Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

vrushali n's picture
vrushali n in काथ्याकूट
30 Aug 2014 - 7:04 pm
गाभा: 

नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये

आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला

thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx

बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत

PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत

CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत

हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?

जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount

पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?

आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??

आणी आम्ही आणखी काय करु शकतो?

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

3 Sep 2014 - 3:41 pm | धर्मराजमुटके

या उन्हाळ्यात डीमार्टमधून स्लाईस म्यान्गो ज्युसच्या बॉटल विकत घेतल्या. बॉटलच्या आवरणावर आतील बाजूस paytm चे २० रु. चे फ्री रिचार्ज कुपन होते. ते कोणताही मोबाईल रिचार्ज करताना वापरता येणे शक्य होते.

शक्यतो मी अशा ऑफरला बळी पडत नाही पण पेप्सिकोसारक्या प्रख्यात कंपनीने दिलेली ऑफर नक्कीच जेन्युईन असावी म्हणून मेहुण्याचे पंजाब न्याशनल ब्यांकेचे एटीम वापरुन ऑनलाईन ट्रान्झ्यक्शनने मोबाईल रिचार्ज केला.

१९ जून २०१४ ला मेहूण्याला त्या मोबाईलवर फोन आला आणी आम्ही रिजर्व ब्यांकेतून बोलत आहोत अशी बतावणी करुन ते त्याला एटीम कार्डचा नंबर विचारु लागले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे त्याचे पुर्ण नाव, मोबाईल नंबर, अकाऊंट नंबर इ. सर्व माहिती होती. ते कार्डचे शेवटचे चार अंक सांगा म्हणून मागे लागले होते. नाहीतर तुमचे अकाउंट बंद होईल असे सांगत होते. मेहूण्याने दोन तीन वेळा दाद दिली नाही तर ते वारंवार फोन करत होते. सगळे कॉल्स +918051278766 या नंबरवरुन आले होते मात्र दरवेळी इंटरनेटवर चेक केले असता त्याचे लोकेशन वेगवेगळे दाखवत होते.

शेवटी मेहूण्याने त्याला फोनवर बोलण्यात गुंग ठेऊन मित्राला एटीममधे पाठवून फोन चालू असेपर्यंत सगळी रक्कम काढून घेतली. व नंतर आम्ही पीएनबी ला मेल लिहून डेबीट कार्ड ब्लॉक करायला सांगीतले. ब्यांकेने कार्ड ब्लॉक केले पण आपणहून काही तपास केला नाही किंवा केला असल्यास आम्हाला कळविला नाही.

मेहूणा android phone वापरत असल्याने व त्याला त्यात अकाउंट न. इ. गोष्टी सेव्ह करुन ठेवायची सवय आहे. मला त्या गोष्टीवर शंका आल्याने मी त्याला असे रेकॉर्ड न ठेवण्याबद्दल बजावले. पण आज paytm चा किस्सा वाचून मला वेगळा संशय येतो आहे. असो. ऑनलाईन शॉपींग बद्दल सावधानता बाळगावी हेच खरे.

अवांतर : कालच दुकानातून बॉर्बॉन बिस्कीटचा पुडा विकत घेतला. त्यावर freecharge.in रु. १० चा फ्री रिचार्जची ऑफर आहे.

आता या सगळ्यात या कंपन्या जेन्युईन असतील पण डेटा कोठेतरी लीक होत आहे हे नक्की.

vrushali n's picture

3 Sep 2014 - 5:02 pm | vrushali n

सावध रहा लोकहो,रात्र वैर्याची आहे,असे म्हणन्याची वेळ आलिये

कार्ड ब्लॉक केलत ते उत्तम पण यात खरं तर बँकेचा संबध दूरान्वये आहे. तुम्ही पेप्सिकोला कळवलं असतं तर भन्नाट अ‍ॅक्शन झाली असती (आणि कदाचित कंपनीनं तुम्हाला `मोस्ट अलर्ट कस्टमर' म्हणून बक्षिस मिळालं असतं!)

>> बँकेचा संबध दूरान्वये आहे

+१

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2014 - 8:23 am | धर्मराजमुटके

ते तर खरेच आहे पण ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मेहूणा android phone वापरत असल्याने व त्याला त्यात अकाउंट न. इ. गोष्टी सेव्ह करुन ठेवायची सवय असल्यामुळे माझा प्राथमिक संशय त्या गोष्टीवर होता. आता ह्या धाग्यावर paytm चा उल्लेख आल्यामुळे मला अचानक ती गोष्ट आठवली.
मी जवळपास ३ वर्षे डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, NEFT वगैरे पद्धतीने व्यवहार करत आहे पण कधीही असा त्रास झाला नाही. मात्र मी अजून ऑनलाईन शॉपींगचे व्यवहार केलेले नाहित हे ही तितकेच खरे.

