तिखट-मिठाच्या पुर्‍या ----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
19 Aug 2014 - 9:00 pm

तिखट-मिठाच्या पुर्‍या ----

साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.
कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2014 - 9:04 pm | प्रभाकर पेठकर

तिखटमिठाच्य उर्फ खार्‍या पुर्‍या माझ्या अत्यंत आवडीच्या. सोबत उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी (सहल प्रसिद्ध) असेल तर काय विचारायलाच नको. पाककृती आवडली. करून पाहिनच पण छायाचित्राने जरा निराशा केली.

निवेदिता-ताई's picture

19 Aug 2014 - 9:07 pm | निवेदिता-ताई

का बरे.... चांगलया झाल्या नाहीत काय... काका

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2014 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

छायाचित्र आकर्षक वाटले नाही. जरा 'आऊट ऑफ फोकस' वाटले. बाकी कांही नाही.

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 2:52 pm | प्यारे१

(संबंधितांनी हलकं घ्या.)

काका काय काय करायचं माणसानं एकावेळी सांगा बघू?
मी मी म्हणून करते, कुण्णाकुण्णाची मदत नाही.... सग्गळं एकटीनं करायचं.
जरा काय फोटो आऊट ऑफ फोकस झालं तर टोचून बोलताय. :-/

रमेश आठवले's picture

20 Aug 2014 - 2:48 am | रमेश आठवले

या पुऱ्या शिळ्या झाल्यावर जास्त चांगल्या लागतात.

शिळया उंधियोसाठी छान .आता बटाट्याचा रस्सा पाकृ येऊ द्या .

पोटे's picture

20 Aug 2014 - 6:29 am | पोटे

फोटु बरोबरच काढला आहे. पण तो एक्स्ल्प्ररर्मध्ये ओपन झाल्याने असा कोपर्‍यात दिसतो आहे. असे वाटते

पुऱ्या टम्म फुगल्यात पण फोटो फोकस झालेला नाही .पुन्हा तळून /अपडेट करूनही .मोबाईल असेल तर वेगवेगळ्या अंतरावरून पेपराचा फोटो काढून ते फोटो मोठे करून पाहा .अक्षरे स्पष्ट दिसतील ते अंतर ठेवून नेहमी फोटो काढा .याला कैमऱ्याचे 'मिनीमम फोकसिंग डिस्टन्स' महणतात .

मुक्त विहारि's picture

20 Aug 2014 - 9:24 am | मुक्त विहारि

झक्कास...

स्मिता श्रीपाद's picture

20 Aug 2014 - 11:32 am | स्मिता श्रीपाद

मस्त खुसखुशीत दिसत आहेत :-)

राघव's picture

20 Aug 2014 - 2:46 pm | राघव

अरे कुणी या पाकृवाल्यांवर बंदी घाला रे... किती हा छळ..
:)

पैसा's picture

20 Aug 2014 - 3:22 pm | पैसा

सोपी आणि पोटभरीची चविष्ट पाककृती!

विवेकपटाईत's picture

20 Aug 2014 - 9:14 pm | विवेकपटाईत

माझा अत्यंत आवडीचा पदार्थ. पण काय करणार सध्या सौ.च्या निगराणीत असल्या मुळे तेल / तूप वर्ज्य. तूर्त काही महिने तरी तेल/ तुपात तळलेल्या पदार्थांचे नाव ही घेता येणार नाही. काय अवस्था झाली पहाच...

चाटवाला आणि कावळा

निवेदिता-ताई's picture

20 Aug 2014 - 9:39 pm | निवेदिता-ताई

पुढच्या वेळी फोटो नीट काढीन ह पेठकर काका

प्रभाकर पेठकर's picture

21 Aug 2014 - 1:01 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद. राग मानू नये. तुमच्याच पाककृती अधिक आकर्षक दिसतील असं वाटल्याने टिप्पणी केली आहे.

Maharani's picture

21 Aug 2014 - 12:13 am | Maharani

आहा.... मस्तच गं ताई ....

मदनबाण's picture

22 Aug 2014 - 12:17 pm | मदनबाण

बाय डिफॉल्ट ताई, पुर्‍या आवडल्या बरं का... जरा फोटु मस्त टाकण्यात पण पटाईत व्हा की.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis