र्‍य आणि ऱ्य पैकी अधीक बरोबर कोणता ? आणि का ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
8 Sep 2014 - 8:49 am
गाभा: 

र्‍य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे. उदाहरणार्थ इथे मिपावर टाईप होतोय तो पहिला र्‍य आहे.

हे दोन्ही साध्या डोळ्यांनी सर्वसाधारणपणे सारखेच दिसतात तर वेगळे ओळखायचे कसे ? न्याहाळकाच्या (ब्राऊजरच्या) कंट्रोल F मध्ये यातला एक एक र्‍य आणि ऱ्य वेगळा वेगळा घेऊन शोध घ्या, दोन्ही र्‍य एकमेकांना शोधात ओळखत नाहीत हे दिसून येईल.

फरक ओळखण्याचा दुसरा मार्ग बॅकस्पेस ची कळ वापरून य डिलीट करणे, येथी र्‍य मधील य डिलीट केल्या नंतर र्‍ एवढेच चिन्ह उरते. ऱ्य च्या य ला बॅकस्पेस ने डिलीट केल्यावर ऱ् उरतो म्हणजेच पहिला र्‍य र्‍ + य वापरून निर्मीत केला जातो आणि दुसरा ऱ्य ऱ् आणि य यांच्या संधी जोडाक्षराने साधला जातो. अर्थात हि टेक्नीकॅलिटी आहे. महत्वाचा प्रश्न हा र्‍य बरोबर कि हा ऱ्य बरोबर हाच आहे.

*अगदी असाच प्रॉब्लेम इतर कोणत्या अक्षरास आहे का ? र्‍ह आणि ऱ्ह मध्ये सुद्धा आहे.

* साध्या डोळ्यांनी फरक पडत नसेल तर कोणता अधिक बरोबर हा उपद्व्याप कशा साठी ?

पहिले आणि सर्वात महत्वाच कारण गूगल आणि इतरही शोधयंत्रात एखाद्या शब्दाचा शोध घेताना काही शोध न दाखवले जाण्याचा संभव आहे. आणि असे शोध दाखवले जात नाहीएत हे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य व्यक्तीस सहज लक्षातही येत नाही पण एखाद्या व्यक्तीचा एखादा शोध यंत्रातील महत्वाचा शोध योग्य माहिती हाताशी न मिळाल्या मुळे अर्धवट राहू शकतो.

दुसरे कारण काय टाईप केल्यावर कोणत अक्षर दिसाव याच्या प्रमाणी करणाच आहे. आत्तापर्यंत टायपींग संबधीत प्रमाणीकरणाच्या प्रश्नाकडे सर्वसाधारण पणे डोळे झाक करत आलो आहोत पण हि उदासीनता खरेच योग्य आहे का ? बहुतांश लोक कमीत कमी पण उत्कृष्ट टायपींग पद्धती वापरत असतील तर टायपींगचा वेग वाढणे सुलभता साधणे इत्यादी फायदे होऊ शकतात.

तिसरे मराठी विकिपीडिया विक्शनरी शब्दकोश इत्यादी प्रकल्पात वेगवेगळी टाईपींग पद्धती वापरणार्‍यांकडून होणारी द्विरुक्ती टाळून शोध/माहिती घेणार्‍या वाचकाच्या हाती योग्य लेख सुलभतेने उपलब्ध करणे

*मिपा वरील र्‍य कसा टंकला जातो = Ry वापरून
*हा दुसरा ऱ्य कसा टंकला जातो = ऱ् + य

असेच काही प्रश्न अ‍ॅ च्या संदर्भाने आहेत पण ते स्वतंत्र धाग्यातून मांडेन.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर Ry लिहुन 'र्‍या' अस टंकल्या जातं. मला अजूनही ’हृदय’ हा शब्द मिपावर नीट टंकता येत नाही. 'र्‍हदय' असंच उमटतं. कोणाकडे काय युक्ती ?

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

8 Sep 2014 - 9:08 am | श्रीरंग_जोशी

मी हृ साठी hRu असे टंकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमलं.

-दिलीप बिरुटे

ऱ्य आणि ऱ्ह हे दोन्ही चुकीचेच आहेत. मराठी भाषेत कुठेही दिसत नाहीत. देवनागरी टंकन संगणकावर उपलब्ध झाले तेव्हा अशा अनेक गोष्टींचा विचार विकसकांनी केला नसावा. अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते. उदा. इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ऱ्य आणि ऱ्ह हे दोन्ही चुकीचेच आहेत
ऱ्ह चं समजलं पण र्‍य हे कसं चुक आहे ?

-दिलीप बिरुटे

ऱ्य आणि ऱ्ह हे दोन्ही चुकीचेच आहेत.