आज मलाबी समस आला.a/c मधन 94रु परस्पर वळते झाले. म्या घाबल्लो,बॅंकेत गेलो.मनाले फुकणीच्या मिनीमम बँलेस्न चा दंड हाय. जरा चार पैशे ठिवत जा खात्यात.

एफ आय आर दाखल झाला ते बरे झाले.

संक्षी सरांचा प्रतिसाद एकच खणखणीत

दशानन's picture

3 Sep 2014 - 10:23 pm | दशानन

मी काही बोलायचे की नाही बोलायचे याचा विचार करून आज लिहितो आहे.
*वरील घटनेबाबत मी माझे मत व्यक्त करत नाही आहे. मी फक्त माझे मत मांडत आहे.

१. माझ्या अल्प माहीतीनुसार सर्व कार्ड हे थ्री लेअर प्रोटेक्टेड असतात, जेव्हा ऑनलाइन खरेदीसाठी कार्ड वापरले जाते, तेव्हा एक OTP (One Time Password) हा कार्ड मालकाच्या मोबाईल व त्याने रजिस्टर केलेल्या ईमेलवर जातो.

२. अशी काही खरेदी झाली व तुमच्या लगेच लक्षात आले तर तुम्ही बँक व पेमेंटगेटवे येथे रिक्वेस्ट करून हा व्यवहार थांबवू शकता. कारण ऑनलाईन पेमेंटगेटवे चे T+2 Days हा सरकारी नियम आहे. आज पैसे कार्ड मधून कापले म्हणजे लगेच आजच विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. त्याला ३ वर्किंग दिवस लागतात.

३. तुम्ही तुमच्या कार्डची माहिती (डीटेल्स नाहीत) पेमेंटगेटवे यांच्या अधिकाऱ्याला देऊन मागवलेले प्रोडक्ट कुठे व कसे पाठवले गेले याची माहिती घेऊ शकता, कारण हा तुमचा हक्क आहे.

४. पोलीस, सायबर क्राईम इत्यादी नंतरच्या गोष्टी पण ह्या तर आपल्या हातात असलेल्या गोष्टी आहेत. आधी त्याचा विचार करून पहा.

*जाता जाता थोडे व्यक्तिगत - दोन वर्षापेक्षा जास्त जुना तुमचा आयडी मिपावर दिसतो आहे, तर कृपया लिहिताना वाक्यरचना व लेखन या कडे खरोखर लक्ष द्या.

vrushali n's picture

4 Sep 2014 - 7:08 am | vrushali n

मी लेखन सुधारायचे करेन आता,सध्या तरी एक एक वाक्य लिहायाला खुप वेळ लागतो आहे

आणी मला debit card नी online खरेदी करतांना one time password ची गरज नाही असे म्हणायचे होते,एकदा तुम्हाला सगळे पिन नं आणी इतर माहीती असली कि झाली,हे नेट बँकींग नाही,सरळ transaction झल्याच मेसेग फोन वर येतो

इतर तांत्रीक बाबींची चौकशी सुरु झाली आहे

निष्कारण मनःस्ताप आणि गोंधळ वाढत जाईल.

मला debit card नी online खरेदी करतांना one time password ची गरज नाही असे म्हणायचे होते

जर ऑनलाईन खरेदी असेल तर पीन नंबर फोनवर येतो आणि कार्ड स्वाईप असेल तर (तुमचा रेग्युलर) पीन, मर्चंट मशीनवर स्वतः एंटर करायला लागतो. प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनला PIN लागतोच. PIN शिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही.

मुक्त विहारि's picture

3 Sep 2014 - 10:32 pm | मुक्त विहारि

शेवटी आमचे बाबा म्हणतात तेच खरे...

"रोखीचा व्यवहार हाच खरा व्यवहार."

आदूबाळ's picture

3 Sep 2014 - 10:48 pm | आदूबाळ

फक्त रोखी म्हणजे काय हाच मुख्य प्रश्न आहे.

सेंट्रल बँकेने/सरकारने काढलेलं चलन हा "फियाट मनी" आहे. लुटुपुटीचा पैसा. सरकार जेवढं विश्वासपात्र तेवढंच चलन भक्कम.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Sep 2014 - 12:41 am | विश्वनाथ मेहेंदळे

बाबा इसविसन किती साली म्हणायचे ?

