चहा नक्की कसा करावा ??

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in पाककृती
3 Aug 2014 - 5:07 pm

एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ??? कुणी काही प्रयोग करते का ??

मी जनरली अर्धा लिटर दुधाची पिशवी फोडून त्यात अर्धा कप पाणी घालून तापवायला ठेवतो त्यात 'वाह ताज' ३-४ चमचे तयार ठेवतो ...आणि दुध तापायला लागले कि थोडा थोडा चहा घालून हलकेच ढवळतो मधून मधून ...(साय पण विरघळली पाहिजे) ...GAS मंद करून हळूहळू एक हलका बदामी रंग येईस्तो प्रक्रिया चालू ठेवतो आणि मग गाळून (वरील चोथा थोडासाच दाबून...फार नाही) मग तो वाफाळता चहा २ पातेल्यात चढवतो (वरून ओततो ...) जरा छान फेस झालं कि २ मोठ्या मग्स मध्ये भरून कलत्रासहा पितो ... कधी फारच म्हणजे अर्ल ग्रे च्या २ टी bags फक्त २-३ वेळा बुडवून काढतो (एकूण डुबकी चा वेळ ५-६ सेकंद इतकाच)...
फारच मस्त लागते ...

आता तुम्ही सांगा ...

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

3 Aug 2014 - 5:25 pm | चित्रगुप्त

अगदी पहाटे मी स्वतःपुरता चहा करून पितो तो असा:
अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात पाऊण कप दूध, एक चमचा साखर घालून उकळवतो. मग त्यात एक लहान चमचा टाटा गोल्ड चहापत्ती टाकून जरासे उकळवल्यावर थोडेसे आले किसून टाकतो. पुन्हा अल्पकाळ उकळल्यावर बनलेला पाऊण कप चहा पितो. सकाळी घरची मंडळी उठल्यावर जो जसा चहा बनवेल, तो अर्धा कप घेतो, आवडला नाही, तर टाकून देतो.

शास्त्रिय पद्धतः
१)एका चीनीमातीच्या सुरईमध्ये १ ग्रॅम चहा पावडर(ग्रिन्/ब्लॅक्/व्हाईट)टाकावी.
२)मातीच्या माठातले/तांबाच्या हंड्यातील सामान्य तापमान असलेले २४० मिलीलिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे व चुल्यावर्/हॉटप्लेट्/गॅस ठेवावे व खळ्खळ उकळी फुटल्यावर लगेचच चहा टाकलेल्या सुरईत ओतावे व सुरईचे झाकण बंद करावे.
३)ग्रिन टी साठी ३ ते ४ मिनिटे,ब्लॅक टी साठी ४ ते ६ मिनिटे व व्हाईट टी साठी ३ मिनिटे झाल्यावर सुरईतील तयार चहा कपात गाळून घ्यावा व शक्यतो तसाच प्यावा.
४)ब्लॅक टी बरोबर अर्धा लिंबू पिळुन प्याला तरी चालेल.
४)काही लोकांना दुध टाकून घ्यायचे असेल तर साय नसलेले दुधच टाकावे.
५)पांढरी साखर सर्वात वाईट असते. त्यामूळे साखर न घालता मध/गूळ घालावा.नाहिच तर ब्राऊन शुगर घालावी.

आयुर्हित's picture

3 Aug 2014 - 5:45 pm | आयुर्हित

बडे लोगोंकी चाय ऐसेही होती है, पी जा फटाफट!

अत्रन्गि पाउस's picture

3 Aug 2014 - 6:37 pm | अत्रन्गि पाउस

मध्ये १ & २ नं चहा सुद्धा सुरेख असतो चवीला..

अत्रन्गि पाउस's picture

3 Aug 2014 - 6:38 pm | अत्रन्गि पाउस

आहे ...

मला दुधाट चहा नाही आवडत .शंकरविलास छाप चहाची राडपण नको असते .पाण्यात साखर टाकून उकळल्यावर चहा पावडर टाकून जरासेच उकळून गाळायचा .दुध पाण्यात तापवायचे (गैसवर पसरट भांडयात पाणी ठेवून त्यात दुधाचे भांडे ठेवायचे ).सरळ गैसवरच तापवल्याने रापते आणि दुधाचा वास चहाला येतो .हे दुध घातले की झाला माझा पहिला चहा .केलेला ,करून ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पीत नाही .चहा आणि लग्न रिपेअर होत नाहीत असे माझे वैयक्तिक मत .रेल्वे प्रवासात डिपवाला शक्यतो टाळतो .असे पण तोंड धुवायला गरम पाणी म्हणून घ्यावे लागते कधीकधी .