स्वॅप्स आणि बिरुटे सर हे जरा इस्कटून सांगात येईल का ? स्वॅप्स यांचा नेमका मुद्दा काय आहे
१) ऱ्य आणि ऱ्ह हे मराठीत उच्चारणच नाही म्हणून अशा अक्षर लेखनाची आवश्यकता नाही

२) ऱ्य आणि ऱ्ह ही मराठीत उच्चारणे आहेत पण त्यासाठी ऱ्य आणि ऱ्ह हे लेखन सर्वात योग्य पर्याय नाहीत (मग योग्य पर्याय कोणते ?)

३) ऱ्य आणि ऱ्ह ही मराठीत उच्चारणे आहेत पण त्यासाठी ऱ्य आणि ऱ्ह हे लेखन गरजेचे आहे पण मिपा टंकनात होणार्‍या उपलब्धतेत त्रुटी आहे . मग ही त्रुटी नेमकी काय आहे असे वाटते ? काय केल्याने त्रुटीचे निवारण होईल ?

४) ऱ्य आणि ऱ्ह ही मराठीत उच्चारणे आहेत, त्यासाठी ऱ्य आणि ऱ्ह हे लेखन गरजेचे आहे पण सरसकट सर्वच मराठी टायपिंग प्रणाली चुकीच्या पद्धतीने करतात ? मग नेमकी बरोबर पद्धत कोणती असावयास हवी

उपरोक्त चार पैकी एक किंवा त्या शिवाय काही वेगळे विश्लेषण असल्यास अधिक विसृत पणे कळवावे म्हणजे इतरांनाही चर्चा सहभाग आणि मत बनवणे सोपे जाईल हि विनंती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

’र्‍हावा’ ’राहणे’ असं बोलीत लिहिता येतं, असं मला म्हणायचं होतं.
स्वॅप्स यांचा मुद्दा मला कळला नाही, त्यांनी लिहिलं की मी लिहितो.

-दिलीप बिरुटे

मी माहीतगार यांचा लेख पाहिला तेव्हा त्यातील अक्षरे मला माझ्या प्रतिसादाच्या छायाचित्रातील ऱ्य आणि ऱ्ह यांच्यासारखी दिसली. त्यामुळे मी लिहिले की अशा पद्धतीने 'र' हा 'य' किंवा 'ह' ला जोडणे अयोग्य आहे.

Ry and Rh

ही जोडाक्षरे कशी लिहावीत हे खाली दर्शविले आहे. हा जो अर्धा र आहे तो अर्धचंद्रासारखा काढावा म्हणजे इंग्रजीतील हायफन (-) आणि हा मराठीतील अर्धा र वेगळा दर्शवता येईल. कसे हे खाली दिलेल्या प्रतिमेत लिहून दाखवले आहे.

Ry and Rh - Right Way to Write

युनिकोड कॅरेक्टर रेंडरिंग हे कित्येक ब्राउजर्समध्ये प्रमाणित नाही. त्यामुळेही असे घडते.

वानगीदाखल 'पायर्‍या' आणि 'कुर्‍हाडी' हे शब्द पहा. दोन्हींमध्ये अर्ध्या र ला य किंवा ह शी जोडण्याची पद्धत नक्कीच प्रचलित आणि प्रमाणितही आहे. तसेच 'चौर्य' आणि 'बार्हस्पत्य' हेही शब्द पहा. यातील जोडण्याची पद्धत तसेच त्यांचे उच्चार हे आधीच्या जोडाक्षरांपेक्षा वेगळे आहेत. चौर्य यातील र आणि य यांचा उच्चार त्यामानाने बराचसा स्वतंत्र होतो (तालव्य), तर पायर्‍या यातील र व य यांचा उच्चार एकत्रच उच्चारांवर जोर देऊन केला जातो (मूर्धन्य).

कंठव्य / 'क' वर्ग - क् ख् ग् घ् ङ्
तालव्य / 'च' वर्ग - च् छ् ज् झ् ञ्
मूर्धन्य / 'ट' वर्ग - ट् ठ् ड् ढ् ण्
दंतव्य / 'त' वर्ग - त् थ् द् ध् न्
ओष्ठव्य / 'प' वर्ग - प् फ् ब् भ् म्
विशिष्ट व्यंजने - य् व् र् ल् श् ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ्

यातील य तालव्य, र मूर्धन्य तर ह कंठव्य आहेत. त्यामुळे यांच्या जोडाक्षरांचे उच्चार दोन प्रकारे करता येतात तसेच ते लिहिलेही दोन प्रकारे जातात. अशाच प्रकारे पृ, प्र, र्प अशा वेगवेगळ्या पद्धतीने र हा इतर अक्षरांना जोडला जातो. त्यांचे उच्चारही स्वतंत्र आहेत.

