टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in काथ्याकूट
24 Jul 2014 - 4:11 pm
गाभा: 

Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.
(१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.
(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?
(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?
आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.
यापैकी ibruk मुंबईत असल्याने जवळ. पण पुण्याच्या TECHNOWRITES मध्ये कोर्सेसची विविधता दिसून येते.
(lionbridge या संस्थेने काही वर्षांपूर्वी एक छोट्या कालावधीचा अभ्यासक्रम झेवियर्स मध्ये घेतला होता असं आठवतय.)
तसंच कुठल्या प्रसिध्द नसलेल्या पण चांगल्या संस्था आहेत का?
कृपया, या क्षेत्रातल्या जाणकारांनी/अनुभवी व्यक्तीनी मार्गदर्शन करावे.
Instructional designing बद्द्ल
(१) ह्या क्षेत्राच्या वाढीस खुप वाव आहे असं म्ह्टलं जातं. पण शालेय अभ्यासक्रम शिकवणारे विडियोज पाहिले तर त्यात कल्पकता, विषय उलगडून सांगणे, concept स्पष्ट करणॆ या गोष्टी नावालाही दिसून येत नाहीत.
(२) corporate training साठी ह्या प्रकारचे मटेरिअल (वेब बेस्ड, CD वगैरे) तयार केले जाते का? त्याचे प्रमाण किती आहे?

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jul 2014 - 4:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समीरसुर ह्या मिपाकरांना संपर्क करावा.

समीरसूर's picture

24 Jul 2014 - 5:29 pm | समीरसूर

अंतरा आनंद,

१. या क्षेत्रात नोकर्‍या बर्‍यापैकी आहेत. प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये विशेषतः खूप संधी आहेत. चांगल्या आणि अनुभवी रायटर्सना मागणी खूप आहे. इंटरनेटवर एक सर्च टाकल्यास आपल्याला कल्पना येईलच. फ्रीलान्सिंगसाठी दांडगा अनुभव असल्याशिवाय काम मिळवणे अवघड जाते. शिवाय फ्रीलांन्सिंगसाठी जबरदस्त नेटवर्कींग आणि संपर्क लागतो.

२. या क्षेत्रात येण्यासाठी इंग्रजीचे कौशल्य महत्वाचे आहे. खूप साहित्यिक इंग्रजीला या क्षेत्रात वाव नाही. त्यासाठी क्रियेटीव्ह रायटिंगचे क्षेत्र निराळे आहे. साधे, सोपे, सगळ्यांना चटकन समजेल असे इंग्रजी आले म्हणजे झाले. संकल्पना नीट समजावून घेऊन सोप्या इंग्रजीमध्ये मांडणे जेणेकरून वाचणार्‍यांना संकल्पना (किंवा फीचर, एखादी प्रोसेस, इत्यादी) लगेच समजेल अशी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. म्हणजे आकलनक्षमता, लिखाणाची योग्य संगती लावणे, लिखाण सुसूत्र होईल असे बघणे, लिखाणाचे नियोजन करणे, परीक्षणाचे नियोजन करणे, लिखाणाला किती वेळ लागेल, कुठले टूल वापरावे लागेल, वाचकवर्ग नेमका कोण असणार आहे हे समजून घेणे, विषय समजावून घेण्यासाठी ग्राहकाशी किंवा विविध गटातल्या सहकार्‍यांशी सतत संपर्क ठेवून माहिती घेत राहणे, इत्यादी कौशल्ये या क्षेत्रात आवश्यक असतात. अनुभव वाढत जातो तसे तसे जबाबदार्‍या वाढत जातात. क्लिष्टता वाढत जाते.

