"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.
साहित्यः
केक साठी:
मैदा - १/२ कप
साखर - १/२ कप
थोडेसे ब्राउन केलेले बटर - १/२ कप
अंडी - २
बेकिंग पावडर - १/२ टी.स्पुन
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
दुध - ३ चमचे
चॉकलेट टॉपिंग साठी -
कुकिंग ७०% डार्क चॉकलेट - २०० ग्रॅम
heavy cream - १/२ कप
जिलेटीन - १ चमचा
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
गरम पाणी - १/४ कप
साखर - १ चमचा
कृती:
१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन यावे.
२. एका बाउल मधे २ अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स, रम इसेन्स एकत्र फेटुन घ्यावे.
३. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ते अंड्याचे मिश्रण असलेले बाउल ठेवुन ३ मिनिटे परत फेटावे. (double boiler method वापरावी)
४. हे बाउल खालील गरम पाण्यास लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नाहितर अंड्याचे scrambelled egg तयार होईल. ;)
५. ३-४ मिनिटे चांगले फेटल्यावर त्यात थोडेसे brown केलेले पण खुप गरम नसलेले बटर ह्या अंड्याच्या मिश्रणामधे ओतुन निट मिक्स करावे.
६. निट मिक्स झाल्यावर त्यात चाळुन घेतलेला मैदा व बेकिंग पावडर टाकावे. हलक्या हाताने हे एकत्र करावे.
७. हे मिश्रण डोश्याच्या पिठाएवढे किंवा पॅनकेकेच्या पिठासारखे असले पाहिजे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको.
८. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
९. एक केकचे भांडे घेउन त्याला बटर व मैदा लावुन घ्यावा व त्यावर बटर पेपर लावावा, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही.
१०. आता ह्या भांड्यामधे वरच्या मिश्रणातील १ पळी मिश्रण ओतावे. ते पुर्ण भांड्यात निट पसरुन घ्यावे व ओव्ह्नमधे ठेवुन ५ मिनिटे बेक करावे.
११. ५ मिनिटात तो एक लेयर तयार झाला असेल. भांडे बाहेर काढुन त्यात अजुन १ पळी मिश्रण ओतावे व परत ओव्हनमधे ५ मिनिटे बेक करुन घ्यावे.
१२. अशा प्रकारे सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. शेवटचा लेअयर तयार झाल्यावर केक बाहेर काढुन थंड होवुन द्यावा.
१३. केक थंड होईपर्यंत चॉकलेटचे टॉपिंग बनवुन घेवु.
१४. एका भांड्यामधे क्रिम गरम करुन घ्यावे. त्यात चॉकलेटचे तुकडे, साखर, रम इसेन्स व व्हॅनिला इसेन्स टाकुन एकत्र करावे.
१५. वाटीमधे थोडे गरम पाणी घेउन त्यात जिलेटीन निट विरघळवुन घ्यावे. हे पाणी वरील चॉकलेटच्या मिश्रणामधे टाकुन निट मिक्स करावे.
१६. हे मिश्रण आता थंड झालेल्या केकवर ओतावे. सर्व बाजुने हे चॉकलेट लागले पाहिजे व वर चाचॉकलेटचा लेयर thick असला पाहिजे.
१७. आता केक १-२ तास फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावा.
१८. केक खायला तयार आहे.
प्रतिक्रिया
16 Jul 2014 - 2:33 am | यशोधरा
मस्त दिसतो आहे केक! यम्मी!
16 Jul 2014 - 2:34 am | रेवती
एक वेगळा छान केकचा प्रकार दिसतोय. आवडला. तू केलेल्यात चार थर दिसतायत. छानच!
16 Jul 2014 - 3:13 am | मधुरा देशपांडे
हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.
16 Jul 2014 - 3:42 am | स्वाती दिनेश
मस्त..
बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..)