चित्रगुप्त's picture

10 Aug 2014 - 10:56 pm | चित्रगुप्त

रेल्वे प्रवासात डिपवाला चहा साखरेचा असतो, म्हणून बिनासाखरेचा चहा मिळतो का म्हणून अनेक वर्शांपूर्वी एकदा आगगाडीतल्या चहा बनवणारापर्यंत पहुचलो. तिथे जे पाणी चहासाठी वापरत होते, ते बघून आजतागायत रेल्वेतला चहा- कॉफी प्यायची हिंमत झालेली नाही.

मागे एकदा रेल्वेतील संडासच्या नळाचे पाणी चहासाठी वापरत आहेत असे टीवीवर दाखवले होते.

एकदम डायलाॅग मारलात की कंजूसकाका *lol*

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2014 - 8:23 pm | टवाळ कार्टा

अंडे न घालता :)

रमेश आठवले's picture

3 Aug 2014 - 8:57 pm | रमेश आठवले

चहा दुधासह उकळून पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. इतर देशात कोरा पिण्याची किंवा पाणी उकळल्यावर दुध पाणी मिश्रण करून पिण्याची पद्धत आहे. त्यातसुद्धा कपात आधी दुध आणि मग पाणी घातल्याने चहा जास्त चांगला होतो अशी मान्यता आहे. जपानमध्ये काही जण एकत्र चहा पीत असले तर चहा पिण्याचा औपचारिक समारंभ होतो. इंग्लंड मध्ये हाय टी म्हणजे चहा बरोबर काही नास्त्याचे पदार्थ असा करतात.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2014 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/smiley-face-cooking.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/drink/reading-newspaper.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2014 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व प्रथम साखर पत्ती सोबत पाणी उकलु द्यायचे आणि मग दूध टाकल्यावर थोडं उकळु द्यायचं आणि मग चहा घ्यायचा..!

मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! *sad*

असंका's picture

3 Aug 2014 - 10:41 pm | असंका

मनातलं उघड-
+1

ह्म्म. ऐसीसारखा 'मनातले छोटे-मोठे प्रश्न' असा १ धागा पाहिजे मग.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2014 - 12:12 am | राजेश घासकडवी

मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sad

बिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.

प्यारे१'s picture

4 Aug 2014 - 1:43 am | प्यारे१

+१

ह्या प्रतिसादापुरतं गुर्जीं शी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2014 - 7:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स.न.वि.वि. मिपावर वाचनीय लेख असतात, उत्तम चर्चा होतात, मिपासारखं अभिव्यक्त होण्यासाठी माहितीबरोबर आनंद मिळविण्यासाठी मिपासारखं समृद्ध असं संकेतस्थळ आंतरजालावर दुसरं कोणतं नाही. (टाळ्या) मिपाचं अजून कौतुक केलं असतं पण अनेकांना त्रास होतो म्हणुन आवरतो (लै भारी) पूर्वी काय होतं आणि काय होतं आता त्याची तुलना करण्यापेक्षा आता उत्तम काय व्यक्त होता ते झालं पाहिजे, ते आलं पाहिजे, असेच निरर्थक धागे यायला लागला की मग बोअर होतं, (मला तरी) प्रतिसादाचं रतीब घालायचं तर ते कसेही घालता येतात. (अंडे घालूनही चहा करता येतो) आम्हीही पूर्वी असे रतीब घातले आहेत. आता कोणी तसं करु नये, असे माझं मत नाही. पण,कुछ हटके नको का, असं माझं व्यक्तिगत मत आहे. (टाळ्या)

आताही चहा झाली की लगेच पहा इथे कॉफी आली. चहाचा धागाही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करता आला असता. पाण्यात साखर विलायची, सुंठ, घालण्याच्या पद्धती, उकळण्याच्या पद्धती, गवती चहा, कोरा चहा वीथ लिंबू, आरोग्यासाठी फायदे तोटे, जालावरचा विदा, असं काही असलं की मग धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी होतात, हे मान्यच. आणि असेच लेखन आलं पाहिजे असं मला वाट्तं (टाळ्या)

