क्रिम पफ Swans

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
24 Aug 2014 - 10:59 pm

.

साहित्य Choux पेस्ट्रीसाठी:

१/२ वाटी मैदा
१/२ वाटी पाणी
१/४ वाटी अनसॉल्टेड बटर
२ अंडी
१/४ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून साखर (ऑपश्नल)

.

पाकृ:

एका नॉन-स्टीक पॅनमध्ये पाणी. मीठ व बटर एकत्र करुन गरम करायला ठेवावे.
पाण्याला उकळी आली की गॅस बंद करुन त्यात मैदा घालून मिश्रण एकत्र घोटून घ्यावे. (उकड काढतो त्याप्रमाणे)
मिश्रण एकत्र होऊन गोळा तयार झाला की दुसर्‍या भांड्यात ते काढावे व सतत चमच्याने हलवत रहावे.
त्यात साखर घालून एकत्र करावे.

.

मिश्रण जरा गार झाले, साधारण दहा मिनिटांनी त्यात एक अंडे फोडून घालावे व एकत्र करावे जोपर्यंत ते एकजीव होत नाही.
मग दुसरे अंडे फोडून घालावे व ते ही एकत्र करावे जोपर्यंत मुलायम मिश्रण तयार होत नाही.
ओव्हन २०० डीग्री सें वर प्री-हिट करायला ठेवावा.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावावा. असे दोन ट्रे तयार करावे.
पायपिंग बॅगमध्ये थोडे मिश्रण भरून घ्यावे.

.

पायपिंग बॅगने लंबगोलासारखे आकार (Swanच्या शरीराचा आकार)काढून घ्यावे. जर शेवटी टोक आले असल्यास पाण्याच्या बोटाने ते हलके चपटे करावे.
२०० डिग्री सें वर २०-२५ मिनिटे बेक करायला ठेवावे.
बेक झाले की कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी ठेवावे.
दुसर्‍या ट्रेवर इंग्रजी आकडा 2 जरा वाकडा काढावा ( Swanच्या मानेसारखा).
त्या आकड्याला डोक्यासारखे गोल आकार पाईप करुन घ्यावे व ओव्हन मध्ये २०० डिग्री सेंवर १०-१२ मिनिटे बेक करावे.

.

साहित्य सजावटीसाठी:

१ वाटी फ्रेश क्रिम
१/४ वाटी पेक्षा कमी साखर
व्हॅनिला एसेन्स

.

पाकृ:

क्रिम फेटणार ते भांडे काही तास आधी फ्रिजमध्ये गार करत ठेवावे तसेच हँड मिक्सर चे बीटर्स ही गार करत ठेवावे, असे केल्याने क्रिम लवकर फेटले जाते.
भांड्यात क्रिम ओतून मिडियम स्पीडवर फेटायला घ्यावे.
सॉफ्ट पीक्स आले की त्यात साखर व व्हॅनिला एसेन्स घालून थोडे घट्ट होईल इतके फेटावे.
पायपींग बॅगमधून पाईप करता आले पाहीज इतके फेटावे.

.

असेंब्लिंगः

तयार Swanच्या शरीराच्या आकराचे पफ्स घेऊन , वरून अलगद अर्धवट कापा.
कापलेल्या भागाचे दोन भाग करा, म्हणजे त्याचे पंख तयार होतील.
पोटाकडचा भाग जो आतून पोकळ आहे त्यात फेटलेले क्रिम भरा.
अलगद पंख लावा व 2 आकड्याचा शेवटचा भाग त्यात अलगद रोवून घ्या.

.

सर्व्हिंग प्लेटवर ठेवून त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुर्रून सर्व्ह करा Cream Puff Swans :)

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

24 Aug 2014 - 11:04 pm | सुहास झेले

कौतुक करायला शब्द नाहीत... सलाम ह्या चिकाटी आणि सादरीकरणाला !!

शिद's picture

25 Aug 2014 - 1:42 pm | शिद

असेच म्हणतो.

_/\_

सस्नेह's picture

25 Aug 2014 - 4:06 pm | सस्नेह

आ करून पाहातच राहिलेय..

ब़जरबट्टू's picture

27 Aug 2014 - 9:13 am | ब़जरबट्टू

हेच म्हणतो.. पहिल्याच फोटोला डोळे वासलेच.. सलाम तुमच्या चिकाटीला...:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Aug 2014 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सानिकाताई हॅट्स ऑफ

_/\_

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 11:08 pm | मुक्त विहारि

जबरा कलाक्रुती...(आता ह्याला काय पाकक्रुती म्हणणार?)

बादवे,

हा प्रकार खायचा पण असतो का?

इतका सुंदर दिसत आहे की, असे वाटते, नुसते बघत रहावे.

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 11:21 pm | प्यारे१

नाद खुळा....!
टोपी काढली आहे.
भन्नाट पाकृ. तुला एक प्यार्टी लागू.

