केमिकल लोच्या

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
3 Sep 2014 - 2:45 am

कोण रे तू?
मासाच्या गोळ्यात अडकलेला तू ,
त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष ,
बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे
अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू ,
कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस??
विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर....
येडा कुठला .... साक्षात्कार म्हणे ....आत्मिक विचारचक्र गरगर फिरतात...
बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ...
तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार ..
आतल्या खलबताशी गद्दारी करू नकोस...
विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला ....
लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना....
चार चौघांना पटणाऱ्या असतीलही ....
तू कशा आणणार रे चार चौघांना पटणाऱ्या भावना ,विचार

उगाच खदखदत राहत हे अतरंगी अंतरंग ...
खोदायला घ्याव तर आडवी येते सामाजिक बांधिलकी वगैरे....
साला सब केमिकल लोच्या है...
या मांसाच्या गोळ्यात ....

मुक्तक

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

3 Sep 2014 - 5:13 am | स्पंदना

.......!

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 9:36 am | कवितानागेश

विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला ....
लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना....
चार चौघांना पटणाऱ्या असतीलही ....
तू कशा आणणार रे चार चौघांना पटणाऱ्या भावना ,विचार
>>
हे आवडलं.

भिंगरी's picture

3 Sep 2014 - 10:27 am | भिंगरी

विचार ,भावना शब्दात नेमक लिहिण जमलं नाही कुणाच्या बापाला ....
लिहिणारे लिहोत त्यांच्या भावना....
साला सब केमिकल लोच्या है...
या मांसाच्या गोळ्यात ....

पण मात्र आपण नेमक्याच शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
मनाला स्पर्श करणाऱ्या.

फुंटी's picture

3 Sep 2014 - 1:01 pm | फुंटी

धन्यवाद

मुक्तछंदातला स्वसंवाद आवडला..
सुरेख !

>>>बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ...
तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार ..

हे वाचून कोणता डुआयडी असावा की काय अशी शंका येऊन गेली, बाकी मस्त जमलंय मुक्तक!!