जुना किस्सा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Aug 2014 - 7:21 am

एक जुना किस्सा आहे...
उद्योजक असताना ब्यांके कडुन कर्ज घेतले होते..नियमाप्रमाणी क्वारट्रली "इंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."ईंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाहि.."
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यानं पगारा साठी पैशाची गरज लागली... खंडणी वसुलीसाठी स्वार शत्रू पक्षाकडे गेले होते.
पण त्यांच्या कडूनं काही खबर आली नव्हती..
सैन्याच्या पगाराचा दिवस जवळ येत चालला होता.व अधिकारी वर्ग चिंतेत होता...
पगाराचा दिवस आला..पण खंडणी घेऊन स्वार आले नव्हते .. सकाळी कारभारी वर्ग पेशव्या कडे गेले व नाईका कडूनं पगाराची रक्कम कर्जाऊ घेण्याचे ठरले...नाईकांना निरोप गेला
व त्या प्रमाणे नाईक रक्कम कागद पत्रे घेऊन दरबारात आले..
पेशवे दस्त ऐवजावर सह्या करणार इतक्यात दूत दरबारात आला व स्वार स्वारगेट जवळ खंडणीची रक्कम घेऊन पोहोचले आहेत व कोणत्याही क्षणी शनवार वाड्यावर येतील अशी खबर पेशव्यांना दिली...
पेशव्यांचा जीव भांड्यात पडला व सोय झाली त्या मुळे त्यांनी नाईकांचे आभार मानले व कर्जाऊ रक्कम नको म्हणून सांगितले..
यावर नाईक म्हणाले "हरकत नाही श्रीमंत पण तिजोरीच्या बाहेर काढलेली रक्कम व्याजा सकटच तिजोरीत जाते असा आमचा नियम आहे त्या मुळे किमान १ दिवसाचे तरी व्याज द्यावेच लागेल...
यावर घासाघीस व तंटा झाला पण शेवटी नाईकांनी एका दिवसाचे व्याज वसूल केले अन मगच शनिवार वाडा सोडला.

जीवनमान

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Aug 2014 - 10:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे तंटा केला नसता तर नाईकांना घंटा व्याज मिळाले नसते.
घ्या, तंटा नाय तर घंटा नाय चा अर्थ ;-)

बॅटमॅन's picture

30 Aug 2014 - 11:44 am | बॅटमॅन

हा हा हा =)) धन्य _/\_

अजया's picture

30 Aug 2014 - 4:17 pm | अजया

:-))

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Aug 2014 - 12:45 pm | पुण्याचे वटवाघूळ

स्वारगेट हे नाव पेशव्यांपासूनच्या काळात होते? गेट या शब्दावरून वाटते की ते नाव इंग्रजांच्या काळात पडले असावे. पेशव्यांच्या काळात सध्याच्या स्वारगेटजवळील गुलटेकडी भागात सुमेरसिंग आणि खरकसिंग गारदी यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल फाशी दिले होते.तेव्हा त्याकाळी गुलटेकडी या नावाचे अस्तित्व होते हे मान्य पण स्वारगेटही?

बाकी जुना किस्सा आवडला

मुक्त विहारि's picture

30 Aug 2014 - 2:46 pm | मुक्त विहारि

मिपावर पण असेच आहे....

प्रत्येक धाग्याला, प्रतिसाद हा मिळतोच...

धाग्यातला आषय जितका लोकप्रिय तितके प्रतिसाद भरपूर...