३. मला टेक्नोराईटस ही एकच संस्था माहिती आहे. दुसरी मुंबईमधली टास्क की अशीच कुठलीतरी होती पण बहुधा ती बंद झाली. खरं म्हणजे कोर्सची तशी गरज नाही. छोट्या कंपनीमधून हळू-हळू सुरुवात केल्यास सगळे समजत जाते. आणि या क्षेत्रात टूल्सचे महत्व बर्‍यापैकी आहे. फ्रेममेकर, रोबोहेल्प, ऑफीस, इत्यादी टूल्सवर जर हुकुमत असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते. या क्षेत्रात जे इंग्रजी अपेक्षित असते ते साधारणपणे सगळ्यांना येतच असते. त्यामुळे टूल्सचा अनुभव आणि कौशल्य जर असेल तर नोकरीसाठी सोपे जाते. आपण कुठल्यातरी संस्थेत ही टूल्स शिकून अर्ज करू शकता. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल पण नेटाने प्रयत्न केल्यास काहीतरी मिळेलच. पण नवोदित म्हणून काम करण्याची आणि त्याप्रमाणे पगार स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या आधीच्या अनुभवावर या क्षेत्रात नोकरी मिळणे थोडे कठीण जाऊ शकते. मिळाली तर उत्तमच. :-) तुम्हाला तुमचा रेझ्युमे तसा मॉडीफाय करून घ्यावा लागेल. लिखाणावर जास्तीत जास्त भर देणारा रेझ्युमे तयार करावा लागेल. याची नक्कीच मदत होईल. कदाचित तुमच्या अनुभवाला सुद्धा त्यामुळे काही प्रमाणात ग्राह्य धरता येईल. शिवाय काही नमुना उतारे, निबंध, संवाद, इत्यादी तयार ठेवावे लागतील. कुणी मागीतल्यास लगेच कामाच्या कौशल्याचे हे नमुने पाठवता येतील. बहुतेक ठिकाणी इंग्रजीची लिखित स्वरूपातली चाचणी होईल. आमच्या कंपनीमध्ये आम्ही ही चाचणी सगळ्याच अनुभवपातळीवरच्या लोकांची घेतो. चाचणीशिवाय आमच्या इथे काहीच होत नाही. आणि ही चाचणी तशी बर्‍यापैकी इंग्रजीचे आणि व्याकरणाचे किचकट ज्ञान तपासणारी असते. त्यात क्रियेटीवीटी देखील तपासली जाते.

क्षमस्व! इंस्ट्रक्शनल डिझाईनबद्दल फारशी कल्पना नाही.

मला असे सुचवावेसे वाटते की आपली खूप इच्छा असेल तर तूर्तास आपण एखादा छोटासा कोर्स (१-२ महिन्यांचा) करून महत्वाचे टूल्स शिकून घ्यावीत. इंटरनेटवरून फ्री सँपल वर्जन्स डाऊनलोड करून चांगला सराव करावा. कोर्समुळे तुमच्या रेझ्युमेवर औपचारिक शिक्षण घेतल्याचा संदर्भ येईल. रेझ्युमे चांगला बनवून घ्यावा. त्यात लिखाणासंदर्भातल्या कामांविषयी माहिती द्यावी. शिवाय टूल्स व्यवस्थित शिकल्याने आत्मविश्वास येऊन मुलाखतीमध्ये उत्तरे देण्यात अडचण येणार नाही. इंग्रजीची चाचणी तुम्ही उत्तीर्ण व्हालच.

सध्या सगळ्या जॉबसाईट्सवर आपला रेझ्युमे टाकून शोध घेत राहता येईल. कुठे तरी छोट्या कंपनीमध्ये गरज असतेच. त्यानुसार अप्लाय करत राहता येईल. लिंक्डइन वर देखील सतत शोध घेता येईल. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे रेझ्युमे पाठवून देता येईल. TWIN (Technical Writers India) असा एक ऑनलाईन ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन होता येईल. त्यावर खूप संधी येत असतात. अजून असे बरेच ग्रुप्स आहेत. त्यावरही शोध घेता येईल. लिंक्डइनवर असे ग्रुप्स शोधून काढता येतील. शिवाय छोट्या छोट्या कंपन्या शोधून त्यांना बेधडक रेझ्युमे पाठवता येईल.

कुठेतरी संधी नक्कीच मिळेल. :-) अगदी हमखास! हा विश्वास ठेवा.

आपल्याला शुभेच्छा!

समीरसूर's picture

24 Jul 2014 - 5:35 pm | समीरसूर

हे राहिलेच. कसे लिहावे यासाठी इंटरनेटवर भरपूर साहित्य उपलब्ध आहे. एखादे चांगलेसे पुस्तक घेऊन वाचलेत तरी तुम्हाला सगळे व्यवस्थित शिकता येईल. त्यात फारसे अवघड काही नाही. जसा वेळ मिळेल तसे हे बेसिक्स वाचत गेलात तर लिखाणाचे हे तंत्र तुम्हाला लगेच समजेल. काळजी नसावी. :-)

शुभेच्छा!

कवितानागेश's picture

24 Jul 2014 - 7:26 pm | कवितानागेश

चांगला विषय. :)

फार साधे आणि सोपे काम आहे.

सविस्तर प्रतिसाद आज रात्री देतो...

डू नॉट टेक टेंशन...

धन्या's picture

25 Jul 2014 - 11:43 pm | धन्या

डू नॉट टेक टेंशन...

हे "टेन्शन घेऊ नका" किंवा "टेन्शन मत लो" चं भाषांतर आहे ना? ;)

मुक्त विहारि's picture

25 Jul 2014 - 11:29 am | मुक्त विहारि

सविस्तर प्रतिसाद काल देवू शकलो नाही.....
================================================

टेक्नीकल रायटर...

प्रथमत; समीरसूर यांचे आभार.त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आहे.मला इथे (यानबूला) येण्यापुर्वी ह्या माहितीचा नक्कीच फायदा झाला असता.