प्रश्न असा आहे की युनिकोडमध्ये ही विविधता दाखवणे आणि त्याचे प्रमाणीकरण करणे जेणेकरून जगातील कुणीही कोणत्याही प्रणालीवर, कोणत्याही संगणकावर आणि कोणत्याही अ‍ॅप्लिकेशनवर देवनागरी सारखीच उमटली पाहिजे, टंकता आली पाहिजे. हे होत नाही याचा खेद आहे.

(सूचना - माझ्या प्रतिसादातील जोडाक्षरे वरील त्रुटींमुळे सर्वांनाच नीट दिसतील असे नाही. तरी भावना समजाऊन घ्यावी इतकेच.)

बिरुटेसर, यात बोलीभाषेचा वगैरे संबंध नाही.

माहितगार's picture

8 Sep 2014 - 5:08 pm | माहितगार

हा जो अर्धा र आहे तो अर्धचंद्रासारखा काढावा

मला तरी धागा लेखातील दोन्ही र्‍य आणि दोन्ही र्‍ह आपण म्हणता तसे अर्धचंद्रासारखेच दिसतात. मिपावर काढलेला र्‍ + य ने दिसणारा र्‍य ही अर्धचंद्रासारखाच दिसतो आहे.

एनीवे धागा लेखातील पहिला आणि दुसरा र्‍य वेगवेगळ्या तर्‍हेने तयार झालेले आहेत संदर्भा साठी ऐसी वरील हा प्रतिसाद पहावा :
आणि आपल्या शंका कळवाव्यात.

बाकी आपल्या अपेक्षा रास्त आहेत. (आपल्या भावना आणि विचारांना अनुषंगिक रोचक अवांतर : फोन विकुन नफा कमवणार सॅमसंग ! आणि एखादे मराठी अक्षर दिसत नाही म्हणून सॅमसंगच्या ग्राहकांसाठी झटणार फायरफॉक्स म्हणजे फ्री सॉफ्टवेअर वाले !! एक ऑनलाईन किस्सा ) जेवण्याच्या मीठात आयोडीन कंपलसरी करणारे कायदे करता येतात प्रणालीमध्ये योग्य पद्धतीने मराठी/भारतीय टंकन उपलब्ध करून देणारे कायदे का असू नयेत ?

सटवीचे कपाळ यांनी दिलेली माहिती उपयुक्त आहेच, पण त्यात युनिकोडच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती दिली आहे. आपण जे र्‍य आणि ऱ्य म्हणता आहात त्यांची प्रत्यक्ष वापरातील वेगवेगळी उदाहरणे (शब्दांच्या स्वरूपात) देऊ शकलात तर बरे होईल.

मला तरी धागा लेखातील दोन्ही र्‍य आणि दोन्ही र्‍ह आपण म्हणता तसे अर्धचंद्रासारखेच दिसतात. मिपावर काढलेला र्‍ + य ने दिसणारा र्‍य ही अर्धचंद्रासारखाच दिसतो आहे.

मोबाईलवर मिपा उघडून पाहिले असता पहिला र्‍य हा अर्धचंद्राकार आणि ऱ्य हा सरळ आडवा दिसतो आहे. म्हणून मी म्हटले की अर्धा र हा अर्धचंद्रासारखा काढला पाहिजे.

पैसा's picture

8 Sep 2014 - 5:18 pm | पैसा

मिपावरच्या प्रतिसादासाठी सुलेखन करून त्याचा फोटो अपलोडवण्यासाठी _/\_

एस's picture

8 Sep 2014 - 5:25 pm | एस

आपल्या शाबासकीने आम्ही धन्य झालो... परिक्रमा करायला मोकला आपलं मोकळा...

माहितगार's picture

8 Sep 2014 - 10:32 am | माहितगार

@स्वॅप्स अधिक नेमक्या चर्चेसाठी आपल्या प्रतिसादाचा "अ‍ॅ हे अक्षरही एॅ ...." भाग विसृत चर्चेसाठी संंबंधीत वेगळ्या धाग्यावर नोंदवला आहे. http://www.misalpav.com/comment/610214#comment-610214

असे कसे म्हणता?
१. "र्‍हास" हा अतिशय प्रचलीत शब्द आहे.
२.'ही तर सातार्‍याची तर्‍हा' हे गाणेही प्रसिद्ध आहे. ‍‍

तुम्ही माझा वरील प्रतिसाद आणि त्यातील छायाचित्रे पाहिल्यास मला काय म्हणायचेय हे तुमच्या लक्षात येईल.