स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
25 May 2014 - 7:43 pm

दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.

साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.

कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून मिरच्याना १ दिवस मुरु द्या. या मिरच्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात.
साहित्य

स्वादिष्ट मिरची

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

25 May 2014 - 7:46 pm | दिपक.कुवेत

पण लसुणहि कच्चाच ठेवला तर खाल्ल्यावर वास येईल ना?? का मुरल्यावर वास जात असेल?

मदनबाण's picture

25 May 2014 - 7:55 pm | मदनबाण

वाह्ह... हल्लीच आमच्या मातोश्रींच्या हातच्या अश्या मिर्च्या चापल्या आहेत, फक्त लसुण न-घालता !

तोंडी लावायला झकास आहेत..

सुहास झेले's picture

26 May 2014 - 12:01 am | सुहास झेले

झक्कास... पण आमच्याकडे बिन लसणीच्या बनतात :)

आत्मशून्य's picture

26 May 2014 - 9:18 am | आत्मशून्य

धन्यवाद.

आम्हीपण बिन लसणाच्या बनवतो.
लसूण खुप तिखट असते ना? *i-m_so_happy*

पैसा's picture

26 May 2014 - 2:56 pm | पैसा

चटकदार! मला हा पदार्थ नवीन आहे.

मुक्त विहारि's picture

26 May 2014 - 3:20 pm | मुक्त विहारि

झक्कास...

इशा१२३'s picture

27 May 2014 - 8:57 pm | इशा१२३

नविन पदार्थ समजला...

त्रिवेणी's picture

28 May 2014 - 12:29 pm | त्रिवेणी

तोंपासु. मोहरीची डाळ विकत मिळते की घरी करावी लागेल.

जागु's picture

28 May 2014 - 12:43 pm | जागु

मस्तच.

निवेदिता-ताई's picture

29 May 2014 - 7:36 pm | निवेदिता-ताई

मस्त

अनिता ठाकूर's picture

4 Jul 2014 - 11:19 am | अनिता ठाकूर

मोहरीची डाळ वाण्याकडे मिळते.

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2014 - 11:55 am | प्रभाकर पेठकर

गुजराथी वाण्याला 'राई कुरीया' सांगितल्यास लगेच समजेल. मराठी वाण्याला 'मोहरीची डाळच' सांगावी. कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.

>>कारण कांही समजले नाही तर 'आमच्याकडे नाहीए' सांगण्याची त्यांची प्रवृत्ती असते.
असं नाही हो!! इथल्या मारवाडी दुकानदारांची पण तीच पद्धत आहे. मागे एकदा एका दुकानदाराला ओट फ्लेक्स द्या म्हटलं तर म्हणे आमच्याकडे नाहीये. समोर ठेवलेलं क्वेकर ओट्सचं पुडकं दाखवतं म्हटलं 'ते काय आहे मग?'. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला. ;)

चित्रगुप्त's picture

4 Jul 2014 - 6:46 pm | चित्रगुप्त

इथल्या मारवाडी दुकानदारांची

इथल्या म्हणजे कुठल्या ??
भारतात अजूनही ओटस वगैरे विशेष प्रचारात नाहीये, त्यामुळे खुद्द दुकानदाराला सुद्धा माहीत नसू शकेल.

इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! मुद्दामून पुण्यातल्या लिहायचं टाळलं होतं, आता विचारलंच आहात तर लिहायला हवं. ;)

चित्रगुप्त's picture

4 Jul 2014 - 11:30 pm | चित्रगुप्त

इथल्या म्हणजे पुण्यातल्या

व्वा.. सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय याची पुन्हा एकदा खात्री पटली. :)

अनिता ठाकूर's picture

4 Jul 2014 - 12:03 pm | अनिता ठाकूर

*dash1*