वांग्याचे काप

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
6 Sep 2014 - 12:01 am

गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा.
(कधीतरी खा,नेहमी नको,आरोग्याची काळजी घ्या.)
वांग्याचे काप
साहित्य....
मोठे वांगे
तांदळाची पिठी
एक चमचा बेसनपीठ
मीठ
लाल तिखट
तळण्यासाठी तेल
कृती...........

मोठ्या वांग्याचे पातळ काप करून घ्यावे.व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे
नंतर निथळून जाळीवर काढून ठेवावे.

1

तांदळाची पिठी, बेसनपीठ,मीठ ,लाल तिखट कोरडेच एकत्र मिसळुन घ्यावे.
त्या पिठात काप चांगले घोळवून घ्यावे.

2

तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे काप दोनही बाजूनी मंद आचेवर तळून घ्यावे,

3

खमंग वांग्याचे काप चपाती, भाकरी कशाबरोबरही चांगले लागतात.
तोंडी लावणे म्हणूनही उपयोग होतो.

असेच टोमाटो,बटाटा,कारली याचेही काप करू शकता.
आवडत असेल तर पीठ लावण्यापूर्वी आलं लसूण पेस्ट लावू शकता.

kap

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

6 Sep 2014 - 12:06 am | सुहास झेले

मला प्रचंड आवडतात हे काप...गरम भातात कुचकरून खायला पण मस्त वाटतात... :)

फोटो?

सुहास झेले's picture

6 Sep 2014 - 12:15 am | सुहास झेले

आले आले फोटो आले... मस्तच एकदम. आता धागा कसा जिवंत वाटतोय :)

मध्ये आहेत ते वांग्याचे काप,चार आहेत ते बटाट्याचे आणि पाच आहेत ते टोमाटोचे आहेत.

पैसा's picture

6 Sep 2014 - 12:15 am | पैसा

फोटु इले!

काप मस्त! गोंयात आम्ही तांदुळाचा रवा लावतो मात्र.

भिंगरी's picture

6 Sep 2014 - 12:10 am | भिंगरी

मीही भातात कुस्करुनच खाते.

सूड's picture

6 Sep 2014 - 12:30 am | सूड

तवा फारच रापलाय नै??

भिंगरी's picture

6 Sep 2014 - 12:32 am | भिंगरी

लोखंडाचा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2014 - 12:38 am | डॉ सुहास म्हात्रे

आवडता पदार्थ !

वांगी / बटाट्याचे काप असे तळण्यापूर्वी किंवा त्यांची भजी तळण्यापूर्वी मीठ टाकलेल्या थंड पाण्यात पाच मिनीटे बुडवून ठेवल्यास जास्त चवदार लागतात.

दिपक.कुवेत's picture

6 Sep 2014 - 1:20 am | दिपक.कुवेत

भातात कुस्करुन तर छानच लागतात. फोटो छानच आलेत.

निवेदिता-ताई's picture

6 Sep 2014 - 1:36 am | निवेदिता-ताई

व्वा...मस्त.

स्वप्नांची राणी's picture

6 Sep 2014 - 3:34 am | स्वप्नांची राणी

हा...काय तोंपासू दिसतायेत...माझा प्रचंड आवडीचा प्रकार..!! धन्यवाद भिंगरी पुन्हा आठवण करुन दिल्याबद्दल!!

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2014 - 4:14 am | प्रभाकर पेठकर

वांग्यांना सर्वात आधी मीठ, नंतर हळद नंतर चिंचेचा कोळ आणि शेवटी लाल तिखट लावून जरा मुरु देतो नंतर तांदूळाच्या पिठीत घोळवून तेलावर खरपूस भाजून घेतो. मस्तं लागतात.

आदूबाळ's picture

7 Sep 2014 - 12:59 am | आदूबाळ

ये बात! बहुत आभार, काका.

अजया's picture

6 Sep 2014 - 6:53 am | अजया

लै भारी पाकृृ ,भिंगरीताई!येऊ द्या अजून पाकृृ तुमच्या.

इशा१२३'s picture

6 Sep 2014 - 7:31 am | इशा१२३

फोटो आणि पाककृती छान भिंगरीताई..

कवितानागेश's picture

6 Sep 2014 - 9:10 am | कवितानागेश

हे सेम असे दुधी आनि कान्द्याचेपण छान होतात.
मी ज्वारीचे पीठ वापरते.