ऋतुराज चित्रे's picture

4 Sep 2014 - 11:34 am | ऋतुराज चित्रे

शंभरी पुर्ण झाली. आता १०१ % खात्यात पैसे जमा झाल्याची बातमी येइल, असे मी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मिपा वर एखादा धागा शंभरी पुर्ण करतो हे धाग्याचे यश समजले जाते. मदतीसाठी मिपाकरांनी आपणास मनापासून अनमोल सल्ले दिले. धाग्याची शंभरी पुर्ण झाल्यावर पैसे मिळाल्याची गोड बातमी आल्यास मिपाकरांना व आपणास शतकाचा मनमुराद आनंद घेता आला असता व नुसत्या अभिनंदनानी हा धागा त्रिशतकी झाला असता.

माझ्या प्रतिसादाची वाक्यरचना बदलून धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्, असे आपण चुकिचे लिहून मला टवाळखोर ठरवले.

खरं तर मी माझ्या प्रतिसादाच्या शेवटी ' शुभेच्छा ' असे टंकले असते तर आपला गैरसमज झाला नसता.

फक्त सकारात्मक प्रतिसादांकडे लक्ष द्या आपल्या प्रयत्नांना यश येउन बाबांचे सर्व पैसे परत मिळतील अशी मला खात्री आहे.

धर्मराजमुटके's picture

11 Sep 2014 - 8:53 pm | धर्मराजमुटके

ही बातमी जरुर वाचा.

मंदार कात्रे's picture

15 Sep 2014 - 7:33 pm | मंदार कात्रे

आयसीआयसीआय वाले दरवेळी लॉगिन केले की मोबाइल बँकिंग अ‍ॅप घ्या म्हणून मागे लागतात . परवा एका दिवसात तीन वेळा फोन करुन बेजार केले ... खरच एखाद्याची इच्छा नसताना अ‍ॅप वापरायला का भरीस पाडतात हे लोक? त्यात पुन्हा मोबाइल वरुन केलेले आर्थिक व्यवहार कितपत सेफ असतात हा प्रश्नच आहे ,कारण मोबाइल वरुन नेट सर्व्हिस देणार्या आयएसपी मध्येच सर्वात जास्त डेटा लीक होण्याची शक्यता असते असे मागे वाचलेले होते...जाणकार मार्गदर्शन करतील का?

मन१'s picture

15 Sep 2014 - 9:04 pm | मन१

बँक अधिकारी परिचयाचा आहे म्हणून त्याने दिलेली माहिती योग्य ठरत नाही.
तक्रार न करण्याच्या निर्णयाचा विचार करुन पहावा. पिलियन रायडर ह्यांनी तक्रार न करण्यातील धोके सांगितलेच आहेत.
तस्मात, तर्कानं विचार करुन पहावा.
शुभेच्छाअ. धाग्यानिमित्तानं मलाही दोन गोष्ती समजल्य तक्रार कुठे कशी करावी ह्याबद्दल.

रॉजरमूर's picture

25 May 2016 - 10:19 pm | रॉजरमूर

पुढे काय झाले ?

पैसे मिळाले का परत ?

vrushali n's picture

26 May 2016 - 6:39 pm | vrushali n

पोलीस अधिकारी दिल्लीला त्या पत्त्यावर जाउन आलेत एकदा, तो पत्ता खोटा होता म्हनाले...बघुयात आता

mayu4u's picture

6 Dec 2016 - 12:34 pm | mayu4u

यश मिळाले का?

अभिजित - १'s picture

26 May 2016 - 4:38 pm | अभिजित - १

पेटीम ने पैसे खाल्ले .. सावध राहा या असल्या भंकस साईट पासून

मित्रांनो,
वरील शीर्षकाचा धागा आत्ता सहज मिपावर पेरफटका मारताना वाचला आणि मला माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगाची आठवण झाली. म्हणून ती आठवण "हरवले ते गवसले का?" या माझ्या आवडीच्या धाग्यावर टाकतो म्हणजे इथे झालेल्या गर्दीतून वाट मिळेल... असो...

ससन्दीप's picture

27 May 2016 - 12:28 am | ससन्दीप

आपल्याला बर्‍याच वेळा अपरिचीत नंबर वरुन आपले क्रेडिट कार्ड अपग्रेडेशनचे फोन येतात. शक्यतो आपण ते टाळतो कारण बैंक कधीही फोनवर कस्टमरला स्वतःहून पिन वैगरे विचारत नाही. मध्यंतरी असाच एक काॅल आला होता माझे क्रेडिट कार्ड अपग्रेड होत असल्याचा आणि जर मी त्यांना योग्य माहिती दिली नाही तर कदाचित माझे कार्ड ब्लाॅक होईल. अर्थात मला एकही क्षण लागला नाही कि तो काॅल फ्राॅड आहे हे ओळखायला, म्हणून मी सहज त्याला विचारले कि, "लोग एसा ईजीली फस जाते है क्या?" त्यावर ती व्यक्ति म्हणाली कि' "येस सर, कभी कभी फसते है लोग!"
मी फोन कट केला.

