मोकल / मोकळी भाजणी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
3 May 2014 - 3:48 pm

अजून एक झटपट, पौष्टीक, खमंग पाककृती :)

साहित्यः

१ वाटी थालीपिठाची भाजणी
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
चिमूट्भर ओवा
सजावटीसाठी ओले खोबरे व चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

भाजणीत लाल तिखट, मीठ व थोडे पाणी घालून सरसरीत भिजवावे.

.

पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, ओव्याची फोडणी करावी.(कढीपत्ता हवे असल्यास तो ही घालावा)
हिंग, हळद व कांदा घालून परतून घ्यावे.
त्यात भिजवलेली भाजणी ओतून एकत्र करावे.
झाकून वाफ काढावी.
भाजणी पूर्ण शिजली की गॅसवरुन उतरवावी.

.

वरुन ओले खोबरे व कोथींबीर पेरावी व आलं+मिरची वाटून लावलेल्या ताकासोबत सर्व्ह करावी.

.

ही भाजणी मोकळी व खमंग लागते. नाश्त्याला, मधल्या वेळचे खाणं म्हणून झटपट बनवता येतं.
थालीपिठाला, वड्यांना चांगला पर्याय आहे.

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ's picture

3 May 2014 - 4:28 pm | भावना कल्लोळ

सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना's picture

3 May 2014 - 4:42 pm | स्पंदना

आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते?
मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला.
बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा's picture

3 May 2014 - 5:14 pm | पैसा

भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

सुहास झेले's picture

3 May 2014 - 5:57 pm | सुहास झेले

पुन्हा पुन्हा काय तेच तेच सांगायचे.... :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2014 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

छान.....!

एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?..
मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

रेवती's picture

3 May 2014 - 6:53 pm | रेवती

सुरेख फोटू. खमंग पाकृ!
हा प्रकार करून बघणार. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सानिकातै, तुम्ही आता प्रसिद्ध कराच एक सचित्र पाककृती पुस्तक (अर्थात अगोदरच केले नसेल तर) !

मुक्त विहारि's picture

3 May 2014 - 7:48 pm | मुक्त विहारि

आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते.

मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो.

मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो.

एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते.

थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते.

बादवे,

आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

आयुर्हित's picture

3 May 2014 - 10:45 pm | आयुर्हित

सुंदर फोटो आणि उत्तम पाकृ!

धर्मराजमुटके's picture

3 May 2014 - 11:03 pm | धर्मराजमुटके

ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ?
संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

सानिकास्वप्निल's picture

4 May 2014 - 1:50 am | सानिकास्वप्निल

बनवून बघा आणि सांगा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2014 - 1:19 am | डॉ सुहास म्हात्रे

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

सानिकास्वप्निल's picture

5 May 2014 - 2:58 pm | सानिकास्वप्निल

हाहाहा नक्की

दिपक.कुवेत's picture

4 May 2014 - 12:14 am | दिपक.कुवेत

अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१'s picture

5 May 2014 - 10:33 am | Prajakta२१

आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात
ती मधून मधून हलवावी लागते
पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला
धन्यवाद

सानिकास्वप्निल's picture

5 May 2014 - 3:02 pm | सानिकास्वप्निल

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते.
थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी.

असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :)

धन्यवाद.

बालगंधर्व's picture

5 May 2014 - 10:40 am | बालगंधर्व

सनिका तै, कुहुप मत्स. तुमे अनि अपरना आक्का मिलुन अमाला मारनार हाआत.

कईती चहान लिहईता थुमई!!

दिपक.कुवेत's picture

5 May 2014 - 12:21 pm | दिपक.कुवेत

ठरवुन सुद्धा मला असं कधी लिहिता येत नाहि.

सुहासदवन's picture

6 May 2014 - 8:18 pm | सुहासदवन

तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना!

पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले,
त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता?

ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!

तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

निवेदिता-ताई's picture

5 May 2014 - 6:22 pm | निवेदिता-ताई

सुंदर ग

मस्तच गं... भुक लागली आता. माझी आई पण अशीच बनवते मोकळी भाजणी.

अनन्न्या's picture

6 May 2014 - 7:59 pm | अनन्न्या

मी डब्यातून बय्राचदा कॉलेजला नेत असे, माझ्या मैत्रिणीना खूप आवडायची ही मोकळ भाजणी!

यशोधरा's picture

6 May 2014 - 8:04 pm | यशोधरा

भन्नाट दिसते आहे पाकृ!

रॉजरमूर's picture

9 May 2014 - 12:20 am | रॉजरमूर

खूप छान … मी आजच करून बघेन *new_russian*

ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.

मुक्त विहारि's picture

31 May 2014 - 3:21 pm | मुक्त विहारि

आता जरा मनावर घ्यायलाच पाहिजे...

सानिकास्वप्निल's picture

2 Jun 2014 - 11:40 pm | सानिकास्वप्निल

मस्तं जमली की :)

ताकाचे हबके मारायची कल्पना आवडली.

धन्यवाद.