:08 am | प्रभाकर पेठकर

अंड्यांऐवजी चण्याचे पीठ (बेसन) आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात घेऊन किंचित हळद + मीठ घालून मधाइतके घट्ट आणि प्रवाही भिजवावे. भाज्या शिजल्या की त्यावर ओतावे. मध्यम आंचेवर, फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवावे. शिजल्यावर उलटून दूसर्‍या बाजूनेही शिजवावे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 6:25 am | कैलासवासी सोन्याबापु

मी अंडी खायला ओके आहे, आपण केला असेल हा प्रयोग तर फोटो द्या! "स्पेनिश धिरडी"

हे म्हणजे सुर्याला त्याचा उजेड दाखव असं सांगण्यासारखं आहे!!!

अनुप ढेरे's picture

8 Sep 2014 - 6:43 pm | अनुप ढेरे

पिकासावर पब्लिक अक्सेस द्या अलबम ला. नाहीतर लिंका चुकल्यात

कवितानागेश's picture

8 Sep 2014 - 6:40 pm | कवितानागेश

लिन्कवर जाउनही फोटो दिसत नाहीत. तुमच्या पिकासाच्या अल्बमवर शेअर करण्याचे ऑप्शन्स तपासा. ते ओपन करा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 6:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

पब्लिक अ‍ॅक्सेस दिलाय की राव!!! अल्बम मधे फोटो एन्लार्ज करुन मग जी लिंक येते ती वापरली हाए तरी काही साधंना मेलं!!!

मिपा पब्लिक ला द्या म्हणजे फोटो दिसतील :D

सानिकास्वप्निल's picture

8 Sep 2014 - 7:10 pm | सानिकास्वप्निल

फोटो दिसले की प्रतिसाद द्यायला येते हं

फटू राहूदेत - एकएक आम्लेटच द्या...

भौ चुकूच्या युआरेल्स दिलेल्या आपण.

बाकी फोटु जबरा आलेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

चुक दुरुस्ती बद्दल आभार गणपा शेठ!!!

हाडक्या's picture

8 Sep 2014 - 7:29 pm | हाडक्या

दिसले एकदाचे फटू... भारीये.. आमचा एस्पानी फ्लॅट्मेट करायचा हे असलं .. आमी फक्त नन्तर ताव मारायचो. ;)

प्यारे१'s picture

8 Sep 2014 - 7:31 pm | प्यारे१

सोन्याबापू,

अनंत चतुर्दशीसाठी थांबायचं की एक दिवस. :P
का छळ मांडलाय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्यारे भाई ही जय्यत पूर्वतयारी समजा!!! ;)

एस's picture

8 Sep 2014 - 7:48 pm | एस

स्पॅनिश ऑमलेट झकास आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

Thanks स्वैप्स!

स्वॅप्स साहेब, ह. घ्या. :)

स्वैप्स

स्वॅप्स = s + E + p + s

एस's picture

8 Sep 2014 - 10:24 pm | एस

अहो तुम्ही तो डब्ल्यू खाऊन टाकलात की? ;-)

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 11:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो मी एंड्राइड एप्प वरून पोस्ट्स करतोय, मुद्दाम नाय नावाचा कूटाणा केला!! प्रैक्टिस चालली आहे !! :)

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 7:48 pm | दिपक.कुवेत

जीवंत वाटतेय. फोटु मस्तच आलेत. आता एकदा हे करुन बघीन. फोटोत आहे त्या पेक्षा बटाटा अजुन थोडा पातळ (काचर्‍या टाईप) चीरता आला असता ना? आय मीन मग शीजायला कमी वेळ लागेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

बारीक चिरला जास्त तर तो ओवर केरेमलाइज होऊन टेस्ट कडसर करू शकतो ! एक "तोर्तिया दे पातातास" नावाचे असेच ओम्लेट असते अजुन त्यात मात्र बटाटा चंक्स वापरून ते शिजल्यावर मैश करुन त्यात अंडी घातली जातात पण ते फ़्राइड अन बेक्ड दोन्ही असते!!

सुहास झेले's picture

8 Sep 2014 - 7:54 pm | सुहास झेले

णो कमेंट्स... ;-)

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 11:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

बोला झेले अण्णा बोला!!! महाराष्ट्राला उत्तर हवंय!!!