सानिकास्वप्निल's picture

6 Sep 2014 - 3:27 pm | सानिकास्वप्निल

मला दहीभाताबरोबर असे काप खूप आवडतात
फोटो आले म्हणून +१

आवडता पदार्थ! फोटू आल्याने आता शंकाच राहिली नाही. ;)

एस's picture

6 Sep 2014 - 5:50 pm | एस

माझीच आयडिया ढापली... आमच्या वड्यांबरोबर असेच वांगे-बटाट्यांचे काप बनवले होते. ;-)

मस्त पाककृती. सोबत प्रपे, इए आणि पैतै इत्यादींच्या टीप्सपण भारी. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

6 Sep 2014 - 8:57 pm | मुक्त विहारि

बियरबरोबरचा एक उत्तम चकणा.....

असले काप मला अतिशय प्रिय आहेत..

खटपट्या's picture

7 Sep 2014 - 7:58 am | खटपट्या

करुन बघतो आणि सान्गतो ...

भिंगरी's picture

19 Jul 2015 - 9:38 pm | भिंगरी

करून पाहीले की नाही अजून,नाहीतर आता अजून थोडे वेगळे,पण चवदार वांग्याचे काप आले आहेत.

पोटे's picture

7 Sep 2014 - 2:14 pm | पोटे

शॅलो फ्राय करतो.. पीठ भज्यासारखे करुन काप त्यातुन बुचकळुन शॅलो फ्राय करतो

पोटे's picture

7 Sep 2014 - 2:15 pm | पोटे

किंवा रवा लावुन करतो

पुतळाचैतन्याचा's picture

7 Sep 2014 - 3:23 pm | पुतळाचैतन्याचा

बंगाल मध्ये वांगे केवळ तेलावर तळतात आणि मीठ लावून खातात...तिथे नेहमी हा पदार्थ खाल्ला जातो.तेला "बैंगन भाजा" म्हणतात.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2014 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्स्स्स्स्स्स्स्स्स्स्द!!!!! शेवटचा फोटू बगून गरमागरम आमटीभात पण दिसायला लागाला! एक नंबर !

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2014 - 5:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

सहीच!! बंगालात बेगुन भाजा अन बिहार झारखंडात बेगुनी म्हणतात ह्यालाच थोड्याफार फरकाने!!

मदनबाण's picture

8 Sep 2014 - 5:28 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 8:27 pm | विवेकपटाईत

मलाही आवडतात वांग्याचे काप. कमी तेलात भजी खाण्याचा आनंद मिळतो. बरोबर अदरक टाकून बनविलेला गरमागरम चहा,अहाहा, तोंडात पाणी आले.

उगा काहितरीच's picture

9 Sep 2014 - 11:13 am | उगा काहितरीच

आत्ताच करून पाहीले. झक्कास झाले होते .

अस्मी's picture

9 Sep 2014 - 3:04 pm | अस्मी

मस्त पाकृ....मला प्रचंड आवडतात वांग्याचे काप!!
शाळेत असताना बर्‍याचदा डब्यात पोळी आणि काप म्हणजे बस्स...

पुतळाचैतन्याचा's picture

11 Sep 2014 - 4:22 pm | पुतळाचैतन्याचा

एकदम सुरमई सारखे दिसत आहे.

दुरुगकर अनिल भाल्चन्द्र's picture

29 Sep 2014 - 6:23 pm | दुरुगकर अनिल भा...

मी मराठित लिहिन्याचा प्रयत्न केला पणलीहिन्ण्यस्स फर वेललगतो.

दुरुगकर अनिल भाल्चन्द्र's picture

29 Sep 2014 - 6:27 pm | दुरुगकर अनिल भा...

मराठीत लिहीताना मागे लिहीत गेले की बोंबाबोंब होते. इंग्रजि सारखे सोपे नाही.

सूड's picture

29 Sep 2014 - 7:00 pm | सूड

अगिनकोल्हा वापरुन बघा!!

फक्कड!आभार सर्वाँचे.ज्यांची पाकृ ढापलेली आहे त्यांच्यासाठी सहानुदर्शक ठराव एकमताने मान्य करून टाकू ३०सप्टेँबरच्या आत.
आता उंधियु येऊ द्या.

भिंगरी's picture

29 Sep 2014 - 11:55 pm | भिंगरी

?????????????