टेक्नीकल रायटरचा जॉब मी भारतात कधीच केला न्हवता.पण प्लांट कमीशन करतांना पहिल्यांदा प्लांट मध्ये काय घ्यायचे आणि कुठल्या क्रमाने पुढे जात रहायचे? ह्याची थोडी-फार कल्पना होती.

इथे हा जॉब करतांना सुरुवातीला थोडे टेंशन आले.पण मग सरळ आधीची मॅन्युअल्स वाचायला सुरुवात केली.

बर्‍याच वेळा क्लायंट मेन फॉर्म्याट तयार करायला मदत करतो.एकदा मेन फॉर्म्याट क्लायंटने स्वीकारला की, १०% काम झाले.

कुठलेही मॅन्युअल किंवा प्रोसीजर लिहीतांना एक गोष्ट लक्षांत घ्या की, आपण जे काही लिहीतोय ते व्यवस्थित आहे का? आपल्याला ती प्रोसीजर समजली आहे का?

उदा. मी एका कारच्या चालू करण्याची प्रोसीजर लिहीत आहे.

तर कुठल्या गोष्टी येतील?

--------------------------------------

१. चाकातली हवा चेक करणे.

२. पाणी (तेच ते काचेवर फवारल्या जाते ते.)

३. ऑइल लेव्हल

४. मग मी इग्नीशन ऑन करीन.

५. गाडीचे टेंपरेचर बघीन. (इथे तुम्ही डॅशबोर्डचा फोटो लावलात आणि कुठले इंस्ट्रूमेंट कुठे आहे, हे पॉइंट आउट केलेत तर फार उत्तम)

६. वायपर व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन.

७. पेट्रोल पुरेसे भरले की नाही ते चेक करीन.

८. साइड इंडीकेशन्स व्यवस्थित चालू आहेत की नाही ते चेक करीन.

९. हॉर्न वाजवून बघीन.

१०. १ ते ९ पैकी एखादी गोष्ट बिघडली असेल तर ती दुरुस्त होईपर्यंत गाडी चालवायची नाही.

११. १ ते ९ पैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही आता गाडी चालवू शकता.

-------------------------------------------------------------

आता ही वरील प्रोसीजर क्लायंटकडे जाते.त्यात थोडे-फार फेरबदल केल्या जातात.
------------------------------------------------------------

आणि खरे सांगू का? तुम्ही जर तुमचे काम व्यवस्थित करू शकत असाल, तर प्रोसीजर किंवा मॅन्युअल लिहायला अडचण येणार नाही.

आणि सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली...

मिपावरील पा.क्रु. वाचा.मला व्यक्तिशः इथल्या पा.क्रु. वाचूनच टेक्नीकल रायटिंग कसे असावे आणि कसे नसावे हे समजले.

समीरसूर's picture

25 Jul 2014 - 1:26 pm | समीरसूर

मुक्त विहारिंनी योग्य माहिती पुरवली आहे.

TWIN - http://www.twin-india.org/

Society for Technical Communication - http://www.stc-india.org/

या वेबसाईट्सवर रजिस्टर करून नोकरी शोधता येईल.

अंतरा आनंद's picture

25 Jul 2014 - 11:16 pm | अंतरा आनंद

समीरसूर,मुवी मनापासून धन्यवाद. ह्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
आंतरजालावर माहिती मिळते. पण अनुभवी लोकांनी दिलेला विश्वास फार उपयोगी पडतो. जो इथे मिळाला.

मुक्त विहारि's picture

25 Jul 2014 - 11:58 pm | मुक्त विहारि

खरे मिपाकर एक-मेकांना मदत करतच असतात.

स्वतःवर योग्य तितका विश्र्वास ठेवा अन बिंधास्त रहा.

जास्तीत जास्त काय होईल, तुम्हाला टेक्नीकल रायटरचा जॉब झेपणार नाही. जग तर नाही ना बुडाले? मग झाले तर.

आणि खरे सांगू का, माझ्या २३ वर्षांच्या करीयर मध्ये, मला हा जॉब जास्त आवडला, मी मस्त एंजॉय केला.

रोज नवी प्रोसीजर अन रोज नवे शिक्षण.

आपल्या आयुष्यात हा जॉब पहिल्यांदा आलाय ना? मग घ्या की शिकून.ज्ञान थोडीच वाया जाणार आहे.

असा विचार करून मी काम केले.सुरुवातीला एक महिना बराच त्रास झाला.पण मग एक-एक अडचण सोडवत गेलो.

आज आमचे दोन्ही बॉस आमच्या कामावर खूष आहेत.अजून काय पाहिजे?

अनिरुद्ध प's picture

29 Jul 2014 - 11:05 pm | अनिरुद्ध प

व्य नि केला आहे उत्तराची वाट पहात आहे.