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 11:39 pm | प्यारे१

बाकी ते Swan म्हणजे बघा आपलं राजहंस की वो!
एका तळ्यात होती बदके गाण्यातलं.

साष्टांग नमस्कार तुला!!!! बापरे.....काय पाककृती, प्रेझेंटेशन आणि चिकाटी!!!!!!!!!!
नुसते बघत रहावेसे वाटतात - खायची हिम्मतच होणार नाही. :-)

___/\___

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 1:57 am | डॉ सुहास म्हात्रे

निशब्द !

तुम्ही नक्की काय करता पाकृ की कलाकारी?

माझं मत : दोन्हीही... आणि दोन्हीही उच्च प्रतिच्या !!!

टिवटिव's picture

25 Aug 2014 - 3:03 am | टिवटिव

___/\___

ही कलाकृती खायची की बघायची?
केवळ भन्नाट!

अजया's picture

25 Aug 2014 - 8:05 am | अजया

तुझ्याकडे येऊनच खाईन म्हणते!या जन्मी तरी एवढे कष्ट घेउन अशी पाक कला कृती करणे मला शक्य दिसत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2014 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा

हायला... कस्ला भारी केलाय दो हंस का जोडा... ! :)

दिपक.कुवेत's picture

25 Aug 2014 - 10:30 am | दिपक.कुवेत

भरलीये. करायची गोष्ट तर कोसों दुर!!! शेवटचा फोटो तर पार खल्लास आलाय. उचला रे मला...

सानिकास्वप्निल's picture

25 Aug 2014 - 4:37 pm | सानिकास्वप्निल

चक्क तूला धडकी भरली (गोड) बघून !!!!
तू तर डिझर्ट किंग आहेस ;)

प्रतिसादासाठी धन्यवाद रे __/\__

यशोधरा's picture

25 Aug 2014 - 11:06 am | यशोधरा

ताई, हातांचा फोटो पाठवा. देव्हार्‍यात लावून दर्शन घेईन म्हणते रोज!

कवितानागेश's picture

25 Aug 2014 - 6:58 pm | कवितानागेश

मल सोबत ३-४ हंस पण पाठवून दे. ;)

मृत्युन्जय's picture

25 Aug 2014 - 11:19 am | मृत्युन्जय

____/\_____
____/\_____
____/\_____

बाकी काहिच बोलायचे नाहिये,

मधुरा देशपांडे's picture

25 Aug 2014 - 11:31 am | मधुरा देशपांडे

असेच म्हणते. शब्द नाहीत.

पांथस्थ's picture

25 Aug 2014 - 12:41 pm | पांथस्थ

क.ड.क.!!!!

पियुशा's picture

25 Aug 2014 - 12:50 pm | पियुशा

१ नम्बर !!!!!!!

पुन्हा एकदा सपशेल दंडवत. _/\_

सौंदाळा's picture

25 Aug 2014 - 1:43 pm | सौंदाळा

अवर्णनीय

पिंगू's picture

25 Aug 2014 - 1:54 pm | पिंगू

निव्वळ अप्रतिम..

अप्रतिम दिसतायत. आता मला लंच नंतर dessert साठी पाठवुन दे. :)

पाककलेसोबत आपली चित्रकलाही सुंदर असावी असे निरीक्षण नोंदवतो, त्याशिवाय असे सुबक आणि प्रमाणबद्ध हंस करता येणं शक्य नाही.

सविता००१'s picture

25 Aug 2014 - 2:25 pm | सविता००१

झक्कास. पहात बसावेसे वाटत आहेत

पिलीयन रायडर's picture

25 Aug 2014 - 2:35 pm | पिलीयन रायडर

निव्वळ अप्रतिम...!!!!!!!!!

भाते's picture

25 Aug 2014 - 2:58 pm | भाते

हे खायचं सुध्दा असतं का? हे असले प्रकार फक्त लग्नामध्ये रुखवतात शोभेच्या वस्तु म्हणुन करतात अशी आत्तापर्यंत माझी समजूत होती.

बाकी पाकृ आणि फोटो बघितले, आवडले इ. इ.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

अप्रतिम.. . बाकी शब्दच संपले.

सानिकास्वप्निल's picture

25 Aug 2014 - 4:40 pm | सानिकास्वप्निल

सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार __/\__
:)

मनीषा's picture

25 Aug 2014 - 6:15 pm | मनीषा

सुरेख .. !

अनन्न्या's picture

25 Aug 2014 - 6:22 pm | अनन्न्या

अप्रतिम!

प्रचेतस's picture

25 Aug 2014 - 9:49 pm | प्रचेतस

कलाकार आहात. _/\_

अर्धवटराव's picture

25 Aug 2014 - 10:56 pm | अर्धवटराव

एखाद्या कलेत कुणि किती निपुण असावे याला काहि मर्यादा??? कसलं जबरी सादरीकरण...आणि किती प्रचंड हौस म्हणावी हि. शब्द सुचत नाहित तारीफ करायला.