संजय पाटिल's picture

27 May 2016 - 12:50 pm | संजय पाटिल

हाईट आहे बाबा...

प्रतिक्रिया वाचून एवढा मनस्ताप झाला कि मी शपथ
घेतली आॅनलाईन कार्ड वापरणार नाही.

पैसे भरून काढू हे समजले नाही

शिक्षणा चा काय संबध ???????

बँक मॅनेजर चा सल्ला प्रोफेशनल वाटत नाही. काही तरी गौड बंगाल वाटते. आपण ह्या बॅंकेतून पैसा त्वरित इतर ठिकाणी हलवावा. "चौकशी" ? हि कशाला ? तुमच्या वडिलांचा स्वभाव आणि वय पाहून बँक मॅनेजर काहीबाही सल्ल्ले देत आहे असे वाटते. डेबिट कार्ड वापरून आपले वडील काय न्यूक्लिअर वेपन घेत होते जी त्यांना भ्यायची गरज आहे ? उलट रिटायर्ड माणसाचे पैसे चोरणे हा जास्त सिरीयस गुन्हा आहे, पोलीस तुम्हाला नक्कीच सहानुभूती दाखवतील. बँक मॅनेजर बायकोने घालवलेल्या लाखो रुपयांची वसुली आपल्या कडून तर करत नाहीत ना अशी शंका येते.

ह्या शिवाय सामान्य डेबिट कार्डवर १०-२० हजारांचे लिमिट असते ना ? ४३ हजार कसे गेले ? ह्या शिवाय १० हजारा पेक्षा मोठ्या कार्ड ट्रान्सक्शन वर विकत घेणार्यांचे ओळखपत्र कॉपी मर्चंट ने ठेवणे आवश्यक आहे (कदाचित डेबिट कार्ड साठी आवश्यक नसेल पण क्रेडिट कार्ड साठी आवश्यक आहे) . पोलिसांत तक्रार दिल्यास पोलीस फक्त एक फोन करून हि माहिती मिळवू शकतात.

बहुतेक लोकांना क्रेडिट कार्डची भीती वाटते पण खरे तर कुठल्याही ट्रांसकशन्स साठी क्रेडिट कार्ड वापरावे हे नेहमीच चांगले. क्रेडिट कार्डला जास्त चांगले फ्रॉड प्रोटेक्शन असते.

कृपया PayTM इत्यादी app वापरू नये. PaytM आपला डेटा इतर कंपनींना विकते. त्यांची प्रायव्हसी पॉलिसी वाचा. Paytm != क्रेडिट कार्ड. बँक कायद्याने आपल्या कुठल्याही ट्रान्सक्शन ची माहिती इतर लोकांना देऊ शकत नाही. ह्या उलट Paytm पाहिजे तर हि व्यक्ती दर महिन्याला औषधावांर २००० रुपये खर्च करते, अमुक व्यक्तीने मनोचिकित्सकाला अमुक पैसे दिले इत्यादी माहिती विकून पैसा करू शकते. १० रुपयांच्या फ्री रिचार्ज साठी कृपया आपली बहुमूल्य माहिती इतरांना देऊ नका.

हे नवीनच कळलं..

साहना's picture

6 Dec 2016 - 4:02 pm | साहना

https://pages.paytm.com/privacy.html

We use personal information to provide you with services & products you explicitly requested for, to resolve disputes, troubleshoot concerns, help promote safe services, collect money, measure consumer interest in our services, inform you about offers, products, services, updates, customize your experience, detect & protect us against error, fraud and other criminal activity, enforce our terms and conditions, etc.
We also use your contact information to send you offers based on your previous orders and interests.
We may occasionally ask you to complete optional online surveys. These surveys may ask you for contact information and demographic information (like zip code, age, gender, etc.). We use this data to customize your experience at Paytm, providing you with content that we think you might be interested in and to display content according to your preferences.

Consent

By using Paytm and/or by providing your information, you consent to the collection and use of the information you disclose on Paytm in accordance with this Privacy Policy, including but not limited to your consent for sharing your information as per this privacy policy.

We are required to make an automated IVR or a manual verification call to the customer for every cash on delivery (COD) order placed. You will receive this verification call even if your number is registered for the Do Not Disturb (DND) option.