स्वाती
16 Jul 2014 - 9:22 am | सुहास झेले
वॉव... जबरीच दिसतोय केक. पाककृती आणि सादरीकरण अल्टीमेट :)
शेवटच्या फोटोतली डिश पास करा प्लीज :) ;-)
16 Jul 2014 - 9:25 am | मुक्त विहारि
झक्कास..
16 Jul 2014 - 9:42 am | Mrunalini
केक आवडल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद. :)
16 Jul 2014 - 10:47 am | प्रभाकर पेठकर
पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.
16 Jul 2014 - 11:02 am | Mrunalini
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P
तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.
16 Jul 2014 - 11:11 am | मनिष
हे एवढे एक्झॉटीक काही या जन्मात झेपेल असे वाटत नाही. पण दिल बहलाने को .....वगैरे, वगैरे!!!
काय फोटो आहे शेवटचा...अहाहा!
16 Jul 2014 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा
16 Jul 2014 - 12:32 pm | बॅटमॅन
च्यायला. तुमच्याऐवजी दुसरे कोणी असते तर दुसर्याचे फोटो चोरले म्हणून आरोप लावला असता ;)
मस्त फटू, पाहूनच दिल खूष हो गया.
16 Jul 2014 - 12:51 pm | Mrunalini
हाहाहा.. नाहि हो. पाकृ मीच केली आहे आणि फोटोही नवर्यानेच काढले आहेत. :P
17 Jul 2014 - 12:47 am | एस
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!
16 Jul 2014 - 12:34 pm | पिंगू
दिलखेचक आणि चित्तवेधक फोटो. आपल्याला तर आवडला केक आणि फोटो दोन्ही..
16 Jul 2014 - 12:55 pm | हसरी
सही दिसतोय केक.
हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का?
ते गरम म्हणजे किती गरम करायच?
चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?
16 Jul 2014 - 1:08 pm | Mrunalini
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)
16 Jul 2014 - 1:29 pm | हसरी
अनेकानेक धन्यवाद!! :-)
या शनिवारीच प्रयोग करून बघेन.
16 Jul 2014 - 1:17 pm | दिपक.कुवेत
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.
16 Jul 2014 - 1:28 pm | प्रभो
भारी!!
16 Jul 2014 - 2:39 pm | पियुशा
खपले ____/\____
16 Jul 2014 - 2:42 pm | सूड
शेवटचे तीन फोटो पाहून चचल्या गेले आहे, आता पुन्हा वर्कआऊट सुरु होईस्तवर केक वैगरे ब्यान आहेत. ;)
16 Jul 2014 - 3:01 pm | सानिकास्वप्निल
केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते.
आय अॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__
16 Jul 2014 - 3:09 pm | Mrunalini
Very true सानिका. :)
16 Jul 2014 - 10:58 pm | यशोधरा
कशा गं दोन सुगरणी गप्पा मारतायत! :)
17 Jul 2014 - 12:01 am | Mrunalini
हाहाहा. :D :P
16 Jul 2014 - 4:21 pm | सविता००१
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.
16 Jul 2014 - 5:48 pm | Mrunalini
सविता... नक्की. आम्ही पण वाट बघतोय. ;)
16 Jul 2014 - 6:12 pm | सखी
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :)
मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.
16 Jul 2014 - 6:11 pm | शिद
थरारक केक...थरांवर थर म्हणून. जबरा पाकृ व फोटो. *good*
16 Jul 2014 - 10:54 pm | निवेदिता-ताई
मस्त
17 Jul 2014 - 12:54 am | विशाखा राऊत
आह्हाहा एकदम मस्त :)
17 Jul 2014 - 3:07 pm | Mrunalini
Thank you all :) मंडळ आपले आभारी आहे.
17 Jul 2014 - 4:04 pm | गणपा
_/\_
स्स्स्स्स्स्स्स्स्स्ही.
18 Jul 2014 - 1:21 pm | Maharani
Apratim.... *good*