एकच तर जिंदगी हि
बालपण मार खाण्यात गेल
जवानी अभ्यास करण्यात
अभ्यास करण्याच्या वयात प्रेम केलं
आन आयुष्य घातलं खड्ड्यात
म्हणतात आपलं भविष्य आपण ठरवतो
पण हे कोण सांगणार त्या गरीब मुलाला
कि त्यावर ९५ टक्के प्रभाव
घरात्ल्यांचाच असतो
स्वप्न बघायला मन उघडं असते
पण हे पण ऐका लोक्कांनो
त्या पक्षीच्या शेपटीला एक दोरी पण बांधलेली असते
आकाशाला जरी सीमा नसली तरी
आता तुमच्या स्वप्नांना सीमा असते
मजा करण्याचा वय त्या मुलाचं
डिप्रेशन मध्ये अडकला
सगळ्या चिंता विसरण्याचा सोडून
प्रेयसीच्या रुसव्या-फुग्व्यान मध्ये लटकला
हे म्हणजे आधीचा मर्कट त्यावर मद्यप्याला
रस हळू हळू उडत जाई जीवनाचा
इतक्या डिप्रेशन मध्ये पाहून
सोडून गेली कि हो ती त्याला
प्रेयसी गेली सोडून
घरातल्यांशी तो भांडला
मित्र मात्र अजूनही होते
पण ह्याने आत्महत्येचा पर्याय निवडला
चांगला मुलगा होता हो तो
कधीही कसला व्यसन नाही केलं
चूक काय त्याची तर फक्त एवढीच
कि त्याने मोठं स्वप्न बघितलेलं
मुलाची काळजी वाटणा स्वाभाविक आहे
पण काळजी प्रगती च्या आड येऊ नये
मुलां वर वचक असणं गरजेचा आहे
पण ते वचक त्याला गैर मार्गाला लाऊ नये
गगन भरारी मारण्याची इच्छा पोटी धरणारा
जगाच्या वर स्वताच्या मानाने उडणारा
आकाशात राज करण्यची इच्छा असलेला पक्षी होता तो
पण दुसर्याच्या मर्जीवर उडणारा पतंग बनला होता तो
जर कधी त्याची दोरी तुम्ही सोडली असती
तर कळलं अस्त किती मोठा गुन्हा केलात
तर जाणवला अस्त तुम्हाला पालकांनो
कि गरुडाला पोपट बनवून पिंजर्यात ठेवत आलात
जीव द्यायला निघालेला तो
भेटला तिकडे मित्र त्याला
एकच तर जिंदगी हि, मित्र म्हणाला
मुलगी काय सोडून गेली
निघालास लगेच जीव द्यायला
एकदाच जगायला मिळतं मित्रा
आणि ते जीवन फक्त तुझच अस्त
मारताना आयुष्य डोळ्या दामोरून जातं
तेव्हा आठवणीन शिवाय जुनं कोणीच बरोबर नसतं
एक जिंदगी मिळालेली
आज उडी मारून जीव देणार तू
एकच जिंदगी मिळालेली
अशी का संपवणार तू
एकच जिंदगी मिळते मित्रा
जा उरलेल्या जिंदगीला सजव
आयुष्य हे एक पुस्तक आहे मित्रा
त्याला वाचण्याचा अनुभव अविस्मरणीय बनव
प्रतिक्रिया
25 Aug 2014 - 6:55 pm | अजय जोशी
यावर माझ्या दोन ओळी आठवल्या...
प्रेमभंग झाला तया वाटे जीवन संपले...
प्रेम असे जीवनावर त्याचे वय होत नाही..!
27 Aug 2014 - 3:08 pm | विवेकपटाईत
आयुष्य हे एक पुस्तक आहे मित्रा
त्याला वाचण्याचा अनुभव अविस्मरणीय बनव
आवडलं <
http://vivekpatait.blogspot.in/2011/05/blog-post_10.html
27 Aug 2014 - 4:45 pm | सूड
>>एकच जिंदगी मिळते मित्रा
जा उरलेल्या जिंदगीला सजव
आयुष्य हे एक पुस्तक आहे मित्रा
त्याला वाचण्याचा अनुभव अविस्मरणीय बनव
हे विशेष वाचनीय!! लिहीत राहा.