या व्यतिरिक्त करू काय शकणार म्हणा, अशी इतकी अफाट सुंदर कलाकुसर निर्माण करणं शक्य नाहीच, आणि (तुम्ही प्रत्यक्ष भेटून हे समोर ठेवल्याखेरीज) हे खाणंही नशिबात नाही :-(

कायच बोलत न्हाई. येकदम गपचिप!

अगं सानिका कसलं सुरेख आहे ......

प्रशांत's picture

26 Aug 2014 - 11:17 am | प्रशांत

अप्रतिम....!

इशा१२३'s picture

26 Aug 2014 - 2:51 pm | इशा१२३

नमस्कार..दंडवतच..काहिहि उत्तमच जमत तुला..

नंदन's picture

26 Aug 2014 - 3:02 pm | नंदन

साष्टांग दंडवताच्या स्मायलीची उणीव भासते आहे!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Aug 2014 - 3:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एकतर या विभागात कधी डोकावत नाही मी, उगा डोक्याला भुंगे लागतात, आणि मग एनोने काम भागत नाही.
वर जे काही केलयं त्यासाठी साक्षात दंडवत __/\__!!
तुमचा पत्ता द्या हो, येईन म्हणतो ;)

नि३सोलपुरकर's picture

27 Aug 2014 - 10:17 am | नि३सोलपुरकर

____/\_____.

(हेवा वाटतोय राव..कस्स काय जमतय ह्यांना )

पैसा's picture

27 Aug 2014 - 3:24 pm | पैसा

हे खायचं? हॅ:! उद्या एखादा मोनालिसाच्या चित्रात चण्याची पुडी करू म्हणायचा अशाने!

एस's picture

27 Aug 2014 - 3:29 pm | एस

पेकिंग डक बनवायला जमतं का तुम्हांला? किंवा इथे कुणालाही? असेल तर रेसिपी टाका अगदी सुरुवातीपासून.

बापरे हे खायला असतं? काय कलाकृती आहे!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Aug 2014 - 7:02 pm | llपुण्याचे पेशवेll

दिसायला लै भारी आहे पण प्रत्यक्षात उतरवायला फार कष्ट दिसत आहेत.

साती's picture

29 Aug 2014 - 7:31 pm | साती

मस्तं आहेत हे स्वॅन्स.
करायचे टेंप्टेशन होतेय.

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:41 am | मदनबाण

उफ.. उफ.. पफ पफ ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

काव्यान्जलि's picture

6 Sep 2014 - 1:59 pm | काव्यान्जलि

अमेझिग... फारच छान.....

_मनश्री_'s picture

30 Nov 2015 - 1:56 pm | _मनश्री_

वा ,अप्रतिम
स्तुती करायला शब्दच नाहीत

बाबा योगिराज's picture

30 Nov 2015 - 2:43 pm | बाबा योगिराज

ना हात को आया ना मुह को लगाया, असल काही झालय.
वो असल्या तोंडाला पाणी येणारे खाद्य् पदार्थांचे फोटो नाका ना वो टाकू. दुकानात बसल्या बसल्या नूस्त पोट आणि तोंड खवळत.

सुमीत भातखंडे's picture

30 Nov 2015 - 2:50 pm | सुमीत भातखंडे

सलाम.
अप्रतिम

स्वाती दिनेश's picture

1 Dec 2015 - 12:36 pm | स्वाती दिनेश

हंस मस्तच.. क्लास!
हे कसे सुटले होते नजरेतून?
स्वाती

सुखी जीव's picture

1 Dec 2015 - 12:49 pm | सुखी जीव

वा ,अप्रतिम
स्तुती करायला शब्दच नाहीत

पद्मावति's picture

1 Dec 2015 - 3:56 pm | पद्मावति

आई गं, इतकी सुंदर कलाकृती खाण्याची हिम्मतच होणार नाही माझी.
अप्रतिम पफ्स दिसताहेत.

वेल्लाभट's picture

1 Dec 2015 - 4:25 pm | वेल्लाभट

माईंड झिणझिणिंग आहे हे !

कसलं खतरनाक दिसतंय आणि ते एवढं कलाकुसरीने करणं म्हणजे... क्लासच !
क्लासच.

तुमचं भारी कौतुक आहे ! एक से एक पदार्थ आणत असता आमच्यासमोर. क्या बात है ! क्या बात है !

सोनल परब's picture

1 Dec 2015 - 4:58 pm | सोनल परब

अप्रतिम....!

राही's picture

1 Dec 2015 - 5:42 pm | राही

अतिशय नजाकतीने आणि मेहनतीने केलेली कलाकृती.
यदाकदाचित पुढ्यात आलीच तर खाऊन मोडतोड होईल म्हणून खाववणारच नाही बहुतेक.