नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Aug 2014 - 9:08 pm
गाभा: 

नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.

नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन नावाची काही सरकारी+खासगी क्षेत्रातून योजना आहे. त्या बद्दल अंशतः http://digitalliteracy.co.in/index.html या धाग्यावर (जराशी व्हेग) माहिती दिसते (संकल्पनेची सुरवात काँग्रेसी काळातच झाली असण्याची शक्यता), पण एकुणच यात नवे काय ? यात नेमके काय ? आणि अमेरीकन स्टाईल सोशल प्रोग्राम्स निव्वळ गाजावाजा(हाईप) करून मल्टीब्रँड फॉरेन रिटेल आंतरजालाच्या माध्यमातून पोहोचण्यास हातभार लागेल बाकी साध्य काय ? अशी चिमुटभर साशंकता या क्षणी वाटते आहे.

कुणाला नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन बद्दल अधिक माहिती असल्यास वाचण्यास नक्कीच आवडेल.