उद्या ढुंगण कसं धुवायचं याच्यावर धागे काढायचेत का (हशा) अशा धाग्यात माहिती असेल पण काही संकेत नको का पाळायला ? साहित्य हा समाजाचा आरसा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे घडतं ते अधिक सकसपणे जालावरील लेखनात आलं पहिजे. भाषा, माणूस, लेखन, मैत्री आणि विचारांचे आदानप्रदान ही आंतरजालाची देणगी आहे, तिचा योग्य वापर झाला तर मिपासारखं संकेतस्थळं अजून समृद्ध होईल असे मला वाट्ते. एवढे बोलून मी थांबतो. (टाळ्या)

अवांतर : मी एवढा चांगला प्रतिसाद लिहिला आहे. कृपया उपप्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादापेक्षा सरस प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करु नये, करायचा असेल तर तो मला व्य.नि. ने करावा. *smile*

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 3:12 pm | बॅटमॅन

हा हा हा, सहमत.

आयुर्हित's picture

4 Aug 2014 - 12:13 am | आयुर्हित
पेट थेरपी's picture

4 Aug 2014 - 6:05 am | पेट थेरपी

पाणी गरम करून ठेवाच्चं. मग त्यात दीड चमचा साखर- पांढरीच घालाच्ची. त्यास उकळी फुटू लागली की चहा पत्ती( सोसयटी/ रेड लेबल) एक चहाचा चमचा घालाच्ची. आमच्या लहानपणी चहा-साखरेचे बारके डबे स्टीलचे मिळत त्याबरोबर चहाचा व साखरेचा चमचा मिळे. साखरेचा अंमळ मोठा असतो. शेजारी गॅसवर, ताजे असले तर बरे, दूध गरम करायला ठेवायचे. चहाला उकळल्यावर लगेच गॅस बंद करून चहावर झाकण ठेवायचे. चहा मुरू द्यायचा. मग तो गाळायचा व त्यात दूध घालायचे. आवडी प्रमाणे. आमच्या सासूबाही फार दुधाचा चहा करतात तर आम्हास तो मस्त चहा कलरचाच आवडतो. बरोबरीने एखादे मारी/ मोनाको बिस्किट पुडा घ्यायचा. व गरमच प्यायचा. ग्रीन टी मला आजिबातच आवडला नाही. जालीय वाद किंवा ताजा हार्ड कॉपी पेपर ह्याबरोबर अश्या चहाचे घुटके घ्यावे. २० मिनीटे अति सुखाची जातात.

मदनबाण's picture

4 Aug 2014 - 9:19 am | मदनबाण

कधी काळी तमिळनाडु मधील चहाच्या मळ्यात मनसोक्त बागडलो होतो त्याची आठवण आली. :)
मला एकदा तरी काश्मिरी कहावा प्यायची इच्छा आहे. :)
आता चहाचा आणि मळ्याचा विषय आलाच आहे तर दोन फोटु देतो. :)
चहाची तोडणी करणार्‍या स्त्रीया.
P1

मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. }
P2
(चहा प्रेमी} :)
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2014 - 9:48 am | डॉ सुहास म्हात्रे

एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत.

वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !!

“To be world-class, one needs to set standards, not chase them.”
--- आम्हीच :)

मदनबाण's picture

4 Aug 2014 - 9:55 am | मदनबाण

“To be world-class, one needs to set standards, not chase them.”
--- आम्हीच
वाह... क्या बात हय ! :) धन्स. :)
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

बऱ्याच दिवसाने दर्शन दिलेस रे बाणा !! मस्त !!

बाणाच्या स्वतःच्या फोटोतील "विठ्ठल" पोजला आता "मिपा पोज" म्हणावयास हरकत नाही.

बाकी आम्ही चहा करण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही टपरीवर, हॉटेलात, कॅफेटेरीयात जिथे कुठे मिळेल तिथे चहा पितो. अगदी अ‍ॅसिडीटी होईपर्यंत, तोंड येईपर्यंत. तोंड आले की चहा पिणे थांबवतो, तोंडाला आतून स्मायलोजेल लावतो आणि तोंड जाण्याची वाट पाहतो.

तोंड गेले की पुन्हा चहा पिणे सुरु. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2014 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो भारी आलाय.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

4 Aug 2014 - 9:59 am | तिमा

दिल्ली स्टेशनवर एकदा रेल्वे स्टॉलवर चहा मागितला होता. त्याने चहाची पूड गाळण्यात टाकली आणि वरुन उकळते पाणी+ दूध याची धार ओतली. खाली फिल्टर झालेल्या रसायनाची चव अगदी ओळखीची वाटत होती. डोक्याला जरा ताण दिल्यावर लक्षांत आले की ती ओळखीची चव पाण्याची होती!
इतका वाईट चहा मी आयुष्यात प्रथमच प्यायलो.

