साहित्य मेथी धिरडे पीठः
६ वाट्या तांदूळ
२ वाट्या तूरडाळ
२ वाट्या चणाडाळ
२ वाट्या उडीदडाळ
२ वाट्या ज्वारी
१ वाटी गहू
१ वाटी धणे
१/२ वाटी मेथीदाणे
वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा.
(प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते)
साहित्यः
२ वाट्या तयार धिरडे पीठ
१०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते)
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल
पाकृ:
पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे.
एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे.
नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे.
थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी.
गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
19 May 2014 - 2:13 pm | सुहास झेले
खल्लास ... धिरडे अतिशय आवडतात :)
19 May 2014 - 2:36 pm | मदनबाण
आह्ह... काय मस्त जाळीदार धिरडे झाले आहे ! :)
19 May 2014 - 2:58 pm | सूड
>>मस्त जाळीदार धिरडे झाले आहे !
अगदी हेच लिहायचं होतं !! *ok*
19 May 2014 - 10:19 pm | सस्नेह
अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो.
सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.
19 May 2014 - 11:29 pm | सानिकास्वप्निल
ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :)
धन्यवाद.
13 Jun 2014 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर
जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.
19 May 2014 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाळीदार धिरडे. *good*
-दिलीप बिरुटे
19 May 2014 - 2:56 pm | मुक्त विहारि
छळवादी मंडळींपैकी प्रमूख सुत्रधार.
कठीण आहे.
आत्ता आत्ता कुठे काही जण बॅचलर पा.क्रु. टाकत होते....
जावु दे, काय बोलणार?
19 May 2014 - 3:05 pm | प्यारे१
+१११
सूत्रधार च नाही तर प्रमुख 'कार्यकर्ती'! ;)
19 May 2014 - 5:00 pm | दिपक.कुवेत
प्यारेस अनुमोदन!
19 May 2014 - 7:55 pm | प्यारे१
तू गप रे, तुला अलाऊड नाही.
तू पण त्यांच्यातलाच आहेस. 'प्रशांत भूषण/योगेन्द्र यादव' च्यामारी! ;)
19 May 2014 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह...............
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल
शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये!
19 May 2014 - 3:17 pm | कवितानागेश
यम्मी.....
तयार पीठाची आयडीया छान आहे.
19 May 2014 - 3:29 pm | michmadhura
कमी वेळेत होउ शकणारी चवदार पाकॄ. *ok*
19 May 2014 - 3:36 pm | पिंगू
खल्लास.. कसली अप्रतिम फोटोजिनिक जाळी पडली आहे.
19 May 2014 - 5:23 pm | सूड
जाळी पडत नाही रे, जाळी येते. ;)
19 May 2014 - 6:56 pm | स्पंदना
नाही जाळी पडतेच!!
19 May 2014 - 10:30 pm | सूड
>>नाही जाळी पडतेच!!
असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*
19 May 2014 - 11:30 pm | सानिकास्वप्निल
+१ एकदम करेक्ट :)
19 May 2014 - 3:48 pm | अजया
आता पिठ करावे लागणार !! मग धिरडी....लावा कामाला ;)
19 May 2014 - 5:42 pm | सखी
असचं म्हणते :)
19 May 2014 - 4:23 pm | उदय के'सागर
कोकणी अंबोळी ची पाकृ साधारण अशीच असते ना?
बाकी तुझ्या पाकृला द्यायची माझ्याकडची विशेषणं तरी संपली ब्वा अता :)
19 May 2014 - 4:58 pm | दिपक.कुवेत
छानच झाली आहेत जाळिदार धीरडि. फोटोहि सुरेख.
19 May 2014 - 7:33 pm | रेवती
अगदी अगदी, हेच प्रमाण व कृतीही अशीच! बाकी कौतुक नेहमीप्रमाणेच करते, ते समजून घ्यावे.
19 May 2014 - 7:50 pm | मधुरा देशपांडे
सुरेख फोटो.
19 May 2014 - 10:02 pm | इशा१२३
सुरेख जाळीदार धिरडी...मस्तच..
19 May 2014 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!
20 May 2014 - 12:13 pm | मनिष
मस्त दिसतेय! पण फक्त १/२ कपात मेथीची चव लागेल का? धिरडे करतांना थोडी ताजी मेथी चिरून टाकली तर कसे लागेल?
22 May 2014 - 5:00 am | सानिकास्वप्निल
१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत.
धन्यवाद :)
21 May 2014 - 12:44 pm | आवडाबाई
मस्त !!
हे पीठ थोडे जाडसर दळावे लागते काय ?
21 May 2014 - 1:03 pm | शिद
ए१ जाळीदार धिरडे... मस्तच.
21 May 2014 - 2:18 pm | पैसा
एकदम खल्लास आहेत धिरडी!
22 May 2014 - 8:52 am | निलेश-२७
वा वा खुपच छान !!
23 May 2014 - 12:06 am | हरकाम्या
आजच करुन पाहिली अतिशय उत्तम.सानिकाताईंचे अभिनन्दन.
2 Jun 2014 - 8:40 pm | आयुर्हित
छान लेख आणि फोटोसुद्धा.
साधि, सोप्पी पण आरोग्यदायी पाक्रु!
धन्यवाद.
3 Jun 2014 - 5:33 pm | अनन्न्या
माझे प्रमाण थोडे वेगळे आहे, यावेळी या प्रमाणात करून पाहते. मी दळताना मेथी नाही घालत, मुगडाळ, मसूरडाळ घालते.
12 Jun 2014 - 6:11 pm | निंबुडा
थालीपीठाच्या भाजणीची अशी धिरडी ट्राय करावीत का? बनतील का?
12 Jun 2014 - 7:34 pm | मुक्त विहारि
जमले तर, इथे पा.क्रु. टाका.
12 Jun 2014 - 8:23 pm | विवेकपटाईत
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.
12 Jun 2014 - 8:50 pm | केदार-मिसळपाव
हीला सांगतोच आता हे करायला.