नॉन लेव्हल प्लेइंग गेम

ऋतुराज चित्रे's picture
ऋतुराज चित्रे in काथ्याकूट
28 Aug 2014 - 11:10 pm
गाभा: 

क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे. या उलट उंच उडी ,लांब उडी आणि धावण्याच्या स्पर्धेत वजन आणि उंचीचे बंधन नसते.कोणत्याही व्यक्तीची उंची ठराविक वयापर्यंत वाढते त्यानंतर ती स्थिर राहते.त्यामुळे कोणालाही आपल्या उंचीमध्ये नैसर्गिकरित्या फेर-फार करता येत नाही आणि येथेच काही कमी उंचीच्या खेळाडूंवर अन्याय होतो. कमी उंचीच्या खेळाडूंची जास्त उंचीच्या खेळाडूंबरोबर स्पर्धा लावल्याने खेळाडूच्या नैसार्गिक सामर्थ्याची कसोटी लागत नाही.

सारख्याच उंचीच्या दोन खेळाडूत एकाचे पाय लांब व कमरेवरील धड लहान व दुसर्याचे पाय छोटे व धडाची उंची जास्त असू शकते. अशा वेळी उंच उडी लांब उडी व धावण्याच्या खेळात लांब पाय असलेल्या खेळाडूला छोटे पाय असलेल्या खेळाडूपेक्षा कमी श्रम व अधिक फायदा होतो.सारख्याच उंचीच्या खेळाडूंनी दोन पायात समान कोन ठेवून धावले असता लांब पायाचा खेळाडू हा छोट्या पायाच्या खेळाडूपेक्षा अधिक आंतर कापतो.दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, परंतु पावलातील अंतरातील फरकामुळे बरोबरी साधण्यासाठी छोट्या पायाच्या खेळाडूला पायांची जास्त हालचाल करावी लागते, त्यामुळे शरीरातील जास्त उर्जा खर्च पडते उदा: १० पावलात उंच पायाचा खेळाडू ३० फूट अंतर कापत असेल ( पावलातील अंतर ३ फूट धरू ) तर छोट्या पायाचा खेळाडू १० पावलात २५ फूट अंतर कापेल ( पावलातील अंतर २.५ फूट धरू ) म्हणजे छोट्या पायाच्या खेळाडूला बरोबरीने धावण्यासाठी ३० फुट अंतर कापण्यासाठी २ पावले अधीक टाकावी लागतील,यासाठी त्याला अधिक वेगाने पायांची हालचाल करावी लागेल अधिक हालचाल म्हणजे अधिक उर्जा,अधिक उर्जा खर्च झालामुळे अधिक थकवा त्यामुळे खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.येथे २ खेळाडूंच्या शरीरातील समान उंची परंतु पायाच्या असमान उंचीमुळे या खेळाडूंवर खेळामध्ये समान पातळीवर स्पर्धा होते असे मला तरी वाटत नाही.

प्रतिक्रिया

अगोचर's picture

29 Aug 2014 - 12:40 am | अगोचर

त्या संदर्भात अजुन काही विचार आले -

स्त्री पुरुष भेदभाव बक्षिसाची रक्कम / मोबदल्या बाबतित दिसून येतो. सर्व साधारणपणे स्त्रियांच्या त्याच स्पर्धेसाठी कमी बक्षीस असते. म्हणजे मॅरेथॉन मधे स्पर्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वान्ना तेवढेच अंतर पळावे लागते. त्यातही स्त्रियांची क्षमता निकलांवरुन कमी दिसुन येते आणि हेच त्याचे कारण असावे.