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2014 - 4:05 pm | अत्रन्गि पाउस

ती ओळखीची चव पाण्याची होती!

*lol*

एक पातेलं घ्या हातात उंच धरून त्यातून बल्बकडे पहा
बुडाला भोक नसावे….
चहा बनायच्या आधीच गळू शकतो !

सिलेंडर, पाईप चं लीकेज तपासून घ्यावे
जाम बेक्कार बाबा …
अख्खा माणुस जळू शकतो !

आता साखर, पावडर, दुधाच्या शोधात निघावं
हा सगळा मामला …
फडताळातच कुठेतरी मिळू शकतो !

पाण्यात साखर, पावडर उकळायला ठेवावी
पाचेक मिनिट तरी लागतात
तेव्हढ्या वेळात आरामात कुठेतरी लोळू शकतो !

वेलचीची चिमट टाकून दार लावायला धावावे
शेजार्याचीच जात ती…
तुमच्याकडे चहा बनतोय झटक्यात त्यांना कळू शकते !

उगीच ते येणार, हॅ हॅ हॅ .. चहा केलात वाटतं
कोणी सांगितलंय…
आपण हे टाळू शकतो !

इथे वेळ येते ती दुध टाकायची
यावेळी थोडं सावध हं…
नैतर चहा पातेल्याच्या बाहेर पळू शकतो !

हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा
तिला काय कळतंय…
नंतर साबण लावून पिळू शकतो !

सांडशी मात्र सापडायलाच हवी
फालतुमधे हात पोळू शकतो!

बघत बघता झाला की हो चहा तुमचा
भुरका मारा किंवा कसाही
जो तो त्याच्या पद्धतीने गिळू शकतो !

खटपट्या's picture

4 Aug 2014 - 10:28 am | खटपट्या

जबरी !!!

भिंगरी's picture

4 Aug 2014 - 10:28 am | भिंगरी

लई भारी आनंदिताताई
ब्येष्ट च्या

अजया's picture

4 Aug 2014 - 11:38 am | अजया

लैच भारी !!
आनंदितालाच्च हा प्रतिसाद मिळू शकतो !! *good*

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 3:14 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =)) _/\_

एक लंबर परतिसाद!!!!

मी तं म्हणेन याची स्वतंत्र कविता केली पाहिजे.

बॅट्या पयलेच सेप्रेट कविता के लिये बोलेला हय. +१११

प्यारे१'s picture

4 Aug 2014 - 3:49 pm | प्यारे१

आयला,
ह्यांना तर चहावर कविता झाली. :)

हा काव्याविष्कार एक वेगळा धागा म्हणून हलवण्यात यावा अशी णम्र विणंती.

सुहास झेले's picture

4 Aug 2014 - 9:58 pm | सुहास झेले

हा हा हा *lol*

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2014 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

@हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा
तिला काय कळतंय…
नंतर साबण लावून पिळू शकतो ! >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif
===============
दुत्त दुत्त आ...नंन्दिता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif
मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

पिलीयन रायडर's picture

11 Aug 2014 - 2:10 pm | पिलीयन रायडर

ज ब र द स्त!!!

स्वतंत्र धागा काढलाय का?

सुहास..'s picture

4 Aug 2014 - 10:15 am | सुहास..

एक उकळलेले गरम पाणी सोडल , तर सगळाच चहा हा चविष्ट प्रकार असतो.

