स्मरणातील भ्रमण.

खुशि's picture
खुशि in भटकंती
22 Aug 2014 - 11:31 am

२००५मधील गोष्ट आहे.चारधाम यात्रेला गेलो होतो चाळीसजण होतो हरिद्वारपासुन ५सुमो केल्या होत्या,यात्रा सुरळीत पार पडली शेवटच्या दिवशी पहाटे बद्रिनाथ दर्शन करुन निघालो.आता सर्व प्रवास उताराचा होता.आमची गाडी सर्वात पुढे होती.मागची गाडी लाईट देत होती,गाडीतील सर्वजण हातवारे करुन काहीतरी ईशारे करत होते,काचा बन्द असल्याने अम्हाला काही ऐकु येत नव्हते मागच्या गाडीने आम्हाला ओव्हरटेक केले आणि हाताच्या इशार्याने गजानन{ड्रायव्हर}ला गाडी थाम्बवायला सान्गितले आणि तेही थाम्बले गजाननने डाव्याबाजुला मातीचा ढिगारा पाहुन गाडी त्यावर घालुन थाम्बवली.सगळे गाडीतुन उतरले होते आम्हाला म्हणाले खाली उतरा बघा तुमच्या गाडीची अवस्था,उतरलो.
बघून काळजाचा ठोका चुकला.बाप रे! परमेश्वराची क्रुपा म्हणून वाचलो. आमच्या गाडीचे डाव्याबाजुचे चाक रॉडसह बाहेर आले होते,काहीक्षणाचा अवकाश; चाक निखळले असते आणि गाडी पलटी होउन खोल दरीत कोसळली असती.
सगळ्या ड्रायव्हरनी मिळुन खटपट करुन चाक बसवले.सर्वजण म्हणत होते वहिनी,तुम्ही दुसर्या गाडीत बसा.पण मी म्हटले नाही! आम्ही याच गाडीतुन प्रवास करू.आपला जीव वाचवण्यासाठी दुसर्यान्चा जीव का पणाला लावायचा? काहिही होवो आम्ही याच गाडीत बसू.
पुढचा प्रवास कर्णप्रयाग,राणीखेत मार्गे नैनिताल असा होता.आमची मुलगी नैनितालला आम्हाला जॉइन होणार होती.
कर्णप्रयाग येईपर्यन्त सन्ध्याकाळचे ६वाजले.नैनितालला हॉटेलला व राणीला फोन करुन रात्री ११ वाजेपर्यन्त पोहोचतो असे कळवले.आता घाट चढायचा होता.सुर्यास्त झाला होता साडेसात वाजले होते गाडी डग मारते आहे असे जाणवले थाम्बलो,बघतो तर काय पुन्हा रॉड बाहेर.काळोख झाला होता,सभोवती दाट जन्गल होते,रस्त्यालगत वस्ती नव्हती,गजानन म्हणाला तुम्ही बाकी गाड्यान्मधे सामावुन घ्या मी गाडी येथेच ठेवतो आणि जवळच्या गावात जातो सकाळी गाडी दुरुस्त करुन मी हरिद्वारला परत जाईन.मग आमचे आठजणान्चे सामान बाकी गाड्यान्वर लादले आणि कसेतरी विभागुन चारी गाड्यात बसलो.पुढचा प्रवास सुरु केला.
पहाडी प्रदेशात रात्री आठला वाहतुक बन्द करतात.एका गावात पोलिसानी गाड्या आडवल्या.कसेतरी बाबापुता करून आम्ही आमच्या जबाबदारीवर प्रवास करू असे लिहुन दिले आणि प्रवास सुरु केला.
सम्पुर्ण जन्गल किर्र काळोख... आमच्या चार गाड्यान्शिवाय कोणी नाही.अशावेळी जे व्हायचे तेच झाले.पुढचा ड्रायव्हर रस्ता चुकला.रात्रीचे बारा वाजले तरी रानीखेत येयीना,मग एका गावात लोकाना उठवून विचारले तर कळले,आम्ही पुन्हा बद्रिनाथच्याच रस्त्याला लागलो होतो.पुन्हा गाड्या मागे वळवल्या.
रात्रीचे दोन वाजले होते.जीव मुठीत धरुन प्रवास सुरु होता.आता दुसरेच सन्कट समोर उभे ठाकले.जन्गलात वणवा पेटला होता.अगदी रस्त्या लगतचिही झाडेही जळत होती.एका बाजुला जळता डोन्गर तर दुसर्या बाजुला जळती दरी आणि आम्ही मधुन चालले होतो.किलोमिटरच्य किलोमिटर वणवा पेटला होता,जणू सार्या हिमालयाला आग लागली होती.ड्रायव्हर थकले होते आणि आम्हिही.शेवटी एका ठिकाणी एक सरकारी डाकबन्गल्या सारखा बन्गला दिसला,समोर मोकळ मैदान होते.मग त्या मैदानात गाड्या थाम्बवल्या, गाड्यान्वरच्या ताडपत्र्या मैदानात अन्थरल्या आणि ताडपत्रीवर पुरुष आणि गाड्यात आम्ही बायका, असे विश्रान्ती घेत पडलो.दोन तास विश्रान्ती घेतली.
झुन्जूमुन्जू झाले,देवदार व्रुक्षान्मधुन डोन्गराच्या मागुन हळू हळू अरुणोदय होत होता,पक्षी किलबिलु लागले आणि आन्दाने सर्वान्च्या मनात एकच गीत झन्कारले
सुहाना सफर और ये मौसम हसी!
हमे डर हम खो न जाए कही!!
सुर्याच्या पहिल्या किरणाबरोबर काल रात्रिचा भयानक प्रवास क्षणात विसरला गेला आणि हिमालयाची सुन्दर आणि उतुन्ग देणगी आपल्या देशाला देणार्या परमेश्वरा पुढे आम्ही नतमस्तक झालो.आम्ही रानीखेत मध्ये होतो.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2014 - 12:05 pm | संजय क्षीरसागर