समान स्पर्धेला अपवाद म्हणुन टेनिस हे एकच उदाहरण मला आत्ता आठवते, ज्याच्यामधे पुरुषांना पाच सेट खेळावे लागतात, पण स्त्रियांच्या सामन्याचा निकाल तीन सेटांमधेच लागतो. अर्थात जास्त (वेळ) करमणुक केल्याबद्दल त्यांना जास्ती मोबदला मिळाला तर काहीतरी कारण आहे. या रकमेचा अपवाद म्हणजे अमेरिकन ओपन, उदारमतवाद्यांनी अनेक वर्षें पाठपुरावा करून दोनही विजेत्याना मिळणारी रक्कम समान करून घेतली. पण वरील कारणासाठी (तीनच सेट) काही स्त्रिमुक्तीवाद्याच्या मते हा स्त्रियांचा अपमान आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2014 - 9:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

Anthropometry data collect Karun mag tyaoramane spardha lavatchya ka?

ऋतुराज चित्रे's picture

29 Aug 2014 - 10:45 am | ऋतुराज चित्रे

योग्यच राहील. कोणावरही अन्याय होनार नाही.

आदूबाळ's picture

29 Aug 2014 - 2:16 pm | आदूबाळ

माल्कम ग्लॅडवेलच्या "आउटलायर्स" मध्ये असं काहीतरी वाचल्याचं स्मरतं आहे.

रामपुरी's picture

30 Aug 2014 - 2:10 am | रामपुरी

खेळात पण आरक्षण ठेवायचं म्हणताय... हरकत नाही. तेवढंच एक राहीलय. आचारसंहिता लागू व्हायच्या आधी मागणी करा. मिळून जाईल.

ऋतुराज चित्रे's picture

30 Aug 2014 - 2:03 pm | ऋतुराज चित्रे

वजनानुसार गट चालतात मग उंचीनुसार का नको ?

vikramaditya's picture

30 Aug 2014 - 4:48 pm | vikramaditya

खेळात शारीरीक श्रमांचा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही प्रथम १० खेळाडुंमध्ये ELO रेटींग प्रमाणे कोणा महिला
खेळाडुचा समावेश झालेला दिसत नाही.
Why So?

आदूबाळ's picture

31 Aug 2014 - 3:01 pm | आदूबाळ

ज्युडिथ पोल्गर?

ऋतुराज चित्रे's picture

31 Aug 2014 - 3:17 pm | ऋतुराज चित्रे

माल्कम ग्लॅडवेलचे "आउटलयर्स" आजच वाचायला घेतले.

नितिन थत्ते's picture

31 Aug 2014 - 7:56 am | नितिन थत्ते

>>दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात,

हे पूर्ण चूक आहे.
ज्याचे पाय लांब असतील त्याच्या पायांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे त्याला समान कोन साधण्यासाठी जास्त श्रम लागतील. ऑव्हरऑल दोघांना समान* श्रम लागतील.

*गणित तितके सोपे नसावे. पण लांब पायवाल्याला अनड्यू फायदा मिळत नसावा.

ऋतुराज चित्रे's picture

31 Aug 2014 - 3:07 pm | ऋतुराज चित्रे

मोमेंट ऑफ इनर्शियामुळे असमान उंचीबाबत बरचसा गैरसमज दूर झाला. परंतू वस्तुमान हा घटक विचारात घेतल्यामुळे हा मुद्दा आता वजनाकडे वळतो.

अन्या दातार's picture

31 Aug 2014 - 10:45 pm | अन्या दातार

वजन कंट्रोल करणे ठराविक प्रमाणात शक्य असते. तिथे लेव्हल प्लेयिंग फिल्ड आपोआपच मिळत नाही का?

ऋतुराज चित्रे's picture

1 Sep 2014 - 10:58 am | ऋतुराज चित्रे

वजन व पायांच्या उंचीप्रमाणे गट पाडले तर थोड्याफार प्रमाणात शक्य आहे. वजन व उंचीमुळे एकाच गटात सर्वांंना ठेवल्यास समान संधीचा गुंता अधिक वाढू शकतो. कारण मोमेंंट ऑफ इनेर्शियावर संपुर्ण शरिराच्या वस्तुमानापेक्षा केवळ पायांच्या वस्तुमानामुळे परिणाम होतो.

