कुकी कप

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
19 Aug 2014 - 1:25 am

साहित्यः

मैदा - २ १/४ कप
बटर - १/२ कप
साधी साखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
चॉकलेट चिप्स - १/२ कप
कुकिंग चॉकलेट - १/२ कप
मिठ १ चिमटी
बेकिंग ग्लास मोल्ड
दुध

कृती:

१. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे.

c1

२. साखर चांगली फेटल्यावर त्यात एक अंडे टाकुन परत फेटुन घ्यावे.

c2

३. त्यामधे मैदा, मिठ व चॉकलेट चिप्स टाकुन चमच्याने एकत्र करावे. आता हे पीठ १-२ तास फ्रिज मधे ठेवावे.

c3

४. तो पर्यंत ग्लास मोल्डला बटर लावुन घ्यावे.

c4

५. फ्रिजमधुन पीठ बाहेर काढुन, ते ग्लास मोल्डमधे निट पसरुन घ्यावे. आतमधील कुकी कप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको.

c5

६. ओव्ह्न १८० degree celcius ला preheat करुन घ्यावा. त्यामधे ग्लास मोल्ड ठेवुन १५-२० मिनिटे बेक करुन घ्यावे.
७. ग्लास मोल्ड बाह्रेर काढुन पुर्ण गार होवुन द्यावे. गार झाल्यावर कुकी कप अलगदपणे मोल्ड मधुन बाहेर काढावे.

c6

c7

८. Microwave मधे कुकिंग चॉकलेट मेल्ट करुन घ्यावे.
९. गार झालेल्या कपास आतुन मेल्टेड चॉकलेट लावुन घ्यावे व परत फ्रिज मधे १/२ तास ठेवुन द्यावे.

c8

१०. कुकी कप गार दुध / चॉकलेट मिल्कशेक / आईसक्रिम सोबत serve करावे.

c9

c10

प्रतिक्रिया

विशाखा राऊत's picture

19 Aug 2014 - 3:04 am | विशाखा राऊत

सही :)

भारी आहे आयडियाची कल्पना! या पाकृसाठी जरा वेळ हाताशी असणं आवश्यक आहे असं दिसतय. सगळे फोटू छान आलेत.

भारी अाहे पाकृ!फोटोपण मस्त.चिअर्सवाला तर सहीच!!

इरसाल's picture

19 Aug 2014 - 10:33 am | इरसाल

परत छळ करायला....(इथे नाक मुरडणारी बाहुली आहे)...छमृककेवा !

सुहास झेले's picture

19 Aug 2014 - 10:48 am | सुहास झेले

भन्नाट... !!

प्रभो's picture

19 Aug 2014 - 11:14 am | प्रभो

मस्त !!

सूड's picture

19 Aug 2014 - 11:44 am | सूड

कातिल फोटो!!

Mrunalini's picture

19 Aug 2014 - 12:25 pm | Mrunalini

सगळ्यांना थँक्स. :)

सविता००१'s picture

19 Aug 2014 - 2:22 pm | सविता००१

इथे ये ना गं लवकर आणि कर ना गं आमच्यासाठी अशा छान छान डिशेस! ;)
अग काय मस्त फोटो आहेत...

पिंगू's picture

19 Aug 2014 - 3:32 pm | पिंगू

एक नंबर..

सानिकास्वप्निल's picture

19 Aug 2014 - 6:29 pm | सानिकास्वप्निल

ए मृ आता ते दोन कुकी कप दे पाठवून इथे आत्ताच्या आत्ता :)

मस्तं पाकृ ..आवडेश +१

अगं लगेच पाठवते. तसेही इथुन तिथे पोहोचायला २ तासा पेक्षा जास्त वेळ लागणार नाही. :P

मधुरा देशपांडे's picture

19 Aug 2014 - 7:52 pm | मधुरा देशपांडे

तुमच्या दोघींच्या मधे मी आहे. एक तासात येइल. पाठव लगेच इकडे पण :)
पाकृ आणि फोटो सहीच.

अरे हो. बरोबर. नक्की पाठवते. :D

स्पंदना's picture

19 Aug 2014 - 6:38 pm | स्पंदना

काय क्लपना आहे. लाळ गळली. स्लर्र्र्प!!

पैसा's picture

20 Aug 2014 - 3:24 pm | पैसा

कसलं सुंदर आहे हे सगळं!

मदनबाण's picture

22 Aug 2014 - 12:31 pm | मदनबाण

आहाहा... आहाहा आणि आहाहा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

दिपक.कुवेत's picture

25 Aug 2014 - 10:35 am | दिपक.कुवेत

प्लेन व्हॅनीला आईसक्रिम घालुन खायला आवडेल. तो उन्हाच्या कवडश्यामधील कुकि कप डिमोल्ड करातानाचा फोटो तर फार आवडलाय.

हो. आईसक्रिम घालुन पण मस्त लागेल. मी कोल्ड कॉफी बरोबर ट्राय केले. तसे पण छान लागतात.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 10:03 pm | मुक्त विहारि

झक्कास...