चाक सुटलं असतं तर दरी परिक्रमा घडली असती.

कवितानागेश's picture

22 Aug 2014 - 2:31 pm | कवितानागेश

मरणाची इतकी भिती बरी नाही संक्षी!

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2014 - 3:26 pm | संजय क्षीरसागर

मला मरण्याची भिती नाही. तरीही, `रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

कवितानागेश's picture

22 Aug 2014 - 4:37 pm | कवितानागेश

मरण ते मरण. दुसर्‍याचं काय किंवा स्वतःचे काय?
सहज विचारतेय, आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही घराबाहेर पडला होतात?
उतर दिले नाहेत तरी चालेल. कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे. मी फक्त तुम्ही यावर चिंतन करावेत यासाठी विचारातेय.
धन्यवाद.

पण निरर्थक वणवण, दुसर्‍याच्या जीवावर व्यवस्थेचा भर आणि निष्कारण जीवधोक्यात घालून साहस करणं असले प्रकार कधी केले नाहीत.

आता व्यक्तिगत नाही पण जनरल विचारतो, अमक्याची कृपा होईल, तमका हात धरुन चालवेल, जीव गेला तरी हरकत नाही पण मुक्काम गाठीन आणि मरेपर्यंत हे करतच राहीन यात कितपत शहाणपण आहे?

कवितानागेश's picture

22 Aug 2014 - 6:14 pm | कवितानागेश

'निरर्थक वणवण' या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे 'शहाणपणा' या संकल्पनेची व्याप्ती फारच तोकडी होतेय.
:)
.... आणि जीवाच्या धोक्याबद्दल बोलायचं तर घरातल्या घरात पंखयाखाली बसलेलं असतानाही जीव धोक्यात येउच शकतो.
... तस्मात, घाबरु नका!! :)

एकदम बरोब्बर!

पण म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय ना :

`रुळावर डोकं ठेवून, गाडी आली नाही ' म्हणजे `परमेश्वराची कृपा झाली' असं मानणार्‍यातला मी नाही.

आता कशाला काय म्हणायचं हाच प्रश्न असेल तर विषय संपला!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2014 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्तथरारक !

(अनुस्वार टंकण्याची पद्धत : सुंदर = s + u + (shift + m) + d + a + r + a )

अनुप ढेरे's picture

22 Aug 2014 - 12:16 pm | अनुप ढेरे

त्यापेक्षा मोजींची शिकवणी लावायला सांगा.

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2014 - 1:04 pm | संजय क्षीरसागर

उदा. `मरणातील भ्राँमण'

किंवा `स्माँरणातील मरण'

धन्यवाद. अनुस्वार कसा द्यायचा हे शिकवल्या बद्दल. आता रफार कसा देतात हे सान्गावे.

कवितानागेश's picture

26 Aug 2014 - 9:17 pm | कवितानागेश

रफार आपोआप येतो
हुर्र लिहिताना hurr इतकंच लिहायचं.
आणि सोर्‍या मधला ' र्‍ ' लिहिण्यासाठी shift + r इतकंच.

आपण अनुस्वार देणे शिकवले म्हणून आता तो देता येतो धन्यवाद.

रोचक वृत्तान्त. अन रसाळ कथन

अजया's picture

22 Aug 2014 - 4:04 pm | अजया

काळ आला होता पण वेळ आली नव्हती!