अन्या दातार's picture

1 Sep 2014 - 3:33 pm | अन्या दातार

एवढी गुंतागुंत बघून लोक या स्पर्धेतूनच काढता पाय घेतील तिच्या मायला ;)

हाडक्या's picture

1 Sep 2014 - 4:01 pm | हाडक्या

जर उन्चीमुळे कोणी या खेळात जिंकू शकला असता तर सगळे लंबूटांग य खेळात रेकॉर्ड करीत असलेले दिसले असते.
मूळ गृहितक दिशाभूल करणारे आहे.
याला जर नियम करावयाचे म्हटले तर धावण्याच्या स्पर्धा, उंच उडी, बास्केटबॉल इत्यादि खेळातदेखील असेच म्हणावे लागेल.

विजुभाऊ's picture

1 Sep 2014 - 4:10 pm | विजुभाऊ

डी एन ए सारखे असणे हा निकष लावला तर बरेचसे वाद निर्माण होणार नाहीत.तसेच मायक्रो लेव्हल वर अन्याय होण्याचीसी शक्यता मावळेल

डीएनए सारखे असणे या निकषालाच बहुदा रेसिझम म्हणत असावेत ;)

बॅटमॅन's picture

1 Sep 2014 - 6:22 pm | बॅटमॅन

ठ्ठो!!! =)) =)) =))

मार्मिक गोडसे's picture

3 Sep 2014 - 2:31 am | मार्मिक गोडसे

१९८४ ते २०१२ पर्यंतच्या ऑलिम्पिकच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची उंची ६ फुटापेक्षा अधिक होती, अपवाद फक्त २००० ऑलिम्पिकचा.

१) १९८४ कार्ल लुईस - उंची ६'.३" (८१ कि.ग्रा.) वेळ - ९.९९ सेकंद

२) १९८८ कार्ल लुईस - वेळ - ९.९२ सेकंद

३) १९९२ लिंफोर्ड क्रिस्टी - उंची ६'.२" (९२ कि.ग्रा. ) वेळ- ९.९६ सेकंद

४) १९९६ डोनोवन बेली - उंची ६'.१" (९१ कि.ग्रा.) वेळ - ९.८४ सेकंद

५) २००० मॉरीस ग्रीन - उंची ५'.९ १/२ " ( ७५ कि.ग्रा.) वेळ- ९.८७ सेकंद

६) २००४ जस्टीन गॅटलीन - उंची ६'.१" ( ८३ कि.ग्रा.) वेळ - ९.८५ सेकंद

७) २००८ उसेन बोल्ट - उंची ६.'५" ( ९४ कि.ग्रा.) वेळ - ९.६९ सेकंद

८) २०१२ उसेन बोल्ट - वेळ - ९.६३ सेकंद

जास्त उंचीमुळे खेळाडूला कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा हवेचा अधिक प्रतिकार करावा लागतो. परंतु सरावाने तो धावण्याच्या शैलीत बदल करून त्यावर मात करू शकतो.

उंच खेळाडूला पायाच्या वस्तुमानामुळे ढांग (स्टेप) टाकण्यासाठी कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक उर्जा लागते.

मोमेंट ऑफ इनर्शियामुळे खरे तर कमी उंचीच्या खेळाडूंना अधिक फायदा व्हायला पाहिजे. परंतु ऑलिम्पिकच्या निकालात तसे आढळत नाही.

उंच खेळाडू १०० मीटर अंतर कमी उंच खेळाडूपेक्षा कमी ढांगेत पार करतो .( पायाच्या उंचीतील फरकामुळे ).

धावताना पायाचा जेव्हा जमिनीशी संपर्क होतो तेव्हा काही क्षणापुरता जमिनीच्या प्रतिकारामुळे वेग कमी होतो.

खेळाडूला जोर लावून पुढची ढांग टाकावी लागते. उंच खेळाडूला शरीराच्या वस्तुमानामुळे कमी उंचीच्या खेळाडूपेक्षा अधिक जोर लावावा लागतो. सरावाने तो पायाची हालचाल व जमिनीवर पायाचा जोर ह्यात वाढ करू शकतो.

कमी उंचीच्या खेळाडूने कितीही पायाची हालचाल जोरात केली तरी तो १०० मीटर अंतर कमी ढांगेत पार करू शकत नाही , कारण पायाची लांबी सरावाने वाढू शकत नाही.

उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ९.५८ सेकंद नोंदवली होती.

बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.)

१०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही.

ऑलिम्पिकच्या निकालावरून स्पष्ट दिसते धावण्याच्या स्पर्धेत उंच खेळाडूच जिंकतात. त्यामुळे कमी उंचीच्या खेळाडूंना उंच खेळाडूंबरोबर स्पर्धा लावून त्यांचावर अन्याय केला जातो. ६ फुट उंच खेळाडूबरोबर साडे पाच फुट उंच खेळाडूची स्पर्धा लावणे हे चुकीचेच आहे. शेवटी शारीरिक मर्यादा येतातच.

अवांतर : घोड्यांच्या शर्यतीत घोड्याची डीएनए चाचणी केली जाते.

ठ्ठो... धावा आता ...

vikramaditya's picture

3 Sep 2014 - 10:21 am | vikramaditya

सहमत...

ऋषिकेश's picture

3 Sep 2014 - 10:25 am | ऋषिकेश

नाही पटले
उंचीच का? श्रवणशक्ती, दृश्यमानता वगैरे घटक का नको? जर दृश्यमानता समसमान करायला लेन्स हे अतिरिक्त साधन वापरले दिले जाते, तर उंची वाढवायला अधिक उंचीचे बुट व/वा इतर काहीतरी रोचक उपाय (पटकन सुचत नाहीये, पण जरा विचार केला तर मिळेलच) करून लेव्हल प्लेइंग फिल्ड बनवावे काय? अशी यादी कितीही वाढवता येईल. कोणत्याही दोन व्यक्तीत काहीतरी अधिक उणे असणारच. सर्वार्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड मिळाणे अशाने अशक्य होत जाईल

प्रसाद१९७१'s picture

3 Sep 2014 - 10:40 am | प्रसाद१९७१

तुमच्या लॉजिक प्रमाणे आता परिक्षा पण विद्यार्थ्यांच्या IQ च्या बेसिस वर गट पाडुन घेतल्या पाहीजेत.
१००-११० IQ चा एक गट ११०-१२० IQ चा दुसरा गट.

त्याहुन पुढे जाउन मग IQ+उंची अश्या बेसिस वर खेळात गट पाडावेत.

काय चाललय काय?

हाडक्या's picture

3 Sep 2014 - 7:17 pm | हाडक्या

जगात नवीन गट-तट आणि जातिव्यवस्थेची रचना होऊ घातलीये. ;)

ऋतुराज चित्रे's picture

25 Dec 2014 - 10:31 am | ऋतुराज चित्रे

मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया वाचल्यावर मी माझ्या इंजिनिअर, डॉक्टर व शिक्षक मित्रांशी चर्चा केली. बरेचजणांनी प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली.
बोल्टने जेव्हा हे १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले तेव्हा ५.२९ सेकंद त्याने जमिनीला स्पर्श केला नव्हता. ( इतका वेळ तो हवेत होता.)

१०० मीटर अंतर त्याने ४१ ढांगात कापले. म्हणजे एका ढांगेत त्याने सरासरी ८ फूट अंतर पार केले. अशी कामगिरी कमी उंचीच्या खेळाडूला उंचीच्या मर्यादेमुळे शक्य नाही.

कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग इ. खेळप्रकरात वजनाप्रमाणे अनेक गट असतात तसे उंचीप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेत गट पाडले तर कमी उंचीच्या खेळाडूंना प्रोस्ताहनच मिळेल.

मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया मला अधिक समतोल वाटली.