१ ) गुळाचा चहा , गावाकडे गेलो की सहसा गुळाचाच चहा होतो , गुळचट जरी असला तरी , जर गवती असेल तर क्लास च वाटतो प्यायला !! हेल्दी असतो म्हणे ...
२ ) तमीलनाडु कडे स्टॉलवर चहा बनवायची पध्दत आणि त्यामुळे त्याला येणारी चव वेगळीच असते , एकीकडे चहाच पाणी गरम होत असते , दुसरीकडे दुध , सर्व्ह करताना, चहाकरी , ;) आधी स्टीलच्या वा ग्लासमध्ये साखर घालतो, आणि मग दोन ग्लास मध्ये मग फिरवुन मग देण्यात येतो ..मस्त !!
३ ) इराण्याकडचा चहा , पुणे , कॅम्पात , दोनचार ठिकाणी अजुन ही मिळतो ..एक अतिशय वेगळी चव असते.
४ ) पुणेरी पध्दत तर सर्व सर्वश्रुत आहे , त्यात चहाला येणार रंग आणि गंध ही शामील होतात, अगदी दुकानाच्या शेजारुन गेले तरी सुंगध दरवळुन जातो.
५ ) मी माझ्या काही गुजराती मित्रांकडे ( होय , पुण्यातच ;) ) मसाला चहा प्यायलो आहे . त्या ला येणारा सुगंध आणि चव ही वेगळीच असते .

माझ...मला पुर्ण दुधाचा, ते ही पाकीटाच दुध नाही, ताज, थोडं आलं आणि इलायची घालुन, जर्मनच्या पातेल्यात केलेला, स्टीलच्या ग्लास मध्ये आवडतो. पसंद अपनी अपनी

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2014 - 3:59 pm | अत्रन्गि पाउस

टाकतात असे ऐकले होते ..........पण ते नेमके कसे करत असावेत ब्वा ??

सुहास..'s picture

11 Aug 2014 - 11:55 am | सुहास..

कै च्या कै !! चहात अंडे =))

प्रभाकर पेठकर's picture

11 Aug 2014 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

अंड्याचा आतील भाग नाही तर, कवचाची भुकटी करून ती घालतात अशी अफवा होती. माझा त्यावर विश्वास नाही.

अनुप कोहळे's picture

4 Aug 2014 - 10:25 am | अनुप कोहळे

अर्धा कप पाणी घ्यावे, त्यात आलं आणी विलायची कुटून घालावी. उकळी आल्यावर त्यात एक चमचा प्रति कप प्रमाणे चहा पत्ती टाकावी. चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात आर्धा कप दूध घालवे आणि रंग आपल्या आवडीनुसार येई पर्यंत उकळू द्यावे. कपात गाळून पारले G बरोबर आस्वाद घ्यावा......

सस्नेह's picture

4 Aug 2014 - 3:24 pm | सस्नेह

डायबेटिस आहे का ?

आयुर्हित's picture

4 Aug 2014 - 10:48 am | आयुर्हित

बायकोचा रुमाल आणा

म्हणजे हा आय डी नक्किच पुरुषाचा आहे!

आनन्दिता's picture

4 Aug 2014 - 6:40 pm | आनन्दिता

काका भारी गेस !!
पण प्रस्तुत कवितेत अत्रंगी पाउस यांना चहा कसा करायचा हे सांगितले आहे त्यामुळे इथे त्यांच्या बायकोच्या रुमालाबद्दल लिहिलंय..
सो बेटर लक नेक्स्ट टाइम हं!! *biggrin*

चहाच्या वाटेला फारसा जात नाही पण जर जोडीला फारसाण असेल तर मग त्यासारखं दुसरं अमृत नाही.
गरमा गरम चहात बचका भर ताजं फरसाण टाकावं.
२ मिनीटांनी चमच्याने ते ओरपावं आणि मग मगात उरलेल्या चहाला जी चव येते यवं रे यवं...

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2014 - 3:58 pm | अत्रन्गि पाउस

गम्पाभौ ... आपल्या सारख्या तज्ञ लोकांचा प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले ...चहा + फरसाण तडक करून बघण्यात येईल....
__/\__

मृत्युन्जय's picture

4 Aug 2014 - 2:18 pm | मृत्युन्जय

चहात केशराच्या २ कांड्या टाकाव्यात आणि दूध थोडेसे जास्त घालावे. चांगला होतो चहा.

एक स्पष्टवक्ता..'s picture

4 Aug 2014 - 2:31 pm | एक स्पष्टवक्ता..

थोडं त्यात मीठ पण टाकून बघा…. अजून चांगली चव येईल… *preved*

पैसा's picture

4 Aug 2014 - 2:50 pm | पैसा

चिं. वि. जोशींच्या एका चिमणराव लेखात मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी "चहा कसा करतात?" हा प्रश्न विचारल्यावर तिने "आम्ही किनै, चहाला राकेलची फोडणी देतो!" हे उत्तर दिल्याचं आठवलं! *biggrin*

बाकी चहा अजिबात उकळायचा नाही आणि काफी मात्र मस्त उकळायची हे माझे आवडते प्रकार. मोठ्या हाटेलांमधे हमखास थंड चहा मिळतो तर रस्त्यावर एकदम मस्त तरतरी आणणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. केरळच्या नेत्रावती वगैरे रेल्वेत "चाया" नावाने काफीसारखं लागणारं एक कसलंतरी पांचट पेय देतात.

चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 3:08 pm | प्रसाद गोडबोले

राकेलची फोडणी >>> =))

चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2014 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर

मी नोकरीत असताना माझ्या ऑफिसमधे एक 'भट' आडनावाचा महाभाग होता. त्याला एका कपात ७ चमचे साखर लागायची. (डॉक्टरांनी सांगितलय अशी थाप ठोकायचा) त्याचा चहा (?) कधी चुकून आपल्या टेबलवर आला आणि एक घोट घेतला तरी दिवसभर त्रास व्हायचा.

असंका's picture

4 Aug 2014 - 3:43 pm | असंका

खडी चम्मचवाली चाय!
चहाच्या कपात एवढी साखर घालायची की चमचा त्या साखरेत रोवून उभा करता आला पाहिजे. (कोहराम)

सविता००१'s picture

4 Aug 2014 - 2:52 pm | सविता००१

बेस्ट. आवडेश एकदम

चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक पेयांपासून दूर असल्याने आमचा पास. पण प्रतिसाद रोचक आहेत, वाचायला मजा येते आहे.

(कधीमधी ग्रीन टी (मित्रभाषेत गोमूत्र) पिणारा) बट्टमण्ण.

इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण गीतेतली रेशिपी कुणी ट्राय करताना दिसत नाही. भगवंत म्हणतात,

'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |"

अर्थात, सर्वांनी चहा करावा तो सन्नि नामक विशिष्ट ष्टोव्हवरतीच. तसे केल्यास तो हृदयात जाऊन बसतो.

मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।

याचाही अर्थ सांगून उपकृत करावे ही विनंती. ही पोह्यांची रेसिपी असावी काय?

गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच गहन आहे, अतएव एका वाक्याचे अनेक अर्थ असतात.

पैकी वरील वाक्याचा 'भूक लागून माजल्यागत केल्यास ज्ञानी माणूस पोहे करतो' हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ 'माजलेल्या स्मृतीला जाणून नमक घालून पोहे करावे' हा एक अर्थ आहे. शिवाय 'मतदान कुणाला केले याची स्मृती कळू न देण्यासाठी म्हणून पोहावे' असाही अर्थ आहे पण तो इतका प्रचलित नाही.

हे माझ्या अल्पबुद्धीला समजतील इतकेच अर्थ दिलेले आहेत. पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 7:34 pm | प्रसाद गोडबोले

पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

किंव्वा संक्षी *biggrin*

यसवायजी's picture

4 Aug 2014 - 7:46 pm | यसवायजी

:)) रोफ्ल

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 11:06 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2014 - 7:56 pm | अत्रन्गि पाउस

लेखनसीमा
*lol*

असंका's picture

5 Aug 2014 - 10:01 am | असंका

वा वा! धन्य झालो प्रभू!!

आणि इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा चहा आणला असं मानणार्या लोकांनी याचा विचार अवश्य करावा...

इरसाल's picture

11 Aug 2014 - 11:21 am | इरसाल

याचाच अर्थ असाही होवु शकतो का
मातलेली : स्मृती ही (कमी डिग्र्या असल्या तरी) ज्ञानातच पोहीन असे म्हणते.

मला हॅरी पॉटरमधलि डोलोरस अंब्रीज्बैची चहा प्यायची पद्धत फार आवडते

आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी साखर घालायचे की दोन्ही ओठ(त्यांचे)चिम्म चिटकले पाहिजेत.

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 5:36 pm | प्रसाद गोडबोले

त्यांचे >>> =))))

रामपुरी's picture

5 Aug 2014 - 4:09 am | रामपुरी

चिटकले >>> =))

चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला.

चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

अमृततुल्य कसं काय आलं नाही ?

प्यारे१'s picture

11 Aug 2014 - 1:59 pm | प्यारे१

अजून उकळतोय वाट्टं :-/

>>चहा 'नक्की' कसा करावा ??

मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Aug 2014 - 3:34 pm | निनाद मुक्काम प...
https://www.youtube.com/watch?v=GVmV1tJ1YPo मसाला चाय