पोटे's picture

8 Sep 2014 - 8:02 pm | पोटे

फ्रेंच आम्लेट म्हणतात ना ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही ,माझ्या माहिती प्रमाणे , हाफ कुक्ड फोल्ड ओवर ओम्लेट असले नॉन वेज फिलिंग सहित तर ते असेल फ्रेंच ओम्लेट!

मस्त दिसतंय ऑम्लेट. हा नवीन प्रकार करून चाखायला हवा लवकरच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

थैंक्स!! :)

सानिकास्वप्निल's picture

8 Sep 2014 - 8:38 pm | सानिकास्वप्निल

वाह ! वाह!

मस्तं दिसतय स्पॅनिश ऑम्लेट :)
फोटो पण छान आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 8:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

थैंक्स!!! , मी आपल्या रेसिपीज पण फॉलो करतो ताई! योर ओपिनियन मैटर्स!! अगदी त्या क्रीम फिल्ड स्वांस ची शपथ!!

मुक्त विहारि's picture

8 Sep 2014 - 9:08 pm | मुक्त विहारि

जबरा...

चला मिपावर अज्जुन एक बल्लव आले....

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 9:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुवि सर, I am बल्लव by force which converted to a hobby, इथे साक्षात् बल्लव (गणपा भाऊ) अन कितीतरी अन्नपूर्णा आहेत!!! आम्ही फ़क्त शिकत राहणार!!!

हौसलाअफ्जाई के लिए शुक्रिया!! _/\_

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 12:59 am | काळा पहाड

ठांकू बेरी बेरी मच..

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 6:34 am | कैलासवासी सोन्याबापु

_/\_

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 1:19 am | प्रभाकर पेठकर

सोन्याबापू,

मस्तं पाककृती. अंड्यातून प्रथिने आणि भाज्यांमधून चोथा (फायबर) तसेच बटाट्यातून कर्बोदके अशी चौफेर पोषक द्रव्यांनी युक्त अशी पाककृती. भन्न्नाट...

ऑम्लेट फ्रायपॅन मध्ये उलटविण्यासाठी, तळाकडून शिजले की कलथ्याने फ्रायपॅनपासून सुटे करून घ्या आणि ऑम्लेटखाली कलथा सरकवून ऑम्लेट हवेत उडवून पलटवा किंवा फ्रायपॅनलाच वरच्या दिशेने झटका देऊन ऑम्लेट हवेतल्या हवेत उलटवायला शिका. मजा येते. दुर्दैवाने, कसे ते शब्दात सांगता येत नाहीये. कधी जमल्यास व्हिडिओ टाकेन इथेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 6:31 am | कैलासवासी सोन्याबापु

पेठकर काका, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते आले मला लक्षात पण ह्या केस मधे ते नाही हो शक्य जवळपास एक ते दिड इंच जाड आमलेट असते त्यात भाज्या जास्त सो नाही म्हणले तरी थोड़े ठिसुळ पार भुर्जी होऊन जायची, चाइना प्लेट वापरून फ्लिप मारणे हीच विधि एका स्पेनिश बल्लवाने यूट्यूब ला दाखवलेली ! मी तीच अन्गिकाराली

चित्रगुप्त's picture

9 Sep 2014 - 3:12 am | चित्रगुप्त

मिपावर वाचून लगेचच करून बघितलेली ही माझी पहिलीच पाकृ. मस्त झाले हो हे ऑमलेट. सर्वांना आवडले. धन्यवाद.
गॅस हाय वर ठेवावा की लो वर, केंव्हा कमी-जास्त करावा, वगैरे जाणकारांनी लिहावे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 6:36 am | कैलासवासी सोन्याबापु

आभार आपले, पूर्ण पाकृ ही लो फ्लेम वर करायची आहे , थोड़ी आहे वेळखाऊ! पण वर्थ इट आहे :)

ऋषिकेश's picture

9 Sep 2014 - 9:34 am | ऋषिकेश

ऑमलेट झक्कास दिसतेय
आम्ही केसुंच्या स्टाईलने बनवतो, ओव्हनमध्ये - उलटवण्याची भानगडच नाही
तेही उत्तम होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2014 - 2:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्याकडे (मी जिथे असतो) ओवन असले तर वीज नै अन वीज आली तर अंडी नाय!!! झटपट मधे मिळेल ते बनवले!!!

