साहित्य- १ वाटी बारीक रवा,१ वाटी साजूक तूप,३ वाट्या दूध,३. ५ ते ४ वाट्या साखर,वेलचीपूड, केशर,१/२ वाटी बदाम किवा काजूपूड (ऐच्छिक)
कृती- रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.
प्रतिक्रिया
31 Jul 2008 - 5:16 pm | प्राजु
मस्त. कालच मी तवसाळं केलं. फक्त त्यात तवसाच्या ऐवजी केळी घातली.
आज येऊन पाहते तो रव्याच्या वड्या. मस्त गं स्वातीताई...
सह्ही.... यात रंग घातला पिस्ता कलर किंवा केशराचा रंग.. तर आणखी छान दिसेल ना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Jul 2008 - 5:17 pm | स्वाती दिनेश
केशराच्या काड्या घालते मी,पिस्ता कलर घातला तरी मस्त दिसतील आणि मग वरून थोडे पिस्त्याचे काप भुरभुरायचे..
31 Jul 2008 - 5:17 pm | श्रीमंत दामोदर पंत
वाह........
एकदम सोप्पी आहे ग.................
अता करेन आणि बायकोला खायला घालेन............
मग ती सांगेल तुला कसे वाट्टय ते......................
धन्यवाद........................
31 Jul 2008 - 6:12 pm | स्नेहश्री
एवढ्या सोप्या वड्या......मस्तच........
स्वगतः आईला सांगायला पाहिजे करायला...... 8}
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
31 Jul 2008 - 8:29 pm | अनामिक
१ कप रवा अन ३.५ - ४ कप साखर? खुप गोड नाही का होणार??
(अतिशय गोड न आवडणारा) अनामिक
31 Jul 2008 - 9:12 pm | स्वाती दिनेश
नाही होत अतिगोड..
(अतिगोड न आवडणारी) स्वाती
31 Jul 2008 - 9:20 pm | धनंजय
मी इतका गोडघाशा आहे, की वड्या-बिस्किटे या टिकाऊ गोष्टी माझ्यापुढे एका बैठकीतच संपतात. :-(
त्यामुळे कोणाच्या घरी खाऊचा डबा घेऊन जायचा तरच करीन ही पा.कृ. :-)
31 Jul 2008 - 9:50 pm | चतुरंग
पण तशीही काही गॅरंटी नाही ना? कारण तिथे पोहोचेपर्यंत फक्त 'खाऊचा डबाच' घेऊन जाशील! ;) :B
चतुरंग
31 Jul 2008 - 10:45 pm | धनंजय
आधी नेण्यासाठी मोठा डबा भरला, आणि मग खाऊन अर्धा झाल्यामुळे खाऊ छोट्या डब्यात भरावा लागला!!!
प्राजु - हेच व्हायची शक्यता आहे... करीन अर्धा किलो वड्या पोचतील ५० ग्रॅम! ;-) तेव्हा मला बोलावलेल्या दिवशी फुल्ल स्वयंपाक करूनच ठेवायचा - माझ्या डब्याचा भरवसा नाही.
31 Jul 2008 - 10:59 pm | प्राजु
प्राजु - हेच व्हायची शक्यता आहे... करीन अर्धा किलो वड्या पोचतील ५० ग्रॅम! तेव्हा मला बोलावलेल्या दिवशी फुल्ल स्वयंपाक करूनच ठेवायचा - माझ्या डब्याचा भरवसा नाही.
तुम्हाला घरी बोलावताना स्वयंपाक तर तयार असेलच. पण इथे आल्यावर खाऊ बनवायला सांगू म्हणजे वाटेत संपायची भितीच नाही ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Jul 2008 - 10:09 pm | प्राजु
त्यामुळे कोणाच्या घरी खाऊचा डबा घेऊन जायचा तरच करीन ही पा.कृ.
तसे असेल तर... माझे तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण आहे की, माझ्या घरी (तो खाऊचा डबा घेऊन) नक्की या... ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Jul 2008 - 10:42 pm | यशोधरा
प्राजू, फक्त डबाच मिळेल गं, आतल्या वड्यांच काय?? :)
आणि स्वातीताई, वड्यांचा फोटू नाही टाकलास...
1 Aug 2008 - 12:26 am | विसोबा खेचर
उ त्त म!!
मार डाला....:)
1 Aug 2008 - 12:32 am | अनामिक
ह्या वड्यांना प्रसादाच्या शिर्याची चव येत असेल कदाचित, नाही?... येरवी वड्या करताना दुध नाही घालत ना म्हणून विचारले.
3 Nov 2008 - 1:48 pm | स्वाती दिनेश
जेव्हा पाकृ दिली तेव्हा वड्या केलेल्या नसल्याने फोटू नव्हता माझ्याकडे. ह्या दिवाळीत वड्या केल्या आणि फोटोही काढला तो डकवत आहे.
धन्यवाद.
स्वाती
3 Nov 2008 - 4:38 pm | चतुरंग
म्हणजे, "पाकृ दिली त्यावेळी त्रास दिला नव्हता, तो आता देते आहे", असं म्हणण्यासारखं आहे!!
(खुद के साथ बातां : लाळेरे बांधायला लावण्याचा त्रास दिल्याबद्दल संपादनाचे अधिकार वापरुन फोटू काढून टाकता येईल का रे रंगा? :W )
चतुरंग
3 Nov 2008 - 5:21 pm | विसोबा खेचर
ओक्के, सवडीने मिपावर टाकतो.. :)