इशा१२३'s picture

9 Sep 2014 - 10:52 am | इशा१२३

मस्त!फोटोही छान.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2014 - 2:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

थैंक्स!!!

दिपक.कुवेत's picture

9 Sep 2014 - 11:20 am | दिपक.कुवेत

साहित्याच्या चित्रात २ नच दिसत आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2014 - 8:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझाच अंदाज चुकलेला ! नंतर १ अजुन घातले होते त्या फेटलेल्या अंड्यात!

सुहास पाटील's picture

9 Sep 2014 - 11:33 am | सुहास पाटील

मस्तच लय भारि

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2014 - 2:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभारी आहे सुहास साहेब :) _/\_

त्रिवेणी's picture

9 Sep 2014 - 12:55 pm | त्रिवेणी

कुणी करून दिले तर खाईन. अंड्याचा वास नाही आवडत(स्वत:च्या किचनमध्ये).

चांगलय.मला मात्र गाड्यावरच जास्त भारी वाटतय.

अवांकर:- थँक्स जेपी. :-)

पैसा's picture

10 Sep 2014 - 9:22 am | पैसा

पोटभरीची आणि हेल्दी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2014 - 2:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो, तेल फ़क्त थोड़े जास्त वापरले आहे ! तोच एक मुद्दा आहे!! बाकी काही नाही! :)

कपिलमुनी's picture

10 Sep 2014 - 3:47 pm | कपिलमुनी
ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

बापु,
त्या त्रिवेणी काकु आणि जे.पी. काकांना धन्यवाद (उपप्रतिसाद) द्यायचे राहिले की
पैजारबुवा,

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 4:52 pm | दिपक.कुवेत

तुमच्या प्रतिसादाला पण उपप्रतिसाद मिळेल :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 5:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी आपली आठवण करुन दिली, विसरले असतील असे वाटले म्हणुन.

पैजारबुवा,

आले कि सगळ्या प्रतिसादांची खबर घेतील हो :)

स्पंदना's picture

11 Sep 2014 - 5:20 am | स्पंदना

हो . हो. खोबर घातल तरी चालेल दिपक कुवेत.
धन्यवाद.

स्पंदना's picture

11 Sep 2014 - 5:21 am | स्पंदना

नाही.नाही.
मुळ्ळीच विसरलो नाही ज्ञानोबाचे पैजार. काळजी नसावी.
धन्यवाद.

स्पंदना's picture

11 Sep 2014 - 5:22 am | स्पंदना

तो तर देणारच दिपक कुवेत.
धन्यवाद.

धन्यवाद आठवण करुन दिल्याबद्दल ज्ञानोबाचे पैजार.
नक्की धन्यवाद मानेन.

ज्येष्ठ मिपाकरांना वगैरे वगैरे.... एक मिपाकर म्हणून.... वगैरे वगैरे...

एवढे बोलून वगैरे वगैरे... धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2014 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा

काय क्च्कुन अंडी मारलीयेत राव! :-D
आम लेट ला धागा ! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2014 - 3:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज मी साधं बॅचलर ऑम्लेट केलं होतं. ईनो (तेच हो ते आपल्याकडची लोकं जळजळ झाल्यावर घेतात ते) घातल्यावर काय होतं हे पाहायची ईच्छा झाली. ३ अंडी, अर्धा कांदा, मिरच्या, मीठ, कोथिंबिर मिसळवुन फेटुन घेतलं. त्यानंतर १/२ टी.स्पुन ईनो घालुन परत फेटुन घेतलं. पांढरा फेस तयार झाला आणि चविला किंचित आंबट चव आली. कपाळावर हात मारुन घेतला. पण एवढं मटेरिअल टाकुन द्यायचं जीवावर आलं होत म्हणुन तसचं ऑम्लेट घातलं. आश्चयाची गोष्ट म्हणजे ऑम्लेटच्या चवीमधे कुठलाही फरक नव्हता आणि नेहेमीपेक्षा जास्त फुगलं होतं. =)) ईनो जिंदाबाद.